Author: Niranjan Salaskar

अधुरी कथा

अधुरी कथा

मराठी कथा || Marathi Stories || मराठी साहित्य

अधुरी कथा

“अगं रश्मी आज मला अवधुत दिसलेला मी कामावर निघण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते तेव्हा दिसला तिथे. रोहीणी रश्मीसमोरच्या टेबलावर बसताना म्हणाली. रोहीणीने एक गोष्ट नोटीस केली की आजही अवधुतचा विषय काढला की रश्मीच्या चेह-यावर तिच चमक येते जी ते जेव्हा एकत्र होते तेव्हा यायची. रोहीणीला संशय येऊ नये म्हणून रश्मीने जसं तिला त्याचं नाव ऐकुन काही झालच नाही अस तोंड केलं आणी नुसतं औपचारिकतेने तिला विचारलं
“कसा आहे तो आता..? आणी काय करतो सध्या.? तीचा चेहरा परत तसाच चमकला. रोहीणीला ठाऊक झाले की ती मुद्दाम तसे हावभाव देतेय खरं तर अजुनही तीचं त्याच्यावर तेवढच प्रेम आहे जेवढं आधी होत..!
“एकदम मस्त आहे तो आणी आधी सारखाच खुप पॉझिटिव्ह आणी एनर्जेटीकही”. रोहीणी म्हणाली.
” हो तो नेहमी मला बोलायचा की मला खुप मोठं व्हायचंय नाव कमवायचय आणी तोे हे करु शकतो हे मला माहीत होतं. तो दु: ख कवटाळत बसणा-यातला नव्हता. रश्मी त्याच्या विचारात हरवत चालालीय हे रोहीणीला माहीत पडलं. ती गप्प होती आणी रश्मीची मात्र बडबड चालु होती जणु ती खुप दिवसांची त्याच्याविषयी बोलली नव्हती. जणु तीने जबरदस्तीने त्याचा विषय, त्याचं प्रेम कायमचा कुठेतरी पुरुन ठेवलं होतं आणी आज रोहीणीमुळे तीच्या प्रेमळ आठवणी उफाळुन बाहेर येत होत्या..
३ वर्षापूर्वी…
अविनाश मध्यम घराण्यातला ध्येयवादी मुलगा होता. त्याला स्वतःच्या पायावर उभे राहुन काहीतरी करुन दाखवायचे होते. घरात मोठा असल्याने घराची जबाबदारीपण तो उत्तम प्रकारे सांभाळत होता.जवळपास ३ वर्षापूर्वी तो रश्मीला भेटला असेल. हळुहळू ते दोघं प्रेमात पडले जवळपास ३ वर्ष ते एकमेकांच्या प्रेमळ सहवासात होते एकमेकांवर जिव ओवाळायचे नुसते. फरक फक्त एवढाच होता की त्यांची जात सारखी नव्हती. पण त्या दोघांना त्याचा काडीमात्र फरक वाटत नव्हता. ते दोघ मोकळ्या विचाराज्ञचे होते प्रेमात पडताना त्यांनी जात नाही विचारली तर लग्न करताना का विचारात घ्यावी असं त्यांना वाटायचं
लहानपणापासून रश्मी गावी म्हणजे तीच्या आजी-आजोबांकडे वाढली होती. तीचा त्यांच्यावर खुप जीव होता. कारण ज्या वयात तिला आईवडिलांचा आधार हवा होता त्या वयात तीच्या आजीआजोबांनी आईवडिलांची कमी पुर्ण केली. नंतर पुढच्या शिक्षणासाठी ती मुंबईत आली पण तीचं मन रमायला तयार नव्हतं. तीच्या आजीआजोबांच्या आठवणीने रडुन रडुन तीने खुप रात्र जागवल्या. आणी आईवडिलपण त्यांच्या कामात असल्याने तीला समजुन घेणार तीथ कोणीच नव्हतं. त्याच दरम्यान कॉलेजला गेल्यावर तीची आणी अविनाशची भेट झाली. तीला शमजुन घेणारा कोणीतरी तीला मिळाला आणी ती त्याच्या प्रेमात पडली.
एके दिवशी तीच्या आजोबांची तब्येत बिघडल्या कारणाने तीला तातडीने गावी जाव लागलं. तीच्या आजोबांनी तीला अट घातली की “मी जिवंत असेपर्यंत मला तुझं लग्न बघायचय. रश्मी आजोबांना अविनाशबद्दल काही सांगु शकत नव्हती कारण तो धड त्याच्या पायावर उभा राहीला नव्हता. एकीकडे अविनाश जो तिच्यावर वेड्यासारखा जिव ओवाळत होता आणी एकीकडे तीचे आजोबा ज्यांनी तिला वाढवलं, मोठं केल. तीने त्याक्षणी तीच्या काळजावर दगड ठेवुन आजोबांनी घातलेली अट मान्य केली. आणी लग्नाच्या मंडपात उभी राहिली थाटामाटात लग्न लागलं मुलगा चांगला इंइंजिनीयर होता.इथे अविनाशला काहीच कल्पना नव्हती की रश्मी त्याला आता कधीच भेटणार नाही ती त्याची कधीच नव्हती. लग्नाच्या दुस-याच दिवशी तीने रोहीणीला अविनाशला कळविण्यास सांगितले. अविनाश पुरता खचुन गेला. नियतीने घातलेला घाव तो सहन करु शकला नाही पण तरीही त्याने धीर सोडला नाही तीच्या प्रेमळ आठवणी ह्रुदयाच्या कोप-यात साठवुन काळीज दगडाच करुन मनाशी ठरवलं की आता परत प्रेमात पडायचं नाही.
सध्या..
“काय गं रश्मी कुठे हरवलीस..? रोहीणीने तीच्या खांद्यावर हात ठेवत विचारले तसा तीचं भान हरपलं.
“काही नाही असचं..
मला माहीत आहे तुझं अजुनही त्याच्यावरचं प्रेम आहे तु लग्न भलेही दुस-याच्या मर्जीने केलस पण प्रेम मात्र तुझ्या मर्जीचं होतं.
तशी रश्मी जोरजोरात हुंदके देत रडत होती. मनातुन ती स्वत: ला दोषी समजत होती. ती म्हणाली “मी त्याचा विश्वास घात केला आहे त्याच्या सगळ्या आशा पार मोडुन टाकल्या आहेत मला तो कधीच माफ करु शकणार नाही. तीच्या अश्रुंचा बांध फुटला एवढे दिवस मुस्काट दाबुन परिस्थितीच्या मा-याला आज वाचा फुटली होती.
“तुला वाटतं का अविनाश तुला दोष देत असेल असं..? अगं उलट मी जेव्हा त्याला तुझ्याबद्दल साज्ञगितलं तेव्हा तोही खुप रडला पण नंतर काय म्हणाला माहितीये..?
“काय.? ती रडतचं म्हणाली.
“तो म्हणाला की तुझी(रश्मी) इच्छा होती की मी नावाने कामाने मोठा माणुस बनाव असं बस्स.! तीने माझी इच्छा पुर्ण केली नाही म्हणुन काय झाल आता मी तिची इच्छा पूर्ण करणार.
हे एकुन रश्मी घळाघळा रडायला लागली…

लेखकाला फोलो करण्यासाठी
Instagram.com/niranjan_salaskar
twitter.com/95niranjan
या कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत.

