#गुंतवणूक || #शेअरबाजार || #अर्थविषयक || #Share_Market_Study
कोरोनाचा परिणाम पुढील काही काळ राहणार आहे. Lockdown मुळे ऑटो क्षेत्रावर काय परिणाम होतील असाही एक विषय असेल. या क्षेत्रातून मोठा रोजगार निर्माण करण्याची आणि बाजारात Liquidity ठेवण्याची क्षमता आहे. पण जर Lockdown मुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आणि नोकऱ्या कमी झाल्या, ऑटो कंपन्यांचे व्यवसाय मंदावले अन लोकांकडे पैसे खर्च करण्याची क्षमता राहिली नाही तर गाड्या विकत घेण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. परिणामी, गाड्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या, टायर कंपन्या, गाड्यांना फायनान्स करणाऱ्या कंपन्या यावर नकारात्मक परिणाम होईल आणि तेथील एकंदरीत रोजगार कमी होऊ शकतो. अर्थचक्र ठप्प होऊ शकतं.

लोकांना गाडी घ्यावी वाटणे ही एकतर गरज असते किंवा जीवनशैलीचा तो भाग असतो. अलीकडच्या काळात गाड्या घेण्याचं प्रमाण कमी झालं होतं. त्याला ट्रॅफिक, गाड्यांच्या किमती, पार्किंगचे प्रॉब्लेम, भरमसाठ इन्शुरेंस, मेंटेनन्स असे विषय असल्याने लोकांचा गाडी घेण्याकडे कल कमी झाला होता. त्यात ओला, उबर सारख्या सुविधा, मेट्रो वगैरे उपलब्ध असल्याने पर्याय उपलब्ध होते.
पण कोरोंना आणि त्याचा लोकांद्वारे (गर्दीतून) होणारा संसर्ग या बाजूने विचार केला असता, सुरक्षितता म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे कमी होऊ शकते आणि जो तो स्वतःला गर्दीपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःची गाडी घेणे आवश्यकता बनू शकते. त्यामुळेच कदाचित वाहन विक्रीत वाढही होऊ शकते. आलिशान गाड्यांपेक्षा परवडतील अशा गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढू शकतो आणि हे क्षेत्र वधारू शकतं. जर पैसे नसतील तर फायनान्स करून गाड्या घेतल्या जाऊ शकतात. लोकांची मानसिकता कशी असेल यावरच अनेक बाबी अवलंबून असतात. कारण आधी सांगितल्याप्रमाणे, भारतातील लोकांची ‘वस्तू विकत घेण्याचा क्षमतेवर’ अर्थव्यवस्था चालते!
अभिषेक बुचके
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या आवडीच्या ब्रोकरसह डिमॅट अकाऊंट सुरू करा!
EDELWEISS
https://bit.ly/3ktNztS
5PAISA
https://www.5paisa.com/landing/partners-elite?rcode=NTQxOTgyODI
ANGEL BROKING
https://nxt.angelbroking.com/SubBrokerAPI/LMSLanding?SBCode=r4HFVMS%2biVjBnmbkJeANrA%3d%3d
© 2020, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!