Category: General Information

जागतिक मंदीची दहा वर्षे!

जागतिक मंदीची दहा वर्षे!

भारतीय शेअर बाजार  ||  जागतिक मंदी  ||  Global Crisis Recession   ||  लेहमन ब्रदर्स

Image result for recession meaning

जागतिक मंदीची दहा वर्षे! पण शेअर मार्केट मध्ये काम करणार्‍या प्रत्येकाला ही भीती सतत लागलेली असते की अशी काळोखी रात्र पुन्हा येईल की काय… शेअर बाजार हा सतत कसल्यातरी सावटाखाली वावरत असतो. भूकंपाचे संकेत जमिनिखाली राहणार्‍या प्राणी-कीटकांना आधी समजतात तसं जगभरातील आर्थिक-सामाजिक-राजकीय-भौगोलिक घडामोडीचे पडसाद शेअर बाजारात उमटताना दिसतात.
आजही बघितलं तर सलग चार दिवस झाले भारतीय शेअर बाजार तुटताना दिसत आहे. अशा क्षणी ते “भयस्वप्न” डोळ्यासमोर उभं राहतं म्हणजे राहतच. ही मंदीची सुरुवात तर नाही न?

शिकण्यासारख काहीतरी या लेखामधून नक्की मिळेल… 
|
https://www.loksatta.com/…/article-about-ten-years-after-l…/

 

जागतिक मंदीच्या दसवर्षपूर्ती निमित्ताने… 
https://www.loksatta.com/…/dr-rupa-rege-nittsure-article-o…/

 

 अभिषेक बुचके

-OPEN DEMAT ACCOUNT FREE-

 

Go to e-book!

शेअर बाजाराची कटी पतंग…

Buy Right Sit Tight

Buy Right Sit Tight

शेअर बाजार मराठीत   ||  Indian Share Market   ||  अर्थव्यवस्था  ||  Selecting Shares ||  Long Term Investment

Image result for share market

Share बाजारात “Buy Right Sit Tight” ही म्हण सर्रास वापरली जाते. पण याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की, योग्य research करून चांगले stocks शोधा. योग्य levels वर चांगले stocks buy करा आणि स्वतःच्या research वर विश्वास ठेवत अपेक्षित परतावा येईपर्यंत ते hold करा. portfolio मध्ये जपून ठेवा.

यासाठी दोनच गोष्टी लागतात. एक म्हणजे सय्यम आणि दुसरं म्हणजे hold करण्याची आर्थिक क्षमता.OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

शेअर बाजारात आठ हजार पेक्षा अधिक कंपन्या आहेत. त्यांचे rates रोज खालीवर होत असतात. त्यात Nifty मध्ये 50 आणि next nifty मध्ये 50. हेसुद्धा खाली वर होतच असतात. मग ज्या shares मध्ये गुंतवणूक करून कमी risk मध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता असताना उगीचच आठ हजार कंपन्या धुंडाळत बसण्यात काय अर्थ.

दीड महिन्यांपूर्वी UPL नावाचा nifty मधील शेअर काही news मुळे नवनवीन नीचांक गाठत होता. चांगला शेअर का पडतोय याची तपासणी न करता काहीजण त्यातून बाहेर पडले. पण एक NEWS येणे होती. 700 रूपयांचा शेअर 560 पर्यन्त गेला. सर्व ठोकताळे तपासून आमच्या टीम ने 570 च्या आसपास BUY साठी तो सुचवला होता. दीड महिन्यांपूर्वी! आज त्या शेअर ची किम्मत आहे 720!!!

बाजार आपल्याला संधी देत असतो. तो साधता आली पाहिजे. अनेक कचदिल असे चांगले shares नुकसानीत विकतात. यामागे दोन कारणे असतात. एक म्हणजे भीती. की हा शेअर शून्य तर होणार नाही ना? ही भीती रास्त आहे. पण ती घालवता येते. साधारण एक ते दोन तास त्याबद्दल इंटरनेटवरून माहिती घेतली तर सर्व शक्यता समोर येतात. त्यानुसार गुंतवणूकदार निर्णय घेऊ शकतो.

दूसरा भाग आहे ‘उधारी” चा. अनेकदा गुंतवणूकदार कमी पैशांच्या आधारावर जास्त नफा कमावता यावा यासाठी MARGIN use करून क्षमतेपेक्षा जास्त shares घेतात. मग पैसे कमी पडू लागले की shares विकावे लागतात. ही शक्यता खूप त्रासदायक असते. Traders अशा position मध्ये अडकतात. Stoploss लावून त्यांनी नुकसानीत तो share विकणे योग्य निर्णय असतो. पण जे गुंतवणूकदार असतात त्यांना याचं काही वाटत नाही. चांगल्या share मधून चांगला परतावा यासाठी ते वेळ द्यायला तयार असतात. यालाच म्हणतात Buy Right Sit Tight.
आज असाच एक share आम्ही सुचवू इच्छितो. तो म्हणजे Kotak Mahindra Bank. सध्याच्या market प्राइस ला तो buy करून 1320 आणि 1365 च्या Target साठी तो पोर्टफोलियो मध्ये ठेवला जाऊ शकतो. Traders असाल तर 1235 चा stoploss लावता येईल.

