Category: Kitchen Beginners

उपवासाची कचोरी

उपवासाची कचोरी

#उपवासाची कचोरी  ||  #OnlineCooking  ||  खादाडगिरी  || खवय्ये

#साहित्य :

पारी साठी

४-५ मोठे बटाटे

२ टी स्पून साबुदाणा पीठ

मीठ चवीने

सारणा साठी :

२ कप ओला नारळ खोवून

३-४ हिरव्या मिरच्या

१/४ कप काजू

१/४ कप कीस-मिस

१ टे स्पून लिंबू रस

मीठ व साखर चवीने

तळण्यासाठी डालडा तूप किंवा रिफाईड तेल

कृती

सारणा साठी :

नारळ खोवून घ्यावा. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. काजू थोडे कुटून घ्यावेत. मग खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, काजू. कीस-मिस, लिंबू रस, मीठ व साखर घालून मिक्स करून सारण बनवून घ्यावे.

पारी साठी :

बटाटे उकडून सोलून किसून घ्यावेत. मग त्यामध्ये साबुदाणा पीठ व मीठ मिक्स करून घ्या, मग त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून त्यामध्ये नारळाचे सारण भरून गोळा बंद करा.

कढईमध्ये तूप गरम करून मंद विस्तवावर कचोऱ्या तळून घ्याव्यात.

All Your Kitchen!

Cooking Tips

Cooking Tips

#स्वयंपाकघरातील छोट्या-मोठ्या tips

१. #टोमाटोची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी तिला deep freezer मध्ये ठेवावे.

२. #कोथिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो.

Tiffin: Memories and Recipes of Indian Vegetarian Food

http://amzn.to/2d5AExC

३. Fridge मध्ये एका पिशवीत #खायचा सोडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही.

४. सफरचंद कापल्यावर  ते काळे पडू नये म्हणून त्याला लिंबू रस लावून ठेवा. सफरचंद दीर्घकाळ टवटवीत राहते.

५. #कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा अर्धा कापा आणि पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. कापताना डोळ्यातून पाणी येत नाही.

६.Sandwich  करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्या म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात. कापलेल्या कडा उन्हात वाळूवून मिक्सरमधून काढूल्या तर कटलेटसाठी चुरा वापरता येतो.

Ayurvedic Cooking for Self-HealingUsha Lad

http://amzn.to/2d9sEys

७. काकडीच्या कुठल्याही कोशिंबीरीला चोचवल्यावर किंवा चिरल्यावर थोडे लोणी लावा व मीठ लावून पिळून काढा म्हणजे कोशिंबीर पानात वाढेपर्यंत करकरीत राहील.

८. #भज्याचे पीठ पाण्यात कालवण्यापूर्वीच त्यात  फेसून तेल घालावे. हळदी ऐवजी खाण्याचा पिवळा रंग घातल्यास भज्यांना रंग छान येतो. फेसून मोहन घातल्याने भाजी खुसखुशीत होतात.

Shakahari Chinese CookingSanjeev Kapoor

९. #मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावी. शिजल्यावर वांगी चिरून मसाला भरून तेलात परतणे म्हणजे चवदार लागतात.

१०. साधी शेव किंवा लसूण शेव करताना खुसखुशीत व्हावी म्हणून #डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे.

११. कोणत्याही प्रकारची रसदार भाजी करताना त्यात थोडा #मावा किसुन भाजून घातल्यास भाजी चविष्ट होते व भाजीचा रस्सा दाट होतो.

Funskool Cooking Set @299

http://amzn.to/2deNpET

१२. #खमंग ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो. ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर  साधारण चमचाभर साखरपाणी टाकून ढोकळापात्र बंद करून ठेवावे. हे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो.

१३. डोश्याचे पीठ वाटताना त्यात भेंड्यांची बुडखे घालून वाटावे. डोसे खुसखुशीत होतात.

१४. आंब्याची डाळ करताना, डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन भिजत घालावी. त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो.

Handmade Wooden Serving and Cooking Spoon Kitchen Tools Utensil, Set of 5 @200 Only

१५. इडली डोशाच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची गरज नाही.थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाईस प्रमाण आवश्यकतेनुसार घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होती.

Kashmiri Cooking P. Krishna Dar

http://amzn.to/2cR50aC

१६. मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेले संबंध मुग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ठ होऊन तिची पौष्टिकता वाढते.

