Category: Travelyaari

नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग किल्ला

 

#नळदुर्ग #महाराष्ट्रातील_किल्ले #पर्यटन #भटकंती #निसर्ग #पाऊस #Nature #Photography #FortsInMaharashtra

 

   

 

पन्हाळ्याची स्वारी!

पन्हाळ्याची स्वारी!

#पन्हाळ्याची महती आणि माहिती!

#Panhalgad Trip

शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या आणि अशा अनेक शूरवीरांच्या अन महात्म्यांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या पन्हाळा ह्या गडावर जाण्याचा योग आला हे भाग्यच!!! ह्याच पन्हाळ्याला सिद्दी जौहरने वेढा घालून स्वराज्याच्या राजाची नाकाबंदी केली होती; ह्याच पन्हाळ्यावरून विशालगडाकडे जाताना बाजीप्रभू, शिवाकाशी, बांदल आणि अनेक शूर मावळे स्वराज्यासाठी अन त्याच्या राजासाठी धारातीर्थी पडले! ह्याच गडावर संभाजी राजांना कैदेत ठेवले गेले होते व नंतर येथून सुटका करून घेऊन त परत शिवाजीराजांकडे आले. कोंदोजी फर्जन्द या मर्दाने अवघ्या काही मावळ्यांच्या जिवावर हा किल्ला मोघलांकडून पुन्हा जिंकून घेतला. उत्तर काळात मराठ्यांची राजधानी!

-> पन्हाळगड हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्यातील पन्हाळा तालुक्यात एक महत्त्वाचा किल्ला आहे . पन्हाळा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची समुद्रसपाटीपासून ४०४० फुट आहे. हा किल्ला एक निसर्गरम्य परिसरात असून  पर्यटणासाठी उत्तम आणि आनंद देणारा आहे. विशेष म्हणजे हा चढाईस सोपा असणारा गड आहे.

-> पन्हाळा गडास अविस्मरणीय इतिहास आहे, पण बाजीप्रभू यांचा पराक्रम आणि शिवाजी-संभाजी यांची भेट या प्रमुखकरून आठवणार्‍या घटना आहेत. बाजीप्रभू आणि इतर महापराक्रमी मावळ्यांच्या रक्ताने तेथील घोडखिंड पावण झाली म्हणून त्या घोडंखिंडचे नाव पावनखिंड असे नाव  झाले.

 

-> पर्यटनाचे स्पॉट???

बाजीप्रभूंचा पुतळा :- या गडाच्या मधोमध पराक्रमी बाजीप्रभूंचा एक दिमाखदार असा पुतळा आपणाला पहावास मिळेल. जो त्यांच्या पराक्रमाची एक प्रतिकृती आहे.

अंबरखाना :- या इमारतीचा आकार हत्तीच्या पाठीवर ठेवण्यात येणाऱ्या अंबरसारखा असल्यामुळे याला अंबरखाना असे म्हणत असे.हा त्याकाळी बालेकिल्ला होता. त्याच्या जवळ गंगा,यमुना आणि सरस्वती या नावाची धान्य कोठारे आहेत.या कोठार तांदूळ ,नाचणी, वरी त्यांची धान्य साठवण केली जात असे.याची श्रमता २५००० खंडी इतकी होती.त्याच बरोबर त्या इमारतीचा उपयोग सरकारी कचेऱ्या ,टाकसाळ यांच्यासाठी होत असे. या जवळ शिवाजी महाराजांचा राजमहल होता जो इग्रंजानी १९४४ साली उध्वस्त केला.

 

राजवाडा– हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

सज्जाकोठी– राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.

राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

अंधारबाव/अंदरबाव :- हि एक तीन मजली इमारत आहे याच्या तळमजल्यात एक विहीर ही आहे. हे गडावरील कुतुहलाचे ठिकाण आहे . तसेच इथून तटबंदीकडे जाण्यासाठी चोरदरवाजादेखील आहे.

तीन दरवाजा :- हे पश्चिमेच्या दिशेला एकापाटोपाट असे तीन दरवाजे आहेत. हे दरवाजाचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. दरवाजाचे बांधकाम शिशामध्ये केले आहे. याच दरवाजावर श्रीगणेशची मूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या पंजात हत्ती असलेली शिल्पे दिसेल. तसेच पहिल्या दरवाजावर फारशी भाषेतील एक शीलालेख दिसतो. तीन दरवाजातून आत आल्यावर आपणाला विष्णूचौक व विष्णुतीर्थ नावाची विहीर पहावास मिळेल व कोंडाजी फर्जद याने ६० मावळ्यांसमवेत किल्ला जिंकला होता. व याच दरवाजातून इग्रंजानीही आक्रमण केले होते. तीन दरवाजाजवळ हनुमाननाचे मंदिर आहे मूर्ती त्याकाळीतील आहे. वाघ दरवाजा : हा  सुद्धा गडावरील एक कौशल्यपूर्ण बांधकाम केलेला दरवाजा आहे . याच्या जवळ तबक बाग आहे.

