मराठी कादंबरी संक्रमण

#Sankraman #Marathi_ebook        #संक्रमण #मराठी_पुस्तक 

author – #Abhishek_Buchake

http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Abhishek%20Buchake&BookType=1

#राजकारण #शेअर_मार्केट #शेती #भावनिक_गुंतागुंत  #अर्थकारण   #मैत्री  #स्थित्यंतर

#Politics  #Share_Market   #Economy   #Relationship  #Friendship

Sankraman

सरसंघचालक ते डॉनल्ड टृंप – उत्तरार्ध

#Mohan_Bhagvat to #Donald_Trump    #राष्ट्रवाद    #दुभंगलेलं जग   #मुखवटे_अन_चेहरे

मागील लेखापसून पुढे

…आरएसएस किंवा सरसंघचालक हे कट्टर #राष्ट्रवाद ह्यावर बोलत असतात अन त्यांचं राजकारण-समाजकारण यावरच अवलंबून आहे. हिंदुस्थानावर पहिला हक्क असावा तो हिंदूंचा आणि भारत हे हिंदू राष्ट्र आहे असा अट्टहास त्यांचा ह्याच कारणांसाठी असतो. येथे राहणार्‍यांचा धर्म कोणताही असो, पण ते संस्कारांनी हिंदू असावेत अशी ही विचारधारा आहे. मग त्यातूनच #योगासन, #सूर्यनमस्कार #आयुर्वेद वगैरे गोष्टींची अनिवार्यता येते. ह्या सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ काढावा, तो म्हणजे इतर धर्मियांनी फार वाव न देता येथील हिंदूंचं प्रबळीकरण!

आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या बुद्धिजीवी, विचारवंत, पुरोगामी, secular वगैरे स्वतःला समजणार्‍या लोकांना संकुचितपणाच्या आणि भेद निर्माण करणार्‍या वाटतात. पण यांचीही आता गोची झाली आहे. वारंवार ह्या भूमिकेवर टीका करणारे पाश्चिमात्य राष्ट्र आज स्वतःच अशा एका नेत्याला पाठिंबा देत आहेत. तो कोण? तर #डॉनल्ड_टृंप. एरवी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असं संबोधणार्‍याची खिल्ली उडवणारे राष्ट्रांना तशाच एका नेत्याची गरज वाटावी? अमेरिकेकडे डोळे लाऊन बसलेल्या भारतातील पुरोगामी अन विचारवंत मंडळींना ह्या टृंप महाशयांच्या येण्याने चांगलाच धक्का बसला आहे. भारतातील भेद अन द्वेषपूर्ण राजकारण-समाजकारणाला नावे ठेऊन अमेरिकेची उदाहरणे देणारे आता गायब झाले आहेत. ९/११ ला अमेरिकेवर हल्ला झाला अन जगाची सगळी समीकरणे बदलून गेली. मुस्लिम समाजाला वारंवार आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं जाऊ लागलं अन त्याच नजरेतून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. केवळ एका हल्ल्याने जगाचे डोळे उघडले गेले आणि अनेक देशांत मुस्लिम समाजावर अनेक प्रतिबंध आले अन त्यांना दूर केलं जाऊ लागलं. भारतात मुस्लिम समाजाने अनेक शतके जुलमी राज्य केलं. अर्थात तो एक कटू इतिहास आहे. पण त्याचे प्रतिसाद आज उमटत असतात. कट्टर हिंदुत्ववाद त्याच आठवणींतून जन्माला येतो अन काहीतरी द्वेषपूर्ण बाहेर पडतं. भारतातील कट्टर हिंदूंना नेहमी ह्या टीकेला सामोरं जावं लागायचं जे अमेरिका अन अन्य राष्ट्रांतील तत्सम घटनेने मवाळ झालं. इसिस नावच्या मुस्लिम दहशतवादी संघटनेने तर जगाला हादरवून सोडलं. मुस्लिम समाजावर अजून बंधने वाढली. त्यांना संशयाने पाहिलं जाऊ लागलं. युरोपात बाहेरचे लोंढे येण्याचं प्रमाण वाढलं अन युरोप अशांत झाला. त्यातूनच ब्रिटन युरोपिय संघातून बाहेर पडला. तिकडे जगाचे कैवारी असलेल्या अमेरिकेत अध्यक्षीय पदाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले. सत्तेची दोन टर्म पूर्ण करणार्‍या #बराक_ओबामा यांचा वारसदार येणार होता. आजवरच्या इतिहासात ओबामा हे वेगळे राष्ट्राध्यक्ष राहिले यात वाद नाहीत. त्यातल्या त्यात अहिंसा वगैरे मानणारे हे राष्ट्राध्यक्ष! पण अमेरिकेत एक असंतोष खदखदत होता आणि तो आजही आहे. बाहेरून आलेले आणि त्यातही मुस्लिम समाज यावर मूल अमेरिकन नाराज आहेत. त्यांची जीवनशैली अन त्यांचा धर्म यावर जगभरात आक्षेप नोंदवले जात असताना अमेरिकन नागरिक त्यांच्यावर नाराज असणं साहजिक आहे. अमेरिका ही भारत नाही हे त्याचं मूळ. इतिहासात मुस्लिमांनी (बादशहांनी) हिंदूंवर अत्याचार केले अन राष्ट्र लुटले तरी तळागाळातील हिंदू हा त्यांना परका मानत नाही, उलट भाऊ मानतो. पण अमेरिका वेगळी आहे. तेथे परकीय अन ह्या मातीतले असा भेद होता अन आहे. तेथील अर्थकारण अन समाज वेगळा आहे. खासकरून अर्थकारण. महाराष्ट्रात ठाकरे हे भूमिपुत्रांसाठी आग्रही असतात ते सर्व देशांत असतं. ब्रिटन तर युरोपातून वेगळा झालाच ह्या मुद्दयासाठी. तुमचं ओझं आम्हाला नको ह्या भूमिकतून. त्याच आशयाची लढाई आज जगभर चालू आहे. कुठे हिंसक पद्धतीने, कुठे आर्थिक पातळीवर, कुठे धोरणात्मक तर कुठे शांतपणे!

