भाग १: शेअर बाजार मूलभूत माहिती
हा शेअर बाजार नेमका काय आहे? याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात!
असं नाहीये की कोणीतरी बसल्या-बसल्या केवळ मनोरंजन किंवा व्यवसाय म्हणून शेअर बाजार सुरू केला. तर शेअर बाजार हा गरज म्हणून समोर आलेला पर्याय आहे. तो आजच्या काळाचा आहे का? तर नाही! तो अनेक शतकांपासून सुरू आहे. फक्त त्याचे स्वरूप बदललं आहे.
शेअर बाजार म्हणजे काय? असा जर प्रश्न कोणी केला तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे… शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे!
आता इथे एक नवा शब्द आला… गुंतवणूक!
हा शेअर बाजार जर गुंतवणुकीचा प्रकार असेल तर गुंतवणूक म्हणजे काय हे तरी आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे…
गुंतवणूक ही तेंव्हा करता येते जेंव्हा तुमची काहीतरी बचत म्हणजे Saving असते!
तुम्ही बचत तेंव्हाच करू शकता जेंव्हा तुमचं काहीतरी Income असतं.
आता हे सगळं सरळ स्वरुपात पाहूया…
ज्यावेळी आपण काम करतो त्याचा आपल्याला मोबदला मिळतो त्याला आपण Income म्हणतो. त्यातून Income मधून आपला दैनंदिन आयुष्यावर खर्च होतो आणि मागे राहते ती बचत…. या बचतीच्या पैशातून आपण गुंतवणूक करत असतो!
गुंतवणूक करायची कशासाठी?
गुंतवणूक ही Returns साठी असते… म्हणजे बचतीचे पैसे कुठेतरी गुंतवले की त्यातून परतावा मिळणं अपेक्षित असतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या गरजेच्या वेळी आपल्या आर्थिक गरजा भागल्या पाहिजेत!
ही गुंतवणूक कुठे कुठे करता येते..?
तसं पाहता गुंतवणुकीचे महत्वाचे असे पाच ते सहा पर्याय आहेत.
बँक
गोल्ड
रीयल इस्टेट
इन्शुरेंस
बॉन्ड
आणि शेअर मार्केट!

गुंतवणूक म्हणजे काय याबद्दल सर्व माहिती खालील लिंकवर…
यावरून एक निश्चित झालं की शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. मुळात या पर्यायाविषयी आपल्याला फार कमी माहिती असते. आपल्या भारतातील फार तर 2-5% लोक या क्षेत्रामध्ये आहेत. जी काही प्रगत राष्ट्रे वगैरे आपण बघतो तर त्या राष्ट्रांत हे प्रमाण 40% पेक्षा अधिक आहे. म्हणजे जर आपला देश विकसित होणार असेल आणि अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असेल तर हे क्षेत्रसुद्धा गतीने वाढणार आहे आणि त्यामुळे येथे प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत.
- शेअर बाजार हे अर्थव्यवस्थेशी थेटपणे निगडीत असं क्षेत्र आहे.
- प्रचंड क्षमता आणि अर्थातच पैसा असलेलं हे क्षेत्र आहे.
- येणार्या काळात भारतासारख्या देशात खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करून देणारं हे क्षेत्र असणार आहे.
शेअर बाजार याकडे येऊ! शेअर बाजारातसुद्धा तीन ते चार प्रकारचे बाजार आहेत.
Equity
ज्याला आपण सामान्यपणे शेअर बाजार म्हणत असतो. यामध्ये कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात.
Commodity
सोयाबीन, हळद यासारखे शेती संबंधित उत्पादने गोल्ड, अलुमिनियम असे मेटल्स क्रूड ऑइल वगैरे मध्ये ट्रेडिंग होत असते.
Currency
Dollar, Euro सारख्या करन्सी मध्ये ट्रेडिंग होतं आणि Hedging साठी वापरलं जातं.
Derivatives
Futures & Options हे दोन पर्याय याअंतर्गत येतात. Trading आणि Hedging साठी हे Instrument वापरले जातात.
यापैकी आपल्यासारख्या सामान्य माणसाने शक्यतो Equity मध्ये गुंतवणुकीचा विचार करावा जो सोपा आणि त्यातल्या त्यात सुरक्षित आहे.
हा शेअर बाजार नेमका दिसतो कसा? चालतो कसा?