 

चार दरवाजा– हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच “शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव – गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी – सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

रेडे महाल– याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

संभाजी मंदिर– त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

धर्मकोठी– संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

महालक्ष्मी मंदिर :- हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर जे राजवाड्याजवळ आहे. हे राजा गंडारित्य भोज याचे कुलदेवत होते. मंदिराजवळच सोमेश्वर तलाव आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

हे स्पॉट सोडले तर तेथे आसपास थोडं जंगल आहे. चार-सहा सोबती असतील तर तेथे फिरण्याने, तेथील हिरवळ बघितल्याने डोळ्याला ताजेतवानेपणा आणि मनाला आराम मिळेल. तसच तेथून काही किलोमीटर वर कसलंतरी अवकाश संशोधन केंद्र का काहीतरी आहे. बाजीप्रभू यांच्या पुतळ्याच्या पाठीमागून जो रस्ता जातो तेथून जावं लागतं. आमच्या दुर्दैवाने वेळ कमी आणि चुकीच्या नियोजनामुळे तेथे जाता आलं नाही.

 

-> पन्हाळ्याला कसे जावे?

कोल्हापूरवरून एक तासभराच्या अंतरावर आहे पन्हाळा. तेथे जाण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती असलेल्या टाऊन हॉल जवळ बस किंवा प्रायवेट गाड्या भेटू शकतात. जर शक्य असेल तर एक दिवसासाठी गाडी भेटली तर उत्तम राहील, कारण जवळच ज्योतिबा आणि इतर स्पॉट आहेत जे लवकर होऊ शकतात.

 

-> गडावर राहायची-खायची सोय?

राहायची सोय याबद्धल खात्रीने सांगता येणार नाही. गेस्ट हाऊस आणि लॉज दिसतात पण नक्की नाही माहीत. पण खायची सोय उत्तम आहे. बाजीप्रभू पुतळ्यापासून जवळच हॉटेलच्या रांगा आहेत. एकाहून एक भारी अस्सल गावरण पदार्थ मिळतात जेवायला. पिठलं-भाकरी, ठेचा आणि कांदा भजे खाऊन तर सगळा थकवा क्षणात उतरतो!!!

 

टीप- शिवरायांचा आणि गडाचा इतिहास माहीत असेल तर फिरणं अधिक रुचकर, उत्साहवर्धक आणि थरारक वाटेल.

#पन्हाळगडाची छायाचित्रे!!! #Images Of Panhalgad

बाजीप्रभू चौक
कोल्हापूरवरुन पन्हाळ्याला गेल्यावर प्रथम तुम्ही ह्या चौकात येता.

DSCN0855 DSCN0859 DSCN0866 DSCN0870 DSCN0884 DSCN0891 DSCN0892 DSCN0894 DSCN0899 DSCN0900 WP_20160124_10_05_09_Pro WP_20160124_10_05_13_Pro WP_20160124_10_07_32_Pro WP_20160124_10_08_47_Pro

कोकणातील कातळशिल्प – भाग २

कोकणातील कातळशिल्प – भाग २

#रम्य कोकण, गूढ कोकण!

काहीच दिवसांपूर्वी आपण

Petroglyphs In Konkan/Maharashtra

ह्या शीर्षकाखाली कोकणातील गूढ चित्र आणि शिल्पंबद्धल बोललो होतो. आनंदाची बाब म्हणजे, ह्या विषयावर अजून लिखाण येत आहे. वृत्तपत्र माध्यमातून ‘भटकंती’ करणारे निसर्ग-वैज्ञानिक याबद्धल माहिती सांगत आहेत. ही अत्यंत महत्वाची अन दिलासादायक गोष्ट आहे. कातळशिल्प म्हणजे काय आणि त्याबदधल इतर माहिती मागील भागात पाहिली आहे आणि खाली दिलेल्या लोकसत्ता वृत्तपत्राच्या बातमीवर जरूर नजर टाका!!!

