आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Category: General Information

शेअर बाजार e-book – मराठीत

शेअर बाजार e-book – मराठीत

Share Market Beginners  ||  Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market E-Book  || शेअर बाजार पुस्तक  || गुंतवणूक || Basic Terminologies In Share Market  ||  

 

शेअर बाजाराचं विश्व वरचेवर विस्तारत आहे. पण अनेकजण या विश्वाशी, यातील संकल्पना व चढ-उताराशी अनभिज्ञ आहेत. शेअर मार्केट बद्दल काहीजण फक्त ऐकून असतील, पण त्या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दल धाडस होत नसेल. काहीजण या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती बाळगून असतील, पण त्यातील मूलभूत माहिती नसल्यामुळे पूर्ण ताकदीने त्यात उतरू शकत नसतील. अशा SHARE MARKET BEGINNERS साठी मी अभिषेक बुचके, घेऊन आलोय एक BASIC USER GUIDE, एक माहिती पुस्तक… तेही मराठीत, तेही विनामूल्य, मोफत, FREE…

FREE E-Book For Share Market Beginners

शेअर बाजार म्हणजे सट्टा, जुगार नाही. ते तंत्र आहे, शास्त्र आहे आणि एक संधी आहे. गुंतवणुकीचं योग्य साधन म्हणता येईल. या क्षेत्रात जे येतात त्या प्रत्येकाचे हेतु वेगळे असतात. आपण या क्षेत्रात येत आहोत त्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. जोपर्यंत शेअर बाजार काय आहे हे माहीत होत नाही तोपर्यंत जास्त पैसे लावण्याचं धाडस करू नये. आधी मूलभूत माहिती घ्यावी अन मग गुंतवणूक करावी.

शेअर बाजारात लावलेला पैसा बुडतो हे सत्य असलं तरी तो साधारणपणे स्वतःच्या अट्टहास, अयोग्य मार्गदर्शन व अपुरी माहिती यामुळेच बुडतो. फेरफार व गैरव्यवहार करणार्‍या कंपन्या यामुळेही तो बुडू शकतो.

या e-book मध्ये काय आहे???

गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी करतात, शेअर बाजारातील गुंतवणूक, शेअर बाजारातील प्रवेश, Demat Account, Depository, DP, share म्हणजे काय?, शेअर कसा खरेदी करतात?, कमीत-कमी किती रुपयांचे shares खरेदी करता येतात?, नेमका कोणता शेअर खरेदी करावा?, शेअर खरेदी करताना कोणते निकष असतात?, Sensex आणि Nifty म्हणजे काय?, Primary आणि secondary मार्केट म्हणजे काय?, IPO म्हणजे काय?, Corporate Action म्हणजे काय?, Dividend म्हणजे काय?, Bonus, Split, Right Issue, 52 Week High-Low, Intraday-Positional-Delivery-Long Term Position म्हणजे काय?, Upper Circuit आणि lower circuit म्हणजे काय?, Bearish-Bullish, Overbought-oversold म्हणजे काय?, Record Date आणि Effective Date मध्ये काय फरक असतो? वगैरे वगैरे सर्व संकल्पना थोडक्यात आणि मराठीत नमूद केलेल्या आहेत.

एकंदरीत शेअर मार्केट या क्षेत्राशी अगदीच अनभिज्ञ असलेल्या व्यक्तिला किमान मूलभूत माहिती मिळावी या हेतूने या Document ची निर्मिती झाली आहे.

शेअर मार्केट हे खूप मोठं विश्व आहे. त्यात रोज नवनवे अध्याय लिहिले जात असतात. हे Document त्या सर्व मुद्द्यांना स्पर्श करणार नाही. पण शेअर बाजारात नव्याने येऊ इच्छिणार्‍या अन मूलभूत माहिती वाढवू इच्छिणार्‍या लोकांसाठी हे Document उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो…

[[ Disclaimer – खुलासा – मी शेअर मार्केट मधील तज्ञ नाही किंवा SEBI registered Analyst वगैरे नाही. काही वर्षांपासून स्वतः ह्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि सध्या Share Broker आहे. मला या क्षेत्रात आल्यावर काही अडचणी आल्या अन त्याची उत्तरे शोधताना बरेच प्रयास करावे लागले. ती सर्व माहिती मराठीत आणि एका ठिकाणी करता यावी यासाठी हा खटाटोप. ]]

जरूर वाचा अन अभिप्राय कळवा… आणि आवडलं असेल तर Playstore वर नक्की चांगलं rating द्या, share करा… तुमचं Rating हेच माझं Earning…

खालील लिंकवर क्लिक करून e-book download करू शकता… किंवा Google Playstore वर जाऊन Abhishek Buchake search करू शकता… 

LINK

https://play.google.com/store/apps/details?id=com.sharemarket.marathi.sharebazaar&hl=en

शेअर मार्केट मराठीत…

Top Stocks To BUY

Top Stocks To BUY

Share Market In Marathi   || शेअर बाजार मराठीत  ||  गुंतवणूक टिपा  ||  Which Stocks To Buy   ||  Top Shares  || Share Recommendations   ||  Share Market Investment 

[Date – 10 Feb 2018]

2018 चा केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड बघायला मिळाली. 11000 च्या वर असलेला NIFTY थेट 10500 च्या खाली आला. अनेकांनी आपले अडकलेले पैसे काढून घेतले. सलग दोन दिवस पडझड आणि परत एक बाऊन्स बॅक. परत पडझड आणि परत तेजी. बजेट नंतरचा आठवडा खूपच रंजक राहिला. Index खूपच volatile होते. अशात अनेकांचं नुकसान तर झालं पण अनेकांनी चांगल्या नव्या positions घेतल्या. अजून एकदा असा मोठा डाउनफॉल अपेक्षित आहे, तो केंव्हा येईल सांगता येत नाही, पण तो NIFTY ला 10000 पर्यन्त खाली खेचू शकतो. पण हेसुद्धा short term correction असेल. त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने BUYING सुरू होईल आणि धीम्या गतीने बाजार पुन्हा वर सरकू लागेल. आशा परिस्थितीत चांगल्या व दर्जेदार shares मध्ये दीर्घ पल्ल्यासाठी गुंतवणूक खूपच फायद्याची ठरेल. NIFTY 100 व काही Midcap किंवा Smallcap मधील दर्जेदार कंपन्या गुंतवणुकीसाठी नक्की आकर्षक असतील. बाजारातील गुंतवणुकीची ती योग्य संधी समजून आपल्याकडील काही (सरसकट सर्व नाही) रक्कम बाजारात गुंतवू शकता.

मागच्या लेखात आपण NIFTY 50 मधील दहा कंपन्या बघितल्या आणि त्यानंतर Midcap मधील काही कंपन्या बघितल्या. आता त्यापुढे जाऊन गुंतवणुकीस आकर्षक इतर shares बघूयात…

 

 1. Apollo Tyres

जवळपास 15000 कोटींचा market cap असलेली Tyre क्षेत्रातील कंपनी. वाहन क्षेत्रातील तेजीचा परिणाम या क्षेत्रावर थेट संबंध. एका बाजूला MRF सारख्या दिग्गज कंपनीशी स्पर्धा आणि योग्य वाटणारी शेअर प्राइस ही जमेची बाजू. खरं तर शेअर split झालेला आहे. 1 रुपये Face Value आहे. पण बाजारात हा शेअर 230 च्या रेंजमध्ये मिळत असल्यास नक्की घ्यावा असा. सध्या 260 च्या आसपास कार्यरत आहे. एकंदरीत क्षेत्रातील तेजीचा लाभ या कंपनीलाही होत आहे.

 

 1. Berger Paints

रंग क्षेत्रातील कंपनी. क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होताना दिसतो. पण भारतासारख्या देशात कंपनीला वाढीसाठी पोषक परिस्थिती. येणार्‍या काळात गृहनिर्माण क्षेत्रात वाढ झाली तर हे क्षेत्रही तेजी अनुभवेल. सध्या शेअर 250 च्या आसपास कार्यरत आहे, पण split आणि bonus सारख्या corporate action नंतरचा हा रेट आहे याची नोंद घ्यावी. ह्या पातळीवर गुंतवणूक करण्यासारखा शेअर आहे.

 

 1. ICICI General Insurance | HDFC लाइफ | SBILife

अर्थसंकल्प 2018 मध्ये आरोग्याच्या योजना राबवत असतांना Insurance क्षेत्राला सुगीचे दिवस येतील असं चिन्हं आहे. या क्षेत्रातील कंपन्या नजीकच्या काळात आपला व्यवसाय गतीने वाढताना दिसून येईल. बाजारात जोरदार पडझड होत असतांना Insurance shares फार पडझड होताना दिसलं नाही. या तीनही कंपनीत, योग्य भाव भेटताच समप्रमाणात गुंतवणूक करून ठेवावी.

 

 1. Bajaj Electricals

Domestic Appliance मधील कंपनी. या क्षेत्रातील दर्जेदार कंपनी. नुकतेच कंपनीचे वार्षिक निकाल आले त्यात कंपनीचा performance चांगला दिसून आलाय. बाजारातील पडझडीचा फटका कंपनीला बसलेला आहे. येणार्‍या काळात चांगला परतावा अपेक्षित आहे.

 

 1. Indian Hotels

पुन्हा एकदा Tata ग्रुपमधील कंपनी. मुंबईतील Hotel Taj याच कंपनीचे. Hotel क्षेत्रातील दिग्गज कंपनी. Tourism चा या क्षेत्रावर थेट परिणाम होत असतो. Luxurious सुविधा ह्या रोजच्या आयुष्यातील गरज नसल्याने वाढ मर्यादित वाटते. मंदीचे चटके या क्षेत्राला बसू शकतात. पण दर्जेदार कंपनी असल्याने Low Risk. अलीकडेच कंपनीने Right Issue दिलेला. सध्या 140 च्या आसपास कार्यरत आहे. 160 या 52 week high ला नुकताच गवसणी घालून आला आहे. बाजारातील पडझडीत correction झालेला. सध्याच्या position पासून Mid to Long Term साठी घ्यावा असा शेअर. खालच्या बाजूला 122 आणि 110 च्या आसपास support.

 

 1. UPL

खरं तर ही NIFTY100 मधील कंपनी. LARGE CAP. केमिकल क्षेत्रात कार्यरत. सध्या 700 रुपयांवर कार्यरत आहे. 52 week low च्या आसपास. अनेक market analyst कडून कंपनीला BUY च recommendation आहे.  सध्याच्या क्मतीवर नक्कीच Buy करावी अशी…

 

 1. NALCO – National Aluminium

Metal क्षेत्रातील कंपनी. Government undertaking. सध्या विविध aluminium व इतर metal manufacturing चा व्यवसाय. शिवाय power plant ही. चांगला performance करण्याची अपेक्षा. 70 रुपयांच्या आसपास कार्यरत. 52 wk low 61 आहे व 52 wk high 97 आहे. आपल्या पोर्टफोलियोत छोटीशी जागा या शेअर साठी काढून ठेवता येईल.

 

 1. Hindustan Copper

एकमेव कंपनी ज्या कंपनीला Copper mining चे अधिकार आहेत. सरकारी भागीदारी असलेली कंपनी. सध्या काही कारणास्तव share price कोसळत आहे. 52 wk low आहे 56 आणि high आहे 110. सध्या 75 ते 80 च्या दरम्यान कार्यरत आहे. Long term साठी गुंतवणुकीस चांगला शेअर.

 

 1. Hindustan Zinc

वर चर्चा केलेल्या दोन कंपनी याच क्षेत्रातील. हासुद्धा गुंतवणुकीस चांगला शेअर आहे. 300 रुपयांच्या आसपास कार्यरत. अनेक market analyst ने हा recommend केला आहे. सरसकट एकाच क्षेत्रात सर्व गुंतवणूक करू नये, वरीलपैकी योग्य वेळी योग्य shares गुंतवणुकीस निवडावा.

 1. Ambuja Cements

जेंव्हा इनफ्रास्ट्रक्चर किंवा गृहनिर्माण क्षेत्रात तेजी येईल तेंव्हा cement sector सुद्धा तेजीत असतं. पण ह्या सेक्टरच्या काही मूलभूत अडचणी आहेत. एकतर जे दिग्गज आहेत त्यांची किम्मत जास्त दिसत आल्याने सामान्य गुंतवणूकदार त्यापासून दुरावतो. या क्षेत्रात Ambuja Cement ही सध्या attractive वाटत आहे. अर्थात, चांगला परतावा मिळवण्यासाठी यात patience ठेवावे लागतील. Diversified व balanced portfolio बनवताना या क्षेत्राचा विचार करत असाल तर हा शेअर बरा वाटतोय. सध्या 250 च्या आसपास कार्यरत आहे, अजून तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. टप्प्याटप्प्याने योग्य गुंतवणूक करता येईल.

 

 1. NLC Industries

लोकसत्ताच्या अर्थवृत्तांत पुरवणीत शेअर मार्केट तज्ञ अजय वाळिंबे यांनी हा शेअर सुचवलेला होता. सीमेंट क्षेत्रातील मिनी कंपनी म्हणता येईल. मलाही हा गुंतवणुकीस चांगला वाटतो. बाजारात पडझड होत असताना जर हा अजून खाली आला तर गुंतवणूक करावी.

 

 1. Bharat Forge

Forging क्षेत्रातील दर्जेदार कंपनी. Large Cap. शेअर बाजार कोसळत असताना हा शेअर मात्र 52 wk high च्या जवळ कार्यरत आहे. विविध Brokerage Houses कडून या शेअर ला BUY चं recommendation आहे. ह्या levels वर शेअर थोडा महाग वाटत आहे. थोडासा correction आल्यानंतर यात गुंतवणूक करता येईल.