          डॉनल्ड टृंप यांनी अनेक द्वेषपूर्ण वक्तव्ये केली आहेत. काही निंदनीयही. त्याचा अनेक पातळीवरून निषेध अन विरोधही झाला. पण अमेरिकेत काही वेगळे पायंडे आहेत. डॉनल्ड टृंप हे कोणी माथेफिरु किंवा सरसंघचालक यांच्याप्रमाणे बिगर-राजकीय संघटनेचे अध्यक्ष किंवा अशासकीय व्यक्ति नाहीत. ते तेथील अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आणि ती उमेदवारी मिळवण्यासाठी जी निवडणूक असते ती निवडणूक ते जिंकले आहेत. इकडे भारतात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासारखी व्यक्ति, जी कुठल्याही सरकारी पदावर नाही, लोकप्रतिनिधी नाही आणि तरीही यांचं वक्तव्य देशपातळीवर गंभीरपणे घेतलं जातं. टृंप तर उद्याचे अध्यक्ष आहेत! आणि विशेष म्हणजे त्यांना विविध स्तरांतून पाठींबाही मिळत आहे. म्हणजे जे लोक भेदभाव, द्वेष याला विरोध करून उदारमतवाद अन स्वातंत्र वगैरेच्या आदर्श मानले जातात त्यांनीच टृंप यांच्यासारख्या व्यक्तिला पाठिंबा दिला आहे. हे कसलं लक्षण मानायचं?

          राजकारण हे केवळ राजकरणी करतात असा गैरसमज असतो. मुखवटे तर जनताही घालत असते. आपलं एक रूप झाकण्यासाठी. भारतात येऊ. भाजपने काहीतरी गांधीवादी समाजवाद वगैरे मार्ग अवलंबला तेंव्हा त्यांना देशभरातून केवळ दोन जागा मिळाल्या. कट्टर हिंदुत्ववाद अवलंबला अन बाबरी मशीद पाडली तेंव्हा १८२! हे जनतेचं खरं अन मुखवट्यामागचं रूप असतं. जनतेलाही मनातून एक भूमिका पटलेली असते. जशी कट्टर हिंदुत्वाची. पण आपण उघडपणे ती मान्य केली तर आपला काहीतरी नुकसान होईल यासाठी आतून एक भूमिका घेऊन वरुण एक मुखवटा परिधान केला जातो. ह्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपचं अनेक राज्यांत अन देशात सरकार आलं. महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर-कॉंग्रेस सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलं. १९९५ ला आलेलं सरकार हे ‘कट्टर हिंदूंचं’ होतं असं शिवसेना सांगते त्यात प्रामाणिकपणा असतो. जर समझा, जनतेला सर्वसमावेशक वगैरे व्हायचं असतं तर अशी सरकारे आलीच नसती. ती येतात कारण मुखवट्यांमगे चेहरे असतात. मुंबईत मराठीच्या जिवावर वीस वर्षे शिवसेना राज्य करत आहे, तरीही सेनेला संकुचित म्हणणं किंवा भाजपला-सेनेला संकुचित म्हणणं हे त्या मतदारांचा अपमान आहे. म्हणजे मुंबईत सेना-मनसेला मत देणारा संपूर्ण मराठी माणूस संकुचित आहे असा अर्थ काढावा का? मोदींच्या माथ्यावर गुजरात दंगलीचा शिक्का होता. मोदी भारतासारख्या ‘secular’ देशाचे पंतप्रधान कधीच होऊ शकणार नाहीत असं अनेक विचारवंत म्हणाले. पण मोदी ऐतिहासिकपणे पंतप्रधान पदावर आरुढ झाले. त्याला विकासाची स्वप्ने किंवा कॉंग्रेसचा नाकर्तेपणा अशी कितीही नावे दिली तरी किमान सुशिक्षित जनतेला तर हे माहितीच होतं की मोदी हे आरएसएस नावाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेत तयार झालेलं रसायन आहे. तरीही त्यांना मते दिली कारण तो कट्टरपणा अन संकुचितपणा प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतो. अशा सरकारांना ‘भावनेवर निवडून दिलेलं’ सरकार अशी टीका सहन करावी लागते. मग उदारमतवाद, secularism वगैरे हेही भावनात्मक मुद्देच आहेत. लोकांनी काय आजवर ह्याच एका मुद्द्यावर इतरांना निवडून दिलं काय?

