Category: Serial Killer

धर्मक्षेत्र

धर्मक्षेत्र

 

महाभारत होऊन गेल. केवळ अठरा दिवसांच्या लढाईमुळे सर्व जगाचा इतिहास बदलून गेला. महाभारतानंतर जे काही झालं तेही आपण पुराणात आजही वाचतो आहोत, पण त्याच्यानंतरही एक महाभारत झालेल असणार ज्याची आपल्याला माहिती नसेल. महाभारतानंतर, महाभारतातील सर्वांना स्वर्ग-नरक प्राप्तीच्या आधी एक मोठ्या परीक्षेला सामोरं जाव लागलं असेल, ज्याला ‘न्याय’ अस म्हणतात. चित्रगुप्त, ज्याच्याकडे प्रत्येक व्यक्तीच्या पाप-पुण्याचा लेखाजोखा असतो, त्या चित्रगुप्तच्या दरबारी महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा न्याय झाला असेल. अशाच विषयावर आधारित आहे Epic वाहिनीवरील ‘धर्मक्षेत्र’ ही मालिका.
खर्‍या अर्थाने कुरुक्षेत्र ते धर्मक्षेत्र आणि धर्मक्षेत्र ते स्वर्ग किंवा नरक हा प्रवास जो आपण पुराणात वाचतो, तेथे प्रत्येक कृतीतून दिसतात त्या मानवी भावना आणि त्या भावनांचे खेळ.
                धर्मक्षेत्र ही मालिका एका विशिष्ट हेतूने नक्कीच प्रेरित असणार आहे. कुरुक्षेत्रात जे घडलं ते माहीत आहे पण त्यानंतर जे घडलं असेल ते दाखवण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात आला आहे. द्रौपदी असेल किंवा शकुनी यांच्यामुळे महाभारत झालं अस म्हणतात किंवा हे महाभारत भीष्म पितामह, कुंती, गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्यात ते होऊ न देण्याची क्षमताही होती, पण तरीही त्यांनी ते थांबवलं नाही असही म्हंटलं जात. काय खर आणि काय खोट? ह्या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती या प्रत्येक पात्रावर झाली, ती म्हणजे चित्रगुप्तच्या न्यायालयात, जेथे या सर्वांकडून स्पष्टीकरण मागितल त्यांच्या प्रत्येक कृतीच आणि त्यांच्यावरील आरोपांच!
                  मालिकेचा विषय हा आजवरच्या महाभारतावरील आलेल्या विविध मालिकांपेक्षा वेगळा आहे. यात अस गृहीत धरण्यात आल आहे की, प्रत्येकाला महाभारत आणि त्यातील घटना माहीत आहेत. मालिकेत जे कलाकार घेतले आहेत ते परिपूर्ण असे नाहीत, त्यांच्या भूमिकेवर, रंगभूषा-वेशभूषा यावर लक्ष केन्द्रित करण्यापेक्षा त्यातील कथेवर जास्त केल गेल आहे जी मालिकेची मजबूत बाजू आहे. शकुनी, कृष्ण, द्रौपदी किंवा अन्य सर्व पात्र हे कसे दिसायचे-बोलायचे यापेक्षा ते कसे वागले आणि त्यांनी काय केल हे दाखवण्याचा प्रयत्न विशेष कौतुकाचा आहे. प्रचंड खर्च करून भव्यदिव्य सादर केलेली महाभारत मालिका आणि अतिशय कमी खर्चात सादर केलेली ही धर्मक्षेत्र मालिका यात तुलना करणं गैर जारी असल तरी दोनही मालिका विशेष बघण्यासारख्या आहेत.
                     महाभारतातील प्रत्येक व्यक्तीचा एक वैयक्तिक हेतु होता; ज्याप्रमाणे राजा द्रूपद ने वर मागितला होता की ‘द्रोणाचार्य यांना पराभूत करू शकेल अशी संतान मला दे.’ आणि द्रौपदी जन्मली आणि जिच्यामुळे महाभारत झालं अस म्हणतात तिच्या भावाने, अर्थात दृश्त्द्युंन ने गुरु द्रोण यांचा कुरुक्षेत्रात वाढ केला; शकुनी ज्याने कौरवांकडे राहून कुरू कुल संपवण्याची प्रतिज्ञा केली होती; भीष्म पितामह यांनी शिखंडी वर शस्त्र चालवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती; कर्णने मित्राची साथ न सोडण्याची आणि दानशूर पणाच उदाहरण घालून दिल; हे सगळं एकाच दिशेने चालल होत, महाभारत! महाभारत हे घडणारच होत, ज्याला थांबवण किंवा सुरू करणं कोणाच्याही हाती नव्हतं. महाभारत हे विधिलिखित होत!
                     वर नमूद केलेल्या सर्व घटना, कथा आणि वस्तुस्थिती दाखवणारी मालिका म्हणून ‘धर्मक्षेत्र’ या मालिकेच वर्णन व कौतुक करावं लागेल. सुरुवात तर नक्कीच चांगली झाली आहे. ज्यांना ‘महाभारत’ या एका शब्दशी जुळलेल्या गोष्टींचं आकर्षण आहे, त्यांनी ही मालिका जरूर बघावी.