 

 1. Gati

सध्या Online Product Selling क्षेत्र विस्तारत आहे. वाढतं शहरीकरण आणि digitization यामुळे ते आणखीन वाढत जाईल असं दिसतंय. या क्षेत्रातील BlueDart सध्या मोठ्या पोर्टलसोबत टाय अप असल्याने तेजीने वाढत आहे. त्याचप्रमाणे Gati ही कंपनीसुद्धा याच तर्‍हेने वाढ नोंदवू शकते. या शेअर बाबत समिश्र प्रतिक्रिया बघायला मिळतात. पण थोडीशी risk घेऊन यात गुंतवणूक केली तर Long Term साठी ती फायदेशीर ठरू शकते. सध्या 115 च्या आसपास आहे, अजून कमी आल्यास आपल्या पैशांतील छोटा हिस्सा यात गुंतवू शकता.

 

 1. Jagran Prakashan

विविध Brokerage Houses या शेअर ला नेहमीच focus मध्ये ठेवत असतात. माध्यम क्षेत्रातील मोठा समूह. सध्या 165 च्या आसपास कार्यरत आहे. म्हणजे 52 wk low च्या आसपास. गुंतवणूक करता येईल असा शेअर.

 

 1. Avenue Supermart

Dmart चे मॉल चालवणारी ही कंपनी. हे shares IPO मध्ये मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरशः उड्या पडल्या होत्या. परिणामही तसाच आला. 300 रुपयांना Issue केलेला हा share listing ला 640 पर्यन्त गेला आणि आज तो 1200 रुपयांवर कार्यरत आहे. बर्‍याच ठिकाणी असेलेले मॉल अन कंपनीचे चांगले fundamentals बघता कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक खूप फायद्याची ठरेल. Long Term साठी उत्तम शेअर.

 

 1. L&T Infotech

सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी. मागे सांगितल्याप्रमाणे हे वर्ष IT Sector साठी चांगलं मानलं जात आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्या गुंतवणुकीस आकर्षक आहेत त्यात हा शेअर अग्रेसर आहे. थोडही correction आल्यास या शेअर मध्ये गुंतवणूक जरूर करावी.

 

 1. Dabur India

मोठी कंपनी. ह्या कंपनीचे अनेक उत्पादने वापरले असतील. चांगली balance sheet आणि fundamentals. बराच काळ consolidate झाल्यानंतर हा शेअर वाढत गेला. सध्या 52 wk high च्या आसपास कार्यरत आहे. Assured returns साठी असे शेअर आपल्या पोर्टफोलियो मध्ये असायलाच हवेत.

 

 1. Tata Power

पुन्हा एकदा Tata ग्रुपमधील कंपनी. हा फार गमतीशीर शेअर आहे. जवळपास वर्षभर हा शेअर 80 च्या आसपास कार्यरत होता. वाढही नाही आणि तूटही नाही. पण Tata चा शेअर असल्याने गुंतवणूकदार यातून बाहेरही पडत नाहीत. पण अलीकडे या शेअर ने आपला तो पॅटर्न तोडून 100 च्या वर झेप घेतली होती. पण बाजार कोसळताच पुन्हा 82 ते 83 च्या आसपास आला. सध्या पॉवर सेक्टर ला चांगले दिवस आहेत. या क्षेत्रातील दिग्गज या नात्याने ह्या शेअरकडे बघता येईल. हा शेअर 90-92 च्या वर गेला की चांगली तेजी दाखवेल. पण त्यासाठी patience हवेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी घ्यावा असा शेअर.

  अभिषेक बुचके  || @Late_Night1991

[[[ Disclaimer – खुलासा – I’m not financial adviser nor fund manager.  मी गुंतवणूक सल्लागार नाही. The stocks advised here, are based on my own market research and analysis. संबंधित लेख माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासातून लिहिलेला आहे. ]]]

गुंतवणुकीसाठी योग्य संधी

 

Midcap Money 1

भाषिक अस्मिता

भाषिक अस्मिता

मराठीचा मारेकरी  ||  भाषिक वाद  ||  मराठी भाषाप्रेम  || हिन्दी भाषेचा द्वेष  ||  इंग्रजी भाषेचा अतिरेक  ||  #माझंमत

भाषावार प्रांतरचना होऊन आता साठ वर्षे लोटून गेलीत, पण अजूनही भाषिक अस्मितेवरून आरोप-प्रत्यारोप व वाद होत असतात. ते भविष्यातही होतच राहतील याबाबत खात्री आहे. भाषा हे संवादाचं माध्यम असताना वरचेवर ते वादाचं कारण बनताना दिसत आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. नेहमीप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिक अशा वादांसाठी कुठल्यातरी नेत्याला, पक्षाला किंवा वर्गाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून स्वतः मात्र दोषमुक्त होत असतो.

भाषा की फक्त संवादाचं माध्यम असती तर हे मुद्दे इतके टोकाला कधीच गेले नसते. पण भाषा ही संस्कृतीची ओळख असते. कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करताना त्या भाषेशी आधी ओळख करू घ्यावीच लागते, आणि जेंव्हा संस्कृतीचा प्रश्न येतो तेंव्हा गदारोळ होणारच असतो.

बाकीचा सगळा फाफट पसारा सोडला तर मूळ मुद्दा आहे मराठी भाषा अन संस्कृतीचा! ते विविधतेत एकता, सर्व भाषा चांगल्या वगैरे गोष्टी सांगून फायदा नसतो.

              एका उदाहरणाने सुरुवात करुयात. आम्ही काही मित्र एकदा देवदर्शनासाठी दक्षिणेत गेलो होतो. आमच्यातील एक मित्र अगदी कट्टर मराठी. इकडे महाराष्ट्रात असताना, कुठेही जा मराठीत बोला, महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोललं पाहिजे, ज्या राज्यात जाल तेथील भाषा शिकली पाहिजे, हिन्दीत संवाद करूच नये असं सांगायचा. अगदी कट्टर मराठी विचारांचा माणूस.

आता परराज्यात निघताना त्याचे हे विचार त्याच्या गिनतीत नव्हतेच. पण आम्ही मित्रांनी त्याची फिरकी घ्यायची ठरवलं होतं. आम्ही त्याला सांगितलं, आता ज्या राज्यात आपण जात आहोत तेथे तू, तेथील भाषेत बोलून सर्व व्यवहार करायचे, हिन्दीचा चुकूनही वापर करायचा नाही, इंग्लिश बोलू शकतोस. ठरलं.

गडी हुशार तसा. अगदी लहानपणापासूनच. हसत-हसत त्याने आमचं आव्हान स्वीकारलं. आम्ही त्याला कसलंही सहकार्य करणार नाही असं सांगितलं होतं.

रेल्वे स्टेशन आलं अन आम्ही उतरलो. पहाटेची वेळ. सोबत सामान बरच होतं. मित्राची परीक्षा सुरू झाली होती. एक कुली (हमाल) आला आणि त्याच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीत व इंग्रजीत संवाद साधून आम्ही भाव वगैरे ठरवला. आमचं ठरलं. तो मित्र आमच्या तोंडाकडे बघत उभा होता. दूसरा कुली आला. आमचा मित्र अस्लखित का काय म्हणतात तसलं इंग्रजी बोलू शकतो. तो फाडफाड इंग्रजीत त्या कुलीशी बोलत होता. कुलीला फक्त “लगेज” हा शब्द कळाला. पण तो लगेच तयार नाही झाला. त्याने हातवारे, इशारे व तोंड वेडंवाकडं करत भावना पोचावल्या. नो नो, यान्न बिन्न करत सौदा ठरला. पंधरा मिनिटे गेली पण आमच्या मित्राने पहिला पेपर काढला होता.

पुढच्या टप्प्यावर गेलो. आम्ही चहा वगैरे घेतला. दक्षिणेत हिन्दी अजिबातच बोलत नाहीत असं नाही. रोज कमवून खाणारे कुली, टपरीवाले, ऑटोवाले वगैरे जमेल त्या भाषेत संवाद साधून, कस्टमरची गरज ओळखून काम करत असतात. हिंदीत बोललं की तिकडे थेट मारतात असा गैरसमज महाराष्ट्रातच जास्त पसरला आहे.

तर, आम्ही चहा घेतला. आमच्या मित्रानेही चहा वगैरे घेतला. त्याच्या बॅगची चैन खराब झाली होती अन त्याला हवी होती मेणबत्ती. बिचारा त्या दुकानदाराला बराच वेळ इंग्रजीत सांगत होता, हातवारे करत होता पण त्या दुकानदाराला काय समजेना. तो काडीचीपेटी, शम्पो वगैरे वगैरे दाखवत होता. शेवटी आमच्या हुशार मित्राने मोबाइलवर भाषांतर केलं आणि मेणबत्ती मिळवली. बराच वेळ गेला पण मित्र पास झाला. शेवटी पैज ती पैज!

पुढे बर्‍याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असेच प्रसंग झाले. तेथील सर्वांना इंग्रजी समजत नाही, मराठीचा तर प्रश्नच नाही आणि ह्याला काही त्यांची भाषा समजत नाही. तसं कायमचा इकडे स्थायिक होणार असता तर क्लास वगैरे लाऊन त्याने ही भाषा शिकली असती इतका ज्ञानी तो नक्कीच आहे, पण चार दिवसाच्या दौर्‍यात अशा काय अडचणी येतील असं त्याला वाटलं नव्हतं. एका ठिकाणी अवाजवी प्रसंग घडला. एका भाजीवाल्या महिलेला तो काय सांगू बघत होता काय माहीत, तिने याला नीट शिव्या घालायला सुरुवात केली. तिला वाटलं हा काहीतरी अश्लील हातवारे करतोय की काय. पण आम्ही वेळेत मध्यस्ती केली अन वाचला बिचारा. जोडे खाता खाता वाचला बिचारा. नंतर तो शांत शांत राहू लागला. जेवताना तर असे वांधे व्हायचे बिचार्‍याचे की सांगायला सोय नाही. भाज्यांचे व पदार्थांचे इंग्रजीत नावे सांगायचा जे त्या लोकांनी बापजन्मी कधी ऐकले नसायचे. हिन्दी वापरायची मुभा नसल्याने नेहमी नेहमी भाषांतर करून त्याला सांगावं लागायचं. भाषेचा मोठा अडसर ठरू लागला. संवाद कमी अन नाट्यशास्त्राचा अभ्यास जास्त होऊ लागला.

चार दिवसांत पुरता सुकून गेला बिचारा. इथे Theory मांडताना अन practical करताना किती त्रास होतो याचा अनुभव त्याने घेतला. भाषा कुठलीही असो, ती संवाद पूर्ण करण्यासाठी, एकमेकांचं बोलणं समजावून घेण्यासाठी असते हा महत्वाचा भाग. मग मी माझीच भाषा धरून बसणार आणि तो त्याचीच भाषा धरून बसणार असं झालं तर व्यवहारच काय तर साधा संवादही होणार नाही. भारतासारख्या देशात भाषेच्या बाबतीत कितपत अट्टाहास अन किती लवचिकता बाळगली पाहिजे याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. धोरणकर्ते एकंदरीत स्वार्थासाठी भाषा लादतात, मूर्ख आहेत आणि आपल्यालाच आपल्या मात्राभाषेची अधिक काळजी आहे असा त्याचा गैरसमज कमी झाला असावा.

भारतात इतकी राज्य आहेत अन त्यांच्या इतक्या भाषा आहेत की सामान्य माणसाला त्या सर्व भाषा किमान कामापुरता शिकायच्या म्हंटलं तरी ते शक्य नाही. पर्यटन करण्यासाठी जर मी देशातील प्रत्येक राज्यात जाणार असेल तर चार-सहा दिवसांच्या कामासाठी मी ती स्थानिक भाषा शिकणे अपेक्षित आहे का? हे सर्वथा अशक्य आहे. पण मी जर नोकरी किंवा इतर कामानिमित्त जर कायमचा किंवा जास्त काळासाठी तिथे राहणार असेल तर मला ती स्थानिक भाषा शिकणे सोयिस्कर आहे. ही गरज बघूनच कदाचित धोरणकर्त्यानी एखादी संवाद भाषा असावी अशी मागणी केली असावी किंवा तशी सोय असावी असं त्यांना वाटलं असावं. पण हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही नाही नाही हे अनेकदा सांगावं लागतं आणि ती केवळ संवाद करण्यासाठीची भाषा आहे असं मला वाटतं.

आता महत्वाचा मुद्दा हा की हिंदीच का? इतर भाषा काय वाईट आहेत का? तर नाही. हिन्दी ही भाषा देशातील बहुसंख्य लोक किमान बोलू व समजू शकतात. ती सर्वांना लिहिता यावी, वाचता यावी अशी अपेक्षाही नाही. याचा अर्थ असा नाही की हिन्दी ही राष्ट्रभाषा असावी. पण उत्तरेतील राज्ये, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, ओरिसा, बंगाल इत्यादी राज्यांत ज्या भाषा आहेत त्यात अन हिंदीत काही सारखे शब्द आहेत. [या भाषांचा उगम कसा व कोठून आहे याचा “अभ्यास” नाही हेही स्पष्ट करू इच्छितो.] म्हणजे तेथील लोक किमान तोडक्या-मोडक्या पद्धतीने ह्या भाषेत संवाद साधू शकतात.

उद्या जर एखादा तामिळ माणूस तामिळ भाषेत बोलत महाराष्ट्रात दारोदारी त्याचं उत्पादन विकू लागला तर त्याला कोणी दारातही उभं करणार नाही. कारण तो काय बोलतोय यातील एकही शब्द कोणाला समजणार नाही. पण तोच एखादा गुजराती तुटक हिन्दी+गुजराती भाषेत जर काही सांगू लागला तर किमान चार-सहा ओळखीचे शब्द ऐकून त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेता येईल. असही आपल्याकडील लोकं सेल्समन दिसला की स्वत:हून “केवडेको दिया, क्या लाया” करत हिन्दीतूनच बोलतात. ती भाषा त्यांनी कुठेतरी चित्रपट किंवा इकडे-तिकडे ऐकलेली असते. अशिक्षित असले तरीही.