– Angel Broking Latur. (अभिषेक बुचके)

-START LONG TERM INVESTMENT-

 

Go to e-book!

बोनसचा इन्फोसिस

दक्षिण दुभंग

दक्षिण दुभंग

लोकसत्ता वृत्तपत्रात “दक्षिण दुभंग” या गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया!

https://t.co/Igq06e0Tug?amp=1

15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालेला भारत हा विविध संस्थांनात विखुरलेला होता ज्याला टप्प्याटप्प्याने भारत राष्ट्राचा आकार प्राप्त झाला। तसं पाहिलं तर दक्षिण आणि उत्तर भारत हा भेद अन मतभेद खूप पूर्वीपासून आजतागायत सुरू आहेत।

शरीरातील प्रत्येक अवयवाला महत्वाचं काम असतं। त्यात कमी-जास्त असं काही नसतं। शरीर म्हणून ते एकत्र असतं।

#लोकसत्ता मध्ये गिरीश कुबेर यांनी लिहिलेला लेख अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे।

70 वर्षे झाली तरीही हा देश एकत्रित नांदतो आहे याचं आश्चर्य अन अभिमान वाटला पाहिजे।

उत्तर भारताने अनेकदा परकीय आक्रमण झेलली। फाळणी बघितली। राजकीय अस्थिरता, सांस्कृतिक उलथापालथ अनुभवली। या विविध कारणांनी तिथे आर्थिक स्थैर्य नांदू शकलं नाही। पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे राजकीय भूमिका बजावण्यात ते अग्रेसर होते।

पण दक्षिण भारतात बऱ्यापैकी स्थैर्य होतं अन सांस्कृतिक, भाषिक अस्मिता टिकून राहिल्या। लेखात नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील साहित्यात फाळणी बद्दल फार उल्लेख नाहीत। त्याचप्रमाणे उत्तर भारतात दक्षिणेतील घडामोडीकडे फार लक्ष दिलं जात नाही।

महाराष्ट्र त्यांच्या मध्यावर आहे। ही सगळी आक्रमणे आपल्या इथे येऊन धडकली। काही विरली, काही पुढे गेली। मूळ विषय आहे प्रत्येक राज्याच्या भूमिकेचा! प्रत्येक राज्य व विभागाने स्वतःची भूमिका घेतली आहे। देशाच्या राजकारणाची सूत्रे उत्तर भारतात आहे हे सत्य आहे। तो अगदी पारंपरिक प्रघात आहे। दक्षिण भारताने संशोधन, आर्थिक स्थैर्य यात प्रामुख्याने वाटा उचलला। जसा पंजाबने सुरक्षा वगैरे बाबतीत। विषय असा आहे की, प्रत्येकाला स्वतःची भूमिका माहीत असताना स्वायत्त वगैरे विषय येतात कसे। माझं स्वतंत्र पाहिजे वगैरे…

शरीरात अवयवाला काम आहे, कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी आहे तशी देशातही आहे। तसेच देशातही! मग मध्ये मध्ये ही स्वायत्त, स्वतंत्र वगैरे येतं कुठून?

दक्षिण विरुद्ध उत्तर हा वाद नवा नाहीच। भाषा वगैरे थोपवणे हेही नवं नाही। पण अन्याय होतोय म्हणून स्वतंत्र अस्तित्व हवं हे चूकच।

आपल्या इथेही अशी मागणी होत असते। पण मुंबई पुणे स्थित माध्यमे नागपूर विदर्भातील बातम्याही देत नाहीत यामुळे महाराष्ट्राचे दोन तुकडे होऊ नाही शकत। भाषेचंही तसंच। कोण किती महसूल देतो, विकासात किती वाटा उचलतो वगैरे पेक्षा एक राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली असताना हे दुभंग अवैध!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

पॉपकॉर्न आणि बरच काही

DEMATERIALIZATION अनिवार्य

DEMATERIALIZATION अनिवार्य

Physical Shares To DEMAT is now mandatory  ||  Shares Demat मध्ये ठेवणे बंधनकारक  ||  माहितीसाठी

आज शेअर बाजारात येणार्‍या प्रत्येकाला विविध Apps, Software आणि Websites च्या माध्यमातून Trading करायची माहिती आहे. कोणीही क्षणात शेअर BUY आणि SELL करू शकतो. त्यासाठी त्याला ब्रोकरला किंवा अन्य कोणाला विनंती करण्याची गरज राहिलेली नाही. पण ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा टेक्नॉलजी आजइतकी विकसित नव्हती तेंव्हा share बाजारात व्यवहार कसे होत असावेत?