Epic वाहिनी – एक मोहक मेजवानी

Epic वाहिनी – एक मोहक मेजवानी

 

रोज रोज तेच-तेच सास-बहू मालिका, त्यातील नाटक, प्रेमाचा तमाशा, राग-लोभ आणि अशा अनेक गोष्टी बघून जर तुम्ही कंटाळला असाल किंवा माध्यम समूह, चित्रपट व इतर गोष्टींचा तुम्हाला वीट आला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे; Epic नावाचं एक नवीन चॅनल सुरू होत आहे जे नुसतं म्हणायला आणि दिसायलाच नाही तर खरोखर एक ‘Different’ चॅनल आहे.
         Epic चा अर्थ होतो महाकाव्य, वीरकथा किंवा इतिहास! ह्या चॅनलचा मूळ गाभा किंवा गर्भच आहे इतिहासातील पानांत, पुराणातील कथेमध्ये, संस्कृतीमधील ओलाव्यात आणि मानवी मनाच्या आठवणीतील कोपर्‍यात! यावरील मालिका ह्या वास्तववादी आहेतही आणि नाहीतही; कारण इतिहास तो असतो जो आपल्याला असायला हवा असं वाटत असत, पुराण-काव्ये ती असतात जी आपण लहानपणी आई-आजीच्या मांडीवर डोक ठेऊन झोपताना ऐकलेल्या असतात. चॅनलवरील मालिका आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, काही जुन्या काळात तर काही मनातील विविध भावनांमध्ये! यातील काही मालिका तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात. ज्यांना खरच माहिती शोषून घ्यायची आवड आहे, ज्यांना काल्पनिक जगात वावरायला आवडतं, ज्यांचा इतिहास-संस्कृती-परंपरा या जिव्हाळ्याचा गोष्टी आहेत आणि ज्यांना डोक्याला खुराक हवा असतो त्यांच्यासाठी ही वाहिनी एक मेजवाणीच असेल.
         यातील विषय हे खूपच नावीन्यपूर्ण आणि उत्कंठापूर्ण दिसत आहेत हे विशेष. भारत देश हा आपल्याला खूप अस्वच्छ किंवा ‘काहीच नसलेला’ वगैरे वाटत असेल,  पण भारत देश हे नेमकं काय रसायन आहे हे अजून कोणीही ओळखू शकलेल नाही. डिस्कवरी वाहिनी असेल किंवा हिस्टरी किंवा इतर वाहिन्या असतील किंवा चित्रपट असतील, त्यातून नेहमीच एका वेगळ्या भारताचं दर्शन घडत आलेल आहे. भारताचं नेमकं खर रूप कोणत आहे हे जास्तीत जास्त माहीत घेण्याच्या प्रक्रियेत अनेक वाहिनी आणि चित्रपटात ही वाहिनी आणि त्यातील काही मालिका नक्कीच एक वेगळी भूमिका बजावतील अस आजच्या घडीला तर नक्कीच वाटत आहे.
           यावर अजून बरच काही बोलायचं आहे….

                                                                         To Be Continued….

युद्ध संपले…! Yudh Ends…!

युद्ध संपले…! Yudh Ends…!

काही दिवसांपूर्वी सोनी टीव्ही वर महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘युद्ध’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित मालिकेच्या माध्यमातून प्रथमच टीव्ही सिरियल जगतात पदार्पण केल. त्यांच्या ह्या एंट्री कडे सर्वांचच लक्ष लागलेल होत. त्यावर टाकलेला हा खास ‘Serial Killer’ चा टक्का.