इथे कोण कोणावर आपली भाषा लादत नव्हता. गरज असल्याने दोन्हीही बाजूंनी तडजोडी होऊन एका सामायिक भाषेद्वारे संवाद पूर्ण केला गेला.

भाषिक अस्मितेत एक मुद्दा खूप महत्वाचा असतो, तो म्हणजे भाषा लादणे! हा खूप भयंकर प्रकार आहे. भाषा म्हणजे संस्कृती अशी ओळख असलेल्या देशात भाषा लादली जाणे खूप धोकादायक आहे. कारण भाषेच्या आडून संस्कृती व प्रादेशिक अस्मिता संपवण्याचा प्रयत्न देश तोडण्याचे काम करेल. [[भाषावार प्रांतरचना होत असताना देश कोणत्या स्थितीतून गेला असेल याची कल्पना आजच्या (म्हणजे माझ्या) पिढीला नसावी. फाळणीनंतरची फाळणी टळली हे त्याकाळातील राजकीय नेतृत्वाचं तात्कालिक यश म्हणावं लागेल.]]

तत्कालीन व आजच्या परिस्थितीला राजकीय पदर आहेत जे ह्या लेखाचा भाग नाहीत. सध्या सत्तेत असलेला भाजपसारखा पक्ष, ज्याला उत्तर भारतातील पक्ष म्हंटलं जायचं, हिन्दी भाषा इतर राज्यांवर लादत आहे असा आरोप होत असतो ज्यात काही अंशी तथ्य आहे. कारण ते त्यांच्या राजकीय सोयीचं आहे. पण ह्या पक्षाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे गुजराती अस्मिता व भाषा याबाबतीत किती कट्टर आहेत हे माहिती असताना ते हिंदीचा आग्रह का धरतील असा प्रश्नही समोर येऊ शकतो. भाजपबद्दल असलेली नाराजी हिन्दीचा दुस्वास करण्यासाठी कारणीभूत आहे का? याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कारण बरीच मंडळी भाषिक अस्मितेच्या मुद्दयाकडे राजकीय चष्म्यातून बघत असतात.

हिन्दीतून शिक्षण, हिन्दीची ओळख होणे आणि लादणे यात फरक आहे. हल्ली इंग्रजी जशी बालवाडीपासून शिकवली जाते तसं हिन्दी पाचवीपासून शिकवतात. त्याचं कारण इतकच की त्या भाषेची थोडीफार ओळख व्हावी. नंतर तो विषय ऐच्छिक असतो. दूसरा भाग म्हणजे केंद्रीय सरकारी कार्यालयात, बँकांत हिन्दीचा वापर. तेथे स्थानिक भाषेला प्राधान्य असायलाच हवं याच्याशी सहमत. पण त्यानंतर हिन्दी असायला हरकत नाही. म्हणजे प्रामुख्याने मराठी आणि पर्याय म्हणून हिन्दी. त्यानिमित्ताने हिन्दीतील चार शब्द समजून ते उपयोगी पडतील अशी अपेक्षा असते. गेली अनेक दशके ह्या हिन्दी पाट्या बँका व कार्यालयात वगैरे आहेत, पण असा एकही माणूस नसेल की जो ह्या पाट्या वगैरे वाचून हिन्दीकडे आकर्षित होऊन त्याने आपली भाषा सोडून दिली असेल. हे अशक्य आहे. ते ‘हम हिन्दी भाषा उपयोग का स्वागत करते है|’ अशा पाट्या असल्या तरी तेथील कर्मचारीसुद्धा ती भाषा फार वापरत नाही. लाया क्या, भेजा क्या यापुढे त्या भाषेचा उपयोग होत नाही. पण महाराष्ट्राच्या कार्यक्रमात हिन्दीचा वापर हा निव्वळ मूर्खपणा आहे हेही सत्य.

ह्या लेखाचा भाग नसला तरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, आज दैनंदिन वापरत असलेले मराठी शब्द विविध भाषेतून आलेले आहेत. अजाणतेपणी आपण ते सर्रास वापरतो. जे सोपे होते ते अंगिकारले. जसे संस्कृतमधील शब्द इंग्रजीने घेतले तसे. ह्या नियमानुसार हिन्दीचे चार शब्द मराठीत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण हिन्दी भाषेने इतर भाषेवर अतिक्रमण केलं असं त्यामुळे म्हणता येणार नाही. आज वापरत असलेल्या सर्वच भाषेत हे आढळून येईल.

एक साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटांची! महाराष्ट्र हे मराठी राज्य असूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पहिल्यापासून हिन्दी चित्रपट बघितले जातात, गाणी ऐकले जातात. पण असं का? कोणी मराठी माणसावर ते बघण्या-ऐकण्यासाठी जबरदस्ती केली होती का? का पैसे देत होते? याला लादणे म्हणतात का? हिन्दी भाषा समजलीच कशी? महाराष्ट्रात उद्या तामिळ, कानडी भाषेतील दर्जेदार चित्रपट आणून लावा, किंवा हिंदीतीलच दर्जेदार चित्रपट कानडी, तेलगू भाषेत लावा.. बघूयात किती लोकं ती बघायला तयार असतात ते… आपण मराठी चित्रपटही आवर्जून बघत नाहीत तो भाग तर वेगळाच अजून!

पण याला काही कारण आहेत. मराठी व हिन्दी भाषेत असे अनेक सारखे शब्द आहेत. मग गुजराती, राजस्थानी, बंगाली वगैरे भाषा अन हिन्दी यात काहीतरी साम्य आहे जेणेकरून हिन्दी ही सर्वांना किमान समजता येईल अशी भाषा बनु शकते असं वाटतं. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणणे हे हिन्दी लोकांचं आपल्या भाषेवरील प्रेम असेल अन हिन्दीला राष्ट्रभाषा बनवणे हे हिन्दी नेत्यांचं स्वार्थी राजकारण असेल. उद्या मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा जर कोणी देत असेल तर कोण मराठी माणूस त्याला विरोध करेल? आपआपल्या भाषेवर प्रत्येकाचं प्रेम असतं. भाषेच्या आडून राजकारण केलं जात असेल तर त्याला राजकीय प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे, पण सामान्य माणसाने एकमेकांच्या भाषेला कमी लेखणे किंवा द्वेष करणे हा अतिरेक आहे.

उद्या जर मराठी, तमिळ, तेलगू किंवा इतर प्रादेशिक भाषा संवाद भाषा म्हणून स्वीकार करून तिचा प्रसार करायचा निर्णय सरकारने घेतला तर आनंदच आहे, पण ती भाषा त्या-त्या राज्याच्या बाहेर किमान समजता येईल का हे बघावं लागेल.

मी मागेही म्हंटलं होतं की, जिथे रोजगार व पोटापाण्याचे मूलभूत प्रश्न बर्‍यापैकी सुटलेले असतात तिथे भाषिक अस्मितेचे मुद्दे प्रामुख्याने उचलले जातात. हे मी आजच्या काळातील बोलत आहे. अर्थात मुंबई-ठाणे पट्टा त्याला अपवाद आहे, कारण मुंबईत मराठी भाषा अस्तित्वाचा प्रश्न आहे. मराठी संस्कृतीची छाप मुंबईवर असणे यासाठी कट्टर आणि कट्टर मराठीचा मुद्दा रेटून किंवा लादून पुढे न्यायला काहीच हरकत नाही. मुंबईत भाषाप्रेम हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर मुंबईतून मराठी भाषा व संस्कृती नामशेष होण्याची भीती आहे. पण इतरत्र तसं नाही. सध्या मी फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय.

उर्वरित महाराष्ट्रात भाषिक अस्मितेचा मुद्दा फोल ठरतो. कारण जिथे रोजगाराचे, शेतीचे, अगदी पाण्याचे प्रश्नही सुटलेले नाहीत तिथे मराठीचा आग्रह आणि मराठी भाषा वाढीसाठी प्रयत्न हे म्हणजे दुष्काळपट्ट्यात LED TV विकण्यासारखी गोष्ट होईल. कारण ह्या माणसाला आपल्या मूलभूत गरजेपुढे ते बाकीचे प्रश्न अक्षरशः गौण वाटतील. मुळात ग्रामीण भागातच मराठी भाषा व संस्कृती अजूनही टिकून आहे हे सांगावं लागेल. शहरीकरण, आधुनिकीकरण किंवा जागतिकीकरण असं काहीही नाव द्या, पण मोठी शहरं आपली संस्कृती व भाषा व पर्यायाने आपली ओळख हरवून बसत आहेत हे सत्य आहे. मग तेथे असलेल्या लोकांना अचानक मराठी भाषा व संस्कृतीचा मुद्दा मोठा वाटू लागतो; परदेशात मराठी भाषा प्रतिष्ठान वगैरे असतात तसे. कारण मराठीचा वापर कमी झालेलं त्यांना आढळून येतं. मराठीवर हिन्दीपेक्षा इंग्रजीचं आक्रमण जास्त झालेलं असतं.

              आपल्याकडील अनेक भाषाप्रेमींना तामिळनाडूचं असलेलं कट्टर भाषाप्रेम वगैरे बद्दल मोठं कौतुक असतं. तामिळनाडूकडे बघून त्यांना मराठी समाजाला अन महाराष्ट्राला भाषेची प्रयोगशाळा करायची तीव्र इच्छा होऊ लागते. जेंव्हा-जेंव्हा ‘भाषा’ यावर चर्चा होते तेंव्हा-तेंव्हा तामिळनाडूचं उदाहरण दिलच जातं. पण तो किती शतकांचा संघर्ष आहे व त्याची पाळेमुळे कुठे आहेत हेही आपल्याला ठाऊक नसतं. अगदी आर्य व द्रविड इथपासूनचा तो संघर्ष आहे. कधी-कधी तो डीएनए वरही जाऊन पोचतो. आधी संस्कृती, आचरण व धर्म येथून सुरू झालेला तो मुद्दा भाषेवर पोचला. भाषावार प्रांतरचना हा अध्यायही तेथेच सुरू होतो. एका गांधीवादी तेलगू नेत्याच्या बलिदानाने (56 दिवस उपोषण) भाषावार प्रांतरचना प्रकर्षाने समोर आल्याचा इतिहास आहे. हा अनेक वर्षांचा कटू संघर्ष आहे जो तामिळनाडूला स्वतःची ओळख देऊन जातो. सारखं तामिळनाडूचं उदाहरण महाराष्ट्रासमोर मांडून काय उपयोग? आपली संस्कृती, आपलं आचरण अन स्वभाव वेगळा आहे हे कधी लक्षात येणार? महाराष्ट्र हा उत्तर भारत व दक्षिण भारताच्या मध्ये असलेला प्रदेश आहे. उलट, ही अनेक वर्षांपासूनची संस्कृती इतक्या संक्रमणानंतरही कशी टिकून आहे याचा खरं अभ्यास केला पाहिजे.

Related image

कुठलही राज्य हिन्दीला आपली राज्यभाषा/राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारायला तयार नाही (अगदी गुजरातही) आणि त्याची गरजही नाही. प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध आहे. ते लादणे वगैरे म्हणजे नुसता पोरखेळ आहे. त्याने काहीही हासिल होत नाही.

तसं पाहता मराठी भाषेतही अनेक मराठी भाषा आहेत. पुण्याची मराठी, मुंबईची मराठी, कोकणची मराठी, घाटी मराठी, वर्‍हाडी मराठी, अहिराणी अशा विविध बोली भाषा आहेत. पण आपण एकच मराठी का वापरतो? कागदोपत्री सर्व व्यवहार त्या मान्यताप्राप्त मराठीतच का? कोकणच्या लोकांना त्यांची मराठी नको का? का एकच मराठी सर्वांवर लादायची? हे असे प्रश्न उभे राहू शकतील का…? असो.

आता महत्वाचा मुद्दा. इंग्रजीचा! ज्या भाषेच्या अतिक्रमणामुळे भारतीय भाषा अपंग बनत आहे ती भाषा. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित व विविध भाषा-संस्कृतीचा गाढा अभ्यास असलेले भालचंद्र नेमाडे म्हणतात, इंग्रजी शाळांच्या जागी मुतार्‍या बांधायला पाहिजेत! ह्या वाक्याकडे कोणताही मराठीप्रेमी, राजकरणी, समाजकारणी गांभीर्याने बघताना दिसत नाही. कारण इंग्रजी ही ज्ञानाची भाषा, प्रगतिची भाषा अशा अंधश्रद्धेत तो वावरत असतो. इंग्रजीला विरोध केला तर आपले तथाकथित आधुनिक विचारांचे मुखवटे गळून पडतील अशी भीती त्यांना वाटते. कारण भारतीय भाषांचा अट्टहास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही हिंदुत्ववादी संघटनेंचा मुद्दा असल्याने तो आग्रह तथाकथित आधुनिक विचारांची मंडळी ते करू शकत नाहीत. असो. या सगळ्यामुळेच, इंग्रजीला डोक्यावर चढवून ठेवल्याने मराठीची किती गळचेपी होत आहे याचा विचार कोण करत नाही. ही निव्वळ मानसिक गुलामगिरी आहे.

नवीन पिढी बालपणापासून इंग्रजी शिकत आहे. म्हणजे त्यांना शिकवली जात आहे. हळूहळू इंग्रजी हीच त्यांची संवाद भाषा बनत आहे. एका मराठी वाक्यात इंग्रजी शब्द ही संकल्पना जाऊन पूर्णतः इंग्रजी वाक्यात संवाद ही परिस्थिती समोर आहे. यामुळे ही पिढी मराठी साहित्य व संस्कारापासून तुटत आहे याची जाणीव कोणालाही नाही.

