Category: Political Perception

दक्षिण दुभंग

दक्षिण दुभंग

लोकसत्ता वृत्तपत्रात “दक्षिण दुभंग” या गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया!

https://t.co/Igq06e0Tug?amp=1

15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालेला भारत हा विविध संस्थांनात विखुरलेला होता ज्याला टप्प्याटप्प्याने भारत राष्ट्राचा आकार प्राप्त झाला। तसं पाहिलं तर दक्षिण आणि उत्तर भारत हा भेद अन मतभेद खूप पूर्वीपासून आजतागायत सुरू आहेत।

शरीरातील प्रत्येक अवयवाला महत्वाचं काम असतं। त्यात कमी-जास्त असं काही नसतं। शरीर म्हणून ते एकत्र असतं।

#लोकसत्ता मध्ये गिरीश कुबेर यांनी लिहिलेला लेख अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे।

70 वर्षे झाली तरीही हा देश एकत्रित नांदतो आहे याचं आश्चर्य अन अभिमान वाटला पाहिजे।

उत्तर भारताने अनेकदा परकीय आक्रमण झेलली। फाळणी बघितली। राजकीय अस्थिरता, सांस्कृतिक उलथापालथ अनुभवली। या विविध कारणांनी तिथे आर्थिक स्थैर्य नांदू शकलं नाही। पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे राजकीय भूमिका बजावण्यात ते अग्रेसर होते।

पण दक्षिण भारतात बऱ्यापैकी स्थैर्य होतं अन सांस्कृतिक, भाषिक अस्मिता टिकून राहिल्या। लेखात नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील साहित्यात फाळणी बद्दल फार उल्लेख नाहीत। त्याचप्रमाणे उत्तर भारतात दक्षिणेतील घडामोडीकडे फार लक्ष दिलं जात नाही।

महाराष्ट्र त्यांच्या मध्यावर आहे। ही सगळी आक्रमणे आपल्या इथे येऊन धडकली। काही विरली, काही पुढे गेली। मूळ विषय आहे प्रत्येक राज्याच्या भूमिकेचा! प्रत्येक राज्य व विभागाने स्वतःची भूमिका घेतली आहे। देशाच्या राजकारणाची सूत्रे उत्तर भारतात आहे हे सत्य आहे। तो अगदी पारंपरिक प्रघात आहे। दक्षिण भारताने संशोधन, आर्थिक स्थैर्य यात प्रामुख्याने वाटा उचलला। जसा पंजाबने सुरक्षा वगैरे बाबतीत। विषय असा आहे की, प्रत्येकाला स्वतःची भूमिका माहीत असताना स्वायत्त वगैरे विषय येतात कसे। माझं स्वतंत्र पाहिजे वगैरे…

शरीरात अवयवाला काम आहे, कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी आहे तशी देशातही आहे। तसेच देशातही! मग मध्ये मध्ये ही स्वायत्त, स्वतंत्र वगैरे येतं कुठून?

दक्षिण विरुद्ध उत्तर हा वाद नवा नाहीच। भाषा वगैरे थोपवणे हेही नवं नाही। पण अन्याय होतोय म्हणून स्वतंत्र अस्तित्व हवं हे चूकच।

आपल्या इथेही अशी मागणी होत असते। पण मुंबई पुणे स्थित माध्यमे नागपूर विदर्भातील बातम्याही देत नाहीत यामुळे महाराष्ट्राचे दोन तुकडे होऊ नाही शकत। भाषेचंही तसंच। कोण किती महसूल देतो, विकासात किती वाटा उचलतो वगैरे पेक्षा एक राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली असताना हे दुभंग अवैध!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

पॉपकॉर्न आणि बरच काही

पॉपकॉर्न आणि बरच काही

पॉपकॉर्न आणि बरच काही

मुजोर Multiplex आणि गोंधळ  ||  मनसे मारहाण  ||  खाद्यपदार्थ किमती 

काल-परवा मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मॉल मॅनेजरला मारहाण केल्याची बातमी बघितली. त्यांची तक्रार होती की पाच-दहा रुपयांचं पॉपकॉर्न ते दोन-अडीचशे रुपयांना का विकतात. ही ग्राहकांची लूट वगैरे आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल असंच दिसतय. पण त्या मॅनेजर (इथे त्याला बिचारा म्हणून सहानुभूती मिळवून देणं योग्य ठरणार नाही. कारण असे मॅनेजर मॉलचे मालक असल्यासारखे वागत असतात अन तोरा मिरवत असतात. असो)

तर मनसैनिकांनी त्या मॅनेजरला हानला ज्याचे विडियोही आले. यात मनसेने नवीन काही केलं आहे अशातला भाग नाही. एकट्या-दुकट्याला, निर्बल असणार्‍याला मारणं ही त्यांची जुनीच सवय आहे. यांचा हात अशा सामान्य माणसावरच उठतो. जे त्यांना विरोध करू शकणार नाहीत अशांवर ते झुंडीने तुटून पडतात अन त्याला तुडवून स्वतःला रांगडे मर्द, महाराष्ट्र सैनिक वगैरे म्हणवून घेतात. खरं तर त्यांना मंदसैनिक म्हंटलं पाहिजे. कारण मेंदू असणारा माणूस अन त्यातल्या त्यात राजकीय कार्यकर्ता असलेला माणूस असला मूर्खपणा करणार नाही. त्या मॉलमध्ये विकल्या जाणार्‍या वस्तूचे भाव तो मॅनेजरच ठरवत असतो असा त्यांचा समज असावा. कारण व्यवस्थापकीय संचालक, Business Strategist वगैरे पदं असतात आणि ते हा सगळा प्रकार ठरवत असतात हे त्यांच्या मेंदूच्या बाहेरचं असावं. म्हणजे धोरणकर्ते नावाची व्यक्ति असते हे त्यांनी कधीच गृहीत धरलं नाही. समोर दिसेल त्याला तोडत सुटायचं असा त्यांचा वोरा असतो. बरं हे फक्त मनसैनिकांच्या बाबतीत नाही तर सर्वपक्षीय विचारधारा आहे. पण मनसे वेगळा का? तर त्यांचं सर्वोच्च नेतृत्व अशा उद्योगांना खतपाणी घालत असतं. ते याला “खळखट्टाक” वगैरे म्हणतात. दहा-बारा वर्षे झालं हेच चालू आहे. म्हणजे राजसाहेब थेट करण जोहरला वगैरे भेटून प्रश्न मिटवतात ते इथे मॉल मालकांना वगैरे भेटून सोडवता आले नसते का हा विषय आहे. बर्‍याचदा राजकीय कार्यकर्ते स्वतःचा वैयक्तिक राग झुंडीच्या माध्यमातून बाहेर काढतात. त्यांच्या चकचकीत गाड्यांना पार्किंगला जागा दिली नाही, त्यांच्याकडून पार्किंगचे पैसे घेतले किंवा हवं तसं घडलं नाही तर त्यांच्यातील समाजकारणी जागा होतो अन तो समोरच्याला मारत सुटतो. समोरची माणसेही काही साधू-संत किंवा त्यागमूर्ती नसतात. तीही डांबिसच असतात. त्या दोघांचा राडा बर्‍याचदा सामान्य माणसाला सुखावून जातो.

असो. हा सगळा राजकीय फेरफटका झाला. त्यावर कितीही खर्च केला तरी बॅलेन्स रिकामाच राहतो. मूळ विषय आहे पॉपकॉर्नचा! मॉल ही सामान्य (म्हणजे मध्यमवर्ग वगैरे) माणसाने जाण्याची अन तेथे जाऊन एंजॉय करण्याची जागा आहे का हाच खरा प्रश्न आहे. कारण हा सामान्य माणूस केवळ तेथील झगमगाट बघण्यासाठी तेथे जात असतो. सरकारच्या कृपेने आपल्याकडे कुठल्या चांगल्या बागा, स्मारकं किंवा पर्यटन स्थळे नसल्याने बाहेरगावचे पाहुणे आल्यावर आपण त्यांना मॉल वगैरे बघायला घेऊन जातो. तिथे एक-दोन फोटो काढून परत येतो. बर्‍याचदा तिथे एखाद्या वस्तूची किम्मत विचारायचीही धास्ती वाटते. कारण तो झगमगाट आपल्यासाठी नाही हे त्या सामान्य माणसाला माहिती असतं. त्याची त्याबद्दल तक्रारही नसते. फार तर स्वतःचं Income तितकं नाही एवढा दोष स्वतःलाच लावून तो पुढे सरकतो.