अमेरिकेत डॉनल्ड टृंप जे बोलत आहेत टे कदाचित तेथील लोकांच्या मनातील असेल. त्याशिवाय कोणताही राष्ट्रीय अन अंतरराष्ट्रीय नेता अशा वल्गना करणार नाही. आज त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे, पण हेच टीका करणारे उघडपणे त्यांचं (इच्छा असूनही) समर्थन करू शकत नाहीत ही गोची आहे. पण उद्या मत देताना ते त्यांनाच मत देतील. असा नेता राष्ट्राचा अध्यक्ष होणार नाही असं अनेकजण सांगत असले तरी उद्या टृंप अध्यक्ष झाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण संकुचितपणा उघडपणे दाखवणारे कमी असले तरी मनात दाबून वेळ आल्यावर ते बाहेर काढणारे भरपूर असतात. हा मुद्दा केवळ मुस्लिम विरोधाचा नाही. टृंप आणि भागवत हे दोन भिन्न राष्ट्रातील नेते जे बोलत आहे त्याचे संदर्भ वेगळे असले तरी भावना एकच आहे. ते म्हणजे त्यांच्या दृष्टीकोणातून प्रखर राष्ट्रवाद! हा राष्ट्रवाद केवळ विद्रूप भावनांचा नसून त्याला काहीतरी वास्तविकतेचे अर्थ आहेत. ब्रिटन युरोपातून वेगळा झाला तो याच भावनेतून. मतदान झालं ते त्याला अनुसरूनच. उद्या अमेरिकेत होणार नाही कशावरून? मुंबईत आझाद मैदान दंगल सहन केली जाऊ शकते ती मुस्लिमांना परकं न समजण्याच्या भावनेतून. पण अशा गोष्टी पाश्चिमात्य देशात सहन केल्या जात नाहीत हे सत्य आहे. फ्रांस राष्ट्राने असे हल्ले अलीकडच्या काळात अनुभवले. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. तथाकथित पुरोगामी किंवा निधर्मवादी सर्वसमावेशक वगैरे भूमिका मांडत असतात अन त्यालाच अंतिम सत्य मानून चालतात. उलटपक्षीय कट्टरवादी टीकेचे धनी होऊनही यशस्वी होत जातात. हे सगळं कशाचं लक्षण आहे. भारताने #वसुधैव_कुटुंबकम चा विचार दिला तो आज गरजेचा आहे. केवळ भौतिक सीमारेषा आखून वेगवेगळ्या राष्ट्रवादाच्या भूमिका घेतल्या जात आहेत. अलीकडे माझं अन पलीकडे तुझं, असा तो मुद्दा. हे केवळ भारतात होतं आणि आहे असं नाही; तर संपूर्ण जग यात अडकलं आहे. जगावर राज्य करणारे ब्रिटन, अमेरिका, युरोप, मध्य-आशियातील राष्ट्रे सगळीच संकुचितपणा अन फुटीरतावाद याचे धक्के सहन करतो आहे. यावर केवळ #महात्मा गांधींची समतेची अन अहिंसेची तत्वे मात करतील असं म्हणणं म्हणजे पोरकटपणा आहे. जग कलहाच्या उंभरठ्यावर आहे.