इंग्रजीने मराठीची जागा घेतली तरी कोणालाही फरक पडताना दिसत नाही. इंग्रजी वाचता, लिहिता, बोलता येणे उत्तमच, पण संवाद इंग्रजीतून ?? ही धोक्याची घंटा नाही का? 125 कोटी भारतीयांपैकी असे किती लोक परदेशात जाणार आहे की त्यांनी इंग्रजी भाषा शिकावी? गरजेपुरता, माहिती मिळवण्याकरिता इंग्रजी आली तरी खूप आहे, पण हल्ली असं बिंबवलं जात आहे जणू इंग्रजी येत नाही म्हणजे ज्ञान-माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अपात्र आहात. हा काय मूर्खपणा आहे. छोट्या शहरात व गावोगावी इंग्रजी शाळा उघडल्या आहेत. पहिलीपासून इंग्रजी शिकवलं जात आहे. यामुळे इंग्रजी ही नवीन पिढीची बोली भाषा व विचार करण्याची भाषा होत आहे. माहिती मिळवण्यासाठी इंग्रजी पुरेशी असताना इंग्रजीचा इतका अट्टहास का? भारतात किंवा महाराष्ट्रात दोन भारतीयांनी इंग्रजीत संवाद का साधावा? भारतीय म्हणून आपली एक संवाद भाषा असू नये का? पूर्वी संस्कृत न येणार्‍याला ज्ञान मिळवता येणार नाही (असं म्हणतात, मला माहीत नाही) तसंच सध्या इंग्रजीच्या बाबतीत होत आहे. कामापुरती इंग्रजी ठीक आहे, पण इंग्रजीतून संवाद हे धोकादायक आहे. कारण भाषेसोबत संस्कृतीही येते; हळूहळू ते चित्र आपल्याला दिसत आहे. इंग्रजी हीच मराठी व इतर भाषांना धोका आहे असं माझं ठाम मत आहे.

इंग्रजी आल्याने कोणीही ज्ञानी किंवा अधिक जाणकार होत नाही हे ठासून सांगितलं पाहिजे. म्हणजे स्वतःला ज्ञानी सिद्ध करण्यासाठी इंग्रजी येणं इतकाच निकष त्यांना पुरेसा वाटतो. पण बुद्धिजीवी लोकांचा एक अहंगड किंवा न्युनगंड असतो; आपण चार पुस्तके वाचली, तीही इंग्रजीतून, आपण माहिती मिळवली याचा अर्थ आपण जास्त जाणते झालो असा त्यांचा समज असतो. मग आपल्यापेक्षा कमी शिकलेला एखादा भाजीवाला, शेतकरी किंवा अगदी पानपट्टिवाला आपल्यापेक्षा चांगला विचार करूच शकत नाही असं त्यांना वाटत असतं. कारण आपले मुद्दे योग्य शब्दांत, इंग्रजीत, उदाहरणसहित मांडल्याने आपण अधिक विचारवंत आहोत अशी त्यांची समजूत असते. असो. तो मुद्दा वेगळा!

मुळात, आपण कसे मराठीचे मोठे सेवेकरी व पुरस्कर्ते हे दाखवून देण्यासाठी हिन्दी व इतर भाषांवर टिप्पणी केली जाते. कारण समोर शत्रू आहे असं दाखवल्याशिवाय इकडच्या फौजेचं नेतृत्व करायची संधी मिळत नसते. त्यासाठी हिन्दीला शत्रू दाखवलं जातं. त्याला राजकीय कारणं असू शकतात. पण इंग्रजीलाही तोच न्याय लावताना कोणी दिसत नाही. कारण आयचा घो पेक्षा what the fuck हे सभ्यतेच्या चौकटीत बसवून घेतलं असल्याने आपल्याला इंग्रजी ही खूपच अत्याधुनिक व नम्र वाटते. काही शब्द व वाक्य मराठीऐवेजी इंग्रजीत बोलल्याने तुमची वेगळी प्रतिमा तयार होत असेल तर अशा भाषेच्या चौकटी निरर्थक आहेत.

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे भाषिक अस्मितांचा सुळसुळाट. भाषेचा मुद्दा कितपत कट्टरपणे आणि केंव्हा लवचिकपणे हाताळला पाहिजे हे समजलं पाहिजे. त्यासाठी तितका अनुभव असायला हवा आणि समाजातील प्रतिक्रियांचा, परिणामांचा विचार करता येण्याइतपत प्रगल्भता असावी लागते. निव्वळ पुस्तकातील माहिती उथळपणे मांडत राहणे काही कामाचं नाही. त्याने गर्दी जमा होईल पण एका पातळीनंतर ते सगळं निरर्थक ठरेल.

टीप:- कसलाही खुलासा नाही…. आपआपल्या बौद्धिक कुवतीनुसार अर्थ काढण्यास आपण मोकळे आहात…  

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

 

रुचा

रुचा

मराठी कथा  || स्वलेखन  || Marathi Stories  || लघुकथा  ||  साहित्य  || लिखाण  || मोबाइल जग / आभासी जग ||

 

रुचा सोफ्यावर पडून आपल्या मोबाइलवर काहीतरी करत होती. तिच्या चेहर्‍यावर पडणार्‍या मोबाइलच्या प्रकाशामुळे तिचे डोळे चमकत होते. ती एकटक त्यात काहीतरी बघत होती. कानात हेडफोन घुसवलेले होतेच. ती आपली मस्त गाणी ऐकत मोबाईलवर ट्विटर बघत बसलेली असते.

घरात सगळीकडे कामाची लगबग चालू असते. आई, बाबा, आजी, आजोबा सगळेजण काहीतरी काम करण्यात गुंग असतात. सगळे खूप घाईत, गडबडीत अन व्यस्त आहेत. सगळ्यांना काम कसं पूर्ण करावं याचे हिशोब पडले आहेत. त्यात सगळे एकमेकांनाच ऑर्डर सोडत असतात.

इतकं सगळं चालू असतं ते कशासाठी?

कामाचा ताण कितीही असला तरी सगळ्यांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत आहे. त्यांना कुठल्यातरी गोष्टीचा आनंद अन समाधान होतं. प्रत्येकजण आपलं काम कसं चोख पूर्ण होईल याचाच विचार ते करत आहेत.

पाहुणे?

पाहुणे म्हणजे, सगळ्यांच्या घरात येणारे, सगळ्यांचे लाडके… गणपती बाप्पा अन गौरी माता! गौरी-गणपतीचा सण!

गेली दोन महीने रुचाला तिचे बाबा बजावून सांगत होते की काहीही झालं तरी यंदाच्या गौरी-गणपती सणाला तू आलंच पाहिजेस. रुचा परदेशात नोकरी करणारी तरुणी. जर्मनी! गेली दीड वर्षे ती तिथेच काम करत आहे. ती ह्या घरातील एकुलती एक! तिला ना भाऊ ना बहीण. त्यामुळे सगळ्यांची लाडकी. गेली अनेक वर्षे ती शिक्षण अन नोकरीसाठी आपल्या घरापासून-गावापासुन दूर राहिलेली. त्यामुळे तिला घरातील कुठल्याच गोष्टींशी फार जवळचा संबंध आला नाही. लहानपण अभ्यास अन लाडात गेलं आणि मोठेपण गावाबाहेर शिक्षण अन नौकरीसाठी. तिच्या घरच्यांनीही तिला कधीच कसल्या बंधनात अडकून टाकलं नाही. मुलगी अन मुलगा असा भेद तिथे कधी रूजलाच नाही. तिला तिच्या आयुष्यात तिला हवं ते करण्याची मुभा दिली होती. आणि तिनेही सगळीकडे यश मिळवत घरच्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

पण आज तिची तिशी जवळ आली होती. घराण्याला वारस नाही याचं दुखं असण्यापेक्षा आपली परंपरा, संस्कृती खुंटुन बसेल याची घरच्यांना रुखरुख वाटत होती. पैसा-संपत्ती तर कोणच नेत नाही, पण जाताना एक संस्कृती-परंपरा मागे असावी यासाठी धडपड असतेच.

त्यासाठीच तिच्या बाबांनी-आजोबांनी तिला सणवार करायला आपल्या गावी येण्यासाठी गळ घातली होती. जेणेकरून घरातील संस्कार-रिती तिला माहीत होतील. ते पाळावेत अशी बंधने तिच्यावर लादायची नसली तरी ते तिला माहीत असावेत, त्याच्याशी ती समरूप व्हावी एवढीच त्यांची इच्छा असे. घराण्याचे जे काही रिती-रिवाज होते ते आठवणीत तरी अस्तीत्वात असावेत म्हणून त्यांची ही धडपड होती. आपल्या मुळाशी नातं तुटू नये, मूळ संस्कृतीशी नाळ तुटू नये यासाठी त्यांचा हा आटापिटा होता. त्यासाठी ते तिला नेहमी घरी-गावाकडे यायला सांगत.

रुचा तशी मित्र-मैत्रिणी यांच्यात रमणारी मुलगी. तिला गावाकडे आल्यावर फार कंटाळा यायचा. तिला सतत आपल्या मित्रांच्या संपर्कात राहायची सवय होती. गावात करमणुकीची फार साधने नव्हती. घरात कोण समवयीनही नसल्याने तिला गुदमरून यायचं. मग ती गावाकडे आल्यावर आपल्या जिवलग मित्रांशी फेसबूक, फोन, ट्वीटर वगैरेच्या माध्यमातून सतत संपर्कात असायची. त्याशिवाय तिला करमत नसे. तिचा दिवस यातच जात असे. यातच तिचे सुट्टीचे दिवस यातच निघून जात. हे तिचं दुसरं जग होतं, जे तिला अतिशय प्रिय होतं. त्यामुळे विविध माध्यमातून ती आपल्या दुसर्‍या जगाशी संपर्कात राहायची.

घरच्या मंडळींना वाटायचं की लेकरू कित्ती दिवसांनी घरी आलं आहे, त्याने आपल्याशी बोलावं, गप्पा कराव्यात, मदत करावी, घरातील कारभारात लक्ष घालावं, इकडे-तिकडे फिरावं आणि बरच काही अशा अपेक्षा होत्या. पण ह्या अपेक्षा ती काही पूर्ण करू शकत नव्हती.

तिला घरच्यांशी काय बोलावं, कुठल्या विषयावर बोलावं हा मोठा प्रश्न पडायचा. त्यामुळे काय जेवणार? कधी झोपणार? वगैरे प्रश्नोत्तरे एवढाच काय तो संवाद असायचा. तिचा असा स्वभाव कधीकधी तुसडेपणाची जाणीव करून देत, पण दोन वेगळ्या जीवनशैलीत ती अडकली आहे याची तिच्या घरच्यांना जाणीव होती. त्यामुळे प्रत्येकवेळ ती आपल्या virtual अर्थात इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही माध्यमातून दुसर्‍याच जगात वावरत असायची.

तशी रुचा चांगली मुलगी. घरच्यांना उलटून बोलणे, दुखावणे वगैरे असंस्कृत लक्षणे तिच्यात नव्हती. उलट ती सगळ्यांचा आदर करायची, सगळ्यांबद्दल तिच्या मनात प्रेम होतंच. घरचे सगळे तिला अतिशय प्रिय होते. किंबहुना, बाहेरून येताना ती नेहमी घरच्यासाठी आठवणीने त्यांच्या आवडीच्या-उपयोगाच्या वस्तु घेऊन यायची. आपल्या आजोबांसाठी तर नेहमी न विसरता सिगरेट पाइप आणायची. पण इतकी वर्षे बाहेर राहिल्याने तिच्या वागण्यात, सवयीत जरा तुटकपणा आला होता. झाड खूप उंच झाल्याने त्याच्या मुळातील अन शेंड्यातील अंतर पडतं तसं काहीतरी झालं होतं.

तिच्या बाहेरच्या अन ह्या जगात खूप अंतर होतं. ती रोज जिथे राहायची, वावरायची तिथून अशा ठिकाणी आल्यावर तिच्यात एक स्थित्यंतर यायचं; तिच्याही नकळत.

आजोबांच्या चेहर्‍यावरील वाढत्या सुरकत्या, बाबांचे हळूहळू पांढरे होत चाललेले केस यातील फरक तिला लवकर जाणवायचा नाही. तिला दुसर्‍या जगाची, बाहेरच्या जगाची, ज्यात ती रोज राहते त्याची जास्त ओढ होती, कारण तेच जग तिचं वर्तमान अन भविष्य. कुटुंबातील जगाच्या केवळ गोड आठवणी राहणार हा वास्तविक विचार तिच्या मनाला पटलेला होता. हे गावाकडचं जग तिला मागासलेलं अन मुख्य म्हणजे कंटाळवाणी वाटायचं. त्यामुळे ती येथे येण्यास टाळाटाळ करत.

घरात गौरी आगमनाची जय्यत तयारी चालू होती. सगळे राबत होते आणि रुचा सोफ्यावर पडलेली होती. तिला कशाशीच काही देणं-घेणं नव्हतं. पण घरचे सांगतील ते छोटी-मोठी कामे ती बिनबोभाट करायची.

आजोबा आजीला ओरडत होते, सकाळपासून काय ते वातींचं घेऊन बसलीस, जरा मदत कर मला. बाबा तर लांब-लांब उड्या मारत काम करत होते.