आपल्याकडे शेतकरी सोडला तर सर्वांना स्वतः निर्माण केलेल्या उत्पादनाची किंवा विक्रीला ठेवलेल्या उत्पादनाची किम्मत ठरवण्याचा अधिकार आहे. त्यात मॉल सुद्धा आले. प्रत्येक माणूस स्वतःच्या आर्थिक सक्षमतेनुसार तेथे जाऊन खरेदी वगैरे करत असतो. मॉलमध्ये विकल्या जाणार्‍या वस्तूची किम्मत किती असावी हा ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे. कारण तो झगमगाट मेंटेन करण्यासाठी किती खर्च येत असेल हे त्यांनाच माहिती अन त्यानुसार ते त्याचा रेट ठरवत असतील. ते तुम्हाला त्या वस्तु घेण्याची जबरदस्ती करत नाहीत. अन ती वस्तु तेथून घेतली नाही तर सामान्य माणसाचं काही अडतही नाही. तो तुमच्या हौशेचा, अर्थसक्षमतेचा अन ऐच्छिक विषय आहे. तो तुमच्या मूलभूत जगण्याचा विषय नाही. सरकारी कारखाने, कंपन्या, सहकार क्षेत्र हे नफ्याचं गणित झुलवू शकत नाहीत म्हणून बुडीत निघतात. अर्थात, तिथे भ्रष्टाचार असतो हा भागही महत्वाचा.

आवडत्या सुपरस्टारचा चित्रपट बघण्यासाठी बरेचजण 800 ते 1000 रुपये इतक्या रुपयांचं तिकीट काढतात. ती त्यांची हौस आहे, ऐच्छिक विषय आहे अन त्यांच्याकडे तितके पैसेही आहेत. मॉल हा जीवनशैलीचा भाग आहे. Entertainment! तिथे ज्या वस्तु मिळतात त्या बाहेर मिळत नाही असं थोडीच आहे. तुम्हाला परवडत नसतील तर तुम्ही त्या बाहेरून घ्या.

फाइवस्टार हॉटेलमध्ये साधा चहा 300 रुपयांना असतात असं म्हणतात. आम्ही तर चहा पिण्यासाठी सुद्धा कुठलं हॉटेल न बघता टपरीवरचा चहा पितो. मग काही उद्या तिथे जाऊन हाणामारी करावी का? की सामान्य माणसाला परवडत नाही वगैरे म्हणावं. आजपर्यंत इतके चित्रपट बघितले पण एकदाही तो साठ रुपयेवाला समोसा, पेप्सी किंवा पॉपकॉर्न घेतला नाही. त्या पदार्थांसाठी तितके पैसे मोजायची आमची तयारी नसते. बास! विषय इथेच संपतो.

कांद्याचे किंवा भाज्यांचे भाव वाढले तर त्या आपोआप आपल्या ताटातून कमी होतात. आपण शेतकर्‍यांना जाऊन मारणार का, की मला परवडत नाही स्वस्तत दे. आपण त्यासाठी सरकारशी भांडतो. कारण ते धोरणकर्ते आहेत. त्या पॉपकॉर्नच्या केसमध्येही त्या मॅनेजरलाला मारून काय उपयोग होता. पण सामान्य माणसाला यातून आनंद मिळतो. एखादी महाग वस्तु आपल्याला स्वस्तात मिळेल या आशेने ते अशा कार्यक्रमाला पाठिंबा देतात. एकतर त्यांचा या वर्गावर रागही असतोच. कोणीतरी त्यांना मारत आहे हे बघून त्यांना आनंद होणं साहजिक आहे. ग्राहक मंच, सुप्रीम कोर्ट यांनी या मॉल वाल्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना नियम व अटी घालून देण्याचे प्रयत्न चालू असावेत. हे कशा पद्धतीने राबवता येतील यावर राजकीय कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पण निर्बल, एकट्या अन कसलही संरक्षण नसणार्‍या, अधिकार नसणार्‍या व्यक्तींना मारहाण करून काहीही साध्य होणार नाही. हे मंदसैनिकाना कळलं पाहिजे.

यात दूसरा मुद्दा आहे तो बाहेरून आणल्या जाणार्‍या पदार्थांचा. कोर्टाने वगैरे त्यासाठी मल्टीप्लेक्स वाल्यांचे कान टोचले आहेतच. पण वांदा असा आहे की बाहेरून आणले जाणारे पदार्थ यावरही काही निर्बंध असतील का? सरकारच्या कृपेने आता ते प्लॅस्टिकमध्ये आणता येणार नाहीत, त्यासाठी स्टीलचे डबे आणावे लागतील. सुरक्षेच्या कारणास्तव त्या सगळ्याची तपासणी करावी लागेल. बरं आपण जपानी माणसांसारखे शिस्तबद्ध कुठे असतो. सार्वजनिक ठिकाणी घाण करतो तशी थिएटरही घाण करणार. लग्नाच्या पंगतीत जेवण्यासाठी दोन तास वाट बघणारे दोन तासाच्या चित्रपटादरम्यान काही न खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत का हा प्रश्नही महत्वाचा आहे. जेष्ठ नागरिकांना वगैरे महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रयत्न केले पाहजेत. हे प्रश्न कसे सुटतील याचाही विचार झाला पाहिजे. आततायीपणा काही उपयोगाचा नाही.

मनसेचे काय?

खरं तर मनसेने स्वतःला चित्रपट, चित्रपटगृह या क्षेत्राशीच बांधून घेतलं आहे की काय असा प्रश्न पडतो आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी राज ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्न उचलायचे अन त्यावर ठाम असायचे. जनतेचा त्याला प्रतिसादही मिळाला. पण मग प्रसिद्धीसाठी अन प्रतिमानिर्मितीसाठी अन दुसर्‍यांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलने होऊ लागली. पक्ष आणि पक्षनेतृत्व भरकटू लागलं. आज महाराष्ट्रात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत याचा कसलाही विचार न करता हे असले पॉपकॉर्न सारखे तुलनेने कमी महत्वाचे प्रश्न हाताळले जाऊ लागले. समजाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर कसलीही ठाम भूमिका अन कार्यक्रम पक्षाकडे नाही. मग भरकटलेले कार्यकर्ते जमेल तसे पतंग उडवू लागतात.

मोदी आणि आघाडी

मोदी आणि आघाडी

राजकारण  ||   राजकीय लेख  ||  मोदी आणि मोदीविरोधी आघाडी  ||  

दरबारात काम करणाऱ्या मंडळींना किंवा प्रजेला कठोर किंवा एकाधिकारशाही करणारा राजा नको असतो।

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्थाही तशीच झाली आहे। मोदींनी गेल्या चार वर्षात राज्यकारभार कसा केला किंवा देशाच्या प्रगतीत किती भर घातली हा चर्चेचा विषय आहे। पण राजकीय पातळीवर मोदी वादग्रस्त ठरले। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात कमळ फुलवलं हे त्यांचं राजकीय यश आहे। राजकीय यश मिळवण्यासाठी राजकारणी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात। त्यात पार्टी विथ डिफ्फेरेन्स किंवा चाल-चरित्र-चेहरा असा काही अपवाद राहिला नाही।
Image result for मोदी
मोदींनी राजकीय पातळीवर अनेक शत्रू बनवून ठेवलेत अन नावालाही मित्र ठेवले नाहीत हे त्यांचं अपयश म्हणावं लागेल। विरोधी पक्षातील नेते असोत, मित्रपक्ष असतील किंवा स्वपक्षातीलही मंडळी असोत, मोदींनी वैयक्तिक पातळीवर सर्वांना दुखावलं आहे। त्यामुळे मोदी नको असं म्हणणारी गर्दी वाढत राहिली। जनतेला काय वाटतं हा भाग वेगळा।
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हेच भाजपचे चेहरा असणार यात वाद नाही। पण त्यांच्या विरोधात कोण असेल हा प्रश्न महत्वाचा आहे। यात पहिलं नाव साहजिकच राहुल गांधी यांचं येतं। राहुल हे आजपर्यंत अपयशी नेते ठरले आहेत शिवाय त्यांच्या क्षमतेवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आहे। राहुल गांधी यांच्या नंतर ममता, मायावती, नितीशकुमार वगैरे नावंही समोर येतात। नेतृत्व कोण करेल हा मुद्दा कितीही महत्वाचा वाटत असला तरी मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचं नाही हा समान धागा सर्वांमध्ये आहे। भाजप सत्तेवर असण्यापेक्षा मोदी सत्तेवर आहेत ही त्यांची अडचण आहे। खरं तर ही अडीच प्रादेशिक पक्षांना जास्त वाटते। कारण प्रादेशिक पक्षांना दिल्लीतील सत्तेपेक्षा राज्यातील सत्तेत जास्त रस असतो। दिल्लीतून त्यात हस्तक्षेप होऊ नये हीच त्यांची इच्छा असते। पण मोदी तसं होऊ देत नाहीत। प्रादेशिक पक्ष किंवा नेते राजकीयदृष्ट्या संपवणे हाच त्यांचा अजेंडा राहिला आहे। त्यांना वाजपेयी यांच्यासारख्या विनम्र आणि सर्वसमावेशक चेहरा हवा असतो। त्यांना मनमोहन सिंग यांच्यासारखा नेताही सहजपणे स्वीकारता येतो। असाच नेता त्यांना 2019 मध्ये चालू शकतो। त्यांचे ‘इंटरेस्ट’ जपणारा आणि दबावाला सहजपणे झुकला जाईल असा नेता हवा असतो। इंदिरा गांधी यांना त्याच कारणाने जास्त विरोध झाला। शरद पवार यांनाही पंतप्रधान होऊ न देण्यामागे याच शक्ती असतात। कारण दिल्लीत ताकदवर नेता असणं म्हणजे राज्य नेतृत्व कमकुवत होणे।
राहुल गांधी यांनी गुजरात अन कर्नाटक निवडणुकी दरम्यान बऱ्यापैकी समजूतदारपणा दाखवला हे प्रादेशिक पक्षांना खुणावणारं आहे। 2019 मध्ये मोदी नको ह्या एकाच सूत्राने जर सर्वांना बांधलं तर मवाळ राहुल गांधी सर्वजण स्वीकारू शकतात। पेशवे कमकुवत होणे सरदारांना हवं असतं किंवा दिल्लीत बसवलेला शाह असणं हे इतरांना हवं असतं तोच इतिहास येथे लागू होईल।
भारताच्या राजकीय इतिहासात प्रादेशिक पक्ष, नेते यांना आमूलाग्र स्थान आहे। त्यांचं दिल्लीवर नियंत्रण असणं किंवा दिल्लीचं त्यांच्यावर नियंत्रण असणं हाच खेळ राजकारण घडवत असतो। बघुयात 2019 ला काय घडतं ते!