#सरसंघचालक काय म्हणाले? पूर्वार्ध

#समान_नागरी_कायदा    #हिंदू_लोकसंख्या  

अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे #सरसंघचालक #मोहन_भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की, हिंदूंना लोकसंख्या वाढवण्यापासून कोण रोखलं आहे. असाच काहीतरी अर्थ होता त्यांचा. आता माध्यमांनी त्यांचं संपूर्ण भाषण न दाखवता एवढच ‘खळबळजनक’ म्हणून सर्वत्र हेच वाक्य दाखवलं. माझ्या अंदाज्यानुसार त्यांचं म्हणणं हे ‘समान नागरी कायदा’ ह्या मुद्दयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी असावं. तसं ते असायला काही हरकत नाही. पण त्यांच्या वक्तव्याची टिंगलही झाली अन टोकाचा विरोधही झाला. पण त्यात वस्तुस्थिती आहे याकडे कोण लक्ष दिलं नाही. आरएसएस यांची विचारसरणी काय आहे हे काही लपून नाही. देशाबाद्धल त्यांची स्वतःची काही स्वप्ने आहेत ज्यासाठी ते काही धोरण अवलंबत असतात. आता ती चुकीची की बरोबर हे कोण ठरवणार? पण एक आहे की, त्यांनाही ‘हिंदुस्तान’ हा बलशाली अन प्रगत पाहायचा आहे. अर्थात त्यांच्या वाटा, मार्ग अन पद्धती वेगळ्या असतील. त्यांना केवळ दोष देऊन भागणार नाही.

नुकत्याच झालेल्या जनगणणेत काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या आहेत. त्यात असं दिसून आलं आहे की गेल्या दहा वर्षांत मुस्लिम धर्माची लोकसंख्या ०.८ टक्के वाढली आहे (वाढीचा दर असा आहे) आणि तीच हिंदूंची ०.७ टक्क्यांनी घटली आहे. खरं तर याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. पण आपल्याकडील स्वतःला secular समजणारी माध्यमे आणि विचारवंत यावर फार भाष्य करत नाहीत. किंबहुना निखिल वागळे यांच्यासारख्या ज्ञानी माणसालाही ही टक्केवारी किरकोळ आहे असं वाटतं. हे म्हणजे अगदी धन्य आहे! सरसंघचालक ह्याच स्थितीकडे अंगुलीनिर्देश करत होते. संघ आणि हिंदुत्ववादी लोकांचं म्हणणं (याला पुरोगामी लोक आवई म्हणतात) असं आहे की, एक काळ येईल जेंव्हा हिंदुस्थानात मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या बरोबर किंवा अधिक होईल. ही त्यांची भीती आहे. पण त्यात वास्तविकता नाही असं म्हणता येणार नाही. त्यासाठी फार लांब जायची गरज नाही. एकेकाळी #अखंड_हिंदुस्तान वगैरे होता ज्यात आजचा बराच आशिया खंड येतो. म्हणजे अफगाणिस्तान हा प्रदेश आधी पुर्णपणे हिंदूबहुल भाग होता, म्यानमार-ब्रम्हदेश येथेही हिंदू बहुसंख्य होते. पण आज ही मुस्लिम राष्ट्र आहेत. किंवा तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत. तेवढं लांब जायचं नसेल तर मुंबईच घ्या. मराठी माणसाचं प्रभुत्व असणार्‍या मुंबईत आज इतर भाषिक बहुसंख्य होऊन बसले आहेत. यासाठी अनेक दशकांचा कालावधी ओलांडावा लागला असला तरी हा इतिहास विसरता येणार नाही. हे सगळे गाफिल राहिले म्हणूनच ह्या गोष्टी घडल्या. जर मुस्लिम लोकसंख्या वाढीवर काही प्रतिबंध लावले नाहीत तर येणार्‍या सात-आठ दशकांत, मुस्लिम एक-एक टक्क्यांनी वाढत जातील अन हिंदू एक-एक टक्क्यांनी कमी होत जातील आणि काहीतरी विपरीत परिस्थिती होईल असा दूरचा विचार काही हिंदुत्ववादी मांडत आहेत, ज्यात तथ्य आहे. कारण सगळ्या सुधारणा हिंदूंमध्ये करायच्या असा आपल्याकडच्या ‘समाजसेवी’ अन ‘पुरोगाम्यांमध्ये’ हट्ट आहे. मुस्लिम धर्मात पुढारलेपण यासाठी फार खटाटोप होत आहेत असं दिसत नाही. कारण जास्तीची अपत्य हे कुटुंबालाच जड होतात अन आर्थिक मागासलेपण वाढत जातं हे आजच्या काळचं सत्य आहे. यासाठी समान नागरी कायदा आणून का होईना ह्या समाजात पुढारलेपण आणावं आणि समतोल राखावा अशी संघाची पहिल्यापासून मागणी आहे.