ही सगळी गडबड चालू असताना अचानक मोठा पाऊस पडू लागला. सोसाट्याचा वारा सुटला. रुचाला याची चाहूल लागताच ती जागेवरून उठली अन घराच्या बाहेर येऊन सगळा नजारा बघू लागली. बघता-बघता काळेकुट्ट ढग सगळीकडे पसरले अन जणू तूफान आलं. ती थोडीशी घाबरून आत आली आणि घराच्या खिडकीतून ते सगळं पाहू लागली. तितक्यात प्रचंड वीज चमकली. भली मोठी. काही क्षण त्याचा प्रकाश सगळीकडे पसरून नाहीसा झाला. रुचाने ते पाहिलं अन आता भला-मोठा गर्जनेचा आवाज येणार म्हणून तिने डोळे बारीक केले अन खांदे कानाला टेकवले.

धडाम… वीज पडल्याचा आवाज आला. काही क्षणात लाइट गेली. आभाळ इतकं काळं अन दाटून होतं की दुपारीही रात्र झाल्याप्रमाणे वाटत होतं. सगळं बंद झालं. अख्ख्या शहराची लाइट गेली. सगळीकडे पावसाचं राज्य होतं.

तीन तास झाले लाइट जाऊन. सगळा संपर्क तुटला होता. लाइट तर बंद होतेच पण लँडलाइन फोन, मोबाइल नेटवर्क वगैरे सगळे बंद पडले. कोणीतरी बातमी आणली की, खूप मोठं वादळ झालं आणि आजूबाजूला खूप नुकसान झालं. मोबाइल टावर अन लाइट चे transformer उन्मळून पडले अन जळाले वगैरे. दोन-तीन दिवस हे सुरळीत होईल असं वाटत नाही असं तो म्हणाला.

लाइट गेल्यावर झोपेचं सोंग घेतलेल्या रुचाने हे ऐकलं अन तिचे त्राण निघून गेले. आता दोन दिवस असं अश्मयुगात वावरल्याप्रमाणे राहावं लागणार ह्या कल्पनेने तिच्या अंगावर काटा आला. काही वेळात मोबाइल अन लॅपटॉपची बॅटरी संपली. जसा-जसा वेळ वाढत चालला तसा-तसा रुचाचा सय्यम सुटत होता. गेली आठ तास ती आपल्या दुसर्‍या जगाशी संपर्क साधूच शकत नव्हती. तिला हे घर एक भयाण बेट वाटत होतं.

ती अस्वस्थ व्हायला लागली. तिला काही सुधारेना! ती सतत आपला बंद पडलेला मोबाइल बघू लागली. मनात हजार विचार येत होते. बोटे सळसळत होती. एका जागेवर पडून-पडून तिला अजूनच असहाय वाटायला लागलं. काहीतरी करावं असं तिला वाटत होतं. मन उडत होतं, सैरावैरा पळत होतं. त्याला कुठेतरी गुंतवायला पाहिजे होतं.

रुचाच्या आजोबाला हा प्रकार ध्यानात आला. त्यांनी खडे फेकायला सुरुवात केली. घरात मेणबत्त्या, कंदील वगैरे लावून कामे सावकाश-शांतपणे चालू होती. बाहेर पावसाची बॅटिंग मात्र जोरात चालू होती.

आजोबा अगदी थकून-भागून आले अन रुचाचा बाजूला येऊन बसले.

रुचाने विचारलं, “काय झालं आजोबा?”

आजोबांनी पाणी वगैरे मागितलं. निष्क्रिय बसलेल्या रुचाने तत्परतेने आणून दिलं.

आजोबा म्हणाले, रुचा बाळा जरा काम करशील?

ती कुठेतरी मन अडकवून घ्यायला तयारच होती. कारण एकटेपणा तिला खात होता. त्यात घरातले सगळे कामात असल्याने तिच्याशी कोण बोलेना. मग आजोबा म्हणाले, अंधारात मला अन तुझ्या आजीला काही दिसत नाही. उगाच धडपडू कुठेतरी. आमची कामे तुला करावी लागतील? करशील??

पलीकडे बसलेल्या आजीला आजोबांचा खेळ समजला होता. रुचा सुरूवातीला थबकली. तिला वाटलं, आता वाती वळणं, साफसफाई, पडदे लावणं, डेकोरेशन अशी अफाट कामे करायची? आपल्याला झेपेल का? पण भयाण एकांतापेक्षा अन अस्वस्थतेपेक्षा तिला ती खूप सोपी वाटली. एकटं बसून काय करायचं. जर सोबतीला मोबाइल, लॅपटॉप, गेम्स, इंटरनेट, whatsapp, ट्वीटर वगैरे मित्र नसतील तर आपण वेडे होऊ अशी तिची ठाम समजूत झाली होती. म्हणून तिने स्वतःला कामात जुंपून घेतलं. अशीही ही संधी समोरून चालत आली होती आणि ती एकप्रकारची मदत अन कर्तव्य होतं. ती एका झटक्यात कामाला लागली.

Social Media, Interaction, Abstract, Lines, Head Woman

रुचा अगदी सगळ्या प्रकारची कामे करू लागली. मग गौरीला अलंकार घालताना समजलं की किती सुंदर दागिने आहेत घरात. मी कधी पाहिलेच नाहीत. कंदिलाच्या प्रकाशात तर ते अजूनच शोभून दिसत होते.

मग तिने आजीला आपोआप पण मनापासून प्रश्न विचारायला सुरुवात केली की, हे दागिने कधीचे? याला काय म्हणतात? आज हीच साडी, हाच नैवेद्य का? यात काय असतं?

लहानपणी कधीतरी केलेल्या गप्पा-गोष्टी अन कामे तिला डोळ्यासमोर दिसत होती. स्मृतीतील एक दरवाजा उघडल्या गेला होता. काळाच्या अन कामाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या स्मृती अलगद कळी उमलावी तशा उमलत होत्या. गेली कित्येक वर्षे आपण ह्या मजा अनुभवल्या नाहीत याचं तिला दुखं वाटत होतं. लहानपणी तर ती हे जादुई जीवन जगताना  वेडी होत असे. हे एक event organize केल्याप्रमाणेच आहे याचं वास्तविक भान तिला आलं.

आजोबाला तर नाना प्रश्न विचारत सुटली. हे कशासाठी? ते तसं का? हे कुठे ठेवलं आहे? मागच्यावर्षी काय होतं?

अलीकडच्या काळात तिने हे सगळं फक्त लांबून पाहिलेलं होतं. त्यातील उत्साह तिला कधीच जाणवला नव्हता. ती त्याच्यात कधीच समरस झाली नव्हती. पण आज तिचं मन बहरत होतं. तिला तिच्या दुसर्‍या, virtual जगाची आठवण येतच नव्हती. काही क्षणांसाठी तिचे रोजचे साथीदार इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही सगळे हरवले होते. मन मनोरंजन करण्याची इतर साधने तिला भेटली होती.

ह्या जुन्याच पण हरवलेल्या जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे तिला जाणून घ्यायची होती. इथल्या जगातील मजा तिला खुणावत होत्या. आणि आजी-आजोबा तिला त्या उत्तरांध्ये अजूनच गुंतवून ठेवत होते. मग तिला अगदी प्राचीन काळातल्या अध्यात्म अन इतिहासाच्या गोष्टी समजल्या. घराचे रितीरिवाज समजले. अगदी सहज. बोलता-बोलता. मग त्या अध्यात्मामागे नेमकं विज्ञान कसं दडलं आहे याचा विचार ती करू लागली. तर्क लाऊ लागली. स्वतःचं ज्ञान अन पूर्वीचे समज यात ताळमेळ साधत ती मग्न झाली. आईला स्वयपाकात मदत करताना तिला समजलं की आपली आई तर एखाद्या ‘कुक’ पेक्षा जास्त प्रकारचे पदार्थ बनवू शकते. अगदी सोळा प्रकारच्या भाज्या अन अष्टपक्वान्न, तेही एका ताटात, एका देवीसाठी! हे तर एमबीए करून कंपनी चालवल्यापेक्षाही अवघड आहे. ती जवळच असलेल्या पण हरवलेल्या जगाच्या सताड उघड्या दरवाजातून आत आली.

फक्त छत्तीस तास! ते छत्तीस तास रुचाच्या आयुष्याला अन विचारसरणीला कलाटणी देणारे ठरले. जेंव्हा लाइट आली तेंव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या घरच्यांना आपल्यापेक्षाही जास्त ज्ञान आहे. ते कुठल्याही क्षेत्रातील असो, पण ते ज्ञानच आहे. ते माझ्याकडे किंचितही नाही जे त्यांच्याकडे भरभरून आहे. मी आजवर फेसबूक, गूगल वर अनेक नवनव्या गोष्टी वाचत होते, पण माझ्या आजीकडे तर त्याहूनही भन्नाट अन विलक्षण गोष्टी आहेत. आजोबा तर ग्रेट माणूस! जसे ट्वीटर वगैरे share करून connect करायची माध्यमे आहेत तसे आजोबाही एक प्रकारचे ‘social media’च आहेत. जुन्या काळातील संदर्भ, ज्ञान, परंपरा ह्या नवीन पिढीपर्यंत share करायची त्यांची मोठी जबाबदारी आहे. आम्हाला share केल्यावर आम्ही ते like करायचं का नाही ते आमच्यावर, पण आजोबांना त्यांचं कर्तव्य करावच लागणार!

ह्या सगळ्या लोकांकडे ज्ञानाचं भंडार आहे, ते पुढे share केलं पाहिजे. माझी आजी तर चार गावे सोडून त्याच्या बाहेर कधी गेली नाही, पण तिला इतकी माहिती? हे सगळं अचंबित करणारं आहे. फक्त मौखिक ज्ञान अन संस्कार यातून हे आजीला समजलं होतं; कुठल्याही पुस्तकातून नाही. तिला ह्या चार भिंतीत स्वातंत्र्य मिळालं, मित्र मिळाले अन तिने इथेच स्वतःचं जग थाटलं. जसं तिचं घरातील जग अन बाहेरील जग, तसं माझं हे जग अन ते जग! अन मला काही क्षणांसाठी आपल्या virtual जगापासून दूर राहता आलं नाही.

बोलण्यातून, संवादातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो अन नाती टिकतात. हा संवाद इंटरनेटवर अनोळखी व्यक्तींशी असायलाच हवा पण ओळखीच्या व्यक्तींशीही टिकवलाच पाहिजे. झाडाने उंच उंच वाढताना मुळांकडून येणारा प्रवाह दुर्लक्षित करून चालणार नव्हतं. रुचाला अचानक वेगळाच हुरूप चढला. देश-विदेशातील संस्कृतीच्या संपर्कात आलेली रुचा आता आपल्या संस्कृतीलाही जवळून निरखू लागली. घरच्यांशी घट्ट असलेले पण अंधारात गेलेले नातेसंबंध अधिक दृढ होत होते. ती संवाद साधत होती, बोलत होती हेच खूप होतं. तिच्या virtual, दुसर्‍या जगात अनोळखी व्यक्तीशी संवाद करून त्यांना मित्र बनवलं जात, पण इथे आपल्याच नात्यांना अधिक जवळून बघायची किमया करावी लागते हे तिला समजलं.

परदेशी परतत असताना रुचा खूप बदललेली दिसत होती. परतताना नेहमी उत्साही, आनंदी दिसणारी रुचा ह्यावेळेस थोडी अस्वस्थ दिसत होती. आई-आजी ओवाळताना भरल्या डोळ्यांनी, परत कधी येणार म्हणून विचारत.

पण आज ती स्वतः म्हणाली, मला खूप गोष्टी शिकायच्या आहेत, सुट्टी मिळाली तर लवकर येईन!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in || @Late_Night1991

ALSO READ …

बंधन – मराठी कथा

भिक्षुकी

भिक्षुकी

मराठी कथा || कालाय तस्मय नमः ||  स्वलेखन  ||  वैचारिक वगैरे  || पाहण्यातील घटना  ||  Marathi Stories

 

सदाशिव उपरणकर गुरुजी हे तसे ज्ञानी मनुष्य. कासरी हेही तसं लहान शहर; फार मोठं नाही आणि त्याला गाव असं संबोधावं इतकं लहानही नाही. उपरणकर गुरुजींना सर्वजण सदागुरू म्हणून ओळखायचे. भिक्षुकी हेच त्यांचं जीवन. ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्याने लहानपणापासून भिक्षुकी करायचा परवाना जन्मतः त्यांना मिळाला होता. सदागुरू यांचे वडील हे विद्वान पंडित. त्यांच्याच तालमीत सदागुरू तयार झाले. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान होतं. सदागुरू हेही विद्वान म्हणून परिचित झाले.

गावाच्या थोडसं बाहेर त्यांच्या वडलांच्या जागेतच ते अजूनही रहायचे. जागा तशी बरीच मोठी असली तरी त्यातील बरीचशी जागा फळा-फुलांच्या झाडांनी व्यापली होती. पूजेला वगैरे जाताना घरची फळं-फुलं नेण्याची सवयही होती सदागुरूंना. घर साधारण राहण्यापुरतंच होतं. त्यातच ते राहत.

भिक्षुकीला त्यांच्या वडलांनी आणि त्यांनीही कधीच व्यवसाय म्हणून पाहिलं नव्हतं. ही परंपरा ते कर्तव्य म्हणून पुढे चालवत होते. सदागुरू म्हणजे अतिशय निर्मळ मनाचा, निस्वार्थी मनुष्य असं गावातले त्यांना ओळखणारे लोक सांगत. जिथे ज्या पूजेसाठी बोलावून येईल तेथे ते दिलेल्या वेळेत पोहचणार असा नियतीचा नियम होता. संपूर्ण पुजा व्यवस्थित सांगायची, कुठेही चूक होणे हे त्यांनाच मान्य नव्हतं. यजमान जर घाई-गडबड करत असतील तर त्यांना उपदेशाचे डोस पाजून विधिवत कार्य पूर्ण करून घेणे हा सदागुरू यांचा अट्टाहास असायचा. पुजा कसलीही असो सार्वजनिक गणेशोत्सव, दुकानाचं उद्घाटन किंवा अन्य काही सर्व विधिवत पार पाडावे असा त्यांचा आग्रह. पुजा सांगून झाल्यावर किंवा जे कार्य असेल ते सांगून पूर्ण झाल्यावर यजमान हातावर जी दक्षिणा हातात ठेवली जायची त्याच्यावर डोळेही न फिरवता ती सदागुरू यांच्या सदर्‍याच्या खिशात जाऊन बसायची. दक्षिणा किती मिळाली हे त्यांच्या बायकोला त्यांचे खिसे रिकामे करताना समजायचं आणि मग सदागुरूंना.

