Category: History Sheeter

रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक
#पानिपत (1760) लढाई ||   #संक्रांत  ||   The Battle Of Panipat ||  मराठेशाहीचा इतिहास
दिग्दर्शक – वामक केंद्रे
मुख्य भूमिका – अविनाश नारकर

Image result for रणांगण

पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात एक शोकांतिका म्हणून गणली जाते. मराठी माणसाच्या मनावरील एक भाळभळणारी जखम. संक्रांत जवळ आली की अनाहूतपणे ह्या जखमेवरची खपली निघते अन त्या वेदनेच्या आठवणी जाग्या होतात. इतिहासात केवळ ‘…जिंकता जिंकता हरलेली लढाई!’ इतकेच मर्यादित अर्थ त्या घटनेला नाहीत. त्या युद्धांनंतर आशियाई उपखंडाचे सर्व संदर्भ बदलणार होते. मराठ्यांच्या दारुण पराभवाने ते बदललेही. अगदी, आज बलुचिस्तानात मराठ्यांचे वंशज सापडतात हेसुद्धा त्याच पानिपत युद्धाचे परिणाम म्हणावे लागतील.
१४ जानेवारी १७६१, संक्रांतीच्या दिवशी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संक्रांत साजरा होत होती अन तिकडे पानिपत युद्धात मराठा सैन्य मृत्युला सामोरं जात होतं. मराठे पानिपतची लढाई हरले आणि एका शोकांतिक, करूणामय पानांनी इतिहास भरला गेला. आजही, अडीचशे वर्षांनंतरही, संक्रांत आली की तो इतिहास आठवतो.

DOWNLOAD FREE APP HERE

खरं तर संक्रांत जवळ आलेली असतानाच वामन केंद्रे दिग्दर्शित आणि अविनाश नारकर अभिनयसंपन्न “रणांगण” हे पानिपताचा इतिहास डोळ्यासमोर जागं करणारं नाटक बघण्यात आलं. तो इतिहासच इतका रोमांचक अन थरारक आहे की नाटक बघताना मन हेलावून जातं आणि रोमांचही उभे राहतात.

नाटकाची सुरुवात होते आजकाळात. म्हणजे खर्‍या पानिपत लढाईच्या अडीचशे वर्ष नंतर. एका संक्रांतीच्या रात्री पानिपतच्या रणांगणावर इब्राहीम गार्दी (अर्थात त्याचा आत्मा) सदाशिव भाऊंना शोधत असतो. तोच इब्राहीम गार्दी जो मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तोच गार्दी ज्याने केवळ निष्ठेसाठी जीवन नाकारून मौत पत्करली. तोच गार्दी ज्याने धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य दिलं. संक्रांतीच्या त्या रात्रीपुरता पानिपतवर मृत सैनिकांचे आत्मे जीवंत होत असतात. गार्दी लष्करातिल सैनिक आनंदाने बागडत असतात अन मराठा मावळे (आत्मे) सुस्तीने, निराशेने अन शरमेने त्याच रणांगणावर पडलेले असतात. त्यांच्या लेखी पानिपत हा मराठ्यांचा लाजिरवाणा पराभव आहे, त्यामुळे त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा नाही. आपण पराभूत आहोत अन इतिहासात आपल्याला तेच स्थान आहे अशी त्यांची धारणा असते.