17. कडवे(#वाल)रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसरया दिवशी(फडक्यात न बांधता)एखाद्या कुंडीत पसरावेत त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात.

18. आंब्याची डाळ करण्याची चांगली पद्धत म्हणजे डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मग भिजत घाला त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो.

१९. #अळूवड्या करताना अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत थोड्या वेळाने ती चाळणीत काढून एका वर्तमान पत्रावर पालथी पसरावीत.प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे असे केल्याने वडी खाजत नाही.

२०. #रताळी किसून वाळवावी व नंतर जेव्हा उपयोग करायचा तेव्हा मिक्सरमधून काढून त्यात दाण्याचा कुट, हिरवी मिरची,मीठ, जिरे वाटून घालून त्याचा गोळा करावा व नंतर उपवासाचे थालीपीठ करावेत.

२१.तिखट मिठाच्या #पुर्‍याची कणिक टोमाटोच्या रसात भिजवावी त्याला वेगळीच चव येते.

२२. मोड आलेल्या #मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो.

clay pot for cooking 900 ml microvave oven safe

http://amzn.to/2d9rYcm

२३. ४ ते ५ बटाटे उकडून निवल्यावर बारीक कुस्करावेत. त्यात दोन-तीन कांदे चिरून तळून मिसळावेत. आले, लसून, मिरची यांची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी वरून कोथिंबीर घालावी. आवडी प्रमाणे मीठ घालावे.हा गोळा फ्रीज मध्ये ठेवावा याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो.

२४. नुसत्या उडदाच्या डाळीच्या #उडीदवडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ  व मुगाची डाळ घालावी. ५-६  तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व लगेच वडे करावे. वडे अतिशय हलके आणि कुरकुरीत होतातच पण तेलही कमी लागते.

२५. डोसे करते वेळी डोश्याच्या पिठात एकदम डावभर तेल घालावे व पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालवेत कमी तेलात चांगले डोसे तयार होतात.

२६. बाटली डाळ खाताना ती कोरडी होते व घशाला घास बसतो. त्याकरिता एक वाटी #हरभऱ्याची डाळ भिजवताना एका वाटीत दोन चमचे साबुदाणा भिजवावा. डाळ वाटून फोडणीत टाकताना बरोबर भिजलेला साबुदाणा टाकावा व दुध ताकाचा शिपवा द्यावा म्हणजे डाळ मऊ होते.

२७. नाचणीची #आंबील उन्हाळ्यात करावी म्हणजे उन्हाळा बाधत नाही.

२८. #ढोकळा करताना आयत्यावेळी हळद घातली तर ढोकळा लाल होतो हे टाळण्यासाठी आदल्यादिवशी पीठ भिजवताना हळद घालावी व आयत्यावेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो लाल होत नाही.

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

“गणपती स्पेशल”  #उकडीचे मोदक कसे करावे???

उकडीचा मोदक करणे हा एक मोठा सोहळा आहे.

हा पदार्थ – पाव इंच आले, एक टेबलस्पून मीठ, ओव्हनचं टेम्परेचर, कुकरच्या शिट्ट्या … असं लिहिणार्‍या पुस्तकात बघून करता येत नाही.

त्यासाठी – उगीच एवढंसं चिमटीभर मीठ, एक तारी पाक, मंद आच, दोन उकळ्या आणणे, कणीक थोडीशी सैलसर भिजवणे … ही भाषा यावी लागते.

नारळ किसणे, कापणे, तुकडे करणे वगैरे म्हणणार्‍या मंडळीनी जरा सांभाळूनच यात पडावे.

नारळ गुहागरी असतील तर चव वेगळी ….
राजापुरी असतील तर चव वेगळी,
दापोली आसूद या बाजूची गोडी वेगळी ….
नारळ तारवटी असेल अजून वेगळी ….
तर हे सगळे समजून गुळ कमीजास्त करायचा असतो.

मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा. त्यात करवंटीची साल येता कामा नये. खवणीवर उकिडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं. मधून मधून खोब-याचा तोबराही भरावा.

तांदूळ हा नवा असावा.
नव्या नवरी सारखा ! म्हणजे उकड ‘लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी’ छान चिकट होते. आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो.

तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ….. ही पिठी आता
जात्यावर घरी करणे अशक्य, म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली … भैय्याला,
” ए भय्या, ये गहू पे मत डालो. दुसरा तांदूळ आयेगाना पिसनेको उसके उपर डालो” वगैरे सांगून बारीक दळून घ्यावी.

गुळ अश्विनातल्या उन्हासारखा,
लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळाधमक असावा. किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण झाली आहे असे वाटले पाहिजे.

खोबरे आणि गुळ म्हणजे कोब्रा
आणि देब्रा यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावे.

कोब्राच्या [खोबर्‍याच्या]
संगतीत देब्रा [गूळ] हळूहळू
विरघळत जातो व दोघे एकजीव
होतात.

हे होताना … चमचाभर तांदळाची
पिठी व थोडी प्रत्येक दाणा वेगळा असलेली (कर्‍हाडे ब्राह्मणांसारखी) खसखस भाजून घालावी.

व देवरुखे ब्राह्मणही यात हवेत म्हणून वेलदोड्याची पूड करून थोडी पखरावी व ह्या सर्वांचे सारण तयार करावे.

यातील ‘कुठल्या गोष्टी किती प्रमाणात’ ते आई, आज्जी, सासुबाई, आजेसासूबाई यांनी सांगावे व नवीन सुनेने ते एकत्र परतावे.

जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच पाणी घ्यावे. त्यात चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप व एक छटाकभर तेल घालावे. नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावे. दोन वाफा आणाव्यात.

पीठ अंतर्यामी भिजले आणि तूप-तेल यांच्या मर्दनाने शिजले पाहिजे. सगळ्यात यापुढे खरी कसरत चालू होते.

ही उकड मळणे हा एक खास प्रकार आहे. त्यात एकही गाठ राहता कामा नये. कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी. लिंबाएवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा.

मध्यभागी  ‘पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल’ अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूने संस्कारांचा, शिक्षणाचा दाब देऊन तिला नाजूक, सुंदर मुलीसारख्या चिमटीने कडा दाबून चुण्या करुन सौष्ठव द्यावे.

आत सारण भरावे आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या
म्हणजे नऊवारी नेसलेल्या या
पापडीच्या नि-या अलगद, नाजूक
हाताने मिटत न्याव्यात.
Image result for उकडीचा मोदक
स्वतःचे नसले तरी मोदकाचे नाक चाफेकळी हवे. नंतर या जोडीला मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी.

असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की या फुलाचे नाक रूपी देठ काढून टाकावे व मगाशी वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकाच्या श्वासनलिकेत साजूक तूप ओतावे.

मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या अन्ननलिकेत सरकवावा.

तृप्तता म्हणजे काय … याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा !!!

सूचना – संबंधित लेख WhatsApp वरून घेतलेला आहे.

नम्र निवेदन – गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. अशात सोशल मीडिया वर गणपती संबंधित बरीच माहिती मिळत आहे. प्रथा, परंपरा, विज्ञान, दंतकथा, समाजशास्त्र, अफवा आणि काय काय. यातील खर्‍या खोट्याची खात्री कोणच देऊ शकत नाही. पण ही विविध अन काही अर्थाने बहुमूल्य माहिती संग्रहीत राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. नाहीतर आपण वाचून पुढे जातो. सकाळी वाचलेला मजकूर संध्याकाळी विसरून जातो. त्यामुळे आम्ही असा एक निर्णय घेतला आहे की, जी माहिती जशी मिळते ती तशीच्या तशी आम्ही प्रकाशित करू. अगदी नाव वगैरे सुद्धा! त्यामुळे वाचकांनी ह्या सगळ्याची नोंद घ्यावी अन आपल्या सुज्ञ बुद्धीने निर्णय घ्यावा. आम्ही केवळ माध्यम आहोत.

दुधी भात

दुधी भात

#Recipe of Meethi Bhaat   #गोड भात किंवा दुधी भात कसा बनवावा?

आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच ‘सेट मॅक्स’ वाहिनीवर अमिताभचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट पाहिला असेलच. नसेल तर चिंता करू नका, कधीही पाहू शकता. महिन्यातून एकदा तरी तो टीव्ही वर लागतोच लागतो. असो… त्या चित्रपटातील एक महत्वाचा प्रसंग आठवतो, ज्यात मुलगी सासरी आलेल्या बापाला (acp प्रद्युमन अर्थात शिवाजी साटम) एक पदार्थ खाऊ घालते. त्याला ती मीठी भात असं नाव देते.

