Category: Uncategorized

योग…

योग…

#आयुष्य इतकंही खराब नाहीये की प्रत्येक सिग्नलवर लाल दिवा लागावाच. पण ते इतकंही सुखावह नाही की सिग्नलवर गाडी थांबवल्यावर बाजूला activa वर बसलेली एखादी सुंदर तरुणी यावी अन तिने तिचे विस्कटलेले रेशमी केस आरशात बघून नीट करत असताना आपण तिच्याकडे बघावं अन त्याच क्षणी तिने आपल्याकडे एक घायाळ करणारा कटाक्ष टाकावा!

 

गुढीपाडवा!

गुढीपाडवा!

आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखसमाधानाचं, शांतीचं, आनंदाचं, भरभराटीचं, प्रगतीचं, उत्कर्षाचं, प्रेमाचं, मायेचं, मित्रत्वाचं जावो!

चांगल्या-वाईट घटना घडत असतात… वर्षामागून वर्षे सरत जातात… कुठेतरी आनंद असतो कुठेतरी वेदनाही असतात… कधी पश्चातापही होतो तर कधी गर्वही… दिवसागणिक अन भेटणार्‍या माणसाप्रमाणे आपणही बदलत जातो… एखादं पान नदीच्या प्रवाहात पडतं त्याप्रमाणे परमेश्वराने ह्या पृथ्वीवर आपल्याला पाठवलं असतं… आपण वाहत जातो… शेवटी कुठेतरी समुद्राला मिळावच लागतं… आयुष्यभरचं चांगलं-वाईट आपली माती होतानाच कळतं… पण जीवन सुंदर असतं… पंचेद्रियांना जसा चांगल्या वाईटचा अनुभव असतो तसाच आपल्यालाही सोसावा लागतो… शेवटी सुखाचा अन दुखाचा काटा समान येऊनच थांबतो… आनंदाने जगत राहणे हाच त्यावर उत्तम उपाय असतो… तुलनाच केली तर आपण कोणापेक्षा तरी जास्त आनंदी किंवा दुखीही असू शकतो किंवा कमी आनंदी किंवा दुखी असू शकतो… पण तुलनेचा तराजू दर्जाचा पाहिजे…

गुढीपाडवा काहीतरी देण्यासाठी अन काहीतरी घेऊन जाण्यासाठिच असतो… नव्याची सुरुवात होत असते… जुनं मागे जातं, फक्त आठवणीत राहतं…

स्वच्छंदी जगा, निरोगी रहा!!!

परकाया प्रवेश!

Happy friendship day 😊

Happy friendship day 😊

ज्यांच्याशी कधी गाठभेट नाही झाली पण या website  माध्यमातून भावबंध जुळले अशा सर्व स्नेह्यांस *मैञी दिनाच्या* शुभेच्छा…
Happy friendship day 😊…………………

disappointment

disappointment

its always disappointment in the final moment… crisis comes like an old friend… no options… just to wait till the conditions can takeover us… its fate, its destiny, its …..!

स्वप्नभंग

स्वप्नभंग

माणूस स्वप्न बघत असतो; जगतही असतो. एखाद्या स्वप्नाच्या मागे धावताना, ते स्वप्न जगण्याची इच्छा पूर्ण करत असताना त्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागत असतं. त्यात मग हातात असलेल्या गोष्टी गमवाव्या लागतात, बर्‍याच गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि तरीही जर ते स्वप्न साकार होत नसेल तर…? नैराश्य, विवंचना, अस्थिरता अशा गोष्टींशी घरोबा होतो.

मुळात माणूस स्वप्न का बघतो? सगळं उत्तम चालू असताना वेगळ्या वाटेवरचा विचार मनात का आणतो? केवळ इच्छा? नाही ते त्याहून अधिक काहीतरी असतं. काय असतं? जगण्यावरचं प्रेम आणि जगण्यासाठी असलेला मार्ग. हातात असलेली वाळू क्षणाक्षणाला गळून जात असते, ती संपणार आहे हेही माहीत असतं; ती संपणार तोपर्यंत वाट पूर्ण करायची असते… पण साला वाळू संपून हाताला चिटकुन राहिलेले कण दिसतात आणि वाट तर अजून अर्धीही नाही असं समजल्यावर भावविश्वात गदारोळ होतो. मग योग्य मार्ग सोडून अनेक मार्ग दिसायला लागतात. स्वप्न अन सत्यतला फरक समजायला लागतो. हतबलता येते… मन हेलकावे खात बसतं… स्वप्न अर्धवट राहतं…