गेल्या वर्षी अनिल कपूर ने प्रथमच टीव्ही सिरियल माध्यमातून एंट्री घेतली ती ’24 तास’ ह्या अभिनय देव ह्याने दिग्दर्शित केलेल्या मालिकेतून. ती एक नवीन कन्सेप्ट होती (भारतात तरी!) आणि त्यामुळेच त्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. तशीच एक रोमांचक मालिका घेऊन येण्याचा अनुराग कश्यप ह्याचा प्रयत्न होता.

कथा – 

युद्ध ही मालिका अर्थातच अमिताभ बच्चन यांना केंद्रस्थानी ठेऊन लिहिली गेली आहे. ह्या मालिकेत अमिताभ यांनी ‘YS’ अर्थात युधिष्ठिर सिकरवार ही भूमिका साकारली आहे. त्यामुळेच मालिकेच नाव युद्ध अस ठेवण्यात आल. युद्ध हा एक प्रामाणिक आणि सचोटीचा असा बिल्डर आहे अस दाखवण्यात आल आहे.आजपर्यंत  स्वतःच्या तत्वाला श्रेष्ठ मानून त्याने स्वतःची दुनिया उभी केली आहे. नेहमी स्वतःच्या बिसिनेस आणि त्यातील कर्मचार्‍यांचा विचार करणारा असा हा देवमाणूस बिल्डर आहे अशी त्याची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.
             संपूर्ण मालिका ही युद्ध भोवती केन्द्रित केली आहे. मालिकेची सुरुवातच ही युद्ध च्या ‘close up shot’ ने केलेली आहे. सुरुवातीचा सीन हा असा आहे की त्यातूनच मालिकेत होणार्‍या ‘त्या’ घटना सुरू होतात. मालिकेत कोणीतरी अज्ञात व्यक्ति हा युद्ध ला शारीरिक-मानसिक आणि विशेषतः सामाजिक दृष्ट्या हानी पोहचू इच्छितो आहे अशी ह्या मालिकेची ‘theme line’ आहे. त्यात मग त्याला असाध्य असा मानसिक आजार असण, नेहमी शरीराचा एक भाग निकामी होण, भास होण आणि त्यात एक जोकर त्याला दिसणं, अशी अनेक उपकथानक अगदी पद्धतशीरपणे पेरून ठेवली आहेत. अगदी पहिल्या सीन पासूनच अशा ‘षड्यंत्री’ घटना सुरू होतात. अशा अनेक घटना अन त्या घटनांची उकल म्हणजेच संपूर्ण मालिका!
                             

अभिनय – 

ह्या मालिकेन अर्ध मैदान तर casting मध्येच जिंकल अस म्हणायला हव. कारण मालिकेतील प्रत्येकाने अतिशय सहज-सुंदर अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