हद कर दी आपने!

हद कर दी आपने!

लेख  ||   विडंबन  ||  राजकीय कोटी  ||   महागाई वगैरे  ||  प्यार का पंचनामा  ||  गुस्ताखी माफ

[[[[ मोठा खुलासा – ही कथा निव्वळ काल्पनिक आहे. विनोदनिर्मिती इतकाच ह्या कथेचा हेतु आहे. कुठल्याही पक्षाला त्रास देणे किंवा सरकारी धोरणांवर टीका करणे हा हेतु इथे अजिबात नाही. चुकभुल द्यावी! ]]]

तो रोजप्रमाणे तिला भेटण्यासाठी निघाला। आपल्या जुनाट splendour वर मांड ठोकून तो तिच्याकडे निघाला। तिच्याशी भेट होणार म्हणून तो खूप खुश होता। पण अचानक गाडी पाकपुक करू लागली। पंडिताने सांगितलेली साडेसाती ती हीच असा त्याचा समज झाला| इतक्या उन्हात (42^ वगैरे असेल तापमान) तो बंद गाडी घेऊन रस्त्याच्या कडेला थांबला। गाडीतील पेट्रोल संपलं होतं। तो वैतागला। एक किमीपर्यंत गाडी ढकलत नेऊन तो पेट्रोल पंपावर पोचला। पाकिटात पैसे नव्हते। जवळच्या ATM वर गेला तर ATM  वरील कॅश संपली होती। ऑनलाइन पेमेंट करावं म्हंटलं तर त्या पेट्रोल पंप वर इंटरनेट व्यवस्थित चालत नव्हतं। तिकडे ती वाट पहात असेल म्हणून तो चिंतातुर झाला। मोठीच कोंडी झाली।

त्याने तिला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली। ती समजूतदार होती। ती हॉटेलमध्ये वाट बघते म्हणाली। मग ती फर्ररर करत फंटा पीत बसली।

इकडे त्याने मित्राला पार हात जोडून विनवणी केली अन पंपावर बोलावलं। मित्र उपकार करत आहोत असं तोंड घेऊन आला। त्याने (म्हणजे मित्राने) येताना पैसे आणले होते। मित्राची गाडी घेऊन तो निघाला अन आपली गाडी त्याने मित्राकडे दिली।

मित्र नेहमीप्रमाणे हरामी होता।

मित्राने आपल्या गाडीत पेट्रोल तर भरून घेतलंच आणि सोबत त्याच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी त्याचौकडून पैसे घेतले। एकंदरीत त्याला दोन्हीही गाड्यांत पेट्रोल भरावं लागलं। सोबतच, एवढ्या उन्हाची मदत केली म्हणून त्याने (म्हणजे मित्राने) जूसचे पैसेही घेतले। त्याने मित्राला पैसे अन खास ठेवणीतल्या शिव्या दिल्या अन तो तिला भेटायला तातडीने (जवळपास 2 तास उशिरा) निघाला। (इथे त्याने अन त्याला याच्यात गल्लत नको। योग्य ठिकाणी मित्र अन आपला नायक ठेवावे।)

तिने तोपर्यंत थोडसं-थोडसं करत एक सँडविच, एक कट समोसा, एक फंटा फस्त केला होता। तो आल्यावर रुसवे फुगवे झाले, समजूत काढली अन मग शोना वरील राग कमी झाला।

तिच्यासोबत त्याने, सॉरी, त्याच्यासोबत तिने परत एकदा फंटा पिला। नंतर कुळचट ढेकरही दिली, ज्यावर विनोद करायचं त्याने टाळलं। त्याच्या सँडविच मध्ये तिने अर्धा हिस्सा घेत प्रेमाच्या नावाखाली स्वतःची खादाड प्रवृत्ती लपवली।

त्याने बिल दिलं। काय ती महागाई! फंटा थंड करण्याचे बाटलीमागे दोन रुपये जास्त द्यावे लागले। पण त्या थंड फंटा ने माझ्या गरम झालेल्या फंटीला थंड ठेवलं यातच समाधान होतं। (हा विनोदही त्याने मनातच केला।)

तिची समजूत काढण्यासाठी तिला सावन टेकडीवर न्यायचं ठरलं। तिला असही तेच हवं होतं, पण रागावणे अन समजूत काढणे वगैरे निमित्तमात्र। असले हट्ट तो नेहमीच पुरवतो।

परत पंचवीस किमी जावं लागणार होतं। मित्राची गाडी चांगली होती, पण मित्र कंजूष सोबतच हरामी होता। (अजून एक शिवी त्याने दिली, पण लिखाणात शिवीगाळ असभ्य गृहीत धरली जाते म्हणून ती टाळतो)

,मित्राने त्याला गाडी देताना गाडीचं रिडींग घेतलं होतं। ड्रायव्हरप्रमाणे तो रीडिंग बघून पैसे घेणार होता। सांगायचं म्हणजे, परत एकदा पेट्रोल टाकावं लागलं।

इतक्या उन्हात प्रेयसीला टेकडीवर फिरायला घेऊन जाणारा तोच असेन। त्यापेक्षा अजून एखादा फंटा पाजून फर्ररर आवाज ऐकला असता तर बरं झालं असतं। असो।

वाटेत टोल लागला। तिथे पैसे भरले। मित्राने दिलेले पैसे आज सफाचक होणार होते। तो मित्र रात्री पैसे ट्रान्सफर केल्याशिवाय त्याला झोपू देणार नव्हता। ते पैसे phonepay, paytm, tej वगैरे ने ट्रान्सफर करावेत अन कमिशन मिळवावे यासाठीचा खटाटोप वेगळाच!

तो आणि ती टेकडीवर पोचले। रस्ता एकदम उखडला होता, पण ती गाडीवर (ह्या शब्दात चूक नको। ड च्या ठिकाणी द नको) असताना उखडलेले रस्ते हवेहवेसे वाटतात। तिचा होणारा स्पर्श, खांद्यावर गच्च होणारे हात खूपच रोमँटिक वाटतात। असो। कथेचा बाज बदलायला नको उगीच।

टेकडीच्या पायथ्याला पार्किंग मोठ्या झाडाखाली होती। ते एकच झाड अन एवढ्या मोठ्या गाड्या त्याच्या सावलीत लावेलेल्या तो Whatsapp वर येणारा फोटो आठवला। पण लागलीच काही झाड लावणं शक्य नसल्याने तो गपचूप पुढे निघाला।

दोघे टेकडी चढून वर गेले। वाटेत नेहमीच्या आजीबाईकडून थंडगार ताक घेतलं। तिच्या पोटाचं अन पचनशक्तीचं त्याला नेहमीच कौतुक वाटतं। कुठल्यातरी देवाचं साधारण मंदिर आहे टेकडीवर। इतर सर्व देवांप्रमाणे तोही नवसपूर्ती करतो। दोघे नतमस्तक झाले।

थंडगार झाडांखाली तिचा हात हातात घेऊन बसलं म्हणजे सगळं जग जिंकल्यासारखं वाटतं। तिचंही तितकंच प्रेम त्याच्यावर आहे हे जाणल्यावर तर समस्त सृष्टी आपलीच आहे असं त्याला वाटतं। जागेचं पावित्र्य कमी होईल असं काही त्यांनी कधी केलं नाही।

प्रेम बहरत होतं।

आधी रोज तिच्याशी भेट व्हायची, पण मनाने कितीही जवळ असली तरीही ती त्याच्या घरापासून खूप लांब राहायची। तिला भेटायचं म्हणजे संघर्ष यात्रा करावी लागायची। पेट्रोल तर परवडतच नव्हतं। आता भेट एक दोन दिवसाआड होऊ लागली। अशा वेळेस जिओ चा खूप फायदा झाला। रात्रभर फोनवर बोलायचे दोघे। घाम लागून मोबाईलची स्क्रीन खराब व्हायची पण फुकट calling असल्याने बोलणं काही थांबायचं नाही। अंबानी देवमाणूस आहे। खरंच!