रानावणात भटकणार्‍या माझ्या मित्रांनी जरा चौकस नजरेने फिरावं… आशुतोष बापट यांनी ही माहिती लोकांपर्यंत पोचवण्यबद्धल कष्ट घेतले म्हणून त्यांचे आभार..

http://www.loksatta.com/lokbhramanti-news/beautiful-rock-sculptures-of-ratnagiri-and-sindhudurg-district-1203387/

WP_20160217_10_55_35_Pro WP_20160217_10_55_02_Pro

Petroglyphs In Konkan/Maharashtra

Petroglyphs In Konkan/Maharashtra

*कोकणातील कातळचित्र*

महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख वाचण्यात आला होता जो खरच खूप उत्कंठावर्धक आहे. तो लेख नेमका काय आहे तो खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. हा पेपर सहज माझ्या हाती लागला अन अशी नावीन्यपूर्ण माहिती मला मिळाली. नंतर इंटरनेट वर ह्या लेखाचा मी बराच शोध घेतला आणि शेवतो तो सापडला. आज माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचावा असं वाटतं.

जी माहिती यात आहे ती थक्क करून टाकणारी आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर ancient aliens म्हणून एक मालिका येते त्याच प्रकारची माहिती यात आहे. त्यांच्या थेरी नुसार हे सगळं कृत्य परग्रहवासीय यांचं आहे; तेही हजारो वर्षांपूर्वीचं!!! असूही शकतं म्हणा! कारण ते रेखाटताना तेथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे सत्य असत्य कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण एक गोष्ट विशेष की, आपण ती रेखाटने रोज बघत असतो त्यांना पाचपांडव, गावराखा वगैरे नावे देतो. आपल्याला त्या गोष्टींचा नेमका अर्थ माहीत नसल्याने आपण त्यांना तसे नावे देतो. असो, यात चूक काहीही नाही. जगाच्या पाठीवर सगळीकडे असंचं असतं. ह्या गोष्टींचं अजून सखोलपणे संशोधन होणं गरजेचं आहे, ज्यासाठी अर्थात कोण पगार देणार नाही. ते आपल्यालाच करावं लागणार आहे, तेही स्वखुशीने अन स्वखर्चाने!!!

#Read This Erik V. Van der Eycken or Ancient Aliens Team

एरिक वॅन डॅनीकन हे ह्या सर्व विषयांचे तज्ञ समजले जातात. इजिप्ट मधील पिरॅमिड पासून जगातील कानाकोपर्‍यात ते फिरून अशा प्राचीन खाणाखुणा शोधत असतात. त्यांच्यामते ह्या खूना स्वतः aliens यांनी किंवा त्यांना देव मानणार्‍या त्या काळातील मनुश्यांनी त्यांना खुश करण्यासाठी रेखाटली असावीत. अशी रेखाटने जगाच्या बर्‍याचशा भागात आढळतात. त्यांचा परग्रहलोक यांच्याशी संबंध जुळवणे हे एक थेरी आहे ज्यात सत्य असू शकतं असं वाटतं. भारतातही ती आढळून येत असावीत हे माहीत होतं, पण अगदी आपल्या महाराष्ट्राच्या कोकणात सापडतील असं वाटलं नव्हतं. असे अनेक प्राचीन अवशेष अथवा इतर गोष्टी सापडत असतात त्यांचा आपण टप्प्याटप्प्याने उल्लेख करूच!!!

डॉक्टर श्रीकांत प्रधान हे मराठी व्यक्तिमत्व ह्या विषयाच्या पाठीमागे आहे हे बघून-वाचून आनंद होतो. त्यांना यातील पुढील कार्यासाठी शुभेच्छा!!!

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/cave-paintings-in-konkan-region/articleshow/47659722.cms

भस्माचा डोंगुर…

भस्माचा डोंगुर…

भारत देश हा अनेक आख्यायिका आणि कथांनी भरलेला आहे. अशी कितीतरी गावे अन ठिकाणे सापडतील की ज्याला काहीतर आख्यायिका किंवा कथा आहे. अनेक स्थळे अशी असतात जेथे सत्य-असत्य, आधुनिकता-आख्यायिका, श्रद्धा-अंधश्रद्धा, प्रतिगामी-पुरोगामी, पुराण-विज्ञान अशा गोष्टीना स्थान नसतं. कथा अन आख्यायिका ह्या भारतातील प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनु पाहतात; काही जण त्याचा आदर करून त्याच्यापुढे विलीन होतात, काही त्याच्यामागची रहस्य हुडकू पाहतात, काही गैरअर्थ काढतात, काही विरोध करून पुढे जातात. प्रत्येकाने काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात गाणगापूर येथे श्री दत्त महाराजांचं देवस्थान आहे. देवस्थान आहे, पण जागरूक आहे अस भाविक अन तेथील पुजारीही सांगतात. जागरूक असलं तरी सामान्यांच्या अन ‘स्पेशल’ अशा दोन रांगा असतात. देव जागरूक असेल तर आनंद आहे, तो तरी हे बघत असेल एवढी अपेक्षा आहे. भाविकच्या मनातील भक्तीने देव श्रीमंत होत असतो आणि त्याच्या खिशातील पैशाने देवस्थान! असो.