अपघाती प्रेम 

अपघाती प्रेम 

मराठी कथा || प्रेमकथा || लघुकथा || मराठी साहित्य  || Marathi Story  || 

तिच्या डोळ्यात एक वेगळीच जादु होती. तीच्या डोळ्यात पाहिल्यावर असं वाटायचं की ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. नुसतं एकटक त्या काळसर लुकलुकणा-या डोळ्यांकडे पाहत रहावसं वाटायचं. ती जशी वॉर्डमध्ये शिरली की सगळं वातावरण एकदम फुलुन निघायचं, नाहीतर ती धावपळ, रक्ताळलेल्या पट्टया, पेशंट्सचं कण्हनं, रडारड याने जीव नकोसा व्हायचा. अर्थात या पंधरा दिवसात त्याची मला सवय झाली होती पण ती सकाळ-संध्याकाळ जेव्हा तपासायला यायची तेव्हा या रोगट वातावरणाचा विसर होऊन सार गुलाबी गुलाबी वाटायचं. तीचं ते मिश्किल हसुन बोलणं, केसांची बट हलक्या हाताने कानामागे नेणं, तीचा तो नाजुक स्पर्श, आणि डोळे तर काय कमालच अशी ती म्हणजेच डॉ. समीधा देशमुख. मी जेव्हा या हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हापासूनच माझी ट्रीटमेंट तिच्याकडेच चालु होती. खर तर डॉ. हा पेशा तिने का निवडला हा प्रश्न मी तिला विचारणारच होतो कारण बाकी पेशंट्सना तीने जरी बरं केलं असलं तरी मला मात्र तीने पुरता घायाळ करुन टाकल होतं. माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा आणण्यास औषधांचा जेवढा वाटा आहे ना त्याहुनी जास्त तीच्या हस-या गोड स्वभावाचा आहे. आणी त्यात काही वावगं नाहीय कारण मी जसं ऐकल्याप्रमाणे पेशंट्सना बर करण्यामध्ये डॉक्टरांच्या स्वभावाचाही तेवढाच फरक पडतो. या पंधरा दिवसात आमच्यात एवढी मैत्री झालीय की तीनेच मला तीला ऐकेरी नावाने हाक मारण्याची सक्त ताकीद दिलीय. आणी तसंही तीच्या चेह-यावरुन ती माझ्याहुन वयाने काही मोठी वाटत नव्हती. किंबहुना नव्हतीचं.. ! आम्ही समवयीन होतो. आणी हल्लीच्या काळात असं कोण उरलय आदराने बोलणारं.
तेवढ्यात डॉ.समीधा वॉर्डमध्ये शिरते तसे सगळे पेशंट बेडवर उठुन बसतात आणी ती एक एक करुन पेशंट्सना चेक करते. विवेकचा बेड सगळ्यात शेवटचा होता त्यामुळे तो तसाच पहुडला होता. पण ती आत शिरल्या शिरल्या त्याला तीची चाहुल लागली. एकदाची ती त्याच्या बेडजवळ आली तो उठुन बसला तो एकटक तीच्या गोड हालचाली न्याहळत होता. तीने बाचुलाच असलेल्या टेबलावर ठेवलेला रिपोर्ट घेतला आणी नर्सला आजच्या दिवसाचा डोस समजवला.
काय मग मि. विवेक काय म्हणतेय तब्येत..? तीने स्मितहास्य करत विचारले.
“मस्तच..! आता शुध्द हरपायची थांबलीय आणी थोडी तरतरी वाटतेय”.
“वा..! तु काही खाल्लस का..? तीने थंडपणे विचारले.
“हो तस खाल्लय थोडं, एव्हाना घरुन डबा घेऊन येतीलच”.
तीने लगेच सलाईनची बाटली काढुन ती वर स्टँडला लावली व नळीचे टोक त्याच्या मनगटावरील नळीत लावण्यासाठी त्याचा हात पकडला. तीच्या थंडगार स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारे आले. तो तिच्याकडे एकटक पाहतचं राहिला. ती विवेकला काहीतरी सुचना सांगत होती पण त्याचं मात्र तीच्याच डोळ्याकडे लक्ष लागलं होतं. मोहीनी घातलेला माणुस नजर खिळल्यासारखा जसा एकाच ठिकाणी बघतो तसा त्याला तीच्या डोळ्यांची मोहीनी चढली होती. तीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणी त्याचं भान हरपलं.
“काय..? कसला विचार करतोय एवढा”?
“काही नाही असचं”
“जास्त विचार नको करूस, डोक्याला त्रास होईल आराम कर आता..!
“हो..! या गोळ्या घेतो आणी मग आरामच करतो.