तेंव्हा Physical Share Certificates च्या माध्यमातून shares ची खरेदी-विक्री केली जायची. त्यामध्ये मध्यस्थ अर्थात ब्रोकर ची भूमिका अत्यंत महत्वाची असायची. एखादा शेअर buy किंवा sell करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागायची. आज सारखे ZERO PAISA ब्रोकेरेज चाळे त्यावेळेस परवडणारे नव्हते. आज गुंतवणूकदारांचे shares हे Demat Account मध्ये असतात. म्हणजे, तुमच्याकडे किती shares आहेत, कधी BUY किंवा SELL केले आहेत याची माहिती तुम्हाला Demat ला LOGIN केली की लागलीच मिळू शकते. पण पूर्वी तुमच्याकडे जे Shares चे Physical Certificates असायचे. म्हणजे एक कागदी Certificate ज्यावर लिहिलेलं असायचं की तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे किती shares वगैरे आहेत. त्याची खरेदी-विक्री करण्यासाठी ब्रोकरच्या माध्यमातून केली जायची. त्याकाळी जी माणसे गुंतवणूक करायची त्यांच्या घरात अशी Certificates पडून असायची. तो काळ वेगळा होता. आता असे व्यवहार फार कोण करत नाही.

जसा जसा टेक्नॉलजीचा वापर वाढत गेला तसं तसं Share Market आणि त्याच्यातील व्यवहार सुलभ आणि Global होऊ लागले. Demat Account नावाची Concept आली. गुंतवणूकदाराला Demat च्या माध्यमातून Shares ची खरेदी-विक्री करता येऊ लागली. कागदोपत्री होणारा व्यवहार कालबाह्य झाला. जे shares असायचे ते Demat वरती. पण सर्वच गुंतवणूकदार ह्या बदलात सामील झालेच असं नाही. म्हणजे, ज्यांच्याकडे पूर्वी घेतलेले shares होते, ते त्यांच्याकडे Physical मध्ये होते, ते shares त्यांनी Demat मध्ये transfer केले असतीलच असं नाही. त्यांच्याकडे ते अजूनही Physical Format मध्ये असू शकतात. जोपर्यंत Physical form मधील shares Demat account मध्ये जमा होत नाहीत तोपर्यंत त्या shares चा खरेदी-विक्री सौदा करणे अशक्य झालं आहे.

DEMATERIALIZATION

ज्या प्रोसेसच्या माध्यमातून Physical Format मधील shares आपण Demat Account ला जमा करतो त्याला आपण DEMATERIALIZATION म्हणतो.

जवळपास दहा बारा वर्षांपासून share market मधील सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. Physical व्यवहार बंद झाले आहेत. आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडे Physical Format मध्ये shares पडून आहेत. आता त्यांचे व्यवहार होणं शक्य नाही. जर त्याचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना Demat करावं लागेल.

दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा अनुभव घेतलेल्या भारतीयांना “कालबाह्य” आणि “हे आता चालणार नाहीत” याचा अर्थ योग्य प्रकारे समजला असावा. जशा हजार पाचशेच्या नोटा कालबाह्य ठरवल्या गेल्या, त्यांच्याद्वारे होणारे व्यवहार बंद केले गेले होते.

SEBI (Security Exchange Board Of India) च्या नवीन अधींनियमनुसार Physical Format मध्ये असलेले Shares 5 Dec च्या आत Demat Account उघडून त्यात ते shares जमा करून घेणे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे Physical Format मध्ये shares असतील तर घाई करा आणि Demat Account सुरू करून 5 Dec पूर्वी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

.

– Deadline to dematerialise physical shares is Dec 5 –

Read Related News Below –

https://www.thehindubusinessline.com/economy/deadline-to-dematerialise-physical-shares-is-dec-5/article24255939.ece

https://www.india-briefing.com/news/india-demat-shares-mandatory-beneficial-ownership-rule-16966.html/

https://economictimes.indiatimes.com/hindi/markets/share-bazaar/goodbye-share-certificates-go-demat-till-december/articleshow/64758641.cms

= > WHAT IS DEMATERIALIZATION?

आधीच्या काळी shares खरेदी-विक्री प्रक्रिया Electronic पद्धतीने होत नसत. त्या काळी Physical Certificate असायचे ज्याद्वारे व्यवहार केले जात असत. ते Cerificate गुंतवणूकदाराला सांभाळून ठेवावे लागत आणि विक्री करताना submit करावे लागत. पण Electronic पद्धतीमुळे ही प्रक्रिया जवळजवळ बंद झाली आहे. असं असलं तरी, काही लोकांकडे जुन्या काळी घेऊन ठेवलेले Shares Physical Format मध्ये असू शकतात. ते जर Electronic Format अर्थात Demat मध्ये ठेवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया करावी लागते. याला आपण Dematerialization म्हणतो. एकंदरीत Physical Format मध्ये असलेले shares Electronic माध्यमात convert करणे. यासाठी Demat Account असणे अतिशय आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारणे 1999 काळी SBI चे shares घेऊन ठेवले आहेत. त्याकाळी Physical Certificate द्वारे व्यवहार केला जात असे. समजा त्या गुंतवणूकदाराने मध्यंतरीच्या काळात त्या shares ला काहीच केलेलं नाही. आज जर ते shares विकायचे असतील तर सर्वात आधी ते Physical Certificate त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर एक Demat Account असणे आवश्यक आहे. त्यात Physical Certificate आणि Demat एकाच्याच नावे असणे आवश्यक आहे. मग एका प्रक्रियेनुसार ते shares Demat वर जमा करता येतात त्यानंतर मग Demat खात्यावरून त्याचा व्यवहार करता येईल.