गाणगापूर येथे जाण्याचा योग आला. दर्शन वगैरे आटपल्यावर (आपटल्यावर?) तेथून जवळच असलेल्या ‘भस्माचा डोंगर’ या पौराणिक भागाविषयी ऐकण्यात आल आणि तेथे चक्कर टाकली. भस्माचा डोंगुर याचा अर्थ सरळ आहे एक डोंगर जो भस्माणे तयार झाला असावा. मनात वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या, तेथे गेलो अन सगळं मनातच राहील.तेथे डोंगर वगैरे तर दिसला नाही, भस्म तर लांबच राहील, पण दिसली ती गरीबी!

एक बाई साधं टपराड दुकान टाकून बसली होती, त्यात एका पिशवीत पाव विकत होती. दहा रुपयाला पावाची पिशवी घेतली अन विचारलं, याच काय करायचं? त्या बाईने सांगितलं की वाटेतील भिकार्‍यांना वाटायचं.बरं आहे! निदान येथे तरी माणसांचा विचार झाला. असो. वाटेत अनेक भिकारी झोपड्या करून भिकेच्या प्रतीक्षेत बसले होते. काही काही तर चांगल्या घरचे वाटत होते. पाव वाटले अन समोर एका विरान जागेवर पोचलो, विचारलं कुठे आहे डोंगर? तर हाच डोंगर आहे अस कळलं. सगळीकडे खड्डे होते, लोकांनी भस्म म्हणून सगळी माती खणून नेली होती.

तेथील मातीपिशवीत टाकली अन तेथेबसलेला माणूस म्हणाला की एकडून फिरून जा. जाताना थोडी माती अन काहीतरी दक्षिणा समोर असलेल्या दत्त मंदिरात ठेवायला सांगितली. त्याने सांगितलं तस केल आणि दक्षिणा ठेवत असताना तेथील सर्व भिकारी आमच्याकडे पाहत होते. दक्षिणा ठेऊन फोटो काढत उभा होतो आण सगळे भिकारी एकमेकाकडे पाहत होते; कदाचित माझ्या जाण्याची वाट पाहत असावेत. त्यातील एकाने शेवटी धाडस करून माझ्यासमोर त्या मंदिरात ठेवलेली दक्षिणा घेतली.

भस्माचा डोंगर म्हणजे पुरातन काळी ऋषिमुनींनी किंवा राजांनी विविध यज्ञ, तप साधना करताना राहिलेली राखेचा डोंगर तयार झाला असावा (त्यामुळेच त्याला तपोभूमी म्हणत असावेत) आणि ती पवित्र राख लोक घरी नेत असत. खर तर ही अतिशय पुरातन गोष्ट आहे, येथे जोभस्माचा डोंगर तयार झाला होता, तो तर केंव्हाच तयार झालाआहे, आता उरली आहे ती साधी जमीन जी भाविक उकरून नेट आहेत. एक गोष्ट मानली पाहिजे की, त्या भूमीत काहीतरी वेगळं होत जेणेकरून त्याच भूमीत दत्तांच देवस्थान आहे, लोक तेथील भस्म नेत आहेत. तेथील जमिनीत कदाचित काहीतरी विशिष्ट पदार्थ किंवा रसायनं असतील ज्यामुळे त्या मातीला वेगळं महत्व आल असेल. आज त्या मातीचा काही उपयोग आहे अस वाटत नाही. वैज्ञानिकांनी त्या मातीच सर्वेक्षण आणि चाचणी केली पाहिजे, त्यात चांगले-वाईट काही घटक आहेत का याचा शोध घेतला पाहिजे.