डॉ.समीधा विवेकला तपासुन पुढच्या पेशंट्सकडे सरकते. विवेक अंथरूणात अंग टाकुन तिच्याकडेच पाहत असतो त्या गोळ्यांच्या गुंगीपेक्षा त्याला तिच्या सौंदर्याची गुंगी जास्त चढली होती. बाईकवरून कामावर जाताना कोणीतरी मागुन जोरदार धक्का दिला होता तेव्हा जी शुध्द हरपली ती तब्बल २४ तासांनी आली. डोळे किलकिले करून पाहीलं बघतो तर काय मी चक्क हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टरांना विचारल्यास ते म्हणाले कोणीतरी माणसाने मला इथे पोहचवल्याचे कळले. आज १५ दिवस होत आले तो माणुस काही आलाच नाही पण तो जो कोणी असेल त्याचा मी खुप खुप आभारी आहे एकतर माझा जीव वाचला आणी दुसरं म्हणजे माझी डॉ. समीधाशी ओळख झाली. इथल्या एका नर्सशीपण माझी चांगली गट्टी झालीय तीच्या सांगण्याप्रमाणे मला जेव्हा बेशुद्ध आणी रक्ताळलेल्या अवस्थेत या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले तेव्हापासून ते आतापर्यंत डॉ. समीधानी माझी खुप खुप काळजी घेतली आहे. गोळ्यांच्या डोस पासुन ते खाण्यापिण्यावर पण तीचं काटेकोर लक्ष होतं अर्थात प्रत्येक पेशंट्सची पोटतीडकीने काळजी घेणे हे प्रत्येक डॉक्टराचे कर्तव्य असते. डॉ. समीधा तेच कर्तव्य पार पाडत असेल तर…? नाही..! नाही..! तसं शक्य नाही कारण हॉस्पिटलमध्ये माझ्याशिवाय कोणालाच ती एकेरी नावाने हाक मारत नाही आणी शिवाय तीच माझ्याशी बोलणं, वागणं, माझी काळजी घेण हे कुठल्याच अंगी फक्त कर्तव्य पार पाडण्याची खुण दाखवत नाही. त्याच्या मनात तीच्या विषयी असे बरेचसे विचार येत होते.
अचानक कसल्यातरी गोंधळाने त्याची झोप मोडली विचार करता करता कधी त्या गोळ्यांनी गुंगी आली काही कळलेच नाही. तो उठुन बसला घड्याळात संध्याकाळचे पाच वाजले होते. कोणीतरी नवीन पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखील होत होता. त्याच्याही डोक्याला माझ्यासारखाचं मार लागला होता कदाचित त्याचादेखील अपघात झाला असावा. तेवढ्यात इन्स्पेक्टर दळवी वॉर्डमध्ये शिरले त्यांच्यामागे २-३ हवालदारपण होते.
“कशी आहे तब्येत आता “? दळवी समोरच्या टेबलावर बसत म्हणाले.
“पहिल्यापेक्षा उत्तम आहे” मी स्मितहास्य करत म्हणालो.
“मी. विवेक आम्ही त्या ट्रक ड्राईव्हरला ताब्यात घेतलय ज्याने तुम्हाला केडवे बायपास जवळ धडक दिली होती त्याने चुकी मान्य केली व तो दवाखान्याचा सगळा खर्च द्यायला तयार आहे”. ते एका दमात बोलले. माझया मनात दुहेरी भावना उमटत होत्या एक तर त्या अपघातामुळे माझी डॉ. समीधाशी भेट झाली आणी दुसरं त्या ट्रक ड्राईव्हरचा राग येत होता.
“ठिक आहे बघा काय होतय रीतसरं माझा काहीच विरोध नाहीय”.
“ठिक आहे आम्ही निघतो आता, काळजी घ्या. एवढ बोलुन इन्स्पेक्टर दळवी निघाले.
आठ वाजायला थोडेच तास राहिले होते मी डॉ. समीधाच्या येण्याची वाट पाहत होतो तोपर्यंतचा वेळ माझा हॉस्पिटलची धावपळ बघण्यातच गेला. तोही जाता जात नव्हता. हॉस्पिटलचं जगणं नेहमीच्या जगण्यापेक्षा किती वेगळं असतं ना..? ते रोगट चेहरे, पेशंट्सचं किंचाळणं, कण्हनं, नातेवाईकांची रडारड, डॉक्टरांची धावपळ, गोळ्यांची कडवट चव सारे एकदम भयानक असतं यामुळेच लहानपणापासून मला डॉक्टरांचा खुप हेवा वाटायचा. अशा वातावरणातसुद्धा पेशंट्सशी त्याच ऊमेदीन,उत्साहाने वागणे आणी वेगवेगळ्या पेशंट्सचे वेगवेगळे आजार हाताळणे त्यांना नकारात्मक रोगातुन सकारात्मक जीवनाकडे पाहण्यासाठी ठणठणीत बरं करणे म्हणजे काही सोप नाही… मी घड्याळात पाहिलं आठ कधीच वाजुन गेले होते. मी एकटक वॉर्डच्या दरवाज्याकडे पाहत होतो. दरवाज्यातुन सगळे येत होते नर्स, वॉर्ड बॉय, नवीन पेशंट्स पण जीची मी एवढी वाट पाहत होतो तीचा जरासा मागमुसही लागत नव्हता. आता घड्याळात नऊ वाजले होते रात्रपाळीच्या नर्स आल्या, नातेवाईकांची गर्दी कमी झाली प्रत्येक पेशंट्समागे एकच नातेवाईक बस तेवढीच ती गर्दी सोडली तर धावपळ, नवीन पेशंट्स कोणी येत नव्हतं. अचानक वॉर्डमध्ये कोणीतरी शिरलं डॉक्टरच होते ते पण ती डॉ. समीधा नव्हती कोणी दुसरच होतं कदाचित डॉ. समीधा लवकर गेल्या असतील किंवा त्यांच दुसरं कुठलं काम असेल. त्या नवीन डॉक्टरने पेशंट्सना चेक केले. अर्थात मलाही एवढं कसल महत्वाचं काम असेल, की ते पेशंट्सपेक्षाही महत्वाचं होतं कदाचित दुस-या पेशंट्सना चेक करायला गेली असेल माझ्या मनात असे असंख्य विचार चालु होते.