मग गार्दी सैनिक पुर्णपणे खचलेल्या मराठा मावळ्यांना संपूर्ण पानिपतच्या इतिहासाचा जागर करून सांगतात. पानिपतची लढाई, त्याची पार्श्वभूमी अन त्याचा शेवट सर्वकाही! त्यात मराठे अन भाऊसाहेब पेशवे ज्या बहादुरीने अन शौर्‍याने लढले-झुंजले, अफगाणी अब्दालीची कशी कोंडी झाली याची आठवण ते करून देतात. एकंदरीत पानिपतचं युद्ध हे पराभव नसून शौर्याचं प्रतीक आहे आणि मराठ्यांनी पराभूत मानसिकता झिडकारून अभिमानाने मिरवावे असे घाव आहेत. येथेच सुरू होते खर्‍या नाटकाला!
पानिपतच्या युद्धाचा आवाका इतका मोठा होता की त्यावर चित्रपट बनवायचं धाडसही कोण करू शकत नाही. पण पानिपतचा इतिहास रंगभूमीवर मांडायचा पराक्रम वामन केंद्रे, मोहन वाघ चमूने केला त्याचं कौतुक केलच पाहिजे. स्टेजवर पानिपत सारख्या भीषण महासंग्रामाचा पट मांडणे हा मूर्खपणाच आहे, असं कोणीही म्हंटलं असतं. पण ते तितक्याच सिद्धतेने तडीस नेण्याचं कार्य “रणांगण” नाटकात दिसून येतं.
नाटकात प्रत्येक घटना प्रेक्षकाला समजेल, त्या घटनेची व्याप्ती, भीषणता, भव्यता जानवावी अन प्रेक्षक रोमांचित व्हावा अशी रचना केली आहे. विशेष म्हणजे, घटना त्याचे संदर्भ अन इतिहास समजावून सांगण्यासाठी पोवाडे अन गाण्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे. नाटकाचे संवाद अन कलाकारांनी चोखपणे वठवलेल्या भूमिका हे नाटकाचा प्राण म्हणाव्या लागतील. आजूबाजूला कसलाही भव्य सेट नसतानाही प्रेक्षक त्या काल्पनिक जगात जाऊन पोचतो. काळजाला भिडणारे संवाद अन त्याची चपखलपणे केलेली मांडणी हे तीन तास खिळवून ठेवतात अन उत्कंठा वाढवत राहतात. नाटकात वेशभूषा-रंगभूषा वगैरेचा वापर वगळता कसल्याच ऐतिहासिक सामुग्रीचा वापर केला नसल्याने एक शुष्कपणा वाटतो. पण पानिपतदरम्यान घडलेल्या महत्वाच्या घटना हेरून कथानक पुढे जात राहतं. मराठे अन अब्दाली यांच्यातील डावपेचाचा पट हाच नाटकाचा मुख्य गाभा आहे…

पानिपत संबंधी पुस्तके वाचा

नाटकात भाऊसाहेब पेशवे यांचं पात्र सर्वाधिक प्रभावी असणं स्वाभाविक आहे. अविनाश नारकर यांनीही भूमिका प्राण ओतून जीवंत केली आहे. भाऊसाहेबांचा मत्सुद्दीपणा, राजकीय जाण, हतबलता, उत्साह, नैराश्य आणि करारीपणा अतिशय उठून दिसतो. त्यानंतर नजीब खान ही भूमिका खूप मस्त जमून आली आहे. नजीब खानचा बेरकीपणा, स्वार्थीपणा अन विदूषकी चाळे पानिपत युद्धाला कारणीभूत आहेत हेही स्पष्टपणे समोर येतं. ती भूमिकाही खूप मेहनतीने उभी केली असल्याचं जाणवत राहतं. इब्राहीम गार्दी अन सदाशिवभाऊ पेशवे यांच्यातील मित्रत्व, आपलेपणा अन निष्ठा ही निवडक दृश्यांतून ठामपणे मांडली आहे. पानिपत युद्धादरम्यान झालेला जातीयवाद, अविश्वास अन एकमेकांच्या बाबतीत मनात असलेली आधी हीच पानिपत पराभवाला कशी कारणीभूत आहे हा मुद्दासुद्धा जाणीवपूर्वक मांडून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
खासकरून उत्सुकता होती ती मुख्य युद्धं कशा प्रकारे मांडलं जाईल याबद्धल. कारण तो महासंग्राम, ते भव्य समर रंगभूमीवर मांडणे एक आव्हान होतं. युद्धादरम्यानची रिंगण पद्धत वगैरे! पण त्यासाठी जी युक्ती वापरली आहे ती अप्रतिम आहे. ज्यांचा आत्मा #नाटक जगतो तेच असं सादर करू शकतात. ते दृश्य बघताना खरं युद्धं कसं झालं असेल याचं चित्र उभं राहतं.
एकंदरीत एक अजरामर कलाकृती बघून आनंद झाला. पानिपतचा माहीत असलेल्या इतिहासाला एक दृश्य स्वरूप ह्या नाटकामुळेच प्राप्त झालं म्हणावं लागेल.