जसं तुमचं बँकेतील अकाऊंट चालतं, अमेझोनचं app चालतं किंवा मॉल चालतो किंवा अगदी भाजी मंडई चालते तसच हे चालत असतं.
जसे पैशांचे व्यवहार सोप्या, सुलभ पद्धतीने करता यावेत म्हणून बँकेचं अकाऊंट असतं तसं शेअर्सचे व्यवहार सोप्या पद्धतीने करता यावेत म्हणून डिमॅट अकाऊंट असतं.
जसं तुम्ही अमेझोन किंवा फ्लिपकार्ट वरुन पैसे देऊन वस्तु विकत घेता तसंचं डिमॅट अकाऊंटवर पैसे भरून तुम्ही शेअर्स घेऊ शकता.
जसे भाजी मंडईत भाजी विक्रेते आणि खरेदी करणारे असतात तसेच शेअर बाजारात शेअर्सची विक्री करणारे आणि खरेदी करणारे लोक असतात.
हे डिमॅट अकाऊंट तुम्ही कुठे सुरू करू शकता? तर अगदी बँकेत जाऊन, ऑनलाइन किंवा ओळखीच्या ब्रोकरकडे ते तुम्ही सुरू करू शकता!
एकंदरीत काय, शेअर बाजारात कार्यरत होण्यासाठी तुम्हाला फक्त एक डिमॅट अकाऊंट सुरू करावं लागतं. त्यानंतरची प्रक्रिया अगदी सोपी असते. ती प्रक्रिया कशी असते ही theory आता आपण बघू.
या लिंकवर डिमॅट अकाऊंट म्हणजे काय हे समजून घ्या!
शेअर बाजार कसा चालतो? बॅक एंडची प्रक्रिया…
Exchange, Depository, Broker आणि DP: SEBI


Exchange, Depositories, DP व SEBI सदर्भात माहिती खालील लिंकवर…
इतका वेळ मी सांगत आलो आहे की शेअर बाजार म्हणजे गुंतवणुकीचा एक प्रकार आहे वगैरे… मग काहीजण याला सट्टा का म्हणतात? खरच शेअर बाजार म्हणजे सट्टा आहे का?
उत्तर आहे हो! आपणच त्याला सट्टा बनवलं आहे.
साधारणपणे जेंव्हापासून इंटरनेटची उपलब्धता बर्यापैकी होऊ लागली आणि त्यानंतर प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन येऊ लागले तेंव्हापासून Intraday हा प्रकार जास्त फोफावू लागला आणि तिथूनच या क्षेत्रातील एक नवीन दरवाजे उघडले गेले! Intraday Trading!
आता महत्वाचा प्रश्न… शेअर बाजारात RISK असते का…?
उत्तर आहे हो… खूप RISK असते… पण Risk कुठे नसते असा प्रतिप्रश्नही स्वतःला विचारून बघा. पण एक सांगायचं झालं तर, जोपर्यंत तुम्ही चूक करत नाहीत तोपर्यंत शेअर बाजार तुमचे पैसे बुडवत नाही.
ही RISK साधारण तीन प्रकारची असते.
- तुम्ही केलेली गुंतवणूक शून्य होणे. Investment
तुम्ही निवडलेले शेअर्स चुकीचे असतात.
तुमचा पोर्टफोलियो Balanced नसतो.
गुंतवणुकीकडे लक्ष न देणे.
- Intraday Trading मध्ये मोठा Loss होणे. Trading
Stoploss न लावणे.
दुसर्याने दिलेल्या टिप्सवर काम करणे.
गरजेपेक्षा जास्त RISK घेणे.
- गुंतवणूक करताना तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत असाल तर. Direct Risk.
विचार केला आणि योग्य निर्णय घेतले तर ही सर्वच्या सर्व RISK आपल्याला नाहीशी करता येते.
शेअर बाजारात फसवणूक होते का?
प्रचंड प्रमाणात होत असते. किंबहुना त्यामुळेच हे क्षेत्र जास्त बदनाम झालं आहे. मुळात या क्षेत्रात येणारी लोकं अपूर्ण माहितीच्या आधारे येतात, लालसेचा भाग म्हणून येतात. त्यामुळे त्यांचा गैरफायदा उचलणारी माणसं असतातच… पण तशी माणसं कुठे नसतात असा प्रतिप्रश्न मी तुम्हाला विचारेन! भाजी घेताना सुद्धा आपली फसवणूक होतेच की! पण आपण भाजी घेताना जेवढे चौकस असतो तेवढे शेअर्स घेताना नसतो ही मुख्य समस्या आहे. त्यामुळे अशी भीती बाळगून या प्रचंड क्षमता असलेल्या क्षेत्रापासून दूर राहू नका असं सांगेन…
सावधान! Dos and Don’ts
- अफवांना बळी पडून गुंतवणूक करू नका!