क्रमश: ……..

(निरंजन साळस्कर)

गणपतीचे घर

गणपतीचे घर

मी जर तुम्हाला म्हणालो की मी गणपतीचे घर पाहुन आलोय तर तुमचा विश्वास बसेल का..? तुम्ही म्हणाल देवाच घर कोणी जिवंतपणी कसं बघु शकतं पण हो पण हे शक्य झाल कारण आम्ही आम्ही म्हणजे मी व माझे काही भाऊबंध गेल्या महिन्यात दि. १८-६-२०१७ मध्ये हमरापुर ता. पेण जि. रायगड या गावात गेलेलो खुप दिवसांपासुन त्याच रुटीन लाईफला मी कंटाळलो होतो शुक्रवारी मला माझ्या मामेभावाचा फोन आला म्हणाला आपल्याला रविवारी पेणला जायचे आहे मी त्याला जास्त काही विचारलं नाही कारण तीथे जाण्याचं कारण मला ठाऊक होतं ते तुम्हालाही कळेलच पुढे. मी एका पायावर तयार झालो. कारण शनिवार रविवार माझा सुट्टीचा दिवस होता आणी खुप दिवसांपासून बाहेर फिरायला गेलो नव्हतो तर हा चान्स मला सोडायचा नव्हता. शनिवारी बॅग भरली आणी दुपारच्या सुमारास मी मुंब्रात उतरलो कारण मला तिथुनच रविवारी सकाळी ट्रेनने हमरापुरला चायचे होते. त्याच कारण असं की माझ्या भावाला म्हणजेच (Lucky) आणी (Virus) सुरजला गणपतीची कार्य शाळा सुरु करायची होती तर त्यासाठीच आम्ही गणपती (Booking) करायला तेथे गेलो होतो.
सकाळी ठरल्याप्रमाणे ६:४५ ची दिवा हमरापुर गाडी पकडायची होती पण दिव्याला पोचता पोचता ७:३० वाजले गाडी हुकली आणी त्याला कारणीभूत मीच होतो मी उशिरा उठलो होतो पण त्यानंतरची ९:३० ची गाडी होती त्यादरम्यान आम्ही चहा नाश्ता उरकला आणी ९:३० च्या गाडीत बसलो. गाडीत आमची मस्ती मजाक चालुच होती. ती कोण थांबवणार कारण सगळेच आम्ही लहानपणीचे मित्र होतो तर मग काय विचारुच नका. नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे ओसाड जमिन हिरवागार दिसत होती कुठे नवीन लालसर तांबूस पालव्या फुटलेल्या, तर कुठे हिरवी गवतं झुलत होती. ट्रेनच्या खिडकीतून मस्त निसर्ग दिसत होतं. जवळपास १:३०-२ पर्यंत आम्ही हमरापुरला पोहचलो असेन डोक्यावर ऊन लई तापलेलं मध्ये मध्ये काळे ढग नुसती हुल देऊन जात होते.आम्ही स्टेशनवरुन गावात चार एक किलोमीटर चालत गेलो होतो कारण ज्या व्यक्तीकडुन आम्ही दरवर्षी गणपतींच्या मुर्त्या घ्यायचो त्याचं घर स्टेशनपासुन लांब होतं शिवाय खाजगी गाडीने तिथपर्यंत जाणे व्यर्थ होते कारण तीथल्या प्रत्येक घरात गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचे काम चालु होतं आणी तेच बघत बघत आम्ही गेलो. तिथल्या प्रत्येक घरात एक उंदा कलाकार होता याची प्रचिती त्यांच्या सुबक व रेखीव मुर्त्या पाहिल्यावर होते. अगदी एक फुटापासुन ते ७-८ फुटापर्यंतच्या मुर्त्यापण तितक्याच रेखीव होत्या जितक्या लहान मुर्त्या होत्या. आम्ही जवळपास २-३ किलोमीटर तुडवला असेल तेथे दादर, दिवे, जोहे अशा छोट्या छोट्या गावात सगळ्यांकडे गणपतीच गणपती दिसत होते. कोणी सिंहासनावर तर कोणी मोरावर तर कोणी शंकराच्या खांद्यावर तर कोणी नंदीच्या चेह-यावर बसलेल्या अशा कित्येक प्रकारच्या मुर्त्या होत्या पण सगळ्यात जास्त चर्चा एकली ती बाहुबलीच्या गणपतीची हत्तीच्या तोंडावर उभे राहुन हत्तीने सोंडेत पकडलेल्या धनुष्यातुन तो बाण मारत होता एकदम हुबेहूब जसा त्या बाहुबली फिल्ममध्ये तो प्रभास त्या हत्तीवर ऊभा राहुन बाण मारत आहे तसाच.
खरच त्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा कारण त्याने मुकुट, धनुष्यबाण,हत्तीची सोंड या सगळ्यांवर कोरीवकाम केले होते ती मुर्ती एवढी जिवंत वाटत होती की काही संदेहच नव्हता. आम्ही शेवटी एकदाचे त्या माणसाच्या घरात पोहोचलो घरुन कळले की तो बाजुच्याच गावात खाजगी कामासाठी गेलाय. तोपर्यंत आम्ही त्याच्या मुर्त्या बघण्याचं ठरवलं त्याच्या घराचं पुर्ण अंगण गणपतींच्या मुर्त्यांदी भरुन गेलेलं अंगणाला ताडपत्रीचे शेड केले होते एवढच नव्हे तर त्याचा माळा देखील मुर्त्यांनी भरलेला होता. आम्ही सा-या मुर्त्या डोळ्याखालुन घातल्या कारण आम्हाला ठराविक आणी आकर्षक मुर्त्या हव्या होत्या.
आमच्या पोटात भुकेने थैमान घातले होते पाण्याच्या बाटल्या पटापट संपत होत्या तो माणुस येईपर्यंत आम्ही जेवणासाठी छोटे हॉटेल बघत होतो शेवटी एका छोट्या धाब्यावर जेवणाची सोय झाली जेवण खुप चविष्ट व रुचकर होतं सगळ्यांनीच भुकेमुळे आडवा हात मारला. जेवण उरकल्यावर त्या माणसाकडे गेलो तेथे आवडले तेवढे जवळपास दिड-दोन फुटांचे ५० गणपती बुक केले.आनी स्टेशनवर यायला निघणार तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. मग काय..? निघालो भिजत परत चार किलोमीटर चालायच म्हणजे जिवावर आलेलं पण पावसाची साथ होती तर ते अंतर एकदम किरकोळ वाटलं एकदाच स्टेशन गाठलं संध्याकाळची ५:३० ची ट्रेन होती. आम्ही तर ४:३० लाच पोचलो मग स्टेशनवरच भारत× पाक सामना पाहिला स्टेशनवर गर्दी कमी होती पण तरी सगळे त्या मोबाईलजवळ घोळका करुन बसले होते त्यातल्या त्यात त्यांचापण टाइमपास झाला. ५:३० ला ट्रेन आली गर्दी फार होती पण पनवेल नंतर बसायला जागा मिळाली. आणी संध्याकाळी ८:३०-९ पर्यंत घरी परतलो. खरच हमरापुर बद्दल बोलायचं झाल तर तिथले कलाकार जे परंपरागत त्यांची कला जोपासण्याचं काम सातत्याने करत आहे. तिथली लोक तिथलं धाब्यावरचं जेवण सारच फार अप्रतिम होतं. तिथल्या बोलक्या मुर्त्या माणसं खरच मनाला भावली माझी एक दिवसाची एक छोटीशी पिकनिक खुप उत्तम ठरली. किमान मुंबईतला थकवा तरी त्या छोट्या पिकनिकने दुर झाला. सलाम त्या सच्च्या कलाकारांना आणी सलाम त्या गणपतीच्या गावाला.
©निरंजन साळस्कर

प्रेमाची व्याख्या..!