ही Dematerialization ची प्रक्रिया थोडीशी किचकट आहे. Demat Account सुरू केल्याच्या नंतर लागलीच ते shares त्याच्यात जमा होणार नाहीत. त्यासाठी ब्रोकर कडून एक फॉर्म घ्यावा लागतो. त्याला DRF फॉर्म म्हणतात. तुमच्याकडे असलेले सर्व certificates वरील माहिती त्या फॉर्ममध्ये भरून ते फॉर्म तुमच्या DP अर्थात Depository Participant कडे सुपूर्द करावे लागतात. त्यानंतर DP सर्व बाबी तपासून ज्या कंपनीचे ते shares आहेत त्या कंपांनीच्या Registrar कडे सुपूर्द करतात. सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जवळपास 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत ते share तुमच्या Demat Account ला जमा होतात.

Dematerialization ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिवाय, Registrar कडे सर्व बाबींची काटेकोर पडताळणी केली जाते. बर्‍याचदा काही Queries काढल्या जातात ज्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काही अडचण येत नाही.

पुढील लेखात जाणून घेऊ या निर्णयाचे फायदे, नुकसान आणि शेअर बाजारावर त्याचे पडसाद… 

अभिषेक बुचके

-CONTACT US TO DEMAT YOUR SHARES-

 

Go to e-book!

 

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

बोनसचा इन्फोसिस

बोनसचा इन्फोसिस

Infosys Bonus  ||   शेअर बाजार मराठीत   ||  दीर्घकालीन गुंतवणूक  ||  

अगदी काहीच दिवसांपूर्वी आपण दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत बोलत असताना Infosys या share ने किती परतावा दिला याबद्दल माहिती घेतली होती. Infosys ने गुंतवणूकदारांना भरभरून नफा दिला. यामध्ये कंपनीने BONUS कितीदा दिला आणि त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना कसा झाला याचीही माहिती आपण त्या लेखामध्ये बघितली होती. (संबंधित लेखची लिंक खाली उपलब्ध आहे.)

आज Infosys ने QoQ Results जाहीर करत असताना एक अनपेक्षित पण सुखद धक्का दिला. Infosys ने पुन्हा एकदा 1:1 प्रमाणात BONUS जाहीर केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे Infosys चे जितके shares आहेत ते आता (After Effective Date) दुप्पट होणार आणि अर्थातच Infy ची share price निम्मी होणार. यामुळे सामान्य गुंतव्नुक्दारांमध्ये उत्साह तर येईलच पण ज्यांची Infosys मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आहे त्यांना तर याचा खूप लाभ होईल.

या अनपेक्षित सुखद धक्क्यामुळे Infy च्या share price मध्ये Bounce येण्याची शक्यता आहे. आज हा share 1317 या price ला बंद झाला होता. नजीकच्या काळात 1500 कडे तो जाईल अशी शक्यता दिसून येत आहे.START INVESTING NOW

अभिषेक बुचके 

मागील पोस्टची लिंक

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

सेंसेक्स उच्चांकी पातळीवर

सेंसेक्स उच्चांकी पातळीवर

Share Market At Highs ||   सेंसेक्स उच्चांकी पातळीवर   ||  शेअर बाजार मराठीत  ||  

बर्याणच दिवसांचा अडथळा पार पाडून शेअर बाजाराने आज नवा उच्चांक बनवला. आज सेंसेक्स 282 पॉईंट्स ने वधारून 36548 या पातळीवर बंद झाला. आजच्या दिवसात सेंसेक्स आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. दुसरीकडे Nifty नेही आज तेजी अनुभवली. आज nifty 74 पॉईंट्स ने वधारून 11024 या पातळीवर बंद झाला.

फेब्रुवारी 2018 ला बजेट झाल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. त्यावेळेस “मंदी आली” असं अनेक Analyst सांगत होते. ती मंदी वर्षभर कायम राहील असं अनेकजण सांगत होते. पण सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत आज Sensex ने नवा Lifetime High बनवला आणि Nifty नेही 11000 चा स्तर मोडून वरची पातळी गाठली.