स्वप्नांचा पाठलाग करताना मधूनच खाडकन जाग येते. ते झोपेतील स्वप्न असतं. त्याला सोडून जगता येतं, पण जागेपणी बघितलेलं स्वप्न जेंव्हा तुटतं तेंव्हा जगताही येत नाही अन मरतातर येतच नाही… कधीतरी हात लागेल म्हणून पुन्हा त्याच स्वप्नाच्या मागे धावायचं का हातातून सगळं सुटलं आहे म्हणून नवीन जागेपण स्वीकारायचं अशी मनस्थिती असते. पराभूतची मानसिकता वारंवार टोचत असते… भीती पराभवाची नसली तरी त्यातून येणार्‍या नैराश्य अन निष्क्रियतेची असते… जळणार्‍या सूर्याप्रमाणे पुन्हा तीच आग पेटायला, तीच धग सोसायची क्षमता नसते… कोठुनतरी सुरू झालेला प्रवास अनोळखी अन अंधार्‍या वाटेवर आणून सोडतो… चुकीची गाडी धरल्याची भावना जागी होते… भल्या अंधारात डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडतो… आता अंधारात चाचपडत कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पोचायची घाई करावी लागते, अन्यथा त्याच अंधारात कायमचं गढून राहण्याची भीती असते… स्वप्नभंग झाल्याचं लक्षात येतं… दुसर्‍याने हात द्यावा अपेक्षा नसते, पण आपल्या परिस्थितीला बोटं दाखवणार्‍यांचा तिटकारा येतो… आकांक्षाचे ओझे गळून पडतात अन अपेक्षांचा बाजार तर कायम सताड उघडा असतो… उरलेल्या शक्ति अन हिमतीनिशी धडपडत का होईना रस्ता शोधतो… पुन्हा नव्याने प्रकाश पाहिल्यानंतर परत-परत तेच स्वप्न खुणावू लागतं… विनाशाच्या सुरुवातीतून वाचून परत त्याच शेवटाकडे जाण्याची भीती नसते… भंगलेल्या, गंजलेल्या निरर्थक भविष्याच्या चाव्या बोथट होऊन बसलेल्या असतात… त्याची जाणीव असली तरी जागेपण नसतं…

एक भूकंप, एक स्वप्नभंग अन बदललेले रंग!!!

सैराट मराठी चित्रपट/ झिंगाट सॉन्ग

सैराट मराठी चित्रपट/ झिंगाट सॉन्ग

#Sairat Marathi Movie/ Jhingat Song

‘Fandry’ ह्या पहिल्याच चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दिग्दर्शक, अर्थात नागराज मंजुळे… घेऊन येत आहे दूसरा मराठी चित्रपट ‘सैराट’… साहजिकच नावात बरच काही आहे… ह्या चित्रपटातील ‘झिंगाट’ हे उडत्या चालीचं अन नडत्या बोलीचं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे… ह्या गाण्याला संगीत दिलं आहे  अजय-अतुल ह्या  जोडीने… fandry मधील  ‘तुझ्या पिरतीचा इंचू…’ नंतर झिंगाट…

https://www.youtube.com/watch?v=g8bTNID9nPs

 

Health Tips

Health Tips

# Usefulness of Jaggery

#आरोग्यम धनसंपदा!!! घरचा वैद्य!!!

🙏गुड़ खाने से 18 फायदे :🙏

 

1- गुड़ खाने से नहीं होती गैस

की दिक्कत

 

2- खाना खाने के बाद अक्सर

मीठा खाने का मन करता हैं।

इसके लिए सबसे बेहतर है

कि आप गुड़ खाएं।

गुड़ का सेवन करने से आप

हेल्दी रह सकते हैं

 

3 – पाचन क्रिया को सही रखना

 

4 – गुड़ शरीर का रक्त साफ

करता है और मेटाबॉल्जिम

ठीक करता है।

रोज एक गिलास पानी या दूध

के साथ गुड़ का सेवन पेट को

ठंडक देता है। इससे गैस की

दिक्कत नहीं होती।

जिन लोगों को गैस की परेशानी है,

वो रोज़ लंच या डिनर के बाद

थोड़ा गुड़ ज़रुर खाएं..

 

5 – गुड़ आयरन का मुख्य स्रोत है।

इसलिए यह एनीमिया के मरीज़ों

के लिए बहुत फायदेमंद है।

खासतौर पर महिलाओं के

लिए इसका सेवन बहुत

अधिक ज़रुर है.