प्रेमाची व्याख्या..!

 

प्रेम ही या जगातील अशी एक गोष्ट आहे जी साध्य करायला काहींनी आपलं अख्ख आयुष्य वेचुन टाकलं तर काहींना ते एकदम सहजा-सहजी मिळालं. अर्थात प्रेम मुद्दाम मिळवलं जात नाही आणी कोणी मुद्दाम प्रेमात पडत नाही ते नकळतच होत जातं आणी त्याची जाणीव दोघांनाही नसते एका ठराविक वेळेनंतर त्यांना लक्षात येतं की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेयत. अशा या प्रेमाचे खुप सारे पैलू आहेत कोणी बस स्टॉपवर प्रेमात पडले तर कोणी फ्लाईट मध्ये कोणी अगदी शाळेपासुन प्रेमात आहेत तर कोणाला लग्नानंतर प्रेम होतं. असं म्हणतात प्रेमात पडलेलं जोडपं एका वेगळ्याच दुनियेत असतात त्या दुनियेत त्या लोकलची गर्दी नसते वा त्या तिकिटं काढण्या साठीची लगबग त्यांच एकदम निवांत चाललं असतं जणु ते दोघच त्या दुनियेत अगदी राजा राणी असल्या सारखं त्यांना वाटतं. आता या वेड्या प्रेमाचे प्रकार पण तेवढेच गमतीदार असतात बर का..! काही जणं फक्त सहवास म्हणुन प्रेम करतात काही आकर्षण म्हणुन तर काहींचं तर ते जीवनचं बनलं असतं अर्थात ते प्रत्येकावर अवलंबून असतं की त्यांना कशा त-हेच्या प्रेम रंगात डुंबायचय ते…
काही लेखकांनी याला रोगाची (प्रेम रोग) उपमा दिलीय तर काहींनी रंगाची (प्रेम रंग). कारण काहींच्या आयुष्यात प्रेमाची लागण एखाद्या रोगासारखी झाली तर काहींच्या आयुष्यात लालसर गुलाबी प्रेम रंगाची उधळण झाली. अर्थात या जगातला कोणीही त्याची (प्रेमाची) लागण वा त्याची स्वतःच्या आयुष्यात उधळण झाल्या वाचुन राहीला नाहीय त्यात मीही आहेच. मला अस वाटतं जी व्यक्ती प्रेमात आहे ती जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. आणी प्रेम म्हणजे फक्त व्यक्तीवरच मर्यादित नसाव ते कुठल्याही गोष्टीवर असल तरी ते तितकेच निखळ आणी नितळ असलं पाहिजे मग ते एखाद्या कलेवर, साहित्यावर, छंदावर किंवा आवडीच्या कामावर. प्रेमात नितळता हवी पारदर्शकता हवी विश्वास, समजुतदारपणा हवा, मजा हवी मस्ती हवी वेळ आल्यास एकमेकांना जवळ घेणं, भविष्याबद्दल भरभरून गप्पा मारण, मुलाबाळांबद्दल विचार करण हे सगळचं हवं प्रेमात. अत्यांतिक प्रेमाची मी खुप उदाहरणं पाहीली ज्यात रोमीओ- जुलिएट, हिर- रांझा अाणी असे कित्येक आहेत ज्यांची नावे या समाजाने दडपुन टाकली आणी त्याची कारणेही खुप आहेत पण त्यातल्या त्यात आंतर-जातीय प्रेम हे मुख्य कारण असतं. जाऊद्या त्यावर बोलणेच नको.अशाच एका प्रेमाची छोटी कहाणी मी तुम्हाला सांगु इच्छितो कारण प्रेमाची व्याख्या करण्याइतपत मी त्यापेक्षा मोठा नाहीय त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घोतोय.

मी एकदा फिरण्यासाठी म्हणुन निघालो असताना एका स्टेशनवर उतरलो (काही कारणास्तव नाव सांगत नाहीय) कारण तिथुन मला पुढच्या प्रवासासाठी बस पकडायची होती. बसला खुप उशिर होणार होता म्हणुन मी स्टेशनवरच थाबणे पसंत केले. तेवढ्यात मी स्टेशनच्या शेवटच्या टोकावर पाहीलं एक लग्न झालेलं जोडपं तीथल्या एका चौथ-यावर बसले होते कदाचित ते ट्रेनची वाट पाहत होते. ते जोडपं एकमेकांत एवढ रमलं होतं की त्यांना आपण स्टेशनवर आहे याच भानच नव्हतं. त्याने जेवणाचा डबा आणलेला आणी तो तीला एक एक घास भरवत होता. आणी ते हसत खळखळत स्टेशनवरचं जेवण करत होते. हा असेल तुमच्या दोघांमध्ये अस्मानाएवढं प्रेम पण ते कोणत्या ठिकाणी करतोय याचं थोडतरी भान असायला तरी हवं ना…? मला त्या क्षणी त्यांचा राग येत होता मनात दोन चार शिव्यापण हासडल्या पण त्या निरुपयोगी होत्या. आजकाल प्रेम कमी आणी प्रेमचाळेज जास्त असतात. माझं मनात पुटपटणं चालुच होतं. आता त्यांच्याकडे बहुतेक माणसं बघुन आपापसात काहीतरी कुजबुजत होती कदाचित त्यांनापण ते विचित्र वाटत असावं. त्यांच जेवण करुन झालं त्यानं तीचं तोंडही पाण्याने पुसुन घेतलं. माणसांचं कुजबूजणं वाढलं तरी त्या जोडप्यांनी त्याचे ते प्रेमचाळे थांबवले नाहीत.