नोटबंदीनंतर त्याची आधीची नोकरी गेली होती। आता नवीन नोकरीही मिळत नव्हती। रोजगारनिर्मितीचा प्रश्न गंभीर होता। जवळची सेविंग संपत आली होती आणि खिसाही रिकामा राहू लागला। दरम्यान पेट्रोलचे दर खूप वाढले। तिला घेऊन फिरणं बंद झालं। पैशांचं सोंग कुठून आणणार। तो तिला घेऊन कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जायचा, पण तिथेही वाट लागली। होटेलिंग GST प्रचंड होता। तेही खिशाला परवडत नव्हतं। तो तिला टाळू लागला। तिला तोंड दाखवायचीही त्याला भीती वाटू लागली। कारण पैसेच नसल्याने स्वतःबद्दल कमीपणा वाटत होता त्याला। न्युंनगंड वगैरे।

त्या प्रेमी पक्षांत गैरसमज वाढू लागले। तिला वाटत होतं की तो जाणीवपूर्वक तिला टाळतोय।

एके दिवशी मनातलं सगळं बोलून, चर्चा करून सगळे गैरसमज दूर करण्यासाठी ती व तो बागेत भेटले। त्यांचं बोलणं चालू असताना अँटी रोमिओ स्कोड आला आणि त्यांना पकडलं। त्यांच्या घरच्यांना हे सगळं कळलं। वाट लागली। प्रेम उघडं पडलं। शेवटी ताटातूट झाली।

जीवन नकोसं झालं।

हल्ली त्याच्या घरीही कटकटी वाढू लागल्या होत्या। त्याच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता जो नोटबंदी, GST अन इतर धोरणांमुळे धोक्यात आला होता। आईला घर चालवणंही कठीण झालं होतं इतकी महागाई वाढली होती। भाज्यांचे चढे भाव आईच्या कोमेण्ट्री मधून कळायचे।

हे सगळं सरकारमुळे होतंय, मोदी सरकारने आपल्या आयुष्याची काशी केली ही जाणीव बळावू लागली। आता त्याचंही डोकं भनभनत (या शब्दात पुणेकरांना न आणि ण चा गोंधळ घालायला फुल स्कोप आहे) होतं। सगळा राग कुठेतरी काढायला हवा होता। सरकारशिवाय दूसरा सोपा मार्ग नाही हे त्रिकाळसत्य!

नोटबंदी, जीएसटी, वाढते कर, पेट्रोलचे दर, महागाई, बेरोजगारी, रोमियो स्कोड ही सगळी सरकारची देन… मोदी सरकारमुळे तिच्यापासून ताटातुट झाली याची खात्री त्याला पटली। आता विरोधात भूमिका घ्यावी लागणार होती।

आयुष्याचं वाट्टोळ केलेल्या मोदींवर-भाजपवर राग व्यक्त करण्यासाठी तो इतर पक्षांची कामे करू लागलो। ती लोकं मला पैसे देऊन कामे करून घेऊ लागली। मी secularism च्या गोष्टी करू लागलो।

पण आयुष्य बेक्कार झालं होतं। कशातच मजा राहिली नव्हती।

एके दिवशी त्याला तो जुना मित्र भेटला ज्याला त्याने हरामी, कंजूष वगैरे म्हंटलं होतं। तो बचपन में देखा था, छोटी चड्डी पेहनता था वाला जोक आठवला… असो!

त्या मित्राने त्याला मदतीचा हात दिला। मदतीचा हात दिला असला तरी तो कमळाचा कार्यकर्ता होता हे नमूद करावं लागेल। काळाची पावले ओळखून मित्राने भाजप IT सेल मध्ये प्रवेश केला होता। त्याच्या रिकाम्या हातांना (परत सांगतो, निवडणूक निशाणीबद्दल बोलत नाही मी) काम मिळालं होतं। मित्राने त्यालाही गळ घातली। त्याला गरज होतीच।

आता तोही भाजप IT सेल मध्ये काम करत आहे। त्याला त्या कामाचे मला चांगले पैसे भेटतात। समाजात प्रतिष्ठाही वाढली। आयुष्य स्थिर झालं। मग ‘त्या’ची ती त्याला परत भेटली। त्याला सर्व समस्यांचा विसर पडला। जय हो मोदी!

तो दोस्तों, इस कहाणी से हमे क्या सिख मिलती है – की जग पावसात भिजत असेल तर भिजू दे, आपण आपली छत्री शोधायची!

 

[[[[ मोठा खुलासा – ही कथा निव्वळ काल्पनिक आहे. विनोदनिर्मिती इतकाच ह्या कथेचा हेतु आहे. कुठल्याही पक्षाला त्रास देणे किंवा सरकारी धोरणांवर टीका करणे हा हेतु इथे अजिबात नाही. चुकभुल द्यावी! ]]] 

 

अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991  ||  latenightedition.in

आभासी प्रेम

कर्नाटक ते दिल्ली

कर्नाटक ते दिल्ली

कर्नाटक विधानसभा निवडणूक  ||  राजकारण  ||  लोकसभा २०१९   ||  प्रादेशिक पक्षांचे राजकारण  ||

 

कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणूक 2019 च्या दृष्टीनेअत्यंत महत्वाची मानली जात होती. त्याला कारणेही तशीच होती. कोंग्रेसशासित असलेल्या निवडक राज्यांपैकी कर्नाटक हे सर्वात मोठं राज्य. ते कॉंग्रेसकडून भाजपने जिंकून घेणे म्हणजे 2019 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचं आत्मबळ कमी करण्याची नामी संधी. आणि कॉंग्रेसला कर्नाटक टिकवणे म्हणजे अस्तित्वाची लढाई होती. शिवाय मोदीलाट वगैरे कमी झाली असं ओरडून सांगाता आलं असतं.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली अन मतमोजणीही पार पडली. तिथे जो काही ड्रामा झाला तो ह्या देशाने अतिशय उत्साहाने बघितला. आजच्या ताज्या घडामोडीनुसार येडियूरप्पा ने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मग जो उपद्व्याप केला तो कदाचित भारतीय जनतेचं मनोरंजन करण्यासाठीच केलेला असावा असा दाट संशय येतो.

भरसभेत द्रौपदी वस्त्रहरण होत असताना सर्व ‘पुरुष’ षंढ आणि थंडपणे बघत बसतात तसं भारतीय जनता लोकशाहीच्या परंपरा व घटनेवर वारंवार होणारे अत्याचार हे केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून बघत बसते. एकतर आपल्याला हा सगळा व्यभिचार हवा असतो किंवा आपला कर्मावर इतका विश्वास बसला आहे की ज्याचं त्याचं ‘कर्म’ त्याच्यासोबत न्याय करेल असं म्हणून आपण स्वतःच्या कर्मावर जगत असतो. असो.

आता पुढे काय? हा प्रश्न भाजप अन भाजप विरोधकांना सतावत असेल. पुढे जाण्यापूर्वी एका चित्रपटाची कथा आठवली ती सांगतो. ही कथा तुम्हाला कादंबरी किंवा आजीकडून ऐकलेल्या गोष्टीसारखीही वाटू शकते. किंवा ती आजच्या काळात कुठे relate करायची हे तुमचं तुम्ही ठरवा.