 

6 – त्वचा के लिए, गुड़ ब्लड से

खराब टॉक्सिन दूर करता है,

जिससे त्वचा दमकती है और

मुहांसे की समस्या नहीं होती है।

 

7 – गुड़ की तासीर गर्म है,

इसलिए इसका सेवन जुकाम

और कफ से आराम दिलाता है।

जुकाम के दौरान अगर आप

कच्चा गुड़ नहीं खाना चाहते हैं

तो चाय या लड्डू में भी

इसका इस्तेमाल कर सकते हैं।

 

8 – एनर्जी के लिए -बुहत

ज़्यादा थकान और कमजोरी

महसूस करने पर गुड़ का

सेवन करने से आपका एनर्जी

लेवल बढ़ जाता है।

गुड़ जल्दी पच जाता है, इससे

शुगर का स्तर भी नहीं बढ़ता.

दिनभर काम करने के बाद

जब भी आपको थकान हो,

तुरंत गुड़ खाएं।

 

9 – गुड़ शरीर के टेंपरेचर को

नियंत्रित रखता है।

इसमें एंटी एलर्जिक तत्व हैं,

इसलिए दमा के मरीज़ों के

लिए इसका सेवन काफी

फायदेमंद होता है।

 

10 – जोड़ों के दर्द में आराम–

रोज़ गुड़ के एक टुकड़े के

साथ अदरक का सेवन करें,

इससे जोड़ों के दर्द की

दिक्कत नहीं होगी।

 

11- गुड़ के साथ पके चावल

खाने से बैठा हुआ गला व

आवाज खुल जाती है।

 

12 – गुड़ और काले तिल के

लड्डू खानेसे सर्दी में अस्थमा

की परेशानी नहीं होती है।

 

13 – जुकाम जम गया हो, तो

गुड़ पिघलाकर उसकी पपड़ी

बनाकर खिलाएं।

 

14 – गुड़ और घी मिलाकर खाने

से कान का दर्द ठीक हो जाता है।

 

15 – भोजन के बाद गुड़ खा

लेने से पेट में गैस नहीं बनती.

16 – पांच ग्राम सौंठ दस ग्राम

गुड़ के साथ लेने से पीलिया

रोग में लाभ होता है।

 

17 – गुड़ का हलवा खाने से

स्मरण शक्ति बढती है।

 

18 – पांच ग्राम गुड़ को इतने ही

सरसों के तेल में मिलाकर खानेसे

श्वास रोग से छुटकारा मिलता है।

 

नोट – ये सामान्य रूप से होनेवाले फायदे है| अगर आप किसी अलग बिमारी से पीडित है तो गुड खाने से पहले आयुर्वेदिक तथा अपने नियमित डॉक्टर की सलाह लिजिय!!

म्हणून कोण आत्महत्या करते का???

म्हणून कोण आत्महत्या करते का???

#Marathi Kavita  #मराठी कविता

#एक कविता आधारासाठी!

सध्या महाराष्ट्र व देशातील इतर भाग कठोर दुष्काळाचा सामना करत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा तर गेल्या तीन वर्षांपासून तहानलेलाच आहे. अशा परिस्थितीशी झगडताना आपला शेतकरी बांधव मेटाकुटीला येऊन हजार समस्यांना कंटाळून आयुष्याची जीवनरेषा संपवत आहे. केवळ सांगणं किंवा बोलणं खूप सोप्पं आहे, पण थेट परिस्थितीशी भिडणे कर्मकठिण काम आहे. अशा अनेक बांधवांना त्यांच्याच एका शेतकरी बांधवाने दिलेल्या दिलाशाच्या, आधाराच्या अन हिम्मतीच्या चार ओळी…

कवीचे नाव अज्ञात आहे मात्र ज्याने रचना केली त्याला 1000 सलाम

घरटे उडते वादळात

बिळा, वारूळात पाणी शिरते

कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?

म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही

शिकार मिळाली नाही म्हणून

कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी

करत नाही अर्ज

स्वतःच उभारते वारूळ

कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला

फक्त चोच घेउन जगते

स्वतःच विणते घरटे छान

कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी

तरी तक्रार नाही ओठी

निवेदन घेउन चिमणी

फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला

धाऊन येतो कुत्रा

लाईफ इन्शुरन्स काढला का ?

अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल

कमाउन धन देतात

सांगा बरं कुणाकडून

ते निवृत्ती वेतन घेतात ?

कष्टकराची जात आपली

आपणही हे शिकलं पाहिजे

पिंपळाच्या रोपा सारखं

पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना

पुरस्काराने सन्मानित

तरीही मोर फुलवतो पिसारा

अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव

फुलांची काही कमी नाही

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा

कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला

भय, चिंता फासावर टांग

जिव एवढा स्वस्त नाही

सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी

संकटापुढे झुकला का ?

कितीही तापला सुर्य तरी

समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर

टाक निर्भीडपणे पाय

तु फक्त विश्वास ठेव

पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण

पुन्हा यशाचा गड

आयुष्याची लढाई

फक्त हिमतीने लढ!

error: Content is protected !!