तेवढ्यात ट्रेन आली मी त्या जोडप्यांबद्दल ज्या अर्थी विचार करत होतो त्याबद्दल मला माझीच लाज वाटली.त्या क्षणी माझा मलाच राग आला. मी मनाला प्रश्न केला की त्या जोडप्यांना बघुन माझ्या विचारांची पातळी इतकी खालावली.? कारण त्या तरुणाने तीला उचलुन मागे असलेल्या अपंग खुर्चीवर बसवले. त्यांच्या मागे असलेल्या त्या खुर्चीवर माझी नजरचं गेली नव्हती. तो तर प्रेमाने तीला जेवण भरवत होता, त्यांच्यामधल्या गहि-या प्रेमाला पाहुन मला नव्याने प्रेमाची व्याख्या समजली ती म्हणजे कितीही वाईट परिस्थितीत आपल्या जोडीदाराला जीवानीशी साथ देणे हापण एक प्रेमाचाच भाग आहे. जसे डी. पी बदलतात तसे प्रेम बदलणा-या आजच्या या सोशल मिडियाच्या विश्वात अजुनही जीव तोडुन प्रेम करणारे प्रेमी पाहुन मला खुप बरे वाटले. खरच ते जोडप जिथं कुठे असतील त्यांना असच एकत्र एकमेकांचा सहारा बनवुन आयुष्य जगण्याची ताकद देवो हिच माझी इच्छा. खरच जस दिसत तस नसतं आणी म्हणुन जग फसतं…

[Niranjan Salaskar]

“मैथिली”

“मैथिली”

शितल…! जरा लवकर कर मला अॉफिसला जायला उशिर होतोय, माझा रुमाल आणी टाय कुठे ठेवलीयस”? पियुष कपाटात शोधताना बोलला. “अरे तिथेच आहे बघ कपाटात लेफ्ट साइडला निट बघ जरा” शितल टिफीन भरत होती. “बरं का.. चल लवकर तुपण माझ्यासोबत.. काल ठरलय ना आपलं” पियुष शुज घालताना म्हणाला. “हो बाबा.. चल ही बघ झालीच माझी तयारी” शितलने टेबलावरच्या किल्ल्या घेतल्या घरात सगळं बंद केलय याची खात्री केली व कुलुप लावला. पियुषने तोपर्यंत पार्ककिंगमधुन गाडी बाहेर काढली व शितलच्या डोळ्यावर पट्टी बांधत म्हणाला “आज तु खुप खुष होणार आहेस.. एवढ्या वर्षांच आपलंं स्वप्न आज पुर्ण होणार आहे”.
“हो बघुयाच काय देतोय सप्राईज तु”..! शितल आतुरतेने म्हणाली. पियुषने तिचा हात पकडून तिला गाडीत बसवले. तिच्या डोळ्यांसमोरुन हात फिरवुन पट्टी घट्ट बांधल्याची खात्री केली व गाडी सुरू केली.

“पियुष मला नेमकं सांगशील तरी तु कुठे घेऊन जातोय ते”? शितलची उत्सुकता पराकोटीला पोचली. “तिथे पोहोचलो की समजेलच तुला फक्त अर्धा तास वाट बघ”, पियुष समोर बघत बोलला. शितलला काहीच कल्पना नव्हती की पुढच्या अर्ध्या तासात काय होणार आहे ते, कारण या आधीही खुप वेळा पियुषने तिला अशे सप्राईजचे सुखद धक्के दिलेत, त्यामुळे तीला थोडीशी कल्पना आलीच होती की पियुष मला लन्चला नाहीतरी एखादी ज्वेलरी घेण्यासाठी घेऊन जात असेल. तिला गाडीचा हळुहळू ब्रेक दाबण्याचा आवाज आला. पियुष गाडीतून उतरला दुस-या बाजुस येऊन दरवाजा उघडला, गाडीतून उतरण्यासाठी त्याने तीचा हात पकडला. दरवाजा लावला व हातात हात घालून ती पियुषच्या मागोमाग चालत होती. “पियुष मला सांगशील का आपण कुठे आलोय”? “सांभाळून चाल खाली पाय-या सूरू होतील” असं म्हणुन त्याने तिचा प्रश्न टाळला. दोन मजले चढल्यावर तिने परत तोच प्रश्न केला. “हे बघ आलोच इथ थांब जरा”. पियुषने खिशातून किल्ली काढली त्याने टाळा उघडला व तिचा हात पकडून तिला आतमध्ये आणलं. “झालं का तुझ आता उघडु का पट्टी”? शितलला कधी एकदा सप्राईज पाहतेय अस झालं होतं. “हो उघड”….! शितलने डोक्यामागे बांधलेली गाठ सोडली व हळुच डोळे उघडले, आणी गोल गिरकी घेत तिने सगळीकडे पाहीलं, तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. लगेचच ती पियुषला बिलगली व ढसाढसा रडायला लागली, कारण या आधी एवढं मोठ सप्राईज तिला पियुष कडुन कधी मिळाल नव्हतं व तीने कधी अपेक्षाच केली नव्हती. ती दरवाज्या जवळ गेली दरवाजावर मिसेस.शितल पियुष देशपांडे. असं लिहलं होतं, तिने हळुच हाताने त्या पाटीवरुन हात फिरवला. तीचे आनंदाश्रु काही थांबत नव्हते. “आता अशीच रडत बसणार आहेस का जा घर बघुन तरी ये आतुन” पियुषने हसत शितलला म्हटलं. तशी ती आतमध्ये शिरली घरातल्या प्रत्येक वस्तूवर ती मायेने हात फिरवत होती. शितलला ते नवीन घर फारच आवडलं रंग, पडदे, झुंबर याची चॉईसपण घराला शोभेल अशी केली होती. हे सर्व बघुन तिला पियुषचा हेवा वाटत होता. किती कमी वेळात त्याने स्वतःचे आपले घर घेतले. शितल पुर्ण घर बघुन बाहेर आली. “कसं वाटलं आपल नविन घर”? पियुषने विचारलं. “एकदम मस्त खुप आवडलं अगदी माझ्या मनासारख आहे, मी खुप सजवेन या घराला” शितलच्या बोलण्यात तीचा आनंद दिसत होता. ” हो ते नंतर आता निघुया कामाला उशिर होईल नाहितर”? पियुषने म्हणाला. शितलने नुसतीच मान हलवली अस वाटत होतं तिला अजुन थोडा वेळ नविन घरात थांबायचं होतं. ते दोघं बाहेर पडले कुलुप लावलं तोपर्यंत शितल गाडीत जाऊन बसली होती. आज ती खुप… खुप… खुष होती एवढ्या दिवसांपासूनचं तिचं मुंबईतं स्वतःचं घर घ्यायच स्वप्न पियुषने पुर्ण केल. पियुष गाडीत येउन बसला गाडी सुरू केली. “आपण कधी शिफ्ट व्हायचं इथे”? शितलने उत्सुकतेने विचारलं, तिची आतुरता पियुष समजु शकत होता कारण त्या छोट्या भाड्याच्या खोलीत राहुन ती कंटाळली होती. “उद्याच शिफ्ट व्हायचं” पियुषने खुष होऊन म्हटलं. “काय? उद्याच.? शितलने डोळे विस्फारत म्हटलं. ‘हो’ आज काही माणसं येतील सामान हलवायला तु आता घरी जाऊन सामान बांधायला घे” “ठीक आहे मी आता फुलदाणी, पडदे, बेडशीट, सगळं बांधुन ठेवते”. शितल म्हणाली. तिच्या चेह-यावर वेगळाच हुरूप आलेला होता काय करु नी काय नाही असं तिला वाटत होतं आणि ते सहाजिकच शेवटी ती तिच्या स्वतःच्या घरात जाणार होती.