खूप पूर्वी, अर्थात सदागुरू यांचं लग्न झालं त्याच्यानंतरचा किस्सा; एकदा सदागुरू लग्न लावण्यासाठी गेले होते. लग्न लाऊन वगैरे सदागुरू घरी आले. त्यांच्या पत्नीचं काम होतं की त्यांना मिळणारे पैसे खिशातून काढून घरकामाला घेणे. सदागुरू नंतर स्वतःला लागले तर पैसे बायकोकडून मागून घ्यायचे. त्या दिवशी लग्न लाऊन आल्यावर सदागुरूंच्या बायकोला त्यांच्या खिशातून फार कमी पैसे मिळाले. त्यांची अपेक्षा होती, लग्न लावल्यावर बरीच दक्षिणा मिळणार, पण त्यांचा अंदाज चुकला होता. त्यांनी सदागुरूंना विचारलं की लग्नासारखं इतकं मोठं कार्य करूनही इतकीच दक्षिणा? हा त्यांच्या बायकोने त्यांना याबाबत विचारलेला पहिलाच अन शेवटचा प्रश्न आणि सदागुरूंचं यावर एकदाचंच उत्तर!

सदागुरू म्हणाले होते, पैसे कमवायचे असते तर नौकरी-व्यवसाय केला असता, आपण करतो ते पवित्र कार्य आहे, ते पैशासाठी करत नाही. धर्माने सांगितल्याप्रमाणे ते पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच आपलं कर्तव्य. जो तो आपल्या कुवतींनुसार अन त्याला माझ्या कार्याचं महत्व कितपत वाटलं यानुसार तो दक्षिणा देत असतो. भिक्षुकी यातून येणार्‍या प्राप्तीतूनच आजवर हे घर चालत आलं आहे अन यापुढेही तसंच चालेल. मी जर बघू लागलो मला किती दक्षिणा मिळते तर माझ्या अपेक्षा वाढतील अन मला मोह होईल, त्यामुळे मी कधी ते बघण्याचं धाडस करणार नाही. आपण परमेश्वराचं कार्य करतो आहोत, आपलं तो बघेल. या उत्तरावरून सदागुरूंच्या बायकोला समजून चुकलं होतं की आपली गाठ कोणाशी बांधली गेली आहे.

साधेपणाने राहून, पूर्वजांनी नेमून दिलेलं काम अन परंपरा सदागुरू पुढे चालवत होते. अंथरूण पाहून पाय पसरावे यावर त्यांचा गाढ विश्वास होता. असलेल्या पैशातूनच त्यांनी सर्व प्रपंच त्यांनी पुढे सरवकवला होता. कधी कोणासमोर हात पसरायची वेळ त्यांच्यावर आलेली नव्हती. त्यांना एक मुलगा अन एक मुलगी होती. स्वतःच्या मुलीचं लग्नही त्यांनी जेमतेमचं पार पाडलं होतं. कितीही संकटे आली, घरच्यांशीच भांडावं लागलं तरी त्यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या घरचेही त्यांच्या या स्वभावाला जाणून होते आणि तेही कधी सदागुरूंनी आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यांचे मित्र, त्यांना ओळखणारे हेही सदागुरूंना जाणून होते. मित्रपरिवार, स्नेही यांच्या बाबतीत मात्र सदागुरू श्रीमंत होते. इतकी वर्षे गावात राहिल्याने त्यांचा अनेकांशी चांगला स्नेह होता. त्यात गावात ब्राम्हनांची दोन-तीनच घरे होती. गावातील प्रत्येकाला पूजा सांगायला सदागुरूच पाहिजे असायचे. एक तर याला आर्थिक कारणही असायचं अन सदागुरूंच्या विद्वत्ता सर्वांना माहीत होती. गावात नव्याने आलेल्या बोकिल भडजींनी तर भिक्षुकी हा व्यवसाय असतो ह्याच दृष्टीने वाटचाल केली होती. त्यांच्या घराबाहेर एक फलक टांगलेला होता ज्यावर वेगवेगळ्या पूजेला काय दर आहेत हे लिहिलेलं होतं. गावातील सर्वांना आधी सदागुरू पाहिजे असायचे अन त्यांना जमत नसेल तरच बाकीच्यांकडे ते मोर्चा वळवायचे.

सदागुरूंच्या अशा प्रसिद्धी गावातील काही भडजी त्यांच्यावर राग धरून असायचे, पण सदागुरू हे नम्र व्यक्तिमत्व, स्वतःला एखाद्या कार्याला जाता येत नसेल तर ते बाकीच्यांचीच नावे सांगायचे. सदागुरूंच्या अशा स्वभावानेच ते अजातशत्रु होते. अशाने सदागुरूंचं घरही व्यवस्थित चालायचं. पण सर्वच लोक समजूतदार नसतात; मऊ लागलं की बोटाने खणत जायची प्रत्येक समाजाची मानसिकता असते. सदागुरू मिळेल ती दक्षिणा स्वीकारत असल्याने काही लोकांनी ‘कंजूशी’ सोडली नव्हती. दहा-पंधरा वर्षांपूर्वी सदागुरूंना जेवढी दक्षिणा ते द्यायचे आजही ते तेवढीच द्यायचे. पण सदागुरूंना काहीच फरक पडत नसायचा, कारण त्यांना किती दक्षिणा मिळाली हे ते बघायचेही नाहीत अन बायकोला कधी विचारायचेही नाहीत.

ज्ञान, विद्या, परंपरा यापुढे सदागुरूंनी कशालाच मोठं मानलं नाही. अध्यात्माबद्धल जेथून कोठून नवीन ज्ञान भेटायचं तेथून ते आत्मसात करत असत. धर्म, परंपरा, वेद, पुजा-पठन, श्लोक यातच त्यांचं आयुष्य गाडल्या गेलं होतं. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून स्वतःचं त्याबाबतीत काय मत आहे हेही ते लिहून काढायचे. त्यांच्या ज्ञांनाची बातमी लागल्याने चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक त्यांच्याकडे येऊन अशा विषयावर मोफत ज्ञान घेऊन जायचे. एका निर्मात्याने त्यांना मोठी रक्कम देऊ केली पण सदागुरूंनी त्यातील काहीशी ठेऊन बाकीची परत केली. ज्ञांनाची विक्री माझ्याकडून ह्या जन्मात तरी शक्य नाही म्हणून निर्मात्यांना सांगितलं. निर्माता त्यांना साक्षात दंडवत घालून निघून गेला. सदागुरूंच्या बायकोला ह्या गोष्टीचा कधी राग यायचा, कधी हेवा वाटायचा तर कधी अभिमान! पण याविषयी आयुष्यभर पुरेल असं उत्तर सदागुरूंनी त्यांना एकदाच दिलं होतं.

सदागुरूंच्या वयाची सत्तरी उलटली होती. त्यांनी काम आता बरंच कमी केलं होतं. त्यांचं काम त्यांचा मुलगा पुढे चालवत होता. त्यांचा मुलगा शंकर हाही त्यांच्याच तोडीचा होता. सदागुरूंच्या तालमीत तयार झाला होता शेवटी. अजून त्यांच्याइतकं ज्ञान त्याने आत्मसात केलेलं नसलं तरी रोजच्या पूजा-पाठ सांगायला तोच जायचा. त्यानेही कधी इतकी दक्षिणा द्या अशी मागणी कोणाकडे केली नव्हती. सदागुरूंचा आदर्श! फक्त एक बदल झाला होता, सदागुरू मिळालेल्या दक्षिणेवर कधी डोळेही फिरवायचे नाहीत तर शंकर ते मोजून खिशात ठेवायचा. पिढीचा फरक म्हणून सदागुरूंनी याकडे लक्ष दिलं नव्हतं.

सूर्य कितीही प्रखर असला तरी त्यालाही ग्रहण लागतंच. एक दिवस असा उजाडला होता जेथून उपरणकर घराण्याला ग्रहण लागणार होतं. वयाची सत्तरी उलटलेले सदागुरू अंघोळीला गेले होते अन अंघोळ उरकून झाल्यावर परतताना त्यांचा पाय घसरला अन ते तेथेच घसरून पडले. डॉक्टर वगैरे यांचा सोपस्कार पार पडला अन त्यांची पाठ मोडल्याचं निष्पन्न झालं!

पहाटे चारला उठून सूर्यनमस्कार घालणार्‍या, दिवसभर पोथी-पुस्तकासमोर बसून असणार्‍या, एखाद जागी पुजा कार्य करायला जाणारे सदागुरू आता पलंगावर पडून होते. रोज नवे-नवे औषधोपचार सुरू झाले होते. आज सत्तर वर्षांच्या आयुष्यात इतके दिवस एका जागेवर पडून राहायची वेळ त्यांच्यावर कधी आलेली नव्हती. वाढणार्‍या औषधोपचाराबरोबर त्याचा खर्चही वाढत होता. पडले सदागुरू होते पण पण कंबरडं त्यांच्या घराचं मोडलं होतं. उपचाराचा महागडा खर्च अर्थातच परवडणारा नव्हता. आयुष्यभर पाळलेल्या तत्वामुळे घरात आर्थिक सुबत्ता जेमतेम होती. सर्वकाही पोटा-पाण्यापुरते जमवले होते. सदागुरूंच्या बायकोने काटकसर करून जमवलेले पैसे तेवढेच उपयोगी येत होते.

लवकरच पैशांचा साठा संपत आला. सदागुरूंना ह्या सगळ्याची कुणकुण लागली होती. ते शरीरापेक्षा मनाने मोडून पडले होते. आयुष्यभर आपण पाळलेल्या तत्वांची शिक्षा आपल्याला अन आपल्या परिवाराला भोगावी लागत आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांचं मन वैफल्यग्रस्त झालं होतं. सणावाराला करून घेतलेले दाग-दागिने विकायची वेळ आली होती. हे ऐकल्यावर तर सदागुरू अक्षरशः गतप्राण झाले. क्षणाक्षणाला त्यांना अश्रु अनावर होत होते. पत्नीने किंवा इतर हितचिंतकांनी दिलेल्या सल्ल्याचा आपण कधीच डोळसपणाने विचार केला नाही याची खंत त्यांना वाटत होती.

ज्या डॉक्टरकडे उपचार चालू होते त्यांचे वडील, जे डॉक्टरच होते ते सदागुरूंच्या परिचयाचे होते. तेही सदागुरूसारखेच होते. डॉक्टरकी हा सेवेचा कर्तव्य असलेला पेशा आहे असं ते मानायचे अन बर्‍याचदा मोफत, कमी पैशांत उपचार करायचे. पण त्यांचा मुलगा काळानुसार शहाणा झाला होता, आलेल्या रुग्णांकडून रग्गड पैसे घ्यायचा, किंबहुना पैसे असतील तरच रुग्ण दाखल करून घ्यायचा. नसती समाजसेवा त्याने वडलांच्या मृत्यूनंतर लागलीच बंद केली होती. त्या डॉक्टरने सदागुरूंना शस्त्रक्रिया अर्थात ऑपरेशनचा इलाज सांगितला होता. शस्त्रक्रियेचा खर्च अर्थातच अफाट होता अन उपरणकर कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेरचा होता.

आता पुढे काय? हा प्रश्न उपरणकर कुटुंबाच्या समोर ठाण मांडून उभा होता. घरातील पैसेही संपले होते अन दागिनेही विकून झाले होते. शंकरने ओळखी-पाळखीच्या लोकांकडे पैसे मागावे असा उपाय सुचवला होता पण सदागुरूंनी तो साफ नाकारला होता. आयुष्यभर ज्या ताठ मानेने जगलो त्याच ताठ मानेने संपू असा त्यांचा अट्टाहास होता. त्यांनी कोणाकडेही पैसे मागायचे नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आपला बाप आपल्या डोळ्यासमोर तडफडतो आहे हे शंकरला पाहावलं नाही अन शेवटी हतबल होऊन शंकरने जवळच्या काही लोकांकडे पैसे मागितले; त्यातील काहींनी हात वर केले तर काहींनी मदत करण्यास पुढाकार घेतला.

उपरणकर कुटुंबाला मदत करणे म्हणजे बुडत्या जहाजात पैसे ठेवण्यासारखं आहे हे माहीत असल्याने त्यांना पैसे देण्यास फार कोण उत्सुक नव्हतं. काहीजण तर अशा मोक्याच्या संधी शोधतंच असतात. आता घडली का अद्दल, आलं का उपयोगी ज्ञान-विद्या? का तत्व उपयोगी पडली? अशी दूषणे देण्यास सुरुवात केली होती. शेवटी काय तर, पैसे येणं अवघड होतं.

ज्या हितचिंतकांनी मदत केली त्यांच्याकडून शंकरने पैसे घेतले होते. शंकरने पैशांची व्यवस्था झाली आहे ऑपरेशन करूया असं जेंव्हा सदागुरूंना सांगितलं तेंव्हा सदागुरूंनी पैसे कोठून आले याची विचारणा केली.