फेब्रुवारी 2018 पूर्वी जी तेजी आलेली होती आणि आत्ता जी तेजी आल्यासारखी वाटत आहे त्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे Midcap Shares चा. त्यावेळेस Midcap shares खूपच वधारलेले होते. पण आजच्या बाजारात अनेक Large Cap ही आपल्या खालच्या पातळीवरून वर आलेले दिसत नाहीत. आज Index वधारलेले दिसत आहेत काही मर्यादित Stocks मधील तेजीमुळे. त्यामध्ये Reliance, TCS, HDFC Bank यांसारखे महत्वाचे stocks वगळता बरेच stocks अजूनही खाली आहेत.

Time To Book Profit…

फेब्रुवारी 2018 मध्ये बजेट आल्यानंतर शेअर बाजारात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यात Profit Booking हा महत्वाचा मुद्दा तर होताच पण त्यासोबतच Margin Positions अर्थात उधारीवरील shares हे विकल्या गेल्याने बरीच पडझड झाली. त्यावेळेस ज्या गुंतवणूकदारांनी वरच्या पातळीवर stocks buy केले होते जे विकले नव्हते ते आता ह्या तेजीमध्ये बाहेर पडण्यास इच्छुक असतील.
आज बाजाराने Profit Booking ची आणि Profit Protection ची संधी दिली आहे. बर्याtच पडझडीनंतर आणि Consolidation नंतर बाजारातील काही shares 52 week high जवळ आले आहेत. यामध्ये IT Sector आणि काही अंशी Pharma sector सुद्धा बरेच Overbought दिसत आहेत.

आजच्या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे? 

Exit… Book Your Profit… Protect Your Funds…
जर आज तुमचा Portfolio नफ्यात असेल तर टप्प्याटप्प्याने तुम्ही shares विकून बाहेर पडलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की दोन-तीन दिवसांत सगळे shares विकून demat account रिकामं करायचं. बाजार काही काळ तेजीतच राहील. टप्प्याटप्प्याने shares वर-खाली होत राहतील. यामध्ये चांगला परतावा येणारे WEAK shares विकून टाकले पाहिजेत. पण जे shares तुम्हाला खूप कमी किमतीला मिळालेले आहेत आणि आज ते आपल्या Buying Price पासून बरेच वर आहेत ते सरसकट न विकता त्यात Partial Profit बाजूला केलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे जर Infosys चे 50 shares 1000 च्या रेटने Buy केलेले असतील तर योग्य रेट आल्यावर त्यातील 25 shares तुम्ही विकू शकता. किंवा KPIT सारखा share जर 120 वगैरे ला घेतलेला असेल तर त्याला विकायची काहीच गरज नाही. जे shares Weak वाटत आहेत, जे गुंतवणूकदाराने महाग किमतीला घेतले आहेत आणि जे आता PLUS मध्ये आले आहेत त्यांनी ते विकून टाकावे. तो share तुम्हाला परत कमी किमतीला मिळेल.

सध्या बाजार जरी तेजीत दिसत असला तरी बरेच चांगले चांगले shares अजूनही तळाला आहेत. येणार्याट काळात विविध राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, मग अमेरिकेत निवडणुका आहेत, मग भारतात लोकसभा निवडणुका आहेत. याशिवाय Trade War आणि क्रूड ऑइल सारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा बाजारावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

याचा अर्थ असा की शेअर बाजार परत एकदा खाली येऊ शकतो. त्यामुळे आज प्रॉफिट बुक करून आपण त्या संधीची वाट बघू शकतो. कमीत कमी किमतीला share घेऊन जास्तीत जास्त किमतीला विकणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट होत असेल तर ते घेऊन बाहेर पडावे आणि संधी मिळताच परत गुंतवणुकीसाठी पैसा हातात ठेवावा.

Abhishek Buchake 

 OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अन परतावा   ||  Profit Ratio In Long Term Investment In Share Market  ||  चांगल्या स्टॉक्स मधील गुंतवणूक  ||  Share Market आणि गैरसमज  ||  दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे  ||  become a millionaire by investing in stocks

Image result for LONG TERM INVESTMENT

मागील भागात आपण Maruti Suzuki या शेअर बद्दल माहिती घेतली. त्या शेअर मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत किती नफा झाला हे बघितलं. दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलत असताना IT क्षेत्रातील दिग्गज Infosys बद्दल बोलल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही.

2005 साली Maruti Suzuki ऐवेजी गुंतवणूकदाराने Infosys मध्ये जर 10000 रुपये गुंतवले असते तर काय झालं असतं ते पाहू.

जानेवारी 2005 मध्ये Infy च्या एका शेअर ची किम्मत होती 250 च्या आसपास. दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/250 = 40 shares मला मिळाले असते.

आज July 2018 मध्ये Infy च्या share ची किम्मत आहे 1300 च्या आसपास. म्हणजे, 1300 – 250 = 1050 हा एका शेअर मागे नफा आणि 40 shares म्हणजे 40*1050 = 42000 इतका नफा.

कमी वाटतोय न? म्हणजे मारुती सुजुकी ने दोन लाखांपेक्षा जास्त नफा दिला आणि Infy सारख्या share ने फक्त 42000. बात हजम नही होत ना? और होनी भी नही चाहीये…

आता दरम्यानच्या काळातील Corporate Action बद्दल बोलू.