पियुषने तिला घराजवळच्या चौकात सोडलं व तो पुढे कामावर निघुन गेला. शितलने घरी आल्या आल्या सामानाची बांधा बांध सुरू केली, अथर्व (शितल व पियुषचा ६ वर्षांचा मुलगा) नुकताच शाळेतुन आलेला त्याला काही कळलंच नाही आई काय करतेय सगळं सामान काढुन. “आई काय करतेयस तु”? त्याने निरागस चेह-याने विचारलं. शितल त्याचा पापा घेत म्हणाली “आपण आता आपल्या घरी जाणार आहोत स्वतःच्या, तुझ्या पप्पांनी नवीन घर घेतलंय.. तसाच तो ए……! नविन घर नविन घर…..! ओरडत बेडरूममध्ये गेला. त्याच्या निरागसतेवर शितलला हसुच आलं. पुर्ण सामान शिफ्ट करायला दोन दिवस लागले, नवीन घरात त्यांचे दोन-तीन दिवस झाले. पियुषला शितलने आपण वास्तुशांती करुन घेऊया असं सुचवलं पण पियुषचा या सगळ्यावर विश्वासच नव्हता आणी शितलनेही त्याला जबरदस्ती केली नाही शेवटी तिला त्याचं मन दुखवायचं नव्हतं

नवीन घर खुप मोठं होतं त्यामुळे अथर्वला खेळायला खुप जागा होती, नुसता घरात मस्ती करत असायचा. त्यालाही लगेचच नवीन घराचा लळा लागला होता.
नवीन घरात दिवस कसे पटकन निघुन गेले कळलंच नाही बघता बघता २ महिने झाले. त्या सकाळी मी किचनमध्ये डब्याची तयारी करत होते. पियुष हॉलमध्ये टि. व्हि बघत होता, अथर्वपण शाळेची तयारी करुन बेडरूममध्ये बसला होता. अचानक मला बेडरूममधुन अथर्वाचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला, पण मी दुर्लक्ष केल. थोड्या वेळाने मला अथर्वाच्या एकट्या कुजबूजण्याचा आवाज आला. मी त्याला बघण्यासाठी बेडरुमजवळ आली, दरवाज्याच्या फटीतुन आत पाहीलं आणी माझ्या अंगावर सरसरुन काटाचं आला अथर्व बेडवर बसुन समोर कोणाशी तरी गप्पा मारत होता. मला काही समजत नव्हतं अथर्व असं कोणाशी बोलतोय. माझ्या घशाला कोरड पडली याआधी अथर्व कधीच असा वागला नव्हता. मी धावत हॉलमध्ये जाऊन पियुषला हे सांगणार तोच हॉलमध्ये सोफ्यावर पियुष आणी अथर्व बसले होते. अथर्वने मला बघुन विचित्र पण स्मितहास्य दिलं त्यावेळी ते हास्य खुप क्रुर वाटत होतं. मला समजतचं नव्हतं हा काय प्रकार चालु होता. मला एवढ्या घामाघूम झालेलं पाहुन पियुषने मला विचारलं “काय गं अशी घाबरलेली का दिसतेयसं”? मी काही बोलणार एवढ्यातं माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली व मी धपकन जमिनीवर कोसळली.
थोड्या वेळाने थंड पाण्याचा भपका कोणीतरी तोंडावर मारुन मला उठून बसवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत होतं मी डोळे किलकिले करुन पाहिलं पियुष माझ्या डोक्याजवळ व अथर्व पायाजवळ बसला होता. “अगं शितल अशी कशी पडलीस तु”? “तरी तुला मी नेहमी बोलतो काहीतरी खाऊन कामाला लाग उपाशी पोटी हे असंच होतं.. हे घे नास्ता करुन ही गोळी घे थोडं बरं वाटेल ” पियुष तिचा हात हातात घेऊन म्हणत होता.

तीने पियुषच्या हातातली गोळी घेतली व पियुषला सगळं सांगणार एवढ्यात तिची नजर अथर्ववर गेली व ती गप्प बसली. अथर्व समोर पियुषला सांगणे योग्य नाही म्हणून तिनं त्याला नंतर सांगण्याचे ठरवले. “आज तु आराम कर मी जमल्यास हफ डे ने यायचा प्रयत्न करेन..! अथर्वला आज घरीच राहु देत तुझ्यासोबत” पियुष तिला धिर देत म्हणाला. “चल मी निघतो… “अथर्व आज तु मम्मीकडे लक्ष ठेव तीला काही हवं नको ते बघ मग मी आल्यावर आपण खुप मज्जा करुया”. पियुषने अथर्वला कुशीत घेतले. “ठिक आहे पप्पा मी आज मम्मीची काळाची घेईन” अथर्व बोबड्या सुरात म्हणाला. हे एकुन शितलच्या पोटात गोळाच आला. तिच्या डोक्यात सकाळचाच विचार चालु होता. तिला विश्वासच बसत नव्हता की सकाळी घडलेलं भास होता की सत्य….?
“आई तुला काही पाहिजे का”..? अथर्वच्या निरागस प्रश्नाने शितलला खात्री पटली की सकाळी घडलेलं सगळं भासचंं असेल. “माझा बाबु का असा एकटा बडबडेल..? स्वतःशीच प्रश्न विचारत ती सकाळच्या घटनेबद्दल स्वतःवरचं हसली… मध्येच कसल्यातरी खदखदल्यासारख्या आवाजाने तीला जाग आली ती उठली डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटतं होतं, तिला गोळीने गुंगी कधी आली कळलच नाही. आवाज बेडरूममधुन येत होता ती बेडरुमच्या दिशेने दबकत दबकत गेली. एका डोळ्याने बेडरुमचा कानोसा घेतला तर अथर्व जोरजोरात हसत होता, गप्पा मारत होता, खेळत होता. यावेळी मात्र शितल बर्फासारखी गार पडली तिला समजतच नव्हतं अथर्वला नेमक काय झालय. ती बेडरूममध्ये गेली तेव्हा त्याने भिंतीकडे बोट दाखवत म्हटले “आई ही बघ माझी नवीन मैत्रिणी “मैथिली”. शितलच्या पायाखालची जमिनच सरकली कारण अथर्व आणी शितल सोडून घरात तिसरं कुणीच नव्हतं. तीची भितीने पुर्ण भांबेरी ऊडाली काय करावं हे तीला सुुुचेना, अथर्वाला कुशीत घेऊन ती धावत हॉलमध्ये आली व पियुषला कॉल करुन तातडीने घरी बोलवलं, झालेला सगळा प्रकार पियुषला सांगितला पण पियुषने शितलची समजुत काढली व “तुला भास झाला असेल”, असं म्हटलं. “नाही पियुष अथर्वला याआधीपण मी एकटं बोलताना पाहिलयं त्याची “मैथिली” नावाची कोणीतरी मैत्रिण आहे म्हणे या घरात तिच्याशी हा बोलत असतो खेळत असतो…! मला काहीच कळत नाहीय पियुष तु प्लिज डॉक्टरांना बोलव प्लिज ” शितल पोटतीडकीने पियुषकडे विनंती करत होती आणि सहाजिकच होतं ते, शेवटी आई ती आईच असते. पियुषने शितलची हालत बघुन डॉक्टरांना बोलवलं.