कुठलीही गोष्ट चिरंतर टिकणारी नसते. भूतकाळात त्या जमिनीत काहीतरी विशेष असेलही, पण आज असेलच अस नाही. कालानुरूप त्या गोष्टी लोप पावल्या असतील याची जान सर्वांनी ठेवली पाहिजे.जगातील प्रत्येक गोष्टपरमेश्वराने निर्मित केली असेल तरी तो ती नष्ट करतोच हा नियम आहे. त्या जागेची क्षमताही आता नष्ट झाली असेल. श्रद्धा. भावना अन मान्यता ठीक आहेत, पण त्या काळी आपल्या महत्म्यानी जो दृष्टीकोण ठेऊन नियम-शिकवण घालून दिल्या होत्या त्याची ओळख आज कळली पाहिजे. चुकीच्या गोष्टींचं अंध अनुकरण सोडून खरी श्रद्धा जपली पाहिजे.

घाटशिळ तीर्थ….

घाटशिळ तीर्थ….

अनेकदा तुळजापूर च्या आई भवानी च दर्शन घेण्याचा योग आला, पण ह्यावेळेस तेथील मंदिराजवळील एक अनोखं ठिकाण सुद्धा पाहायला मिळालं. त्या ठिकणाला घाटशिळ तीर्थ अस म्हणतात. तुम्ही तुळजापूर ला गेलात आणि तिथे स्वतःची गाडी पार्क करण्यासाठी एक जागा आहे तेथून फक्त एखाद किमी च्या अंतरावर हे सुंदर व रम्य ठिकाण आहे. ह्या जागेला तस आध्यात्मिक-पौराणिक महत्वही आहे (जे पहिल्या image मध्ये तुम्हाला दिसेल) पण तेथे असलेली शांतता खूपच ‘बोलकी’ आहे. तस हे ठिकाण पहायला तेथे जा अस म्हणण्यासारखं मोठ नाही, पण जेंव्हा केंव्हा तुम्हाला तुळजामातेच दर्शन करण्याचा योग येईल तेंव्हा हे ठिकाण पाहायला काहीच हरकत नाही. मस्तपैकी आपले मित्र-मैत्रिणी किंवा परिवार घेऊन एक दिवस शांततेत (पिकनिक म्हणा हव तर) घालावा अस ठिकाण आहे. एका बाजूने दरी असल्याने जोरदार हवा असते, इतकी की जोराने बोलावं लागत, तेथून दिसणारा घाटही सुंदर आहे, त्या दरीतून वर येण्यासाठी खोलवर पायर्‍या सुद्धा आहेत, कदाचित उत्सवकाळी भाविक तेथून येत असावेत. पण ह्या जागेला महत्व तेंव्हा आहे जेंव्हा तेथे माणसांची जत्रा नसेल, शांतता असेल, आणि स्वच्छता असेल. आज-काल कुठेही गेलात की रित्या केलेल्या दारूच्या बाटल्या असतातच, मंदिर,गड-किल्ले आणि रम्य ठिकाणही त्यापासून वंचित नाहीत. असो, दर्शन लवकर झाल्यावर ह्या ठिकाणी जाऊन बसायला काही हरकत नाही. हे अजूनतरी पर्यटन स्थळ घोषित झालं नसल्याने आणखी सुंदर आहे.

Mood Travelling

Mood Travelling

अलीकडेच एका मित्राच्या लग्नासाठी नांदेड जवळ पानभूसी नावच्या एका खेड्यात
जाण्याचा योग आला होता. तिथे एक प्राचीन मंदिर होत. परकीय आक्रमणापासून
सुरक्षित ठेवण्यासाठी जसे परळी, औंढा नागनाथ किंवा तुळजापूरच मंदिर थोडसं
जमिनीत बांधलं आहे तसच हे मंदिरही तळघरात बांधण्यात आल होत. पण एक विशेष
म्हणजे अस की ह्या मदिरातील गाभार्‍यात जाण्यासाठी भिंतीजवळून अरुंद अशी
वाट होती आणि त्या जागेसमोर जर काही मोठा दगड वगैरे ठेवला आणि एखादा नवीन
व्यक्ति आला तर त्याला समजणार नाही की तिथे एखादी वाट असेल. आणि आणखी विशेष
म्हणजे जशी महादेवची पिंड त्या तळघरात आहे तशीच ती अगदी वरच्या म्हणजे
मंदिरात आल्या-आल्या आहे जेणेकरून आक्रमकांना तीच खरी पिंड आहे असा समाज व्हावा.

                                                           मंदिर परिसरातील गुप्त विहीर

 

                                                         

Accurate Angle – पर्वती

Accurate Angle – पर्वती

पुण्याची पर्वती  || दृश्य  || मनमोकळे आकाश  || माझाक्लिक

 

    पर्वतीवरून दिसणारे पुण्याचे रूप…!

error: Content is protected !!