latenightedition.in  ||  @Late_Night1991

संबंधित पोस्ट…

Unknown History Of The Maratha

२३ वर्षे भयाची…

२३ वर्षे भयाची…

#किल्लारी_भूकंप  #Killari_Earthquake   #भयकंप

आज लातूरमधील किल्लारी भूकंपाला तेवीस वर्षे पूर्ण झाली. गणेश विसर्जन करून गाढ झोपलेल्या लोकांच्या आयुष्यावर नियतीने घाला घातला. पहाटे चार वाजता भयानक हादर्‍यांनी जमिनीने आपला जबडा उचकटला अन घास घेतला अनेक निष्पाप जीवांचा. साडेसहा रिश्टर स्केलच्या या भूकंपानं  आठ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. हाहाकार माजला. मृत्युचे भयाण स्वरूप देशाने पाहिले. रक्ताचा सडा अन मृत शरीरे पाहून वेदनाही बोथट झाल्या. घर, संपत्ती तर गेलीच पण गेले आप्तांचे जीव! जमिनीच्या धक्क्याने झालेले नुकसान भरून आलेही पण मनावर बसलेले तीव्र धक्के काही शांतपणे जगू देत नव्हते अन नाहीत. आजही ह्या गावात भूकंप ह्या शब्दाची भीती आहे. पिढ्या गेल्या पण भय संपत नाही. अधूनमधून साधारण असलेले भूकंपाचे धक्केही तेथील लोकांना रात्र-रात्र घराबाहेर काढण्यास हतबल करतात.

किल्लारी गावाला 1993 पूर्वी  सतत भूकंपाचे धक्के बसत होते आणि मोठ्या भूकंपानंतरही ते बसत राहिले. घाबरलेले लोक शेतात झोपडय़ा करून राहात होते. पण  अधिकारी, लोकप्रतिनिधी  सर्व काही आलबेल असल्याचं सांगत होते. न घाबरता गावात राहायला या, असं आवाहन करत होते. या भागात अग्निजन्य खडक असल्यानं मोठय़ा भूकंपाचा अजिबात धोका नसल्याचं भूवैज्ञानिक सांगत होते. शेवटी तर पत्रकार परिषद घेऊन लोकांना आवाहन करण्यात आलं. हळू-हळू लोक गावात राहायला येऊ लागले . आणि 30 सप्टेंबर 1993 ला  तो विनाशकारी भूकंप झाला.16 हजार लोक जखमी झाले. 52 गावं पूर्णपणे उध्वस्त झाली. 13 जिल्ह्यांना या भूकंपाचा धक्का बसून अकराशे कोटींची हानी झाली. किल्लारीच्या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद पट्टय़ातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली होती.

सरकारी आकड्यांनुसार ७ हजार ९२८ जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. त्या घटनेला आता २३ वर्षे झाली. भूकंपाच्या वेळी लहान असलेली पिढी आता तारुण्यात आहे. त्या तरुणांनी आपल्या जगण्याची लढाई नव्याने सुरू केली आहे. भूकंपात आप्तांना गमवावे लागणे हे वेदनादायी होते. मात्र, अशा समस्यांवर काळ हेच त्यावरचे एकमेव औषध असते.

या काळात भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी निकराचे प्रयत्न केले. राज्यातला सर्वात मोठा पुनर्वसन प्रयोग म्हणून किल्लारीचे उदाहरण दिले जाते. मात्र, भूकंपग्रस्त भागातील नागरिकांचे मानसिक पुनर्वसन अखेरपर्यंत झालेच नाही.

01_1443585505 03_1443585506 08_1443585512 09_1443585512

 

शिवरायांचा मुलुख!

शिवरायांचा मुलुख!

मराठेशाही…. 

सुरुवातीच्या काळात केवळ पुणे वतन हाती असलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत भले-मोठे जनतेचे #स्वराज्य उभे केले. मुघल सरदार शास्ताखानने शिवरायांच्या ‘इतकूश्या’ मुलूखाला नावे ठेवली होती पण नंतर हाताची बोटेही शाबीत न ठेऊ शकलेल्या शास्ताला महाराजांच्या ‘अमाप’ कामगिरीचे दर्शन घडले. पृथ्वी पादाक्रांत करावी… हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असे म्हणणारे शिवराय… त्यांच्या अधिपत्याखाली असलेला मुलुख… आजचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू पर्यन्त पसरलेला हा मुलुख… हा मुलुख जिंकायला खासा औरंगजेब आला होता… अख्ख्या हयातीत डोळ्यात शिवरायांचे स्वराज्य खुपत असलेल्या औरंगजेब ला ह्याच मुलूखात खपावे लागले पण हा मुलुख काही त्याला जिंकता आला नाही….