अमिताभ बच्चन यांना अभिनयाचा शहेनशहा किंवा महानायक का म्हणतात हा प्रश्न जर चुकून कोणाला पडला तर त्याने ही मालिका बघावी आणि आपसूकच त्याला त्याच्या प्रश्नाच उत्तर मिळेल. लाजवाब, अप्रतिम आणि अशा अनेक शब्दांची माळ करून अमिताभ यांच्या गळ्यात घातली पाहिजे;त्यांची तारीफ करायलाही शब्द अपुरे पडतील अस त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आपण आपल्या स्वतःच्या घरात साठीकडे झुकलेल्या व्यक्तीकडे पाहिलो तर त्यांच्या चेहर्‍यावर एक थकवा जाणवतो पण अमिताभ बच्चन ज्यांचं वय सत्तरी ला पोहोचलेल आहे त्यांचा उत्साह, त्यांची एनर्जि त्यांचा तो मुक्त वावर हा खरच अचंबित करणारा आहे. संपूर्ण मालिकेत त्यांची देहबोली, त्यांचा सहज अभिनय हा आकाशातल्या तार्‍याप्रमाणे मोहून टाकणारा आहे. एक व्यावसायिक, एक पती, एक बाप, एक मित्र, एक मरणाच्या उंबरठ्यावर उभा असलेला आजारी माणूस, एक राजकारणी असे एक ना अनेक रंग ह्या मालिकेत त्यांनी अगदी सहजपणे साकारले आहेत. आजवर त्यांना मिळालेल्या अनेक भूमिकांपैकी ही निश्चितच वेगळी आणि ताकतवान भूमिका आहे. अलीकडे आपण त्यांना विविध चित्रपटातून पाहत असतो त्याहीपेक्षा एक अधिक सकस अशी ही भूमिका आहे असच म्हणावं लागेल. त्यांचा भूमिकेवर, व्यक्तिरेखेवर जाणीवपूर्वक घेतलेली मेहनत ही दिसून येते. एखाद्या बोलर ने आपली संपूर्ण स्पेल कुठलेही एक्स्ट्रा किंवा फॉल न देता सर्वच विकेट घ्यावे तशीच कामगिरी अमिताभ यांनी ह्या मालिकेत केली आहे. वेळोवेळी त्यांच्या बदलत्या एक्स्प्रेश्न ने तर खरच कमाल केली. अमिताभ यांना अभिनयाचं विद्यापीठ का म्हणतात ते ह्या मालिकेतील त्यांच्या कामगिरिकडे बघितल्यावर आपसूकच लक्षात येईल. मालिकेतील शेवटच्या एपिसोडमधील अभिनय म्हणजे नदीपत्राच्या घाटावर वसलेल्या एकांत मंदिरावरील सोन्याचा कळस! शेवटच्या भागात त्यांचं ‘अंग्री यंग मॅन’ रूप अगदी नजर लागण्यासारख आहे. तो भाग पाहिल्यावर त्यांचा दीवार, जंजीर मधला विजय नाही आठवला तरच नवल! खासकरून जेंव्हा ते लाताने विलन ला पछाडतात तेंव्हा तर आपण अनाहुतपणे श्वास रोखून बघत बसतो. एखाद्या नवतरुणाप्रमाणे त्यांनी शेवटचे fight sequence केले आहेत.

अभिनयात बच्चन यांच्यानंतर कमाल केली आहे ती झाकीर हुसैन यांनी.युद्धचा एक निष्ठावान सैनिक, युद्धचा उजवा हात, आनंद उपाध्याय अशी त्यांची मालिकेतील ओळख. झाकीर हुसैन यांना आपण अनेक चित्रपटात पाहिलं आहे; खास आठवण करून द्यायची असेल तर ‘सरकार’ चित्रपटातील रशीद ची भूमिका; कारण त्याच्यानंतर त्यांना खास भूमिकेत पाहिलेलं आठवत नाही. पण ही भूमिकाही विशेष लक्ष देऊन उभी केली आह हे जाणवत राहत आणि झाकीर यांच्या अभिनयाने ते ठळकपणे दिसूनही येत. संपूर्ण मालिकेत युद्ध नंतर जर कोणाची भूमिका रंगवली असेल तर ती ही आनंद हीच आहे. युद्ध चा केवळ उजवा हात नाही तर एक मित्र अशीही ह्या भूमिकेला शेड आहे. युद्ध साठी काहीही करायला तयार असलेला, नेहमी युद्ध च्या भल्याचा विचार करणारा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा युद्ध च्या कामाला जास्त महत्व देणारा असा हा आनंद आहे! घरी स्वतःचा मुलगा एका आजाराने पीडित आहे, त्याची आई त्याला सांभाळू शकत नाही, त्या मुलाचं आनंदवर असलेल प्रेम आणि तितकच आनंदच त्याच्यावर असलेला जीव;  ह्या सर्व गोष्टी असतांनाही तो युद्ध आणि कंपनी ह्या गोष्टीला महत्व देतो. ह्या भूमिकेतही एक बेवस बाप, एक निष्ठावान सैनिक, एक मत्सुद्दी राजकारणी हे सर्व रंग अतिशय काटेकोरपने झाकीर ने उमटावले आहेत. एखाद्या उच्च सरकारी अधिकार्र्‍याप्रमाणे सय्यमी वर्तन, जीवावर बेतल असतांनाही केवळ गडबड न करता तेथेही चतुरपणा दाखवणं अशा गोष्टी प्रस्तुत करण हे कामही अगदी व्यवस्थितपणे झाकीर ने जमवलं आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या भागपसून शेवटच्या दोन भाग येईपर्यंत प्रेक्षकाला वाटत राहत की होणार्‍या घटनेच्या मागे आनंद तर नसेल? आणि त्याच्या सुमधुर अभिनयाने नेमकं उत्तर प्रेक्षकांना मिळू न देणे हीसुद्धा त्याला जमून आलेली गोष्ट आहे. त्यामुळे झाकीर हुसैन ला आनंद ह्या भूमिकेत अगदी योग्यपणे निवडल आहे.