भारतात अनेक धर्म अतिशय शांतिपूर्वक अन आनंदाने जगत आहेत. पारशी लोक, जे जगातून नाहीसे होत आहेत ते भारतात आनंदाने जगत आहेत आणि भारताच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावत आहेत. भारतीय संस्कृतीने येथे येणार्‍या प्रत्येकाला आपलसं करून घेतलं आणि उपरेपणाची जाणीव न होऊ देता येथील म्हणूनच ते जगत आहेत. आठशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात दाखल झालेला मुस्लिम समाज, जो अनेक शतके सत्ताधारी राहिला तो समाजही आज इथलाच बनून राहिला, ही भारतीय संस्कृती आहे. म्हणूनच बहुसंख्य भारतीय मुस्लिम हा इतर देशांतील मुस्लिमांपेक्षा वेगळा राहतो, वागतो आणि जगतो. याचा उल्लेख #भालचंद्र_नेमाडे आणि #सदानंद_मोरे यांच्याकडून ऐकल्या-वाचल्याचं आठवतं आहे. आपल्या हिंदू समाजानेही त्यांना इथलाच मानला. पेशवे, हिंदू राजे यांनीही मोगली वंशज गादीवर बसवून राज्य केले पण स्वतः त्या सिंहासनावर बसले नाहीत. अगदी शहाजीराजे यांनीही निजामाच्या कुठल्यातरी आठ-दहा वर्षाच्या पोराला गादीवर बसून राज्य केलं पण स्वतः छत्रपती नाही झाले. याचा अर्थ असा की, ही सर्वांनी मुसलमानांना परका न समजता ह्याच मातीतील म्हणून स्वीकार केला होता. अर्थात, #वसुधैव_कुटुंबकम ह्या संस्कारांचं ते फलित होतं. पण हिंदू संस्कृतीचे पाईक म्हणवून घेणार्‍या आरएसएस ला हे मान्य नसावं कदाचित. कारण हिंदुस्थानात धर्माने हिंदू हेच प्रबळ, सत्ताधीश अन बहुसंख्य असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. इतिहासातील अंनुभावातून हे शहाणपण आलं आहे. कारण आशिया खंडाच्याही बाहेर पसरलेला हिंदू कमी-कमी होत आकुंचन पावला आहे.

आरएसएस ही संघटना काय राजकारण करते यावर वाद असतील, पण आपले राष्ट्र याबद्धल त्यांच्याही काही संकल्पना आहेत. भारत प्रबळ व्हावा ही तर सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे आरएसएस किंवा सरसंघचालक यांच्या वक्तव्याचा केवळ एका बाजूने अर्थ न काढता वास्तविक मंथन केलं पाहिजे. एरवी secular वादावर कोणीही भाषण करून समाजसेवी बनत आहे.

to be continue…

Free Marathi Books

Download #‎Marathi‬ e book in the form of ‪#‎Android‬ app FREE…. FREE… FREE….
मराठी पुस्तकं आता ई-बूक स्वरुपात… तेही अगदी मोफत…

1 #‎Something‬ Samajik ‪#‎समथिंग‬ ‪#‎सामाजिक‬
समाजात ठिकठिकाणी घडणार्‍या आणि आपल्याला दिसणार्‍या, जाणवणार्‍या कथा… अनुभव… मनाला स्पर्शतील अशा घटना… त्यांचं चित्रण ह्या कथासंग्रहात केलं आहे…

http://latenightedition.in/somethingsamajik.apk

2 ‪#‎Satarfatar‬
‪#‎सटरफटर‬ म्हणजे निरर्थक, कमी महत्वाचं किंवा इकडचं-तिकडचं… अतिशय साधारण घडामोडींना जरा अतिशयोक्ति करून विनोदी स्वरुपात त्याची कथा स्वरुपात मांडणी केलेली आहे. शिवाय यात ‪#‎मराठी‬ ‪#‎कविताही‬ आहेत…