- कोणाच्याही हातात ‘कॅश’ देण्याची गरज नाही!
- इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर स्वतः माहिती घेऊन करावी.
- Derivatives & Commodity ट्रेडिंग करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या!
- सर्व व्यवहार स्वतःला शक्य असतील तर Online अकाऊंट सुरू करा अन्यथा जवळच्या बँकेत किंवा ब्रोकरकडे जा!
- शक्यतो टिप्स च्या भानगडीत पडू नका.
- आपले व्यवहार, पोर्टफोलियो इतरांना सांगू नका.
- ट्रेडिंगचं व्यसन लावून घेऊ नका.
- काहीही झालं तरी आपल्या आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडू देऊ नका.
शेअर बाजार हा Parallel Source of Earning होऊ शकतो का?
याचं उत्तर व्यक्तिपरस्वे अवलंबून आहे. हे क्षेत्र कोणाला कसं प्रतिसाद देईल ते सांगता येणार नाही. आपण समजून चालूया याचं उत्तर 50:50 असं आहे.
जर तुम्हाला या क्षेत्रातून Parallel Source of Earning या दृष्टीने बघायचं असेल तर बरीच मेहनत घ्यावी लागेल आणि काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात!
- अभ्यास करावा लागेल. Trading शिकावी लागेल.
- क्षेत्रातील बाबी जाणून घ्याव्या लागतील. Intraday व Positional
- वेळ द्यावा लागेल.
- आपल्या चुकांमधून शिकावं लागेल.
- भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल.
- आर्थिक नियोजन सांभाळावं लागेल.
- सतत Updated राहावं लागेल.
आपल्याकडे अतिशय तुरळक लोकं आहेत ज्यांनी या क्षेत्राला as a trader म्हणून मुख्य Earning चा Source म्हणून यशस्वीरीत्या स्वीकारलं आहे.
बर्याच ट्रेडर्सने प्रचंड अनुभवानंतर यातून Parallel Source of Earning म्हणून यश मिळवलं आहे.
बरेचसे लोकं या क्षेत्रात येतात आणि निघून जातात जे अर्थातच काहीतरी वाईट अनुभव घेऊन जात असतात!
भाग २: करियरच्या संधी व Certification
या क्षेत्रात येण्यापूर्वी किमान Graduation असणं गरजेचं आहे. जर ते कोमेर्स क्षेत्रात असेल तर उत्तम किंवा BBA असेल, MBA असेल तर जास्त फायदेशीर ठरेल. पण हे नोकरी करण्यासाठी झालं. जर तुमचं काहीच शिक्षण झालेलं नसेल किंवा इतर क्षेत्रात झालेलं असेल तरीही तुम्हाला गुंतवणूक, ट्रेडिंग करता येईल, सर्व गोष्टी शिकता येतील आणि व्यवसायही करता येईल!
विविध परीक्षा आणि कोर्सेस
खाजगी क्लासेस
मूलभूत माहिती मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी.
NISM (National Institute of Securities Market)
SEBI ने 2006 स्थापन केलेली संस्था जी Financial Market व संबंधित क्षेत्राबद्दल शिक्षण व मार्गदर्शन देत असते.
अर्थसाक्षरता वाढवणे या उद्देशाने 2016 साली नवी मुंबईत सेंटर सुरू करण्यात आलं.
https://en.wikipedia.org/wiki/National_Institute_of_Securities_Markets
NISM Exam Modules
* BSE च्या परीक्षा व सर्टिफिकेट
http://www.bsebti.com/programs/certification_courses.html
NSE ACADEMY’S Certification in Financial Markets (NCFM)
करियरच्या व व्यवसायाच्या संधी!
- Trader
- Banks
- Registrar Office
- Depositories, Exchanges, DP and SEBI
- Analyst: Fundamental & Technical
- Asset Management Company
- Mutual Fund Manager
- Mutual Fund Distributor
- Investment Advisor
- Portfolio Manager
- Self-Business
- Broker
या क्षेत्राचा अभ्यास करताना काही पुस्तके महत्वाची असतात त्यांची यादी या लिंकवर!
© 2020 – 2021, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!