त्यानंतर महत्व आहे ते युद्ध च्या मुलीला अर्थात तरुणीला! ही भूमिका साकारली आहे आहाना कुमरा हिने. तिची चेहरापट्टी थोडीफार अमिताभ बच्चन शी मिळते. तरुणीलाही कथेमध्ये महत्वाच स्थान आहे. शेवटच्या दोन भागामध्ये समजत की तरुणीची भूमिका इतकी महत्वाची का आहे ते. आहाना हिनेही तरुणीची भूमिका चांगलीच साकारली आहे. घरचा विरोध असतांनाही युद्ध ला त्याच्या कामात मदत करणे, युद्ध च्या दुसर्‍या पत्नीचा, नैना चा तिच्यावर राग-द्वेष असणे, स्वतः डॉक्टर असलेली तरुणी आजारी युद्ध साथी काहीही करायला तयार असणे ह्या सर्व प्रसंगात आहाना ने स्वतःला व्यवस्थित बसवलं आहे.

पवैल गुलाटी ह्याने ऋशीची अर्थात युद्ध च्या मुलाची भूमिका साकारली आहे. सुरूवातीला निरर्थक वाटणारी ही भूमिका शेवटाकडे जाताना अगदी मध्यावर येते. ऋषि सुरूवातीला बडे बाप का बेटा असल्याने बेजबाबदार असतो, युद्ध ला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नसतात वगैरे वगैरे. सुरूवातीला अगदी बेजबाबदार, भरकटलेला नंतर अगदी आदिवासी पोरांमध्ये मिसळणारा नंतर नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेला नंतर जबाबदारीची जाणीव झालेला नंतर मंत्र्यालाही वरचढ असे डावपेच खेळणारा नंतर एका मुलीसाठी (अरुणा ) अस्वस्थ झालेला आणि अंतिमतः एका नायक रूपामध्ये दिसणारा ऋषि ची भूमिका पवैल गुलाटी याने अतिशय समर्थरित्या साकारली आहे.

आहाना कुमरा आणि पवैल गुलाटी ह्या तरुण जोडीने स्वतःच्या अभिनयाचा ठसा अगदी ठळकपणे उमटवला आहे.

तिघ्मांशू धूलिया याने आपल्या मंत्र्याच्या भूमिकेत जान ओतली आहे.गॅंग्स ऑफ वासेपूर मध्ये दिसणारा रामाधीर सिंग आणि मालिकेतील मंत्री ह्यांच्यात फरक आहे हे त्याने आपल्या अभिनयाने अधोरेखित केल आहे. एका दिग्दर्शकात समर्थ अभिनेता लपलेला असतो हे त्याच्या अभिनयातून उलगडत जात. त्याच्या अभिनयाला ‘कया बात है!’ असच म्हणावं लागेल.

ह्या झाल्या मुख्य भूमिका. केवळ मुख्य कलाकारांनी चांगली कामगिरी केली आहे अस नाही तर बाकीच्या सर्वच कलाकारांनी स्वतःच्या अभिनयाच नाणं अगदी खणखणीत वाजवल आहे. युद्ध च्या पहिल्या बायकोच्या, गौरीच्या भूमिकेत असणारी सारिका हिला मालिकेत फार वाव नाही पण तिला मिळालेली भूमिकाही तिने चांगली साकारली आहे. मालिकेत कोणीतरी संशयित चेहरा असावा ह्या हेतूने कदाचित तिला कमी महत्वाची भूमिका दिली असावी. 

के के मेनन सारख्या समर्थ अभिनेत्याला खूपच सामान्य भूमिका देण्यात आली आहे. कमिशनर च्या भूमिकेत सुरूवातीच्या भागात दिसणारा मेनन हा मुख्य ‘षड्यंत्री’ असू शकतो अस वाटत राहत आणि तेव्हाडच त्याच्या भूमिकेच काम होत, त्यानंतर त्या भूमिकेला फार महत्व नाही. ही भूमिका सुद्धा सारिका प्रमाणे केवळ संशयित म्हणून मेनन ला दिली असावी. आहे त्यात मेनन ने जोर लावला आहे पण गॅस बंद असताना त्यात कितीही फोडणी टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी तो निरर्थकच! 