आधी येऊ Bonus कडे.

Infosys ने (गुंतवणूक केल्यानंतर) 2006, 2014 आणि 2015 साली 1:1 ह्या प्रमाणात बोनस दिला आहे.

Bonus म्हणजे काय याची माहिती माझ्या “Share Market Beginners” या Android App मध्ये मिळेल. तूर्तास इतकंच लक्षात घेऊ की 1:1 बोनस म्हणजे एकावर एक शेअर फ्री मिळतो पण त्या शेअर ची किम्मत निम्मी होते. म्हणजे 1000 किम्मत असलेल्या शेअर ची किम्मत 500 होते आणि ज्याच्याकडे ते shares आहेत त्याच्याकडील Quantity दुप्पट होते.

एकंदरीत 2005 साली 40 shares खरेदी केले होते ते 2006 साली 80 झाले. 2014 साली 160 झाले आणि 2015 साली 320 इतके झाले. Quantity दुप्पट होत गेली आणि त्या-त्या वेळेस share चा भाव निम्म्याने कमी होत गेला.

म्हणजे 2018 साली गुंतवणूकदाराकडे Infosys चे एकूण 320 shares आहेत. आता 320 shares आणि आजचा share price 1300 यानुसार 320 * 1300 = 416000 रुपये. वजा 10000 हे मूळ भांडवल. म्हणजे 406000 हा तुमचा नफा.

Record Of Bonus

https://www.moneycontrol.com/company-facts/infosys/bonus/IT#IT

कहाणी यही खतम नही होती.

Corporate Action मध्ये डिविडेंड हा विषय राहिलाच…

Image result for infosys

आपल्याकडील मूळ 40 shares च्या हिशोबाने ह्या 13 वर्षांमध्ये 18260 रुपये इतका डिविडेंड आपल्याला मिळाला असता.

पण दरम्यानच्या काळात Bonus भेटला होता. त्यानुसार जर हिशोब केला तर फक्त डिविडेंड चा नफा होतो 61020 रुपये.

Record Of Dividend

https://in.finance.yahoo.com/quote/INFY.BO/history?period1=799353000&period2=1530556200&interval=div%7Csplit&filter=div&frequency=1mo

एकंदरीत, 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 13 ते 14 वर्षांत अनेक पटींनी परतावा मिळाला आहे. यात महत्वाचा विषय आहे Stock Selection चा. आज कोणत्या share मध्ये पैसे गुंतवावे जेणेकरून भविष्यात त्याचे चांगले Returns मिळतील.

ABHISHEK BUCHAKE (Share Broker & Tutor)

-INVEST IN INFOSYS-


Go to e-book!

Share Market Classes

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अन परतावा   ||  Profit Ratio In Long Term Investment In Share Market  ||  चांगल्या स्टॉक्स मधील गुंतवणूक  ||  Share Market आणि गैरसमज  || become a millionaire by investing in stocks

Image result for LONG TERM INVESTMENT

अनेकांना शेअर मार्केटबद्दल भीती असते की येथे गुंतवलेला पैसा बुडतो. हा निव्वळ सट्टा आहे. याच्यातील धन कधी लाभत नाही वगैरे वगैरे. पण हे सगळे गैरसमज आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक तेंव्हाच बुडते जेंव्हा गुंतवणूकदार स्वतः चुका करतो. तसं ह्या क्षेत्रात येणारे सुरूवातीला चुका करतातच अन नुकसानीतही जातात. पण जे आपल्या चुकांमधून शिकतात त्यांना शेअर मार्केट इतकं नफ्याचं क्षेत्र सापडणार नाही.

आज आपण बोलणार आहोत Long Term Investment बद्दल.

Long Term Investment म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. म्हणजे शेअर बाजारात आपण जे पैसे गुंतवणार आहोत, जे shares घेणार आहोत ते किमान पाच-दहा-पंधरा वर्षांसाठीच्या कालावधीसाठी घेणार आहोत असा त्याचा अर्थ होतो. ही गुंतवणूक खर्‍या अर्थाने पुढच्या पिढीसाठी किंवा स्वतःच्या भवितव्यासाठी केली जाते. याच्यातून सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग शोधला जातो.

बर्‍याचदा आपल्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, म्हातारपणासाठी ही गुंतवणूक केली जाते.

ही Long Term Investment किती परतावा देऊ शकते हे आज आपण बघूयात.

 

समजा, जानेवारी 2005 मध्ये एका गुंतावणूकदाराने दहा हजार रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. त्यात Diversified Portfolio हा भाग सोडून देऊ. त्या गुंतावणूकदाराणे समजा ही दहा हजार रुपयांची रक्कम Maruti Suzuki या शेअरमध्ये गुंतवली आहे. जानेवारी 2005 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 400 रुपये होती. त्या गुंतवणूकदाराने दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/400 = 25 असे 25 shares त्याला मिळाले.