शंकरने घाबरतच सत्य परिस्थिती सांगितली तेंव्हा सदागुरू प्रचंड संतापले. झोपून असलेले सदागुरू सर्व शक्ति एकवटुन जागेवरून उठले अन कोप अनावर झाल्याने त्यांनी शंकरला थोबाडीत लगावली अन नंतर स्वतःच जोरजोरात रडू लागले. ते पैसे परत करेपर्यंत अन्नाचा त्याग करीन अशी धमकी त्यांनी दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शंकरसमोरही पर्याय नव्हता. आता सगळ्यांना समजून चुकलं होतं की सदागुरू उरलेलं आयुष्य झोपूनच राहणार. पण सदागुरूंना हे मान्य नव्हतं. त्यांच्या मनाने कसलीतरी तयारी केली होती. आयुष्यभराच्या घटना त्यांच्या डोळ्यासमोरून जात होत्या, अनेकांचे शब्द ऐकू येत होते, खंत वाटत होती! मनाला एका काळ्याकुट्ट अंधाराने घेरलं होतं. स्वतःचा, स्वतःच्या तत्वांचा राग होता तो.

अशाच एका काळ्याकुट्ट रात्री सदागुरू कसेबसे उठले. त्यांनी घरातून एक पांढराशुभ्र पंचा घेतला, लालभडक कुंकू घेऊन ते पाण्यात कालवलं अन त्या लाल रंगाने त्या पांढर्‍या पंच्यावर काहीतरी रेखाटलं. क्षणाक्षणाला त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडत होतं, पाठीत होत असलेल्या तीव्र वेदनेचा विसर त्यांना केंव्हाच पडला होता. सर्व शक्ति एकवटली होती. सदागुरू त्यांच्या अध्यायनाच्या-पठणाच्या खोलीत गेले तेथील कागदावर काहीतरी लिहिलं. रंगवलेला पंचा घेऊन ते घराच्या मुख्य फाटकाजवळ गेले. तो पंचा तेथे टांगला अन मट्ट्कन खाली बसले. डोळ्यातील अश्रु आता थांबले होते.

संपूर्ण आयुष्य शांतपणे काढलेल्या सदागुरूंची शेवटची धडपड घरातील कोणालाही ऐकू आली नव्हती. घरच्या अंगणात सदागुरूंनी जीव सोडला होता. ह्या घटनेची माहिती शंकरला भल्या पहाटे लागली. सदागुरू जग सोडून गेले होते. शरीरापेक्षा मनाला तीव्र क्लेश करून घेत त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निर्मळ, निस्वार्थी मनुष्याचा असा अंत झाला होता.

सदागुरूंनी चिठ्ठीत लिहिलेलं होतं की “माझ्यामुळे व माझ्या कठोर तत्वपालनामुळे आज माझ्या कुटुंबावर नामुष्कीची वेळ आली आहे. मला क्षमा करा. मी जग सोडतो आहे, तत्व सोडणं मला शक्य नाही!”

सदागुरू यांनी जेथे अखेरचा श्वास सोडला होता तेथे तो रंगवलेला पंचा होता. त्यावर लिहिलं होतं, शंकर तुझ्यासाठी… आणि खाली सर्व प्रकारच्या पुजा अन कार्यांचे दर लिहिलेले होते. हे बघितल्यावर घरच्यांना शोक आवरणे अजूनच कठीण झालं होतं. स्वतः तत्व पाळून ते मुलाला शहाणपण शिकवून गेले.

सदागुरू गेल्यावर शंकरने तो फलक घरातच ठेवला होता, पण त्याच्या वागण्यात आमुलाग्र बदल झाला होता.

शंकर आता स्वतः किती दक्षिणा घेणार हे कार्यक्रम ठरवतानाच सांगत असे. त्यानेही इतर अनेक भटजी यांच्याप्रमाणे हे क्षेत्र ‘व्यवसाय’ म्हणून निवडलं. पूर्वी जिथे एक-दीड तासात एका गणेशाची स्थापना तो करत असे आता मात्र एक-दीड तासात तो तीन-चार गणेशोत्सव मंडळात पुजा सांगू लागला. घरातील बाग तोडून त्याने तेथे वेदिक अन धर्मशास्त्र याच्या शिकवण्या सुरू केल्या होत्या.

मोठ-मोठी लोकं तेथे त्यांच्या मुलांना संस्कार मिळावेत म्हणून आणून सोडत.

मोठ-मोठ्या व्यापरांना लक्ष्मीप्राप्ती व्हावी, टिकून राहावी म्हणून तो त्यांच्या नावाने जप करून मोठ्या दक्षिणा मिळवत होता. ज्योतिषशास्त्र शिकून त्यातूनही व्यापार वृद्धिंगत करायची खटपट त्याने चालवली होती.

शंकर आता पेट्रोलचे भाव वाढले म्हणून येण्या-जाण्याचा खर्चही घेऊ लागला होता. सदागुरू यांचा मुलगा त्यांच्याइतकच विद्वान-ज्ञानी म्हणून लोक त्याच्याकडे कमी बघायचे पण त्याने बापाचे तत्व मोडून सरस्वतीचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो असं म्हंटलं जायचं.

केवळ सरस्वतीची उपासना केली तर त्याचा सदागुरू होतो असं शंकरला राहून-राहून वाटे. सदागुरू गेल्याच्या एका वर्षाच्या आत त्याने दोन छोट्या गाड्या विकत घेऊन दारासमोर उभ्या केल्या होत्या.

सर्वकाही व्यावहारिक करायचं हे शंकरच्या मनाने आणि मेंदूने कठोरपणे ठरवलं होतं. ज्ञानपेक्षा आजचं जग पैशाला महत्व देतं हे शंकरला सदागुरू यांच्या परिस्थितीवरून समजलं होतं. सगळी क्षेत्र कात टाकत होती, काळाबरोबर बदलत होती तर आपण का बदलू नये हा प्रश्न इतक्या वर्षानी शंकरला पडत होता.

डॉक्टर, वकील, नेते, अधिकारी, व्यापारी, कलाकार सगळेच काळानुसार बदलले तर आपण का नाही बदलायचं? सर्वांनी मोठ्या बंगल्यात राहायचं, गाड्यांत फिरायचं, त्यांच्या मुलांनी भारी हॉटेलात जायचं, भारी कपडे घालायचे अन आम्ही काय अजूनही केवळ परंपरा, ज्ञान ह्याच गोष्टीत अडकून राहायचं का??? आमचं कार्य पवित्र असं म्हणून केवळ मनाला समाधान मिळू शकत होतं; पण त्या पवित्र कामाचे फळं मात्र दुसराच कोणीतरी चाखतो आहे असं त्याला वाटे. ज्या लोकांनी आयुष्यभर सदागुरू यांच्याकडून जवळजवळ मोफत सेवा करून घेतली. ज्ञानी, नम्र, निर्मळ म्हणून कौतुक केलं त्यातील एकानेही त्यांना पडत्या काळात आधार दिला नाही. शेवटी सारं जग पैशाचं भुकेलं झालं आहे.

ज्यांनी आयुष्यभर सदागुरूंची एकाच दक्षिणेवर बोळवण केली ते शंकरचे ‘रेट्स’ बघून म्हणतात… कलियुग आले हो… सदागुरू गरीब होते बिचारे, देतील तेवढी भिक्षुकी घ्यायचे… आता भिक्षुकी म्हणजे सगळा बाजार झालाय!!!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in || @Late_Night1991

 

खालील ई-पुस्तकात अशाच काही कथा वाचायला मिळतील… जरूर भेट द्या…

नवीन मराठी कथासंग्रह

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

ONLINE IPO APPLICATION  ||  APPLY ONLINE FOR IPO  \\ SHARE MARKET BEGINNERS 

PROCEDURE

FIRSTLY YOU NEED TO ADD YOUR DP (DEPOSITORY) ID TO YOUR ACCOUNT

                                      ADDING APPLICANT & DP

STEPS

 1. Go to Your Internet Banking console. For example, If you have savings account in SBI which is linked with your Demat account. Then go to SBI internet banking.   www.onlinesbi.com

2. Login with you username and password. You will go to HomePage of SBI internet banking.

THEN

3. Click “Profile” tab on top menu bar.

 

4. On new console you get different options, out of that choose “Manage IPO Applicant”

 

5. Now, you have to enter your ‘Profile Password’ which in NOT same as your ‘Login password’

 

6. After login, you have to submit your details like name, PAN number Depository and beneficiary DP id etc. You will get these things either from your Broker, if not, then by Login to your Demat account.

DP id is generally 16 digit number.

 

7. Submit the details. Go to next step. Enter OTP generated and keep forwarding…

FIRST STAGE OF ADDING A NEW APPLICANT AND ADDING DEPOSITORY COMPLETED.

SECOND STEP IS TO APPLY FOR IPO –

 1. Go to Your Internet Banking console. For example, If you have savings account in SBI which is linked with your Demat account. Then go to SBI internet banking.
 2. Login with you username and password. You will come to HomePage of SBI internet banking.
 3. Then click on “e services” on top menu bar. (shown in figure)

.

4. Check options available on left side. Click on “Demat & ASBA services”

 

5.  You will get different options on console. Check “IPO (Equity)” option.

.

6. Read the conditions carefully before “Accept”

 

7. Now, you will get the list of IPO’s that are open to apply.

.

8. Click your choice, here say “Godrej Agrovet Limited” IPO

9. Now check dropdown option. Individual and Employee. Select proper option. It means, If you are Godrej Company Employee then click Employee option else Individual. Most of the times, employees get shares in discount rates.

10. When you select one of the option, you will get all the details of the transaction and IPO listing like lot size, issue price etc.

 

11. YOU HAVE TO CLICK ON “SELECT REGISTED APPLICANTS” IN FRONT OF APPLICANT NAME.

12. SELECT REQUIRED OPTION AND SUBMIT. YOU WILL GET DETAILED PRINT OF THE TRANSACTION…

 

CONTACT latenightedition.in@gmail.com  FOR DETAILED SHARE MARKET RELATED GUIDANCE & TIPS

 

How to Copyright Script In INDIA

How to Copyright Script In INDIA

How to Copyright Script In INDIA  || Content Copyright  || कथा/कविता/स्वलेखन कसे कॉपीराइट करावे?  || copyright process in INDIA  ||   माहिती ||  चित्रपटकथा व साहित्य कॉपीराइट 

 

कोणत्याही लेखकाला स्वतःच्या लिखाणाच्या चोरीची भीती वाटत असते. स्वतः मंनापासून, मेहनत करून लिहीलेल्या कविता, कथा, चित्रपटकथा, संकल्पना ह्या चार लोकांना share करत असताना, सांगत असताना मनात भीती असते की माझी कलाकृती कोणी चोरून स्वतःच्या नावाने खपवेल… ट्विटरवर टाकलेल्या चारोळ्याही कोणी चोरल्या तरी राग येतो. कारण कुठलंही मंनापासून केलेलं लिखाण हे अपत्याप्रमाणे असतं. त्याला जन्म देताना प्रसूतीवेदना झालेल्या असताना. चांगलं-वाईट कसही असलं तरी ते आपलं असतं. ते कोणीही स्वतःच्या नावाने खपवत असेल, त्याचं क्रेडिट घेत असेल तर राग येणं साहजिक आहे. चोरी करणार्‍याला त्या भावनेची कदर नसते. त्याला वाहवा मिळवायची असते किंवा व्यावहारिक दृष्टीकोणातून वापर करायचा असतो. जेंव्हा आपल्याला समजतं की आपल्या ओळी, संकल्पना, लिखाण कोणीतरी चोरून वापरत आहे तेंव्हा आपण हतबल होतो. त्यात ‘ते माझं आहे’ असं म्हणताना पुरावा असावा लागतो तरच तुम्ही खरे ठरता.

लेखकांची, त्यांच्या मेहनतीची काडीचीही कदर न करणारे भरपूर आहेत. अनेक बड्या लेखकांना अशा चोर मंडळींमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लेखक म्हणून करियर करू इच्छीनार्‍या नवख्या मित्रांना तर यात कसलच मार्गदर्शन नसतं. त्यांचा वापर केला जातो. चित्रपट क्षेत्रात तर अशा गोष्टी होतच असतात. पण काय करावं, कसं सुरू करावं याची माहिती नसल्याने बर्‍याच गोष्टी अडकून राहतात.

मग आपलं लिखाण कसं copyright करावं याचा शोध सुरू होतो. ह्या क्षेत्रात माहितीतील व्यक्ति असेल तर मार्ग लवकर सापडतो, नाहीतर विनाकारण वेळ वाया जातो. उगाच वेगवेगळे अन किचकट मार्ग धुंडाळण्यात आपण हैराण होतो.

ह्या सगळ्या अंनुभावातून गेल्यानंतर मला यातून एक सोप्पा अन सहज मार्ग सापडला… तेंव्हाची Film Writers Association (FWA) अन आता त्यालाच Screenwriters Association (SWA) म्हणतात.

http://fwa.co.in/

 ही संस्था मुंबई स्थित संस्था आहे. लेखकांच्या हक्कासाठी ही संस्था काम करत असते. अतिशय शिस्तीने अन उत्तमरीत्या संस्थेचं कामकाज हो असतं.

ही एक अतिशय उपयुक्त संस्था आहे. येथे तुम्ही तुमचं लिखाण copyright करून घेऊ शकता. चित्रपटकथा, संकल्पना, कविता, गाणी इत्यादि तुम्ही येथे नोंदवून त्याचे कॉपीराइट स्वतःच्या नावाने घेऊ शकता.

लिखाण Copyright करताना काही नियम व संकेत पाळायचे आहेत ते आपल्याला सदस्य झाल्यावर मिळतील.

संस्थेत सदस्यता मिळवण्यासाठी काही मूलभूत बाबींची पूर्तता करावी लागते. सुरूवातीला एकदाच registration fee भरावी लागते. फार नसते, पाच हजारांच्या कमीच.