नवाजूद्दीन सिद्दिकी ह्याला अगदी अगदी काही मिनिटांची भूमिका देण्यात आलेली आहे. पण संजय मिश्रा ह्या काही मिनिटांच्या भूमिकेतही नवाज ने आपला ठसा उमटवला आहे.

युद्ध च्या सध्याच्या पत्नीची अर्थात नयनरत्न ची भूमिका आयेशा रझा यांनी साकार केली आहे. युद्ध च केवळ व्यवसायात गुंतून जाण, स्वतःच्या तब्यातिकडे, मुलाकडे दुर्लक्ष करन, ऋशीची एक आई म्हणून काळजी वाटण, तरुणी चा दुस्वास करन ह्या गोष्टी त्यांनी चांगल्या रंगवल्या आहेत.

मोना च्या भूमिकेत असणारी मोना वसू हिनेही आपली भूमिका जोरदारपणे साकारली आहे. सुरूवातीला महत्वाची असलेली पण शेवटाकडे येताना गायब होणारी भूमिका आहे. पण सुरूवातीला असलेल्या सीन मध्ये तिने अप्रतिम काम केल आहे.

नंतर नंबर येतो तो आपल्या विलनचा! अविनाश तिवारी अर्थात अजातशत्रु! अजातशत्रु तरुणीचा प्रियकर तर आहेच पण तोच घडणार्‍या सर्व घटनांचा सुत्रधार आहे. त्याच्या भूमिकेला तेंव्हाच अर्थ येतो जेंव्हा तो विलन आहे हे गुपित उघड होत. त्यानेही विलनच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
  
सर्वात मजा आणली आहे ती चौधरी इंस्पेक्टर ह्या भूमिकेने. त्या कलाकाराच नाव माही नाही पण त्याने मालिकेत धमाल आणली आहे. अशा भल्या माणसांची गरज समाजात तर असतेच शिवाय मालिकेतही ते भाव खाऊन जातात. त्यामुळेच संपूर्ण गंभीर बाज असलेल्या मालिकेत चौधरी इंस्पेक्टर ची भूमिका एकदम हटके आहे आणि ती त्या कलाकाराने लीलया सादर केली आहे.

आणखी एक उल्लेख करावा वाटतो तो अरुणा ह्या मूलतः एक आयबी एजेंट असणार्‍या पण नक्षलवादी झुंडीत हेरगिरी करणार्‍या मुलीचा. ही भूमिका सादर केली आहे ती नेहा चौहान ह्या मुलीने. खरतर जातिवंत सौंदर्य असणार्‍या किंवा चेहरा रंगवणार्‍या किंवा कमी कपडे घालणार्‍या मुलीच मादक दिसू शकतात हा समज तिच्या अभिनयाने/रूपाने/वेशभूशेने ती खोडून काढते. वर्णाने गडद असूनही नेहा अर्थात अरुणा अगदी आदिवासी कपड्यांत बिना कोणत्या ‘मेक-अप’ अतिशय मादक दिसते. सौंदर्य केवळ निसर्गाने दिलेल्या रंगाने खुलत नाही तर मुलीच सौंदर्य हे तिच्या अदा-अंदाज आणि नजरेने उठून दिसत असत. मालिकेत तिला बघताना अनेकांच्या मनात आग लागू शकते (मालिकेत जशी ऋशीच्या मनात लागते). अगदी मर्यादित सीन मध्ये तिचा अभिनय तर वाखणण्याजोगा तर आहेच शिवाय तिच्या सौंदर्याच खुल्या मनानं आणि मुक्त कंठान कौतुक करावं वाटत.

बाकी सर्व सहाय्यक कलाकारांनी मस्तच काम केल आहे. नेहमी crime-patrol मध्ये दिसणारे चेहरे मालिकेत चांगली भूमिका साकारतात. त्यातही डाबराच्या भूमिकेत असणारा निस्सार खान जरा जास्तच भाव खाऊन जातो. महन्तो च्या भूमिकेत काम करणार्‍या कलाकाराने सुद्धा चांगल काम केल आहे. बाकी सर्व कलाकार हेनेमून दिलेल काम बिनचूकपने पार पाडतात. त्यात मग मलिक ची भूमिका करणारा असो, तरुणी चे दुसरे वडील असोत, जोकर च्या भूमिकेत असणारा व्यक्तीही संवाद फेकीतून नावीन्य दाखवून देतो.