#शिवरायांचे_स्वराज्य   #शिवरायांचा_मुलुख  #छत्रपती शिवाजी महाराजाचे राज्य

shivaji

 

Shivaji Anant Pai
Chava – Shivaji Savant
Shriman Yogi (Marathi)

Unknown History Of The Maratha

Unknown History Of The Maratha

{{ COPY }}

#पानिपतनंतरचा इतिहास   #अटकेपारचे मराठे    #मराठ्यांचा अज्ञात इतिहास   #जगाच्या पाठीवरील मराठे    #बलुचिस्तानचे मराठे   #अशांत बलुचिस्तान  #मराठ्यांचा इतिहास

मोदींनी स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला अन हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला. तसं पाहायचं तर हा प्रश्न पाकिस्तानच्या स्थापनेपासून अस्तीत्वात आहे. विशेष म्हणजे आज तिथे अनेक आंदोलने अन चळवळी चालू आहेत; बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा व्हावा म्हणून. पण त्यात आपलं मराठी रक्तही आहे हे जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्यात तथ्य आहे. आज तिथे बरीच मूळ मराठी वंशीय जनता आहे. आणि मराठा अन्याय कधीच सहन करत नाही उलट तो प्रखर विरोध करतो.

बलुचिस्तान सध्या पाकिस्तानात आहे. पण तेथील मंडळी असं म्हणतात की बलुचिस्तानवर पाकिस्तानने कब्जा केला आहे व हा प्रदेश स्वतंत्र राज्य-राष्ट्र आहे. त्यांनी वारंवार पाकिस्तानला झिडकारलं आहे. मराठी माणूस असाही हट्टी अन चळवळी आहे. स्वतःवर दुसर्‍याचा अधिकार चालू न देण्याचा त्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्य तर त्याच्या रक्तात भिनलेलं आहे. अगदी शिवराय, पेशवे ते टिळक सावरकर यांच्यापर्यंत!

मूळ विषय:-

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : “दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत अर्धकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.”

पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहास फारसा कुठे माहीत नाही अन चर्चिलाही जात नाही. पण तो जाज्वल्य इतिहास आहे.

New History of the Marathas, Volume I
Govind Sakharam Sardesai

पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी..  म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत युद्धात शरण आलेले अन सापडलेले मराठे युद्धकैदीही होते. त्यात पुरुष, स्त्रिया अन लहानगेही होते जे अट्टहासाने ‘देवदर्शन’ करण्यासाठी मराठी फौजेसह मराठी मुलाखातून उत्तरेत आले होते. अब्दाली परतत असताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पुढे #पश्चिम पंजाब (आजचा पाकिस्तान) ओलांडल्यानंतर #बलुचिस्तान प्रांतातील @डेरा_बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सैन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ @अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक  @मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सैनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सैन्य ठेवण्यासाठी आर्थिक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सैन्य पुरविण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आर्थिक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पैशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.

पानिपतात लढलेले बलुची सैन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.

या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाच्या पाऊलखुणा अजूनही आहेत. त्यांच्यात लग्न लावायच्या पद्धती ह्या अजूनही जुन्या मराठी पद्धतीप्रमाणेच आहेत. तेथील संगीतातही अजून आपलं मराठीपण डोकावत असतं. तेथे अनेक रिवाज मराठी अन पेशवाई संस्कृतीची ओळख देतात.

Panipat
Vishwas Patil

 

सध्या या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे

बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगैरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये #नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.

प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.
Raau: (Original Book on Bajirao-Mastani) (Marathi)
N. S. Inamdar

१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.

१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.

दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.

इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.

मराठी रिती अन परंपरा

शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.

तिसरेदरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.

Haua (An Historical Novel on First Chief of Maratha Navy-Kanhoji Angre)
PARAG PRAKASHAN

या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.

सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.

१९६० च्या दशकात @सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सैन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पैज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.

Shivaji The Managemant Guru
Prof.Namdevrav Jadhav

१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा #नाना पाटेकर मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘ ग्रेट मराठाही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.

बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.

मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.

एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.

बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे, जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सैनिक व सरदार लढले होते. शिवाय त्या काळात मराठा ही जात नसून मराठी माणसांचा समूह समजला जाई. आज त्याचे संकुचित जात झाली आहे. पानिपतात संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक व इतर भागातून अनेक सैनिक मावळे होते. त्यात देवदर्शन म्हणून अनेक समाजाचे लोक, स्त्रिया याही कैद झाल्या होत्या.

नोट – संबंधित माहितीचा विडियो पाहण्यासाठी एबीपी माझा च्या @बलुचिस्तानचे_मराठे हा विडियो पाहावा. शिवाय, ही माहिती संकलित-संपादित आहे. याचा मूळ लेखक कोण आहे हे माहीत नसले तरी इतिहासातील अंधारा कोपरा उजळून टाकण्याचं काम या माहितीने होत आहे.  

संबंधित पोस्ट—

रणांगण – मराठी नाटक

स्वा. सावरकर यांच्याविषयीचा एक किस्सा!

स्वा. सावरकर यांच्याविषयीचा एक किस्सा!

#सावरकर नावाची दहशत‬ !!!

सावरकर यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !

दिल्लीचे पालम विमानतळ ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता . भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता . त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला . हे वयोवृद्ध गृहस्थ होते . हा माणूस फार फार मोठा होता .
इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती , पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते , भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते . स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते . त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती .

ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले ” तुम्ही श्री ***** ना ?” .
त्या अधिकाऱ्याने सांगितले ” हो ! पण मी आपणास ओळखले नाही ”

त्या प्राचार्याने सांगितले ” तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये ” .
क्षणार्धात ओळख पटली .

प्राचार्यान्नी विचारले ” ICS च्या परीक्षेत विचारले ” ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात , दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ? ”
ते अधिकारी उत्तरले ” हो ”
” कारण माहीत आहे ?” प्राचार्यान्नी विचारले .
” नाही ” ते अधिकारी उत्तरले .
” जाणून घ्यायचंय ?” प्राचार्य
” हो ” अधिकारी
” सांगतो ”
त्या प्राचाऱयांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे !

ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते ” रत्नागिरी ” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस शाळकरी असतांना , वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता .
सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत . तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे .
” आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला “” ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे .

सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता .

मित्रांनो , आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही .
जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश करू शकले ती भारतीय मात्र कधीच करू शकले नाहीत .

हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर ! संस्कृत भाषेचे तज्ज्ञ ! आपली , भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर !

पन्हाळ्याची स्वारी!

पन्हाळ्याची स्वारी!

#पन्हाळ्याची महती आणि माहिती!

#Panhalgad Trip

शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या आणि अशा अनेक शूरवीरांच्या अन महात्म्यांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या पन्हाळा ह्या गडावर जाण्याचा योग आला हे भाग्यच!!! ह्याच पन्हाळ्याला सिद्दी जौहरने वेढा घालून स्वराज्याच्या राजाची नाकाबंदी केली होती; ह्याच पन्हाळ्यावरून विशालगडाकडे जाताना बाजीप्रभू, शिवाकाशी, बांदल आणि अनेक शूर मावळे स्वराज्यासाठी अन त्याच्या राजासाठी धारातीर्थी पडले! ह्याच गडावर संभाजी राजांना कैदेत ठेवले गेले होते व नंतर येथून सुटका करून घेऊन त परत शिवाजीराजांकडे आले. कोंदोजी फर्जन्द या मर्दाने अवघ्या काही मावळ्यांच्या जिवावर हा किल्ला मोघलांकडून पुन्हा जिंकून घेतला. उत्तर काळात मराठ्यांची राजधानी!

-> पन्हाळगड हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्यातील पन्हाळा तालुक्यात एक महत्त्वाचा किल्ला आहे . पन्हाळा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची समुद्रसपाटीपासून ४०४० फुट आहे. हा किल्ला एक निसर्गरम्य परिसरात असून  पर्यटणासाठी उत्तम आणि आनंद देणारा आहे. विशेष म्हणजे हा चढाईस सोपा असणारा गड आहे.

-> पन्हाळा गडास अविस्मरणीय इतिहास आहे, पण बाजीप्रभू यांचा पराक्रम आणि शिवाजी-संभाजी यांची भेट या प्रमुखकरून आठवणार्‍या घटना आहेत. बाजीप्रभू आणि इतर महापराक्रमी मावळ्यांच्या रक्ताने तेथील घोडखिंड पावण झाली म्हणून त्या घोडंखिंडचे नाव पावनखिंड असे नाव  झाले.