http://latenightedition.in/satarfatar.apk

Owned by – latenightedition.in

देव पावला

#मराठी_लघुकथा #Marathi Short Story

फार फार अलिकडची गोष्ट आहे. दिवस जरी बेरोजगारीचे असले तरी वेळ मात्र संध्याकाळची होती! बेरोजगारी ही आमच्या पाचवीलाच पूजलेली होती (आम्ही पाचवीपासून बेरोजगार नाही, ही फक्त म्हण आहे.) असो. तर असेच आम्ही आमच्याचसारख्या एका टुकार बेरोजगार मित्रासमवेत हुंदडावयास निघालो. अख्खं गाव हुंदडलो. नंतर मात्र थकलो होतो. मित्राने पेट्रोलच्या भावाचीही (rate, not brother) आठवण करून दिली. कुठेतरी विसावा मिळावा म्हणून एका शांत निवांत स्थळी जाण्याचा विचार केला. गावाच्या बाहेर हनुमानाचं, अर्थात रामायणातील मारुतीरायाचं एक प्राचीन मंदिर होतं. शांत जागा, आजूबाजूला हिरवळ, जुनी विहीर, फार तर चार-दोन भक्त असा तो थाट! हनुमानाचं मंदिर असल्याने त्याचा अजून लैला-मजनू मेळाव्याची जागा म्हणून वापर झाला नव्हता. प्रेमप्रकरणात ब्रंम्हचार्‍याची संगत कशाला असा तो विचार. आम्ही तिकडेच कूच करायचे ठरवले. पुन्हा हुंदडत-हुंदडत तिथे जाऊन पोचलो. वार हा शनिवारचा होता; चांगलच आठवतं! तसेही आमच्या राशीस शनीची साडेसाती चालू आहे असं एका विख्यात पंडिताने आमच्या मातोश्रीस सांगितले होते अन मातोश्रीन्नी तर त्याचे उदाहरणासहित स्पष्टीकरणे आमच्यासमोर सादर केली होती. भला मोठा विषय होता तो, उगाच विषयांतर होईल आता. तूर्तास इतके सांगतो की, शनिवारी आम्ही मारुतिरायाचं दर्शन घ्यावं असे फर्मान सुटले. आम्हासही ते निमूटपणे मान्य करावे लागले. अर्थात, आम्ही मंदिरात गेलो की नाही हे कळविण्यास कोण हेर ठेवला नव्हता ही खात्री नाहीच असेही नाही! शिवाय आम्ही ज्या मित्रासमवेत बोंबलत फिरत होतो तो बिचारा देवभोळा मनुष्य. शनिवारी शनि अन मारुती, शुक्रवारी बालाजी, सोमवारी महादेव, गुरुवारी साई के चरण अशा तीर्थयात्रा तो गावातच करत असतो. त्याचा देवभोळेपणा इतका व्यावहारिक होता की शुक्रवारी बालाजीला आल्यावर जवळच असलेल्या शनि मंदिरात जाण्यात तो वेळ वाया घालत नसे. कधी-कधी आम्हासही त्यासमवेत भटकंती करावी लागायची. ह्या सगळ्यांना नवस बोलूनही आम्हाला आमची लैला सोडून गेल्यापासून आम्ही तर यांच्यावरील श्रद्धा तडीपारच केली होती. असो. आम्ही शनिवारी मारुतिरायाचं दर्शन घ्यावे अशी ती अट! आता मारुतिराया अन शनिमहाराज यांच्यात काय अलिखित, गुप्त, शांतता करार वगैरे असतो याचा काही उलगडा होऊ शकला नाही. पण शनिवारी मारुतिरायांचं दर्शन घेऊन शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून बचाव करता येतो असा समज आहे म्हणा! वक्री दृष्टी अन चक्री…?

तर, आम्ही हुंदडत हुंदडत हुंदडत (तीन गल्ल्या पायी चाललो म्हणून तीनदा हुंदडत लिहिलं) मंदिरात पोचलो. काही वेळ मंदिरासमोरील वटवृक्षाखाली वाताहत झालेल्या आयुष्यावर शांतपणे चर्चा चालू होती आमच्या दोघांत. भगदाडं पडलेल्या तटबंदी कशी सावरावी अन अर्धवट उध्वस्त झालेल्या बुरूजांवर भल्या मोठ्या तोफा कशा पेलाव्या हे ते गहन मंथन. आम्हीही तसेच अन आमचे मित्रही तसेच; फाटलेल्या पाचच्या नोटेप्रमाणे. मीच किती खोलात हे सांगायची स्पर्धा (हाहाहा). कोण कोणाकडे उधारी करावी हाच आजचा सवाल. ह्यामुळेच वाटायचं की, खरोखरच साडेसाती चालू होती हो. दुपारी जरा एका जागेवर बसून बोलत होतो तर एक म्हातारा येऊन उठवून गेला, कधी म्हातारी, कधी चौकीदार तर कधी तीन वर्षांचं शेंबडं पोर येऊन आम्हाला उठवून लावायचं…. छे… बेअब्रू साली… आम्हीही गप गुमान उठायचो…