दिग्दर्शन आणि कथा –


ह्या मालिकेच मुख्य दिग्दर्शन आहे ते अनुराग कश्यप ह्याच आणि त्याला साथ दिली आहे ती रिब्बू दासगुप्ता आणि शुजित सरकार यांनी. खरतर सर्वच जन स्वतःची अशी ओळख बनवून आहेत, प्रत्येकाची एक स्टाइल आहे आणि ही स्टाइल मिसळल्यानेच कदाचित मालिका थोडी घसरत गेल्यासारखी वाटते. एक खिचडी जर तिघे मिळून बनवत असतील आणि ती बनवताना तिघेही तिथे उपस्थित नसतील तर गोंघळ होणारच; कारण एक जन स्वतःच्या मनानुसार मीठ टाकणार, नंतर दूसरा पुन्हा मीठ टाकणार, तिसरा तिखट टाकणार अस होत जात आणि खिचडीचा गिदगा होऊन बसतो. सुदैवाने खिचडीचा पुर्णपणे गिदगा होऊ दिला नाही! अनुराग कश्यप ह्याने स्वतः कथा-पटकथा लिहिली आहे त्यामुळे मालिकेचा मार्ग निश्चित होता पण प्रत्येकाने स्वतःच्या कौशल्यानुसार तिथे सजावट केल्याने तो एकसंधपणा दिसून येत नाही.
            कथेत काही बारकावे राहिले आहेत अस राहून राहून वाटत जात. म्हणजे मालिकेच्या पहिल्या एपिसोड मध्ये युद्ध स्वतः फोन करून कमिशनर ला एक ब्रिज पडणार आहे अस सांगतो आणि मालिकेतील विचित्र घटना सुरू होतात. ती घटना आणि विलन ने रचून ठेवलेला सापळा ह्यात काही संबंध आहे का किंवा होता का हे शेवटपर्यंत समजत नाही. शिवाय ज्या काही घटना घडल्या त्या कशा घडल्या आणि घडवून आणल्या हे समजून घेण तर प्रेक्षकला सर्वाधिक आवडतं आणि तेच कथेत नाही. बर शेवटी विलन आणि त्याचे षड्यंत्र उघडकीस येतात तेंव्हा तर ह्या गोष्टी उघड करण गरजेचं होत, पण तेही केल गेलेलं नाही. तरुणी ऑटोतून जात असताना त्या ऑटो ड्रायवर ला काय हेतूने मारल ह्याची उकल सुद्धा होत नाही. नक्षलवाद्यांना मदत करणारा त्यांचा गुप्त सेनापती कोण आहे हे शेवटपर्यन्त समजताच नाही, ज्यासाठी IB एजेंट अरुणा वणवण फिरत असते; तो नेमकं अजातशत्रु आहे की तो मंत्री हेही सगितल नाही. बर, युद्ध ला पराभूत करण्यासाठी विलन एक कमिशनर, बिल्डर, मंत्री, नक्षलवादी आणि कोण-कोण अशा लोकांना हा कसा नियंत्रित करेल. ह्या गोष्टीही आपण गृहीत धरल्या तरी एकटा अजातशत्रु आणि तो बिल्डर हे दोघ सोडले तर बाकीच्यांचा शेवट काय हे दाखवतच नाहीत.
              सर्वात मुख्य अस की आपल्या प्रेक्षकांना ‘ज्याचा शेवट गोड….’ किंवा ‘अंत भला तो सब भला….’ अशी सवय लागली असल्याने शेवट गोड झाल्याशिवाय त्याला राहवतच नाही. आणि ह्या मालिकेला योग्य शेवट देण्यात आलाच नाही अस वाटत. लेखकाच्या मनात असावं की प्रत्येक प्रेक्षकाने आपल्या मनानुसार शेवट गृहीत धरावा; पण अशा गोष्टी खूप वरच्या पातळीच्या आहेत आणि आपल्या भारतात त्या पचनं अशक्यच आहे. शेवट असा आहे की युद्ध हा पाण्यात बुडत असलेल्या तरुणीचा हात धरतो आणि मालिका संपते. अरे, बाजीप्रभूणे खिंड लढवली तशी संपूर्ण मालिका लढवणार्‍या आनंद आणि मोना ह्यांना पोलिसांनी अटक करन असो किंवा बाकीच्या घटनांचे दोर हवेतच मोकळे सोडण्यात आले आहेत त्यामुळे प्रेक्षकांचा शेवटला हिरमोड होतो.
                कथेत काही गोष्टी नावीन्यपूर्ण आहेत. अमिताभ आजारी असताना त्याला भास होण आणि त्यात त्याला एक जोकर दिसत राहणं आणि अगदी शेवटला दाखवण्यात आल आहे की त्या जोकर चा आणि युद्ध च्या बालपणाचा गूढ संबंध आहे. ह्या सर्व गोष्टी लेखकाने व्यवस्थित जुळवून आणल्या आहेत.
               दुसरीकदे आनंद जो युद्ध चा उजवा हात आहे त्याच्या घरी त्याचा मुलगा आजारी असण आणि त्यावर आनंद चा जीव असण त्यासाठी शेवटच्या एपिसोड मध्ये त्याच मुलाच्या हातून गोळी खाऊनही एक बाप आपल्या मुलाच्या भल्यासाठी हसत जातो हे म्हणजे खरच आपल्या मनाला स्पर्श करून जात.
               कथा चांगली आहे ह्यात वाद नाही पण त्यातील बारकावे लक्षात घेण्यात आले नाहीत अस जाणवत राहत. कथेत मानवी राग-लोभ-द्वेष-प्रेम ह्या सर्व भावना अतिशय व्यवस्थित टिपण्यात आल्या आहेत पण अशा ‘suspense serial’ अथवा कथा असतात त्यात हळूहळू धागे जोडत जाण खूप महत्वाच असत; येथे शेवटला अचानक नवीनच वळण देऊन अचानक सर्व गोष्टी जुळवण्याचा अट्टाहास दाखवला आहे जो पचवणं प्रेक्षकला जड जात. अनुराग कश्यप ह्यासारख्या खंद्या लेखकाकडून ह्या चुका झाल्या आहेत हे अपेक्षितच नाही. नेमकी काय चूक झाली ते माही नाही पण कुठेतरी गडबड झाली आहे.
                 बाकी संवाद वगैरे झकास आहेतच.कथा तशी गूढ-रोमांचक-राजकीय-मारामारी प्रकारची आहे पण त्यात संवाद अगदी सामान्य प्रकारचे आहेत. संवादात फोडणी देण्यासाठी खूप जागा होत्या, पण जाणून-बुजून घेतल्या नसाव्यात कारण ‘realistic feel’ वगैरे कल्पना लेखकाच्या डोक्यात असाव्यात. पण हवे तेथे अतिशय प्रभावशाली आणिमजा आणणारे संवाद आहेत. 