खरं पाहायला गेलं तर हा पदार्थ आपल्या मराठी परिवारात सामान्यपणे बनत असतोच. आज त्याच प्रकाराची ‘रेसेपी’ आपण बघणार आहोत.

तुमच्याकडे जर तीन वाट्या शिळा भात राहिला असेल तर तो घ्या.

त्यात थंडगार दूध ओता. किती? दोन वाट्या.

आता त्यात तीन-चार चमचे साखर ओता. (मधुमेह वाल्यांनो बायको कुठे आहे ते बघा आधी)

नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.

आवडत असेल तर असच हादडा; नाहीतर पुढे वाचा!!!

मग हे मिश्रण गरम करायला घ्या. मंद आचेवर ठेवा.

त्याला थोडसं हलवत रहा नाहीतर करपून जाईल. (कसंही असलं तरी शेवटी ते तुम्हालाच पचवायचं आहे म्हणा!)

नंतर घरात जर बदाम (झाडाचे नाही, सुके बदाम) हातानेच बारीक करा. शिजत असलेल्या भातात टाका. किती? पाच-सहा. किंवा पगार आठवून ठरवा.

वेलदोडे असतील तर एखाद-दुसरं टाका.

थोडसं शिजू द्या. पाच मिनिटे केवळ.

सगळं एकजीव झाल्यावर हादडा!!!!

स्वीट डिश तयार आहे.

दुधी भात
दुधी भात

सूचना – ही पाककला सौ. जोशी काकू यांनी सांगितली असली तरी अनुवाद आमचा आहे. आम्ही bachelors आहोत.

Kitchen Beginners

Kitchen Beginners

तुम्हाला जर खूप भूक लागली असेल आणि काही करून खाण्याचा कंटाळा आला असेल तर काही विशेष पदार्थ असे आहेत की जे बनवण्यास फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. आज आपण असेच दोन पदार्थ शिकणार आहोत.

खूप भूक आणि खूप कंटाळा आला आणि कमी वेळ असेल तर असेल तर…

१  मेतकूट चिवडा

साहित्य – चुरमुरे, तेल, मेतकूट, मीठ, तिखट किंवा लोणच आणि कांदा

कृती –
१. सर्वात आधी चुरमुरे चालून घेऊन एका पातेल्यात घ्या. (पाव किलो)
२. त्यात आता अंदाजाप्रमाणे तेल (दोन मोठे चमचे ), मेतकूट (दीड चमचे), तिखट (अर्धा चमचा) किंवा १ चमचा लोणच आणि थोडसं मीठ टाका.
३. सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. चव घेऊन बघा. जर काही कमी पडलं अस वाटत असेल तर पुन्हा टाकू शकता.
४. कांदा आणि मेतकूट चुरमुरे असा खमंग बेत जुळून येईल.

जर खूप भूकलागली असेल आणि थोडा वेळ असेल तर…

२.सुकी भेळ 

साहित्य – चुरमुरे, तेल, तिखट मीठ, मोहरी, हळद, जिरे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर.

कृती –
१. आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात थोडीशी मोहरी टाका.
२. मोहरी फुटली की मग त्यात जिरे आणि हळद टाका.
३. त्यात थोडेसे शेंगदाने आणि दाळव टाका.
४. नंतर त्यात चुरमुरे टाका.
५. मग गरजेनुसार तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. सर्व मिश्रण नीट हलवून घ्या.
५.  मिश्रण थंड होईपर्यंत कांदा, टोमॅटो कोथिंबीर आणि उन्हाळा असेल तर कच्ची कैरी (किंवा लिंबू) स्वच्छ धुवून चिरून घ्या. आवडत असेल तर त्यात तुम्ही काकडी, पापड्या किंवा मूग दाल वगैरे टाकू शकता.
 ६. हे सर्व चिरून झाल्यावर त्या तयार केलेल्या मिश्रणात टाका.
७.  आणिही एक भेल तयार आहे.

किंवा तुम्हाला फोडणी देता येत नसेल तर अजून एक नुसखा असा आहे……

१. एका पातेल्यात चुरमुरे घ्या.
२. त्यात आता पापडी आणि गरजेप्रमाणे तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. एकदा ते हलवून घ्या.
३. त्यात नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिरून टाका. सर्व मिसळून घ्या.
४. त्यात तुम्ही वरुण लिंबू, काकडी, शेंगदाने, दाळ ,शेव किंवा फरसान टाकु शकता.
५.  आवडत असेल किंवा घरात उपलब्ध असेल तर त्यात तुम्ही चटणी सुध्दा वापरू शकता.