आम्ही दर्शनास आत जाताना समजलं की आमचा परममित्र तर आज विना-अंघोळीचा! तरी बिचारा मंदिराच्या बाहेर उभा राहून आंघोळ न केल्याच्या महापापाची दयायाचना करत परमेश्वराची माफी मागत होता. मी त्याच्यावर हसलो अन आलोच आहे मंदिरात म्हणून दर्शन घेऊन आलो. दर्शन वगैरे झालं आणि आमच्या चपला सांभाळत बसलेल्या मित्राजवळ येऊन बसलो. मग थोडा वेळ, आंघोळ न करता मंदिरात का जाऊ नये किंवा शनिवारी मारुती अन शुक्रवारी बालाजीच का? ह्या विषयांवर तात्विक चर्चा चालू झाली. न्यूज चॅनलवर रात्री नऊ-दहा वाजता जशा तावातावाने चर्चा होतात तशा आमच्यात होत होत्या. उगाच बोलायला विषय नाही म्हणून आम्ही भांडत होतो. तेवढीच आपली करमणूक. नंतर मी नाहीतर तो एकमेकांच्या खिशाकडे बघत पाणीपुरी नाहीतर वडापाव खाणारच होतो. अगदी न्यूज चॅनलमध्ये चर्चा संपल्यावर असतं तसं दृश्य! आम्ही बोलत होतो आणि पलीकडून एक तरुण आमच्याजवळ येऊन उभा राहिला. आम्हाला वाटलं आता काय झालं? उगाच लफडं काहीतरी. तो तरुण आम्हाला म्हणाला, इथून कोणतं कुत्रं पळताना बघितलं का? दिवस इतके वाईट येतील असं कधीच वाटलं नव्हतं. खरंच! आम्ही कुत्र्यावर पाळत ठेवणारे वाटलो की काय त्याला. सुरूवातीला मस्तक भणभणू लागलं. मग चेहर्‍यावरून गरीब दिसणार्‍या आमच्या मित्राने त्याला विचारलं, काय झालं भावा? तो भावा म्हणाला, नाई, मी दर्शनाला गेलो होतो. बाहेर आलो तर एक चप्पल गायब होती. तिकडचा भिकारी म्हणाला की कुत्र्याने नेली. आम्ही कट्ट्यावर मांडी घालून बसलो होतो. चटकन पाय खाली घेतले अन पायात चप्पल सरकवली.

तो तरुण म्हणाला, तुम्ही तसा कुत्रा पाहिला का?

एक तर कुत्रा त्यात तोंडात चप्पल घेऊन धावणारा कुत्रा… कहर झाला राव… तरी भावा (त्या तरुणाचं नाव भावा च समजा आता) आपल्याच वयाचा असल्याने आम्ही त्याला मदत करायचं ठरवलं. आमच्या मित्राची इच्छा होती की आपण आपली तात्विक चर्चा चालू ठेवावी. साला आपल्याकडे चर्चाच फार होतात. एखाद्या विषयावर उत्तर मिळवण्यात आपण मागे असतो. मग आम्ही (म्हणजे मी) तर ठरवलंच की भावाची मदत करायचीच. तो कुत्रा/कुत्री अन त्याच्या तोंडात असलेली चप्पल शोधूंनच द्यायची.

आम्ही भावाला विचारलं, कोणता रंग होता?

भावाने खुलासा विचारला, चपलीचा की कुत्र्याचा?

साला कॉमेडी मूड मध्ये होता. उत्तरं शोधायला निघणार्‍यांच्या ह्या अशा व्यथा असतात. शेवटी वाटायला लागतं की काय खाज उठली होती उत्तरं शोधायची. त्यापेक्षा चर्चा परवडल्या.

आम्ही सय्यम ठेऊन विचारलं, दोन्हीचा सांग राजा.

भावा म्हणाला, चपलीचा काळा होता. पण चप्पल नेणारा कुत्रा होता की कुत्री अन त्याचा रंग कुठला हे मला नाही माहीत.

मग आम्ही व आमचा मित्र पुन्हा चर्चा करू लागलो. कुत्र्याचा रंग कोणता असेल? मित्र म्हणाला, आजूबाजूला आपण चौकशी करू इथे कोणकोणत्या रंगाचे कुत्रे आहेत.

आम्ही म्हणालो, ती कुत्रीच असणार. कुत्रा नाही.

का?