संगीत-सिनेमटोग्राफी –
                संगीत चांगलं जमून आल आहे जे गूढता वाढवत जात पण त्यातही तोच-तोचपणा येत राहतो आणि मग ते कंटाळवाण होऊन बसत.
                 सिनेमटोग्राफी ही चित्रपटसारखी वाटत राहते. नजारे-दिवारे बाकी सगळं ठीक आहे पण आपण चित्रपट नाही मालिका बघत आहोत ह्याचा विसर पडत राहतो.

मालिकेचा सार – 
                  मालिकेचा नायक अर्थात युद्ध आणि विलन अजातशत्रु हे दोघेही जोकर ला घाबरत
असतात. लहानपणी घडलेल्या गोष्टींचा बालमनावर गंभीर परिणाम होत असतात आणि
त्यातून काही नायक होतात तर काही खलनायक असाच ह्या मालिकेचा सार म्हणायला
हवा. 

 विशेष काय???

ही मालिका का लक्षात ठेवावी असा जर कोणी प्रश्न केला तर त्याला अनेक उत्तर देता येतील. सर्वात आधी तर अमिताभ बच्चन ह्या महानायकाचा थक्क करणार व्यक्तिमत्व अनुभवण्यासाठी. सर्वच कलाकारांच्या जोरदार आणि टाळीबाज अभिनयसाठी. कथेतील नाविण्यासाठी. मर्यादित (म्हणजे फक्त पाच आठवडे- 20 episode) episodes. सास-बहू, न्यूज चॅनल, रीयालिटि शो अशा गोष्टीपासून वेगळा आनंद लुटण्यासाठी. अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ही मालिका लक्षात नक्कीच राहील.

error: Content is protected !!