 

-> पर्यटनाचे स्पॉट???

बाजीप्रभूंचा पुतळा :- या गडाच्या मधोमध पराक्रमी बाजीप्रभूंचा एक दिमाखदार असा पुतळा आपणाला पहावास मिळेल. जो त्यांच्या पराक्रमाची एक प्रतिकृती आहे.

अंबरखाना :- या इमारतीचा आकार हत्तीच्या पाठीवर ठेवण्यात येणाऱ्या अंबरसारखा असल्यामुळे याला अंबरखाना असे म्हणत असे.हा त्याकाळी बालेकिल्ला होता. त्याच्या जवळ गंगा,यमुना आणि सरस्वती या नावाची धान्य कोठारे आहेत.या कोठार तांदूळ ,नाचणी, वरी त्यांची धान्य साठवण केली जात असे.याची श्रमता २५००० खंडी इतकी होती.त्याच बरोबर त्या इमारतीचा उपयोग सरकारी कचेऱ्या ,टाकसाळ यांच्यासाठी होत असे. या जवळ शिवाजी महाराजांचा राजमहल होता जो इग्रंजानी १९४४ साली उध्वस्त केला.

 

राजवाडा– हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

सज्जाकोठी– राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.

राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

अंधारबाव/अंदरबाव :- हि एक तीन मजली इमारत आहे याच्या तळमजल्यात एक विहीर ही आहे. हे गडावरील कुतुहलाचे ठिकाण आहे . तसेच इथून तटबंदीकडे जाण्यासाठी चोरदरवाजादेखील आहे.

तीन दरवाजा :- हे पश्चिमेच्या दिशेला एकापाटोपाट असे तीन दरवाजे आहेत. हे दरवाजाचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. दरवाजाचे बांधकाम शिशामध्ये केले आहे. याच दरवाजावर श्रीगणेशची मूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या पंजात हत्ती असलेली शिल्पे दिसेल. तसेच पहिल्या दरवाजावर फारशी भाषेतील एक शीलालेख दिसतो. तीन दरवाजातून आत आल्यावर आपणाला विष्णूचौक व विष्णुतीर्थ नावाची विहीर पहावास मिळेल व कोंडाजी फर्जद याने ६० मावळ्यांसमवेत किल्ला जिंकला होता. व याच दरवाजातून इग्रंजानीही आक्रमण केले होते. तीन दरवाजाजवळ हनुमाननाचे मंदिर आहे मूर्ती त्याकाळीतील आहे. वाघ दरवाजा : हा  सुद्धा गडावरील एक कौशल्यपूर्ण बांधकाम केलेला दरवाजा आहे . याच्या जवळ तबक बाग आहे.

 

चार दरवाजा– हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच “शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव – गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी – सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

रेडे महाल– याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

संभाजी मंदिर– त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

धर्मकोठी– संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

महालक्ष्मी मंदिर :- हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर जे राजवाड्याजवळ आहे. हे राजा गंडारित्य भोज याचे कुलदेवत होते. मंदिराजवळच सोमेश्वर तलाव आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

हे स्पॉट सोडले तर तेथे आसपास थोडं जंगल आहे. चार-सहा सोबती असतील तर तेथे फिरण्याने, तेथील हिरवळ बघितल्याने डोळ्याला ताजेतवानेपणा आणि मनाला आराम मिळेल. तसच तेथून काही किलोमीटर वर कसलंतरी अवकाश संशोधन केंद्र का काहीतरी आहे. बाजीप्रभू यांच्या पुतळ्याच्या पाठीमागून जो रस्ता जातो तेथून जावं लागतं. आमच्या दुर्दैवाने वेळ कमी आणि चुकीच्या नियोजनामुळे तेथे जाता आलं नाही.

 

-> पन्हाळ्याला कसे जावे?

कोल्हापूरवरून एक तासभराच्या अंतरावर आहे पन्हाळा. तेथे जाण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती असलेल्या टाऊन हॉल जवळ बस किंवा प्रायवेट गाड्या भेटू शकतात. जर शक्य असेल तर एक दिवसासाठी गाडी भेटली तर उत्तम राहील, कारण जवळच ज्योतिबा आणि इतर स्पॉट आहेत जे लवकर होऊ शकतात.