एक भलं मोठं, वैभवशाली, संपन्न, प्राचीन राज्य असतं. एक राजघराणं गेली कित्येक तप तिथे राज्य करत असतं. पण एकदा होतं असं की त्यांच्या पिढीत एक कमकुवत राजपुत्र जन्माला येतो. त्याच्याकडून अपेक्षा तर खूप असतात, पण त्याच्याकडून त्याची पूर्तता होत नसते. लहानपणापासून प्रचंड कौतुक अन लाडात त्या राजपुत्राची जडणघडण झालेली असते. राजाला मोठी चिंता, की आपल्यानंतर आपल्या राज्याचं, आपल्या सत्तेचं काय होईल. मग तो प्रधानमंडळ वगैरे नेमतो. त्यांच्यावर राज्याची बरीचशी जबाबदारी सोपवली जाते. राजपुत्र समंजस व लायक होताच त्या मंडळाने राजपुत्राला कारभार सोपवावा असं ठरलेलं असतं. राजाचं राज्यकारभारातून लक्ष विचलित झालेलं असतं. प्रधानमंडळात चांगले-वाईट असे दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात. त्यांच्या अंतर्गत संघर्ष सुरू होतो. जनतेतही नाराजी अन असंतोष निर्माण होऊ लागतो. राज्याची घडी सगळी विस्कटते.

अचानक एक दिवस असा उजाडतो की राज्याच्या सीमेवर एक शूरवीर सेनापती लाखांची फौज घेऊन उभा टाकलेला दिसतो. त्या सेनापतीने राज्यातील असंतोष वाढवा यासाठी प्रयत्न केलेले असतात. राज्यातील काही घरभेदयांना त्या शूर सेनापतीने हाताशी धरलेलं असतं. त्याला आता राज्य काबिज करायचं असतं. पोखरलेल्या घराला पाडायला कितीसा वेळ लागतो? गाफिल राजा, अपरिपक्व राजपुत्र अन विभागलेले मंत्री याचा लाभ उठवत तो एका तडाख्यात संपूर्ण राज्य काबिज करतो. अनेक वर्षे राज्य केलेलं घराणं तडीपार होतं. त्याच त्याच सत्तेला अन प्रधान मंडळांच्या गैरकारभाराला कंटाळलेली जनता त्या शूर सेनापतीचे आभार मानू लागते अन डोक्यावर बसवते. सुखाचं नवीन पर्व सुरू झालेलं असतं. एक अध्याय संपलेला असतो.

तिकडे राज्य पराभूत झालेला राजा आपल्या राजपुत्राला तयार करायचे प्रयत्न करत असतो. कारण राजपुत्रालाच गादीवर बसण्याचा अधिकार असतो. आहे त्या सोंगटीवरच डाव जिंकायचा असतो. राजपुत्रालाही आता झळ पोहोचत असल्याने तो जागा होतो. सोबत राहिलेले प्रधानमंडळ अन सैन्यही जरा सावरतं. राजा आपल्या परीने आपल्याला पराजित केलेल्या त्या शूर सेनापतीशी संघर्ष करत असतो. पण इतक्या मोठ्या परभवानंतर अन तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी तो संघर्ष अपुरा पडू लागतो. छोट्या-मोठ्या चकमकी होतात पण प्रत्येक ठिकाणी पराभव होऊ लागतो. आधीचा शूर सेनापती आता महाराजा झालेला असतो. विरोधात कोणीच नाही हे बघून तोही मस्त राहतो.

काही वर्षे अशीच जातात. राजपुत्र हळूहळू समजदार होऊ लागतो. आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय, आपल्या जीवनाचं लक्ष काय हे त्याला समजू लागतं. ज्या ठिकाणी आपण असायला हवं तिथे कोणीतरी दुसरंच बसलं आहे. आपला अधिकार आपल्याला मिळायला हवा. ज्या चुका झाल्या त्या सुधारायला हव्यात असं त्याला वाटू लागतं. राजपुत्र राजाच्या नेतृत्वाखाली लढाईच्या मैदानात उतरू लागतो. पण मखमली गालिच्यांच्या खाली पाय ठेऊन माहीत नसलेल्या राजपुत्राला युद्ध आणि संघर्ष वगैरे झेपत नाही. तो युद्धाच्या मैदानात कसाबसा उभा राहतो, पण आत्मविश्वास नसल्याने तो म्हणावी तेवढी लढतही देऊ शकत नाही. सैन्यालाही राजपुत्राच्या क्षमतेवर विश्वास नसतो. पण अंनुभावातून आणि लोकांच्या आलोचनेतून तो शिकत असतो. राजपुत्र स्वतःमध्ये सुधारणा करत असतो.

राजपुत्राचा अन त्या शूर सेनापतीचा विविध पातळ्यांवर छोटा-मोठा संघर्ष होत असतो, पण राजपुत्रला नेहमी पराभवाची धूळ चाखावी लागते. पण हळूहळू तो शूर सेनापतीला समजून घेऊ लागतो. त्याचा विजय कशात आहे हे जेंव्हा राजपुत्राला समजतं तेंव्हा तो सावध होतो अन वेगळ्या पद्धतीने कामाला लागतो.

मोठ्या लढाईची तयारी सुरू असते. पण तत्पूर्वी छोट्या-मोठ्या लढाया होत राहतात. बहुतेक वेळा राजपुत्र पराभूत होतो, पण प्रत्येक लढाईदरम्यान त्याच्यात सुधारणा होत असते. तिकडे महाराज झालेला शूर सेनापतीला राजपुत्र अजूनही भोळसट अन अनाडी वाटत असतो. त्याचं मिळवलेल्या राज्यावर उत्तम शासन करण्यापेक्षा राज्याची सीमा वाढवण्यात जास्त लक्ष असतं. नवा महाराजा अन जुना राजपुत्र यांच्यातील रोजच्या लुटुपुटूच्या लढाईला जनताही वैतागते.

आता लढाया अटीतटीच्या होऊ लागतात. शूर सेनापतीला राजपुत्र चांगली टक्कर देत असतो. लढाईतील एखादा क्षण जिंकून जाणे हेसुद्धा राजपुत्राला खूप महत्वाचं वाटत असतं. शूर सेनापतीही सावध होतो. सोबतचे अतृप्त साथीदारही अंतर्गत कलह निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण करत असतात. साम-दाम-दंड-भेद वापरुन जिंकलेल्या लढाईपेक्षा राजपुत्राचा वाढणारा आत्मविश्वास शूर सेनापतीला धोकादायक वाटत असतो.

एके दिवशी राजपुत्र शूर सेनापतीच्या पूर्वीच्या मूळ राज्यात जाऊन हल्ला चढवतो अन त्याच्या राज्याचं मोठं नुकसान करतो. राजपुत्राचा पराभव होतो तरीही त्याने शूर सेनापतीच्या राज्यात जाऊन त्याला घाम फोडला ही बातमी वार्‍यावर पसरते. इतर राज्यांच्या विखुरलेल्या फौजा आता एकत्रित येऊ लागतात. आपापली राज्ये परत मिळवायची असतील तर सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही गरज लक्षात येते.

एक प्रचंड मोठी लढाई होते. अगदी अटीतटीची! तुंबळ हाणामारी! दोन्हीही बाजूचं सैन्य कामी येतं, पण अखेर मोठ्या संघर्षाने राजपुत्राचा अन सहकारी राजांचा विजय होतो. हा विजय विरोधी राज्यांच्या एकत्रीकरणसाठी महत्वाचा ठरतो.

कधीही पराभव न पाहिलेल्या अजेय शूर सेनापतीचा सततच्या पराभवाने कणखर झालेल्या राजपुत्राशी अखेरचा सामना होणार असतो. जीवन-मरणाच्या ह्या लढाईत सबंध देशाचं भवितव्य ठरलेलं! आता बघायचं एकच की, हिसकावून घेतलेलं सिंहासन शूर सेनापती टिकवतो की आपल्या पूर्वजांची परंपरा चालवण्यासाठी राजपुत्र आपला अधिकार परत मिळवतो.

ही कथा सहज सुचली म्हणून सांगितली. याचा संबंध कसा आणि कुठे लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कर्नाटकात जे झालं ते झालं. आता मुद्दा उरतो की पुढे काय होणार. मोदी-शहा जोडीला हरवता येतं, त्यांच्याशी संघर्ष करता येतो अन त्यांना अडवताही येऊ शकतं हे कर्नाटकच्या निवडणूकीचा निष्कर्ष. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रादेशिक पक्षांना कॉंग्रेस ही भाजपपेक्षा थोडीशी जवळची वाटू लागली आहे. कारण केंद्रीय सत्ता, भाजपची साधन-संपत्तीची आमिष-दहशत आणि भाजपकडे असलेला मोठा आकडा हे सगळं झुगारून जेडीएस ने कॉंग्रेसचा आधार घेतला हे महत्वाचं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःकडे मोठा आकडा असूनही कॉंग्रेसने जेडीएस ला ‘विनाअट’ पाठिंबा दिला. ही सगळी बदलत्या काळाची समीकरणे म्हंटली पाहिजेत. भाजपचा सध्याचा नूर आणि सुर कुठल्याही प्रादेशिक पक्षांना पटणारा नाहीये.