आज July 2018 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 8800 च्या आसपास आहे. म्हणजे माझ्याकडे 25 shares * आजची किम्मत 8800 = 220000 रुपये ही त्याची आजची किम्मत आहे. म्हणजे माझा निव्वळ नफा 220000 – 10000 = 210000 रुपये इतका झाला. किती पट, किती टक्के परतावा मिळाला हे गणित तुम्हीच ठरवा.

बरं हे गणित इतकं सोप्पं असेल असं तुम्हाला वाटतं का? जरा धीर धरा… खरी गम्मत तर अजून बाकी आहे…

2005 ते 2018 या बारा-तेरा वर्षातील corporate action तर अजून गृहीतच धरल्या नाहीत. Corporate Action म्हणजे डिविडेंड, बोनस, स्प्लिट वगैरे वगैरे. आता त्याचाही हिशोब करुयात.

आधी डिविडेंड चा विषय घेऊ. खालील लिंकवर जाऊन तुम्हाला Maruti Suzuki या कंपनीने किती dividend दिला आहे ती माहिती मिळेल.

https://www.moneycontrol.com/company-facts/marutisuzukiindia/dividends/MS24#MS24

या माहितीच्या आधारे गणित केलं असताना 25 shares साठी गुंतवणूकदाराला गेल्या 13 वर्षांत 6300 रुपये इतका डिविडेंड फक्त डिविडेंड मिळालेला आहे.

म्हणजे त्या गुंतवणूकदाराने 2005 साली Maruti Suzuki कंपनीच्या shares मध्ये 10000 रुपये गुंतवले होते. 10000 ही मूळ गुंतवणूक. त्यापैकी 6300 रुपये तर मला फक्त डिविडेंड द्वारेच मिळाले आहेत. म्हणजे वरील नफ्यात 6300 ही रक्कम अधिक केली असता दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तेरा वर्षांत 210000 + 6300 = 216300 इतका नफा मिळाला.

कोणती बँक किंवा कोणती Scheme इतका परतावा देऊ शकते? दरम्यानच्या काळात वाढलेला महागाई दर लक्षात घेता ही रक्कम बँकेत ठेवली असती अन बँकेतील व्याज अन वाढलेली महागाई याचं गणित जुळलं असतं का हा विचारही करावा लागेल.

या सर्वात महत्वाचा भाग आहे तो Stock Selection चा. म्हणजे, 2005 साली Maruti Suzuki या कंपनीचाच शेअर का घ्यायचा हे कळायला हवं होतं. हे गणित आज बसून मांडणे सोपं आहे. पण आजच्या तारखेत असा कुठला शेअर आहे जो पुढील पाच-दहा वर्षात इतक्या चांगल्या प्रकारे परतावा देऊ शकतो? हाच भाग सर्वात महत्वाचा आहे. एखाद दूसरा अपवाद वगळता दर्जेदार shares अशा प्रकारचा परतावा देण्यासाठी सक्षम मानले जातात. साधारणपणे Nifty मधील Large Cap कंपन्या चांगल्या परताव्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. ज्या कंपन्या (Mid cap वगैरे) कमी कलावधीत इतक्या खूप मोठ्या पटीने परतावा देतात त्यांना Multibagger कंपन्या म्हणतात.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की योग्य share ची निवड आणि patience हा खूप महत्वाचा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी share market अतिशय उत्तम आणि सुरक्षित आहे. आपली गरज काय आहे हे एकदा गुंतवणूकदाराने ठरवलं पाहिजे. किती पैसा किती कालावधीसाठी गुंतवायचा आहे हे धोरण स्पष्ट असायला हवं. त्यामुळे या क्षेत्रात निव्वळ नुकसान आहे असली भीती बाळगून जर तुम्ही यापासून दूर राहत असाल तर ती तुमची आर्थिक नियोजनातील चूक ठरेल.

tbc…

Abhishek Buchake (Share Broker & Tutor)

buchkeabhishek@gmail.com

All About Share Market

…मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी!

…मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी!

जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी….

Bhayyu Maharaj Suicide  ||   Depression Kills

Image result for aloneness

मृत्यू हे अंतिम सत्य आहे. फक्त तो अकाली आला की त्याचं हळहळ व्यक्त केली जाते अन कुतुहुलही वाटतं. मृत्यूसमोर सर्व समान असतात. एका न्यायदेवतेप्रमाणे तो सर्वांशी समान न्याय करतो. त्याला कोणाशीच कर्तव्य नसतं. एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे तो खांद्यावर हात ठेवतो अन कायमचा सोबती बनतो…

आज भय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली अन त्यातून अनेक प्रश्न उभे राहिले. .खरं तर आत्महत्येच्या बातम्या आपण पेपरमधून सारख्या वाचतच असतो, पण जेंव्हा एखादा प्रसिद्ध व्यक्ति आत्महत्या करतो तेंव्हा यावर चर्चा केली जाते.
समाजात वावरत असताना माणूस विविध रंगाचे मुखवटे घेऊन वावरत असतो हेच सत्य आहे. जगाला दिसणारा माणूस हा त्याचा केवळ मुखवटा असतो पण त्यामागे एक चेहरा असतो जो फक्त त्यालाच माहीत असतो. गर्दीत दिसणारा माणूस ही केवळ त्याची प्रतिमा असते. आतमध्ये कुठेतरी एक वेगळाच माणूस अस्तीत्वात असतो.