 

-> गडावर राहायची-खायची सोय?

राहायची सोय याबद्धल खात्रीने सांगता येणार नाही. गेस्ट हाऊस आणि लॉज दिसतात पण नक्की नाही माहीत. पण खायची सोय उत्तम आहे. बाजीप्रभू पुतळ्यापासून जवळच हॉटेलच्या रांगा आहेत. एकाहून एक भारी अस्सल गावरण पदार्थ मिळतात जेवायला. पिठलं-भाकरी, ठेचा आणि कांदा भजे खाऊन तर सगळा थकवा क्षणात उतरतो!!!

 

टीप- शिवरायांचा आणि गडाचा इतिहास माहीत असेल तर फिरणं अधिक रुचकर, उत्साहवर्धक आणि थरारक वाटेल.

#पन्हाळगडाची छायाचित्रे!!! #Images Of Panhalgad

बाजीप्रभू चौक
कोल्हापूरवरुन पन्हाळ्याला गेल्यावर प्रथम तुम्ही ह्या चौकात येता.

DSCN0855 DSCN0859 DSCN0866 DSCN0870 DSCN0884 DSCN0891 DSCN0892 DSCN0894 DSCN0899 DSCN0900 WP_20160124_10_05_09_Pro WP_20160124_10_05_13_Pro WP_20160124_10_07_32_Pro WP_20160124_10_08_47_Pro

मकर संक्रांती अन पानिपतचे युद्ध!!!

मकर संक्रांती अन पानिपतचे युद्ध!!!

संक्रांत ओढवली   ||  #Makar Sankranti And Battle Of Panipat  || संक्रांतीची जखम  ||

 

मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण-

२५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट… १८ व्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध… दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास १०० किलोमीटर अंतरावर पानिपत नावाची अवकाळी, अपशकुनी जागा… या जागेने नेहमीच #दिल्ली तख्ताचा पराभव केला… १४ जानेवारी १७६१…. हाच तो दिवस ज्या दिवसाने भारत किंवा #हिंदुस्तानचा इतिहास-भूगोल-संस्कृती अन भविष्यही बदलून टाकलं… १० महिने झुंज दिल्यानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं…

ह्याच युद्धातील परभवामुळे मराठेशाहीचं कंबरडं मोडलं अन कायमचं अपंगत्व आलं… मराठ्यांचा देशभर असलेला दरारा संपला… काळाची चक्रे उलटी फिरू लागली अन ते वैभव गमावलं… हे युद्ध जर पेशव्यांनी जिंकलं असतं तर भारतावर मराठ्यांची एकहाती सत्ता राहिली असती अन इंग्रज नावाचा शत्रू भारतात कधी तग धरूच शकला नसता… पण इतिहासाला हे मान्य नव्हतं!!! विपरीत घडलं आणि मराठे जिंकता-जिंकता हरले अन त्याच दिवशी भारताच्या पारतंत्र्याचा अध्याय सुरू होण्याची बीजे रोवली गेली…

#पानिपतचं तिसरं युद्ध हे आजही एक गूढ आहे. त्या युद्धात नेमकं काय झालं याबाबत आजही अनेक मतमतांतरे आहेत, पण पराभव हा पराभवच असतो जी मृत्युपेक्षाही आव्हानात्मक असतो.

पानिपत म्हणजे महाराष्ट्रीय मनावरची भळभळती जखम… कधीही न भरून येणारी जखम… ह्या जखमेच्या केवळ आठवणीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अन तत्कालीन संरक्षणमंत्री ह्या मराठी माणसाचे डोळे पाणावले.. काळीज पिळवटून गेलं केवळ ती जागा बघून…

ज्याला पानिपतचा इतिहास माहिती आहे, तो संघर्ष आणि अपमानास्पद पराभव माहिती आहे त्याला संक्रांतीला ही आठवण आल्याशिवाय राहत नाही.. कुठेतरी वाचलेल्या, ऐकलेल्या, बघितलेल्या कटू आठवणी जाग्या होतात अन संक्रांतीच्या तिळगूळची चव उतरून जाते…