भाजपची धोरणं किंवा विचारधारा यापेक्षा भाजपची राजकीय महत्वाकांक्षा ही प्रादेशिक पक्षांना जास्त धडकी भरवणारी. प्रादेशिक पक्ष व प्रादेशिक अस्मिता धुळीस मिळवून भाजप विविध राज्ये गिळंकृत करू पाहतोय हे एव्हाना प्रादेशिक शक्तींना कळालेलं आहे. मित्रपक्षांच्या आधारे राज्य मिळवायचं आणि नंतर मित्रपक्ष संपवायचे हे मोदी-शहांच्या भाजपचं वर्तन न पटणारं आहे. शिवसेना, टीडीपी, नितीशकुमार वगैरे वगैरे ही उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे भाजपशी कधीना कधी संघर्ष करावाच लागणार हे अटल सत्य मानून प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात एकसंध उभी राहताना दिसत आहेत.

कॉंग्रेस आधी आजच्या भाजपसारखी वागायची म्हणून तत्कालीन भाजपचे नेते अटलजींच्या नेतृत्वाखाली 28 प्रादेशिक पक्ष एकत्रित झाले. तेंव्हा कॉंग्रेसविरोधात (केवळ पक्ष नव्हे तर कॉंग्रेसच्या एककल्ली व अहंगड असणारी विचारधारा) एकत्रीकरण झालं होतं. तेंव्हाच्या माजोरी कॉंग्रेसपुढे नम्र, सभ्य अन उदारमतवादी अटलजी वाजपाई प्रादेशिक पक्ष व नेत्यांना जवळचे वाटत होते. आज हीच सगळी प्रक्रिया कॉंग्रेसच्या बाजूने व भाजपच्या विरोधात होऊ लागली आहेत. मोदी हे इतरांचं ऐकत नाहीत आणि मनाचा कारभार करतात हे खरं दुखणं आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष, नेते व अस्मितांना काहीच वाव राहिला नाही. त्या नेत्यांना व पक्षांना राहुल गांधी यांच्यासारखा सहजासहजी झुकवता येईल असा नेता जर केंद्रात असला तर हवच आहे. दिल्लीतील बादशाह थोडासा कमजोर असणे हे छोट्या राज्यांना फायदेशीर ठरतं हा जुना इतिहास आहे. पण आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचं अशा भूमिकेत असणार्‍या भाजपला रोखल्याशिवाय प्रादेशिक पक्षांना अर्थ उरणार नाही हे सत्य आहे.

गुजरातची निवडणूक ही राहुल गांधी यांची एक नेता म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठी पुरेशी आहे. आता इतर प्रादेशिक पक्षांना फक्त स्वतःची ताकत वाढवून ती कॉंग्रेसच्या पाठीशी उभी करायची आहे. आज जर कॉंग्रेस पडती भूमिका घेऊन ‘भाजपला रोखणे’ हा एकमेव अजेंडा घेऊन काम करत असेल तर लोकसभेची निवडणूक भाजपला कठीण जाऊ शकते. मोदींची एकाधिकारशही सध्या कोणालाही नको आहे. प्रादेशिक पक्षांना राज्यातील सत्तेत अधिक स्वारस्य असतं. कॉंग्रेस आणि भाजपा यांना केंद्रीय सत्तेत जास्त रस असतो. प्रादेशिक पक्षांना जर त्या-त्या राज्यात ताकत दिली अन तेथे हस्तक्षेप होणार नाही याची ग्वाही दिली तर ते केंद्रात सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेसला मदत करू शकतात.

अशी बातमी आहे की, कर्नाटकात कॉंग्रेसने जेडीएस ला विनाशर्त पाठिंबा देऊन भाजपचे सरकार येण्यापासून रोखावे, यासाठी इतर राज्यातील काही प्रादेशिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. येणार्‍या लोकसभा निवडणुकीतही कदाचित हीच रणनीती अवलंबली जाईल. काहीतरी करून कॉंग्रेसला उभं करायचं. कॉंग्रेस जर 150 चा आकडा गाठू शकली आणि भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहिली तर देशातील इतर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात. देवेगौडा, गुजराल हे ज्या स्थितीत पंतप्रधान बनले किमान तशी स्थिती निर्माण होऊ देणे यातच भाजपचा पराभव असणार आहे. कारण कॉंग्रेस व इतर पक्षांना भाजप (मोदी) सत्तेवर नको असणं हे जास्त महत्वाचं वाटतं.

एक मुद्दा अधोरेखित केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. तो म्हणजे शिवसेनेचा! कॉंग्रेसने जो विचार करून जेडीएस ला सत्ता दिली तो विचार शिवसेनेसाठी खूप आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जर भाजप स्वबळावर निवडून येऊ शकली नाही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊ शकतात. यात जर शिवसेनेला इतर दोघांपेक्षा (आजच्या परिस्थितीनुसार) जास्त जागा मिळाल्या तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. मध्यंतरीच्या काळात तशा हालचालीही झाल्या होत्या. सध्या शिवसेनेचा स्वबळाचा जोर हा त्याचसाठी असावा. कारण स्वतः स्वबळावर निवडून येण्यापेक्षा भाजप स्वबळावर निवडून येणार नाही इतकीच काळजी सेनेला सध्या घ्यावी लागणार आहे.

गुजरात विधानसभेची निवडणूक ही ट्रिगर होती. कर्नाटकची निवडणूक हा पहिला प्रयोग आहे. लोकसभा निवडणूक हे खरं संघर्षाचं मैदान असेल. येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः निवडून येण्यापेक्षा विरोधकाला अडवण्याचे खेळ जास्त खेळले जातील. ज्याची रणनीती उत्तम असेल तोच लोकशाहीच्या ह्या सर्कसचा रिंगमास्टर असेल.

-8-8-8-समाप्त-8-8-8-

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

माजलेले बोके अन सोकावलेले उंदीर!

राजकीय लेख  ||  उंदीर पुराण  ||  एकनाथ खडसे  ||  भ्रष्ट व्यवस्था  ||  विधिमंडळात उंदीर ||

लहानपणी टॉम अँड जेरी हे कार्टून सर्वांनीच बघितलेलं असेल. त्या कार्टूनमध्ये टॉम नावाचं मांजर जेरी नावाच्या मस्तीखोर उंदराच्या मागावर असतं. त्या दोघांचा सतत काहीतरी दंगा चालूच असतो. यात जी धमाल होते ती खूपच मजेशीर असते. या धुडगूसामध्ये कधी टॉम जेरीवर कुरघोडी करत असतो तर बर्‍याचदा जेरी काहीतरी खोड्या काढून टॉमला ‘जेरी’स आणतो अन धम्माल मजा करतो.  पण काहीही झालं, कितीही झालं तरी दोघांमध्ये कायमचे मनमुटाव कधी होत नाहीत. कारण त्यांच्यात एक बंध असतो… निखळ मैत्रीचा!!! कितीही भांडणे झाले तरी ते एकमेकांपसून कधी लांब जात नाहीत, कारण एकमेकांशिवाय त्यांना करमत तर नसतं.

       टॉम अँड जेरी या कार्टून मध्ये मैत्रीचं हे अनोखं नातं अप्रतिमरित्या रेखाटल आहे. त्यामुळेच कदाचित लहानग्यांपासून जेष्ठांना हे कार्टून आवडतं. तसं पाहता उंदीर आणि मांजर हे एकमेकांचे हाडवैरी. एकमेकांचे नैसर्गिक शत्रू! उंदराला मारून खाणे हा मांजराचा निसर्गधर्म आणि मांजरापासून बचाव करून जगने ही उंदराची नियती! पण हे सत्य त्या कार्टून मध्ये बदलण्यात आलं आहे. असं जर खरच झालं तर काय होईल याचा विचार केला पाहिजे!!!

              महाराष्ट्राच्या विधानभवनात कितीतरी पॉइंट कितीतरी उंदीर मारले यावरून सध्या खुमासदार चर्चा सुरू आहेत. या प्रकारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असेल असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या विषयाला खरी सुरुवात केली ती माजी विरोधी पक्षनेते, पूर्वाश्रमीचे बारा खात्यांचे मंत्री अन सध्या भाजपचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे! हे आरोप त्यांनी खरं तर एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या आवेशात केलेले दिसतात. त्यामुळे हे आरोप करताना ते कोणत्या भूमिकेत होते हे समजेल!

यू तो लढाई बनती ही थी

बस वजह और जगह ढुंड रहे थे

इन्तेकाम अभी बाकी है

तुम होश संभल के रहना…!