आणखी एक असाच नुसखा आहे. त्यात फक्त चुरमुरे नसून जाड पोहे वापरावे लागतील. तो नुसखाही बघून घेऊ….

 ३.  मेतकूट पोहे

साहित्य  – जाड पोहे, मेतकूट, तिखट-मीठ किंवा लोणच, तेल, कांदा टोमॅटो, कोथिंबीर, कैरी. 

कृती – 
१. एका पातेल्यात जाड पोहे घ्या.
२. त्यात नंतर तेल (फोडणीच असेल तर उत्तम), मेतकूट आणि मीठ टाका.
३. त्यात आता तिखट, मसाला किंवा आंब्याच लोणच टाका.
४. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
५. त्यात वरुण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी चिरून टाका.
६. मेतकूट पोहे तयार.

                                                                                                                            – सौ. जोशी काकू

Kitchen Beginners

Kitchen Beginners

                    कांदेपोहे
कांदेपोहे म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन
संस्कृतीचा भाग. लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहायचा कार्यक्रम असो की कुठला विशेष कार्यक्रम
नाश्त्यासाठी गरमागरम कांदेपोहे असलेच पाहिजेत. कार्यक्रम असो की नसो पण पोटाला भूक
लागल्यावर लगेचच करता येईल असा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे कांदेपोहे.
साहित्य –
जाड पोहे, तेल, हळद, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, मसाला, कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, खिसलेल खोबर.
कृती –
१.     
सर्वात आधी जाड
पोहे चाळणीतून चालून घ्या. त्याच्यानंतर पोहे चाळणीतच स्वच्छ धुवून घ्या आणि सर्व पाणी
निघून जाऊ द्या. पोहे तसेच मोकळे करून चाळणीतच राहू द्या ज्याच्यामुळे सर्व पाणी नुघुण
जाईल (पोहयातील पाणी निघून गेल्यावर कांदेपोहे मोकळे होतात अथवा पाणी तसेच राहील तर
कांदेपोहे चिकट होतात).
२.     
कढईत पोह्याला
लागतील ह्या प्रमाणात तेल बारीक गॅस वर गरम करायला ठेवा.
३.     
त्यात पाव चमचा
मोहरी टाका.
४.     
तोपर्यंत एक
कांदा, दोन मिरच्या बारीक चिरून घ्या. असेल तर कडीपत्ता
दोन-तीन पाने स्वच्छ धुवून घ्या.
५.     
तोपर्यंत कढईतील
मोहरी फुटली असेल तर त्यात पाव चमचा जिरे आणि चिरलेला कांदा आणि मिरची टाका आणि थोड
परतून घ्या.
६.     
कढईतील कांद्याला
पिवळसर रंग आला असेल तर त्यात अर्धा चमचा हळद टाका.
७.     
त्याच्यानंतर
कढईत आवडिनुसार शेंगदाणे आणि दाळव टाका आणि परतत रहा.
८.     
आता वाळत ठेवलेले
चाळणीतील पोहे मोकळे करून कढईत टाका. पोहे परतून घ्या.
९.     
आता १ चमचा किंवा
गरजेनुसार मीठ, तिखट आणि बिर्याणी मसाला टाका.
१०.  पोहे २ मिनिट परतून घ्या आणि कढईवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा.
११.  आता पोहे तयार झाले आहेत.
१२.  कांदेपोहे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यावर कोथिंबीर आणि
खिसलेल खोबर टाका. पोहयासोबत लोणच, दही, पापड आणि एखादा गोड पदार्थ असला तर झकासच.   
–    सौ. जोशी काकू 
  

Kitchen Beginners

Kitchen Beginners

             फोडणीची मॅगी 

साहित्य –

एक २० रूपयांचा मॅगी चा पॅक, लोणी किंवा तेल मोहरी, जिरे, तिखट, मीठ, १ कांदा, २ मिरच्या, १ टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर
आणि कढीपत्ता, १ गाजर.  