२५० वर्षांपूर्वी संक्रांतीला अनेक माता-भगिनींनी आपलं सौभाग्य गमावलं… पानिपतहून येणार्‍या पराभवाच्या काळतोंड्या बातमीने पुणे अन महाराष्ट्र शोकात बुडाला होता… मरणारे तर अनेक होते, पण बेपत्ता असलेले त्याहूनही अधिक. अगदी, मराठी सैन्याचे नेतृत्व करणार्‍या सदाशिवभाऊराव पेशवे यांचंही काय झालं हेसुद्धा इतिहासाला कधी कळलं नाही. त्यांच्या पत्नी ना सौभाग्यअलंकार उतरवू शकत होत्या न सती जाऊ शकत होत्या. त्यांच्या पदरी आयुष्यभर वाटेकडे डोळे लाऊन बसणं हेच नशिबी आलं. अशा अनेक स्त्रिया, अनेक घरं होती जी आप्तांच्या जीवंत-मृत असण्याच्या बातमीने जिवंतपणी जळत राहिली… अशा अनेक गहिर्‍या जखमा त्या पराभवाने पदरी बांधल्या होत्या..

….जर…. केवळ जर हा शब्द वापरला तर पानिपतने एक वेगळाच इतिहास अन भविष्य घडवलं असतं… पण नियतीला ते मान्य नव्हतं… जिंकता-जिंकता हरलेलं युद्ध… ह्या जर ने, काळाच्या जराशा फरकाने इतिहासाने भविष्याला पराभूत केलं असं वाटत राहतं…

समुद्रकिनारी असलेलं वाळूचं महाल एका महाकाय लाटेने कवेत घ्यावं तसं अगदी तसंचं… मराठ्यांनी आपलं वैभव गमावलं अन राष्ट्राने भविष्य!!! लढणारे कोण अन मरणारे कोण? नायक कोण अन खलनायक कोण? असे प्रश्न गौण वाटतील असं युद्ध… ह्या युद्धात यमुना ही नायिका होती अन भूक नायक होता… पण मराठे अन अब्दाली यांच्या दृष्टीने ते युद्ध हा आयुष्याचा शेवटचा धडा ठरला…

याचा इतिहास सांगावा तो कमी… कथा सांगाव्या त्या कमी…

सह्याद्रीच्या साक्षीने…

सह्याद्रीच्या साक्षीने…

बाजी प्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतली लढाई…

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले। तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत. गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची.

तिथेच लढाई सुरू झाली। ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत. मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून ? यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं ? इतिहासाला माहीत नाही. पण सात पुत्रांचा हा बाप , निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता. त्यांची निष्ठा रुदासारखी होती.

‘ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ। ‘ फुटो हे मस्तक , तुटो हे शरीर , हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. ‘ तोफेआधी मरे न बाजी , सांगा मृत्यूला! ‘ हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी , फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले.

पाय
रोवुनी उभा ठाकलो
मनी आता
तमा कुणाची
मर्द मराठा मावळा
मी
नोहे साधारण सैनिक
कुणी
राजंसुखरूप जा
गडावरी

उभा राहिलो घोड
खिंडी
शत्रुसैन्याचा काळ बनुनी
पावन ती खिंड
जाहली
मर्द मराठी वेड
पाहुनी
राजंसुखरूप जा
गडावरी

रक्त पिउनी प्यासी
अजुनी
दांडपट्ट्यांची पाती
कितेक शिरं कापुनी
काढली
सामोरी पडती लाशींच्या
राशी
राजंसुखरूप जा
गडावरी

अनेक जाहले घाव
वर्मी
केली देहाची चाळण
पुरती
महामेरुसम निश्चय मनी
शीणली जिद्द
अजुनी
राजंसुखरूप जा
गडावरी

प्राण एकवटले सारे
कानी
अजून मिळे
तोफांची वर्दी
गळुनी पडले खड्ग
हातुनी
राजं.. नाही हरला
तुमचा बाजी

सुखरूप जा तुम्ही
गडावरी
शेवटाकडे आली लढाई
देहातुनी चालले प्राण
सुटुनी
उजाडेल नवा सूर्य
स्वराज्यी
मालवून आमची प्राणज्योती
राजंसुखरूप जा
गडावरी

सह्याद्रीच्या साक्षीने…

सह्याद्रीच्या साक्षीने…


१७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्यास छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रास्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महीने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी शिळीमकर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या तटातिल गणेश शिल्पा समोरील वीरगळ ही संताजी शिळीमकर यांची असावी.

संताजी शिळीमकर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे. या व्यतिरिक्त राजवाड़े यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात


error: Content is protected !!