              एकनाथराव खडसे हे सध्या निर्णायक लढाईच्या तयारीत आहेत असं दिसत आहे. पक्षाकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि झालेला अन्याय त्यांना सहन होत नसावा म्हणून निमित्य काढून भाजपशी, सरकारशी अन फडणवीस यांच्याशी उघडपणे पंगा घ्यायचा अन वातावरण तापत ठेवायचं असा त्यांचा विचार दिसतोय. इतकी वर्षे राजकरणात विविध पदांवर काम केलेले खडसे असा हवेत अन मनमर्जि आरोप करणार नाहीत, अन तेही विधिमंडळात. या आरोपातून कोणती लढ सुरू होणार अन काय निष्पन्न होणार याचा पुरेपूर अंदाज त्यांना होता. असे स्वतःच्या सरकारवर आरोप केल्यावर माध्यमांत चर्चा तर होणारच होती आणि त्यांच्या आरोपांना भाजपमधील उथळ मंडळी नक्कीच प्रतिक्रिया देतील याची त्यांना खात्री असावी. तशी प्रतिक्रिया आयाराम राम कदम ह्या भाजपच्या प्रवक्त्यानी दिलीही अन त्याला परत प्रत्युत्तर खडसेंनी दिलंही. त्यानंतर मुनगंटीवर यांनीही तशीच प्रतिक्रिया दिली. खडसेंना हेच हवं होतं. या विषयावर चर्चा होत राहावी अन वातावरण तापत राहावं अशी त्यांची इच्छा होती. या सगळ्यातून त्यांना बंड करायला नैतिक आधार अन राजकीय पाठबळ मिळू शकलं असतं. त्यांच्या नाराजीची वारंवार चर्चा झाली असती जेणेकरून भाजप श्रेष्ठींना त्यांच्याबाबतीत काहीतरी निर्णय घेणे भाग पडले असते. मध्यंतरी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली अशी अफवाही होती. पण तूर्तास हे सगळं टळलेलं दिसत आहे. ते प्रकरण जरासं बाजूला पडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शांत राहून, थंड डोक्याने या विषयावर फार चर्चा होऊ दिली नाही. राम कदम वगैरे मंडळींना वेळीच आवरलं असावं.

              ह्या सगळ्या राजकरणात मजेशीर भाग आहे तो उंदरांचा! हा सगळा काय प्रकार आहे त्याचा काही नेमका खुलासा होताना दिसत नाही. किती उंदीर होते, किती उंदीर मारले, ते कुठे नेऊन टाकले याचे वेगवेगळे उत्तरं येत आहेत. पण यातून एक सत्य समोर आलं की, राजकारणी अन प्रशासकीय अधिकारी संगनमताने कसा ‘कारभार’ करतात.

भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी हे लोकशाही व्यवस्थेला लागलेले उंदीर असतात. संपूर्ण घराचा, धन-धान्याचा विचका केल्याशिवाय ते शांत होत नाही. तो मस्तीखोरपणा त्यांच्यात ठासून भरलेला असतो. घर पोखरून नेस्तनाबुत करणे हा तर त्यांचा निसर्गधर्म आहे. लोकशाही नावाचं घर ते गेली अनेक वर्षे पोखरत आहेत.

असे उंदीर किती आहेत, कुठे आहेत अन त्यांचा नायनाट कसा करायचा याचं औषध आपण स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षातनंतरही शोधू शकत नाही हे आपलं दुर्दैव म्हंटलं पाहिजे. 2012 साली ‘लोकपाल’ नावाचं जालिम औषध शोधलं असा गाजावाजा झाला पण त्या शोधातून काय बाय-प्रोडक्टस देशाला मिळालेत हे आपण बघत आहोतच. विशेष म्हणजे आज तेच ‘लोकपाल’ नायक आज परत एकदा दिल्लीत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याची चर्चा कुठेही होत नाही.

या व्यवस्थेचे खरे मालक (म्हणजे असं मानायचं) असलेल्या जनतेने त्या उंदरांचा बंदोबस्त करावा, त्यांना नियंत्रणात ठेवावं, घर स्वच्छ ठेवावं म्हणून अनेकदा अनेक “बोक्यांना” घरात घेतलं अन घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पण झालं असं की ज्या बोक्याला विश्वासाने ही जबाबदारी सोपवली होती त्यानेच उंदरांशी संगनमत करून सार्‍या घरात धुडगूस मांडला आहे. आता शिल्लक असलेलं घरही धोक्यात आलं आहे. ही टॉम अँड जेरी ची जोडी स्वतःचे इस्पित साध्य करत आहे. या टॉम अँड जेरी मुळे मनोरंजन न होता शोकांतिका होत आहे असं झालय.

मालकांनीही ह्या बोक्यांना कधी जाब विचारला नसल्याने हे बोके माजले आहेत. अलीकडे 2012 साली जनतेने असा जाब विचारला अन त्यातून देशात एक संक्रमणही घडलं, पण परत दुसर्‍यांना त्याजागी निवडलं तेही बोकेच निघाले. आणि घर पुरतं पोखरून झालं तर अटकाव करणारं कोणीही नसल्याने माजुन लोळ झालेले, निर्ढावलेले, निर्लज्ज उंदीरही भलतेच सोकावले आहेत.

ही माजलेल्या बोक्यांची अन सोकावलेल्या उंदरांची युती वरचेवर घातक होत आहे. त्याला कोण वेसण घालणार हा गहन प्रश्न आहे. चर्चेचा विषय असा की, पहारेकरी म्हणून “वाघ” बसलेले असताना हे बोके अन उंदीर इतका हैदोस घालतात कसे हाही महत्वाचा मुद्दा. हा प्रश्न एकदा वाघालाही विचारला पाहिजे. वाघाचा दरारा कमी झाला की वाघही जाणीवपूर्वक डोळेझाक करतो आहे? असो!

हा उंदीर अध्याय इतक्यावर संपेल असं वाटत नाही. हा केवळ पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध शिल्लक आहे असं जाणवत आहे. वरवर कितीही मजेशीर अन हलका-फुलका वाटत असला तरी याला राजकारणाचे अन भ्रष्ट व्यवस्थेचे अनेक पदर आहेत. शेवटी, “होईल जे जे, ते ते पहावे” हेच हाती. तूर्तास इतकेच!!!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

मलिश्काच्या निमित्ताने!!!

मलिश्काच्या निमित्ताने!!!

सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय का?

मलिश्का विरुद्ध शिवसेना वाद || मुंबई आणि पुणे  || रिचा सिंग  ||  अस्मिता आणि विकास  || #माझंमत  || RJ Malishka vs Shivsena

सोशल मीडियावर सध्या दोन प्रकार खूप गाजत आहेत. एक आहे अर्थातच मलिश्का नामक एका आरजे ने मुंबईतील समस्यांना केंद्रस्थानी धरत सध्या गाजत असलेल्या “सोनू… तुझा माझ्यावर भरवसा नाय का?” ह्या बालिश वाटणार्‍या गाण्यावर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला लक्ष केलं. आणि दूसरा मुद्दा आहे रिचा सिंग नामक एका उत्तर भारतीय तरुणीने पुण्याबाबतीत एक ट्विट केलं.

दोन्हीही ठिकाणी अमराठी (?) तरुणी आहेत. खरं तर ही एका दृष्टीने अभिमानाची बाब असायला हवी (?) की भारतातील तरुणी स्पष्टपणे एखाद्या मुद्द्यावर मत मांडून वाद घालत आहेत. ह्या धाडसाची प्रशंसा केली पाहिजे. कारण गपचूप ऐकून घेणार्‍या मुली ही संकल्पना कालबाह्य होत आहेत याचंच हे उदाहरण आहे. असो.

          तर दोन अमराठी तरुणी महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध शहरावर टिपन्नी करत आहेत. एक आहे मुंबई! जे केवळ महाराष्ट्रची राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानी तर आहेच पण सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूही आहे.

दुसर्‍या बाजूला आहे पुणे! ज्या शब्दातच जाज्वल्य अन स्वयंभूपणा आहे असं म्हणतात. पुणे म्हणजे महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी, आयटी सिटि आणि पट्टीच्या पुणेकरांचं हृदय!!!

ह्या दोनही शहरांची रचना वेगळी आहे. संस्कृती वेगळी आहे. तेथील लोकांचं राहणं-वागणं वेगळं आहे. राजकारणाचा बाजही वेगळा आहे. कदाचित त्यामुळेच हे वाद उफाळून आले असता त्यावर “प्रतिक्रिया”ही वेगळ्या उमटल्या.

आधी मुंबईकडे येऊ. मुंबईतील खड्डे हा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत चालणारा मुद्दा आहे. नुकत्याच मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये हेच खड्डे अन गटारी यावरून हमरीतुमरीची भाषा झाली. खिशातील राजीनाम्याची नौटंकीही झाली. पण अखेरीस पंचेवीस वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणार्‍या शिवसेनेची सत्ता पुन्हा आली. त्या निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं. आता, तो सगळा ज्ञात अन अधोरेखित झालेला इतिहास आहे.