रात्री ९-९:३० च्या सुमारास डॉक्टर आले लागलीच पियुषने डॉक्टरांना अथर्वची रुम दाखवली. डॉक्टर अथर्वच्या बेडरूममध्ये गेले मागोमाग पियुष व शितलही होतेच. अथर्व आताही एकटा बोलत होता आणि यावेळी पियुषनेही ते पाहिलं त्याचा विश्वासच बसत नव्हता. “डॉक्टर अथर्वला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसअॉर्डर झाला नसेल”? पियुषने चिंतीने विचारले. पियुषला या आजाराबद्दल जरा माहिती होतं. “थांबा मला अथर्वाला चेक करु द्या. (अथर्वची एकंदर वागणूक आजारी माणसासारखी बिलकुल नव्हती त्यामुळे स्थेतस्कोपने चेक करायची औपचारीकता न करता त्यानी अथर्वला काही प्रश्न विचारले). “हाय अथर्व “कसा आहेस बेटा”? “मी एकदम मस्त आहे डॉक्टर अंकल” “बेटा तु आता कोणाशी गप्पा मारत होतास”? अंकल ती माझी नवीन मैत्रिणी आहे “मैथिली”. “अच्छा मग आमची भेट करुन नाही देणार तुझ्या मैत्रिणीशी”? “अंकल, तिला नाही आवडत मोठी माणसं.. ती फक्त माझ्याशीच बोलते” अथर्व हसुन म्हणाला. “ओके मग केवढी आहे तुझी मैत्रिणी काय वय काय तिचं”? ती खुप मोठी आहे माझ्यापेक्षा मी दुसरीत आहे आणि ती बारावीत आहे ” अच्छा एवढी मोठी मैत्रिणी वा मस्तचं आहे मग” एवढ बोलुन डॉक्टर बेडरूममधुन बाहेर निघाले, हॉलमधील सोफ्यावर येऊन बसले त्यांच्यापाठोपाठ दोघही येऊन डॉक्टरांजवळ बसले. “काय झालय अथर्वाला डॉक्टर तो असा का वागतोय..? पियुषने विचारलं. “पियुष मला अथर्वमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली नाहीत, लहान मुले नेहमी मनावर बिंबवलेल्या गोष्टी सारखे बोलत असतात. अथर्वने पण हे कुठेतरी मैथिली नावाच्या मुलीबद्दल ऐकल असेल कारण त्याने मैथिली बारावीत असल्याचं सांगितलं म्हणजे १८-१९ वर्षांची मुलगी. आणी अथर्व ६ वर्षांचा. लहान मुले नेहमी इल्युजनरी गोष्टी बोलत असतात कदाचित त्यांच्या इम्यँजीन पावर मुळे होऊ शकत. तो एकदम ठिक आहे काहीच काळजी करु नका”.! हे ऐकताच पियुषने शितलच्या खांद्यावर हित ठेवत तिला धीर दिला. डॉक्टरांनी झोपेसाठी काही गोळ्मा लिहून दिल्या त्याप्रमाणे शितलने अथर्वला गोळी दिली. गुंगीने अथर्व झोपी गेला.

६-८ दिवस झाले अथर्व एकटा बडबडत नव्हता की खिदळत नव्हता.त्यांच्यामध्ये झालेला बदल बघुन मला फार बरं वाटत होतं. एक दिवस मी सोफ्यावर पडले असताना अथर्व माझ्या कुशीत आला त्याचं शरीर बर्फासारखं थंड होतं. “आई मरणं म्हणजे काय गं..? ६ वर्षांचा मुलगा मला मरणाबद्दल का विचारतोय काही कळलेचं नाही “मरणं म्हणजे माणुसं कायमचे हे जग सोडुन देवाघरी जातात ना त्याला मरणं म्हणतात, पण तु का विचारतोय हे सगळं.? अजुन तुला खुप मोठ व्हायचंय, शिकायचयं…. “कारण मैथिली म्हणाली की ती माझ्या बेडरूममध्ये २ वर्षांआधीच फास लावुन मेली होती” अथर्व थंडपणे म्हणाला. हे एकताच शितलच्या अंगावरुन सरकन काटा आला, तिची दातखिळीचं बसली. “डॉक्टर अंकलच्या गोळ्यांमुळे मला खुप झोप येते तिच्याशी बोलायला मिळतच नाही, म्हणुन काल ती मला तिच्यासोबत बोलवत होती मीपण तीच्यासोबत गेलो.. तेवढ्यात त्याने शर्टाची कॉलर थोडी बाजुला केली. शितलने अथर्वच्या मानेवर पाहिलं आणी तीच्या पायाखालची जमिनच सरकली दोरखंडाचे लालसर काळे व्रण मानेवर उमटले होते तीची दातखिळीच बसली………. तो शांत तीच्या कुशीत डोळे मिटूुन पडुन होता………………. आणी ती एकटक त्याच्याकडे बघत राहीली…!

निरंजन साळस्कर)

error: Content is protected !!