वेळ संध्याकाळची आहे. दिवसभर दमून-भागून कुत्री संध्याकाळच्या वेळेस चप्पल तोंडात घेऊन घरी जाईल अन आपल्या पिल्लांना चघळायला देईल.

हाहाहा…हीहीही

तो भावा आता चिंतेत होता. अंधार पडला होता. एका पायात चप्पल घेऊन तो उभा होता. त्यानेही चप्पल हुडकायचा निर्धार केला होता.

आम्ही दोघांनीही अंग झटकलं (माणसासारखे) अन उठून उभे राहिलो. बॅटरी वगैरे कुणाकडे नव्हती. मंदिर गावाबाहेर असल्याने आजूबाजूला बरच रान होतं. प्रकाशाचा अभाव.

Crime patrol, CID बघून आमचं डोकं तल्लख झालं होतं. सावधान-इंडिया म्हणू शकत नाही कारण इथे अनैतिक संबंधाचा काहीच संबंध नव्हता. आम्ही तहकिकात सुरू केली. आधी भिकार्‍याकडे गेलो. तो आमचा खबरी होता. त्याच्या ताटात काहीतरी टाकलं अन गंभीरपणे विचारलं, कुत्रा कोणत्या रंगाचा होता? भीक घेऊन तृप्त झाल्याने तो विचार करू लागला. पण ते त्याच्या क्षमतेच्या बाहेर होतं. Sniffer डॉग बोलवायचा फालतू विचार आमच्या मित्राने सुचवला. तसा चांगला विचार होता तो. कारण चपलीच्या नाही तर निदान त्या कुत्रीच्या वासाने तरी तो sniffer डॉग शोध पूर्ण करू शकला असता. पण ती आवाक्याबाहेरची गोष्ट होती. आम्ही वळलो. पुन्हा कट्ट्यावर जाऊन बसलो. आम्ही व मित्र पुन्हा चर्चा करायच्या पवित्र्यात होतो. भावा त्याच्या गाडीवर जाऊन बसला. त्याच्या उजव्या पायातील चप्पल गायब होती. गाडीची किक मारणे त्याला जमत नव्हतं. लंगडा असल्याप्रमाणे तो उभा होता. नंतर त्याने डाव्या पायातील चप्पल उजव्या पायात घालून किक मारायचा प्रकार करून बघितला. पण यश येणे शक्य नव्हतं. मग आम्हीच दिलदारी दाखवली अन तिथे जाऊन त्याला गाडी चालू करून दिली.

त्याला विचारलं चप्पल सोडून निघाला का?

त्याचा प्लान भारी होता. गाडीच्या प्रकाशात त्याला चप्पल हुडकायची होती. गुड प्लान!

आम्ही आमचीहि गाडी सुरू केली. बराच वेळ आम्ही कुत्रा अन चप्पल शोधत होतो. असा शोध आजवर कोण घेतला होता का हे कोडच आहे. पण त्या शोधाला काही मर्यादा होत्या. एखाद कुत्रं दिसलं की आम्ही थांबायचो अन त्याच्याकडे लक्ष देऊन बघायचो. तो कुत्रा आमच्यावर संशय घेऊन पळून जायचा. आम्ही उत्साहाने पाठलाग करायचो. का की, तो कुतराच आम्हाला त्याच्या अड्ड्यापर्यन्त नेणार होता. मग तिथे चप्पलही सापडली असती. बर्‍याच शोधांनंतरही आमची कोहिम फत्ते होईना. सगळी कुत्री अन त्यांच्या जागा भटकून झाल्या पण चप्पल कुठे दिसली नाही. शेवटी आम्ही तिघेही आमच्या कट्ट्यावर येऊन बसलो. रात्रीचे नऊ वाजत आले. पण केस सॉल्व झाल्याशिवाय घरी जायचं नाही हा निर्धार होता. बसून फक्त पाणीच पिलं. मग जरा दम खाल्ला. हळूच काहीतरी आवाज आला. एक कुत्र्याचं पिल्लू कट्ट्याच्या पाठीमागून निघालं. आम्ही थोडं पुढे सरकून बघितलं अन मोहीम फत्ते झाली. चप्पल तिथे सापडली. चघळून ओली झाली होती. पायात घालायच्या आधी हंडाभर पाणी ओतलं. भावा आमचे आभार मानून निघून गेला. आम्ही दोघे बेरोजगार, आज काहीतरी महत्वाचं काम मिळालं म्हणून आनंदात घरी परतत होतो. जाताना भैय्याची पाणीपुरी खाल्ल्यावर दोघेही ‘मी पैसे देतो’ असं म्हणत होतो.