जगातील प्रत्येक माणसाला स्वतःच्या विवंचना असतात. त्याच्या दृष्टीने ते जगातील सर्वात मोठं दुखं असतं. कोणालाही स्वतःचं दुखं मोठं वाटतं कारण ते त्याच्या दृष्टीकोणातून असतं. जेंव्हा ह्या वेदनेचा, दुखाचा कडेलोट होतो तेंव्हा मग एक विश्व कोसळतं.
प्रचंड गुंतागुंतीच्या मेंदूत, मनात हजारो प्रश्न क्षणाक्षणाला संचार करत असतात. त्यातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेलच असं काही नसतं. पण शेवटच्या श्वासापर्यन्त त्या प्रश्नांशी झगडत राहणं हेच आयुष्य असतं. हे प्रश्नच जगण्याची उमेद असतात. पण जेंव्हा हे प्रश्न सुटतीत असं वाटत नाही, किंवा हे प्रश्न सोडवताना आपण एकटे आहोत असं जेंव्हा वाटू लागतं तेंव्हा माणूस खचतो.

भय्युजी महाराजांनी आत्महत्या का केली यापेक्षा माणसाला आत्महत्या का करावी लागते हा प्रश्न महत्वाचा आहे. आयुष्य जगावं न वाटणे येथेच पराभव झालेला असतो. वैफल्य, नैराश्य, एकटेपणा, अपयश, अपेक्षाभंग अशा अनेक गोष्टी असतात ज्या माणसाला आत्महत्येच्या दरवाजापर्यन्त घेऊन जातात. ताणतणाव कोणाला नसतो? पण ते आयुष्यपेक्षा मोठे नसतात. कुटुंबाच्या सहवासात, मित्र-सहकार्यांृच्या गर्दीत ते प्रश्न खूप छोटे वाटतात. जगण्यात विविध रंग असताना हे प्रश्न, ह्या विवंचना सुटतील हा विश्वास असतो तोपर्यंत कसलच नैराश्य येत नाही. पण गर्दीतला एकटेपणा सतावू लागला की मग ह्या अभद्र भावना मनात घर करून राहतात.
मन आधीच विकारांनी बरबटलेलं असतं आणि मग एक क्षण असा येतो जेंव्हा ते सगळे प्रश्न अचानक सुनामीसारखे अंगावर येऊ लागतात. ह्या सगळ्याशी एकट्याने सामना करायचं धैर्य होत नाही अन माणूस हतबल होऊन घात करून घेतो. तो क्षण टाळता आला पाहिजे.
कधी-कधी वेळेवर जेवायला मिळालं नाही तरी जीवन नकोसं होतं. कारण ती परिस्थिती अन मानसाच्या मनाची अवस्था हीच कारणीभूत असते.

जगावर सत्ता गाजवू पाहणार्यात हिटलर सारखा हुकूमशाहही आत्महत्या करतो. तर देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीरालाही आयुष्याचा त्याग (आत्मार्पण) करावा वाटतो. साने गुरुजी यांसारख्या तत्वनिष्ठ अन आत्मविश्वासाने भारलेल्या सेनानीलाही हा मार्ग खुणावतो.

व्यक्त होण्याचे आणि share करण्याचे आज अनेक मार्ग आहेत. पण तिथे मनातील सर्व भावना खरोखरच व्यक्त करता येतात का हा प्रश्न आहे. प्रत्येक माणूस स्वतःला व्यक्त करण्यासाठी, चिंतेला मार्ग करून देण्यासाठी कुठलातरी मार्ग निवडतो. वाचन, लिखाण, सामाजिक कार्य, मनोरंजन, अध्यात्म, विपश्यना, खेळ, दारू वगैरे वगैरे हे त्यासाठीचेच मार्ग. पण जेंव्हा ह्या माध्यमातूनही आपल्या मनातील दुखं व्यक्त करता येत नसेल तर मग सर्वस्व निरर्थक वाटू लागतं. आयुष्य जगताना असल्या कुबड्या घेऊन जगावंच लागतं. कारण मनाला कुठेतरी गुंतवून ठेवणं हेच त्यामागील एकमेव कारण असतं. जीवनाकडून मृत्युकडे जाताना हे सगळे निमित्तमात्र असतात. जेंव्हा ही माध्यमे मनाला खिळवून ठेऊन शकत नाहीत तेंव्हा मृत्यू जवळ यावासा वाटतो.

Abhishek Buchake

error: Content is protected !!