 


१.     
सर्वप्रथम बारीक गॅस वर एका कढईत तीन चमचे तेल किंवा लोणी टाका.
२.     
त्यात अर्धा चमचा मोहरी टाका. मोहरी फुटल्यानंतर त्यात पाव चमचा
जिरे टाका.
३.     
आता १ कांदा आणि हवी असेल तर हिरवी मिरची आणि कढीपत्ता धुवून, चिरून
त्यात टाका. कांदा परतत रहा. गॅस मोठा करा.
४.     
कांदा पिवळसर होईपर्यंत १ टोमॅटो चिरून घ्या आणि चिरलेला टोमॅटो
कढईत टाका.
५.     
नंतर मॅगी मसाला कढईत टाकून सर्व मिश्रण परतून घ्या.
६.     
आता दोन वाट्या पाणी टाका आणि गॅस बारीक करून कढई झाकून ठेवा.
७.     
साधारण २-४ मिनिट झाल्यानंतर झाकण काढा आणि अखंड (न तोडता) मॅगी
कढईत टाका.
८.     
त्यात हवा असेल तर लगेचच तुम्ही बिर्याणी मसाला, अर्धा
चमचा तिखट आणि चविसाठी मीठ टाका.
९.     
किमान ५ मिनिटांनंतर गॅस बंद करून मॅगी काढून घ्या.
१०. 
नंतर मग तुम्ही त्यात कोथिंबीर, गाजर आवडत
असेल तर पानकोबी टाकू शकता.
      ही मॅगी पोटाची
भुख भागवेल आणि सर्व भाज्यांमुळे पौष्टिकही असेल.   
–   
सौ. जोशी काकू

Kitchen Beginners…

Kitchen Beginners…

          Tasty & Simple Maggi
बाजारातून एक १० रुपयांचं Maggi चा पॅक आणा. 
१.     
सर्वप्रथम साधारण २ – ३ कप पाणी गरम करायला ठेवा.
२.     
पाणी गरम होईपर्यंत अर्धा कांदा, अर्धा
टोमॅटो चिरून घ्या; असतील तर मूठभर हिरवे वाटणे आणि कोथिंबीर
स्वच्छ धुवून घ्या.
३.     
पाणी गरम झालं असेल तर Maggi त्यात न तोडता (अखंड)
टाका, आणि लगेच ३० सेकंदात Maggi मसाला
टाका.
४.     
त्यातच मग हिरवे वाटणे आणि थोडासा बिर्याणी मसाला टाका
(आवश्यक असेल तर मीठ).
५.     
थोडसं उकळल्यावर गॅस बंद करा.
६.     
गॅस बंद करा आणि नंतर त्यात चिरलेला कांदा,
टोमॅटो व कोथिंबीर टाका. 

१.     
आता पोटाची खळगी भरा.

 

Maggi हा प्रकार पोटाला फार पौष्टिक नाही पण भूक लागल्यावर
पौष्टिक वगैरे काही आठवत नसतं. त्यामुळे आली हुक्की दिली बुक्की ह्या प्रकारात हे
खाद्य येत. 
–   
सौ. जोशी काकू

Kitchen Beginners

Kitchen Beginners

सौ जोशी काकू यांच्या पुढाकाराने ‘Kitchen Beginners’ ही post आपण अशा लोकांसाठी
सुरू करत आहोत जे आजपर्यंत तरी स्वयंपाकघरात कधी घुसलेले नाही आहेत. पण आता Kitchen कारकीर्द सुरू करु इच्छितात. यात आपण त्यांना मदत करणार आहोत. यामध्ये आपण सुरूवातीला
अगदी साध्या रेसिपी बघणार आहोत.
                        याचा
श्रीगणेशा आपण चहा पासून करणार आहोत.
स्पेशल टपरी टाइप टी –
1.  
 आधी दीड कप दूध बारीक
गॅस वर ठेवा. (काही जण अर्धा कप पाण्याचा वापर सुद्धा करू शकतात)
2.  
 दूध थोड गरम झाल्यावर
त्यात दीड चमचा चहा पत्ती आणि दीड चमचा साखर टाकावी. (साखर Diabetes नसणार्‍यांनीच टाकावी. अथवा गरजेनुसार कमी-जास्त करावी)
3.  
थोडी उकळी आल्यावर त्यात चिमूटभर वेलची पावडर, 1 लवंग, चीमुटभर मीठ टाका.
4.  
नंतर चहा अजून थोडा उकळू द्या.
5.  
आता ढोसा.
–   
सौ. जोशी काकू

error: Content is protected !!