Image result for copyright symbol

सदस्य कसे व्हाल?

यासाठी तुम्हाला काही बाबींची पूर्तता करावी लागेल.

सर्वात महत्वाचं, तुम्ही लेखक/कवि आहात याचा पुरावा देता आला पाहिजे. त्यासाठी तुमचं एखादं article/ लेख पेपरमध्ये (किंवा मासिकात) छापून आलेला हवा, ज्याची प्रत तुम्हाला सदस्यपद घेताना द्यावी लागेल.

नसेल तर एखाद्या लघुपटासाठी (short film) साठी तुम्ही लिखाण केलेलं हवं. किंवा एखाद्या दिग्दर्शकाने तुम्हाला लेटर दिलं तरी तुमचं काम होऊन जाईल.

एकंदरीत, तुम्ही लेखक आहात याचा पुरावा त्यांना दिला पाहिजे.

नंतर तुमचे ओळखपत्र. म्हणजे आधार कार्ड, घरचा पत्ता इत्यादी.

एक संस्थेच्या नावाने DD.

 

बास इतकीच कागदपत्रे पुरेशी आहे. ही सगळी कागदपत्रे त्यांच्या पत्त्यावर कूरियर तरी करा किंवा थेट ऑफिसमध्ये जाऊन submit करू शकता.

तुमच्या कागदपत्रांचा पडताळणी झाल्यावर, अंदाजे महिन्याभरात तुम्हाला सदस्यता मिळते. संस्थेचं अधिकृत ओळखपत्र मिळतं ज्यावर तुमचा स्वतंत्र ओळखक्रमांक असतो. ही सदस्यता एक वर्षापूरता मर्यादित असते; नंतर ती वाढवता येते. त्याला खर्च जास्त नसतो.

एकदा तुम्ही सदस्य झालात तर तुमचं लिखाण करणं अतिशय सोप्पं आहे.तुम्हाला FWA (SWA) च्या वेबसाइटवर जायचं आहे. दिलेल्या User Name आणि Password सह Login करा आणि तुमचं लिखाण pdf स्वरुपात upload करा. एका पानाला दोन रुपये वगैरे दराने तुमचं लिखाण copyright झालं.

ही संस्था अधिकृत संस्था आहे. मागे झालेल्या दिग्दर्शक-लेखक आणि कथेचे मालकीहक्क वादात लिखाणाचे copyright खूप महत्वाची कामगिरी बजावणारा ठरला.

 

लिहिताना आपण मंनापासून लिहितो. त्यामागेही मेहनत असते. ते कोणालाही स्वतःच्या वैयक्तिक हेतुसाठी वापरायला मिळू नये. फसगत झाली की खूप वाईट वाटतं. त्यामुळे थोडेसे कष्ट घ्या अन स्वलेखन copyright करून घेत चला…

YOU CAN CONTACT ME HERE – LATENIGHTEDITION.IN@GMAIL.COM REGARDING THIS…

ह्या विषयात काही विचारायचं असेल तर latenightedition.in@gmail.com येथे संपर्क करू शकता…

 

FTII Orientation & Interview 2016

मराठी पत्रकार

मराठी पत्रकार

#Marathi_Reporters   #Marathi_News_Anchors  #मराठी_निवेदक  #Marathi_News_Anchors

मागील एका पोस्टमध्ये, ‘मराठी रेपोर्टेर्स’ या मथळ्याखाली आपण ABP MAJHA च्या reporter Dnyanada Kadam यांच्याबद्धल माहिती बघितली होती. आज आपण जाणार आहोत एबीपी माझाचे अजून एक वृत्तनिवेदक मिलिंद भागवत.

बातमी सांगायची प्रत्येकाची एक शैली असते. बातमीच्या प्रकारानुसार निवेदकाला कठोरपणा, उत्साह, हास्य आणि संवेदशीलता दाखवावी लागते. पण त्यालाही काही अपवाद आहेत. मिलिंद भागवत! यांची बातमी व्यक्त करायची किंवा बातमी मांडायची एक खास शैली आहे. बातमी कशीही असोत यांच्या चेहर्‍यावर कमी-जास्त प्रमाणात हास्य तरळत असतं. संथपणे, सावकाशपाणे आणि नम्रपणे बातमीचं कथन चालू होतं. बातमी काय आहे, त्याची तीव्रता याचा फारसा परिणाम मिलिंद भाऊंच्या चेहर्‍यावर नसतो. अगदी प्रसन्न चेहर्‍याने ते बातम्या कथन करत असतात. बातमी झाल्यावर शेवटी त्यांची स्वतःची एक कमेन्ट असते. पण असे गोंडस निवेदक असले तर कधीही, कुठलीही बातमी बघायला माणूस तयार होईल. त्यात रात्री चर्चेच्या कार्यक्रमात जर मिलिंद भागवत असतील तर चर्चाही शांतपणे होते. वक्ता बोलत असताना अध्ये-मध्ये त्यांना टोकतानाही भागवतजी बराच विचार करतात. असे शांत पत्रकार असतील तर बातम्याही तटस्थपणे सांगितल्यासारख्या वाटतात. कसलाही ओवरडोस नसतो. बातमीचं कथन करणे हेच वृत्तनिवेदकाचं मुख्य काम असतं जे मिलिंद भागवत अतिशय दर्जेदारपणे करतात.

अशा प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या पत्रकाराला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

Image result for milind bhagwat

मराठी पत्रकार

रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक
#पानिपत (1760) लढाई ||   #संक्रांत  ||   The Battle Of Panipat ||  मराठेशाहीचा इतिहास
दिग्दर्शक – वामक केंद्रे
मुख्य भूमिका – अविनाश नारकर

Image result for रणांगण

पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात एक शोकांतिका म्हणून गणली जाते. मराठी माणसाच्या मनावरील एक भाळभळणारी जखम. संक्रांत जवळ आली की अनाहूतपणे ह्या जखमेवरची खपली निघते अन त्या वेदनेच्या आठवणी जाग्या होतात. इतिहासात केवळ ‘…जिंकता जिंकता हरलेली लढाई!’ इतकेच मर्यादित अर्थ त्या घटनेला नाहीत. त्या युद्धांनंतर आशियाई उपखंडाचे सर्व संदर्भ बदलणार होते. मराठ्यांच्या दारुण पराभवाने ते बदललेही. अगदी, आज बलुचिस्तानात मराठ्यांचे वंशज सापडतात हेसुद्धा त्याच पानिपत युद्धाचे परिणाम म्हणावे लागतील.
१४ जानेवारी १७६१, संक्रांतीच्या दिवशी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संक्रांत साजरा होत होती अन तिकडे पानिपत युद्धात मराठा सैन्य मृत्युला सामोरं जात होतं. मराठे पानिपतची लढाई हरले आणि एका शोकांतिक, करूणामय पानांनी इतिहास भरला गेला. आजही, अडीचशे वर्षांनंतरही, संक्रांत आली की तो इतिहास आठवतो.

DOWNLOAD FREE APP HERE

खरं तर संक्रांत जवळ आलेली असतानाच वामन केंद्रे दिग्दर्शित आणि अविनाश नारकर अभिनयसंपन्न “रणांगण” हे पानिपताचा इतिहास डोळ्यासमोर जागं करणारं नाटक बघण्यात आलं. तो इतिहासच इतका रोमांचक अन थरारक आहे की नाटक बघताना मन हेलावून जातं आणि रोमांचही उभे राहतात.

नाटकाची सुरुवात होते आजकाळात. म्हणजे खर्‍या पानिपत लढाईच्या अडीचशे वर्ष नंतर. एका संक्रांतीच्या रात्री पानिपतच्या रणांगणावर इब्राहीम गार्दी (अर्थात त्याचा आत्मा) सदाशिव भाऊंना शोधत असतो. तोच इब्राहीम गार्दी जो मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तोच गार्दी ज्याने केवळ निष्ठेसाठी जीवन नाकारून मौत पत्करली. तोच गार्दी ज्याने धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य दिलं. संक्रांतीच्या त्या रात्रीपुरता पानिपतवर मृत सैनिकांचे आत्मे जीवंत होत असतात. गार्दी लष्करातिल सैनिक आनंदाने बागडत असतात अन मराठा मावळे (आत्मे) सुस्तीने, निराशेने अन शरमेने त्याच रणांगणावर पडलेले असतात. त्यांच्या लेखी पानिपत हा मराठ्यांचा लाजिरवाणा पराभव आहे, त्यामुळे त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा नाही. आपण पराभूत आहोत अन इतिहासात आपल्याला तेच स्थान आहे अशी त्यांची धारणा असते.

मग गार्दी सैनिक पुर्णपणे खचलेल्या मराठा मावळ्यांना संपूर्ण पानिपतच्या इतिहासाचा जागर करून सांगतात. पानिपतची लढाई, त्याची पार्श्वभूमी अन त्याचा शेवट सर्वकाही! त्यात मराठे अन भाऊसाहेब पेशवे ज्या बहादुरीने अन शौर्‍याने लढले-झुंजले, अफगाणी अब्दालीची कशी कोंडी झाली याची आठवण ते करून देतात. एकंदरीत पानिपतचं युद्ध हे पराभव नसून शौर्याचं प्रतीक आहे आणि मराठ्यांनी पराभूत मानसिकता झिडकारून अभिमानाने मिरवावे असे घाव आहेत. येथेच सुरू होते खर्‍या नाटकाला!
पानिपतच्या युद्धाचा आवाका इतका मोठा होता की त्यावर चित्रपट बनवायचं धाडसही कोण करू शकत नाही. पण पानिपतचा इतिहास रंगभूमीवर मांडायचा पराक्रम वामन केंद्रे, मोहन वाघ चमूने केला त्याचं कौतुक केलच पाहिजे. स्टेजवर पानिपत सारख्या भीषण महासंग्रामाचा पट मांडणे हा मूर्खपणाच आहे, असं कोणीही म्हंटलं असतं. पण ते तितक्याच सिद्धतेने तडीस नेण्याचं कार्य “रणांगण” नाटकात दिसून येतं.
नाटकात प्रत्येक घटना प्रेक्षकाला समजेल, त्या घटनेची व्याप्ती, भीषणता, भव्यता जानवावी अन प्रेक्षक रोमांचित व्हावा अशी रचना केली आहे. विशेष म्हणजे, घटना त्याचे संदर्भ अन इतिहास समजावून सांगण्यासाठी पोवाडे अन गाण्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे. नाटकाचे संवाद अन कलाकारांनी चोखपणे वठवलेल्या भूमिका हे नाटकाचा प्राण म्हणाव्या लागतील. आजूबाजूला कसलाही भव्य सेट नसतानाही प्रेक्षक त्या काल्पनिक जगात जाऊन पोचतो. काळजाला भिडणारे संवाद अन त्याची चपखलपणे केलेली मांडणी हे तीन तास खिळवून ठेवतात अन उत्कंठा वाढवत राहतात. नाटकात वेशभूषा-रंगभूषा वगैरेचा वापर वगळता कसल्याच ऐतिहासिक सामुग्रीचा वापर केला नसल्याने एक शुष्कपणा वाटतो. पण पानिपतदरम्यान घडलेल्या महत्वाच्या घटना हेरून कथानक पुढे जात राहतं. मराठे अन अब्दाली यांच्यातील डावपेचाचा पट हाच नाटकाचा मुख्य गाभा आहे…

पानिपत संबंधी पुस्तके वाचा

नाटकात भाऊसाहेब पेशवे यांचं पात्र सर्वाधिक प्रभावी असणं स्वाभाविक आहे. अविनाश नारकर यांनीही भूमिका प्राण ओतून जीवंत केली आहे. भाऊसाहेबांचा मत्सुद्दीपणा, राजकीय जाण, हतबलता, उत्साह, नैराश्य आणि करारीपणा अतिशय उठून दिसतो. त्यानंतर नजीब खान ही भूमिका खूप मस्त जमून आली आहे. नजीब खानचा बेरकीपणा, स्वार्थीपणा अन विदूषकी चाळे पानिपत युद्धाला कारणीभूत आहेत हेही स्पष्टपणे समोर येतं. ती भूमिकाही खूप मेहनतीने उभी केली असल्याचं जाणवत राहतं. इब्राहीम गार्दी अन सदाशिवभाऊ पेशवे यांच्यातील मित्रत्व, आपलेपणा अन निष्ठा ही निवडक दृश्यांतून ठामपणे मांडली आहे. पानिपत युद्धादरम्यान झालेला जातीयवाद, अविश्वास अन एकमेकांच्या बाबतीत मनात असलेली आधी हीच पानिपत पराभवाला कशी कारणीभूत आहे हा मुद्दासुद्धा जाणीवपूर्वक मांडून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
खासकरून उत्सुकता होती ती मुख्य युद्धं कशा प्रकारे मांडलं जाईल याबद्धल. कारण तो महासंग्राम, ते भव्य समर रंगभूमीवर मांडणे एक आव्हान होतं. युद्धादरम्यानची रिंगण पद्धत वगैरे! पण त्यासाठी जी युक्ती वापरली आहे ती अप्रतिम आहे. ज्यांचा आत्मा #नाटक जगतो तेच असं सादर करू शकतात. ते दृश्य बघताना खरं युद्धं कसं झालं असेल याचं चित्र उभं राहतं.
एकंदरीत एक अजरामर कलाकृती बघून आनंद झाला. पानिपतचा माहीत असलेल्या इतिहासाला एक दृश्य स्वरूप ह्या नाटकामुळेच प्राप्त झालं म्हणावं लागेल.

latenightedition.in  ||  @Late_Night1991

संबंधित पोस्ट…

Unknown History Of The Maratha

PROMOTIONS
error: Content is protected !!