मुंबईतील खड्डे, गटारी अन तुंबणारे पाणी यावर सतत वाद होतच असतात. पण ते राजकारणी, माध्यमं अन त्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोक अन संस्थेकडून होत असतात. नेमकं ह्यावेळेस हा मुद्दा एका आरजे ने उचलला अन त्यावर चर्चा सुरू झाली. आता मुंबईवर आणि मुंबई महापालिकेवर जर कोण टीका करत असेल तर ती टीका शिवसैनिकांच्या मनावर लागणार हे नक्की होतं. कारण हीच मुंबई महापालिका शिवसेनेचा प्राण आहे असं म्हणतात. पण सध्या राजकरणात सगळ्यांना एकत्रित अंगावर घेणार्‍या शिवसेनेला ह्या मुद्द्यावरून इतर राजकीय पक्षांनी घेरलं आणि गदारोळ सुरू झाला.

              सध्या काही माध्यमं शिवसेनेची बदनामी करण्यात आघाडीवर आहेत असं दिसतय. म्हणजे ‘चप्पलमार’ अशी पंधरा दिवस ब्रेकिंग न्यूज देणे अन महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान रजा मिळावी ही सेनेच्या एका महिला नगरसेवकची मागणी यावर चर्चा घडवून आणणे इथपर्यंत हे मुद्दे आहेत. रोज काहीतरी बातम्या दाखवून शिवसेना किंवा कोंग्रेस पक्षाला नकारात्मक प्रकाशझोतात ठेवणं चालू असतं. काही माध्यमं पक्षपाती अन जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत असा माझा तरी निष्कर्ष आहे ज्याच्याशी सगळ्यांनी सहमत असणं गरजेचं नाही.

मलिश्काचा वाद वाढलाच मुळात शिवसैनिकांनी तिला दिलेल्या प्रतिसादामुळे अन आगीला वारं घालणार्‍या माध्यमांमुळे. नाहीतर हा फुकटचा publicity स्टंट आहे हे कोणीही सांगितलं असतं. कारण एका आरजे मुलीला मुंबईच्या समस्या कधीपासून कळू लागल्या. ह्या चॅनलना आपला टीआरपी वाढवायचा असतो. हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. त्यासाठी ते काहीही करतात हे जगजाहीर आहे. दुर्दैवाने शिवसैनिकांना ते समजलं नाही अन त्यांच्या मेहरबानीमुळेच तिला फुकटाची प्रसिद्धी मिळाली. आता ती स्वतःला समाजसेवक म्हणवून घेईल इथपर्यंत प्रसिद्ध झाली आहे.

पण खरा मुद्दा इथेच सुरू होतो. की मुंबईच्या प्रत्येक समस्येला मुंबई महापालिकेशी जोडणे, माध्यमांनी त्याला हवा देणे अन मग राजकरण्याणी आपला उद्योग सुरू करणे. मुळात खड्डे, तुंबलेल्या गटारी अन विविध समस्या ह्या केवळ मुंबईतच आहेत का? महाराष्ट्रातीलच काय देशातील कुठलीही (एखादा अपवाद वगळता) महापालिका किंवा सामान्य शहर काढून बघा, तिथे ह्याच समस्या यावरूनही बिकट दिसतील. मग फक्त मुंबईलाच टार्गेट करणं आणि माध्यमांनी ते डोक्यावर घेणं याला अर्थ काय? महाराष्ट्रातील इतर शहरातही मराठी माणूसच राहत असतो, तिथेही भ्रष्टाचार होतोच की. मग वर्षाकाठी त्या शहरांची एकतरी बातमी माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज मध्ये द्यावी. लातूर-नांदेड सारखी शहरं (किंवा मराठवड्यातील कुठलाही शहर घ्या) माजी मुख्यमंत्र्यांची आहेत. तेथे काय परिस्थिती आहे. नागपुर आजी मुख्यमंत्र्यांचं शहर आहे. नाशिकमध्ये आधी नवनिर्माणवाले होते अन आता दत्तक आहेत आणि नुकताच झालेल्या पावसात ते शहर पाण्याखाली होतं. ठाणे कल्याण-डोंबिवली हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत…. मग फक्त मुंबईच का? तिथे जास्ततर नोकरदार, बडा व्यापारी, अधिकारी असा वर्ग असतो म्हणून का? सर्व माध्यमांची केंद्रे तिथे आहेत म्हणून फक्त तेथील बातम्या ठळक करणार का? आर्थिक राजधानी अन आंतरराष्ट्रीय शहर म्हणून तेथे राहतात त्याच माणसांना चांगल्या-उत्तम सुविधा अन लहान महापालिका शहरात राहणार्‍या लोकांना कसल्याही सुविधा चालतील असं आहे का? मुंबई महापालिकेचं बजेट कितीही असो पण इतर शहरांना त्यांच्या विकासासाठी पैसा नसतो का? केवळ शेतकर्‍यांनी बंद केल्यानंतरच, अपघात बलात्कार झाल्यानंतरच खेडी बातम्यात येणार का? तेथील नागरी समस्या मुख्य प्रकाशझोतात कधी येणार. का मुंबई-पुण्याच्या समस्यांना राज्याच्या समस्या मानून त्याच अग्रक्रमाने सोडवल्या गेल्या पाहिजेत?

मुळात मुंबई आणि इतर शहरं हा मुद्दा महत्वाचा आहे. सगळ्यांना शहरातील समस्यांवर तोडगा पाहिजे. कारण त्यांना चांगलं राहणीमान पाहिजे असतं. छोटी शहरं ही दुर्लक्षितच राहतात.

Image result for Malishka vs shivsena

                   आता थोडं अस्मिता अन राजकारण ह्या मुद्द्यांकडे वळलं पाहिजे. मलिश्काने मुंबई महापलिकेला टार्गेट केलं अन शिवसैनिकांनी मलिश्काला. यामुळे भाजप अन मुंबईपुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण हीच भाजपा गेली पंचेवीस वर्षे महापालिका सत्तेत आहे आणि सध्या यांचेच मुख्यमंत्री आहेत. रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते मलिश्काने जरी महापालिकेकडे वर्ग केले असले तरी त्याची जबाबदारी भाजपची आहे. दुसरीकडे, मनसे तर जमेल तशी तलवार चालवायला बघत असते. हीच मनसे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी यासाठी आग्रही होती. ते जर घडलं असतं अन मलिश्काने असं गाणं केलं असतं तर आज मनसैनिक मलिश्काच्या घराबाहेर खळ खटॅक करताना दिसले असते.

शिवसैनिकांनी उथळपणा केला हे खरं. पण सध्या राजकारण इतकं गढूळ झालं आहे अन शिवसेना त्यात एकटी असल्याने मलिश्काचा बोलवता धनी दुसराच कोणीतरी असेल असं त्यांना वाटलं असावं. शिवाय त्या गाण्यात मुंबईतील प्रत्येक समस्येला थेट महापालिकेशी जोडलं आहे. जसं सामान्य माणूस सध्या देशातील प्रत्येक गोष्टीला मोदींशी जोडतो. मुंबईतील समस्यांवर आवाज उठवायचा अधिकार मुंबईत राहणार्‍या प्रत्येकाला आहेच. त्या सुधारायला हव्यात यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. पण त्या गाण्यातून BMC वर ज्या प्रकारे हल्ला चढवला तो नक्कीच द्वेषातून आलेला वाटतो. त्यांचं म्हणणं असं की, मुंबईकराचा BMC वर बिलकुल भरवसा नाय. इतक्या उथळपणे हे होतं की त्याला त्याच प्रकारे उत्तर आलं. पण पाचशे कोटींचा दावा हा संतापतून आला असावा. डेंगूच्या अळ्या मात्र उत्तम स्ट्रोक होता. कारण दोन माणसं बोलताना, एकाने दुसर्‍याची चूक दाखवली तर दुसराही पहिल्याची चूक दाखवतोच. तो मानवी स्वभाव आहे.

आता महत्वाचा मुद्दा आहे मराठी माणसाचा. मराठी हा मुद्दा मुंबई पट्टा अन उर्वरित महाराष्ट्र यात खूप वेगवेगळा आहे. मुंबईतील मराठी माणूस अन मराठीच्या वाढीसाठी सतत कार्यरत असणारा कार्यकर्ता हा विभागलेला आहे. त्यात दोन बंधु अन त्यांचे दोन पक्ष यामुळे फुट आहे असं दिसतं. आज जो प्रकार चालू आहे तो निव्वळ मुंबईतील समस्या याच्याशी निगडीत आहे असं वाटत नाही. आज रेडियोएफएम वाल्यांनी दूसरा विडियो टाकला आहे ज्यात थेटपणे शिवसेनेवर वार करण्यात आले आहेत. इतकं धाडस कुठलातरी राजकीय वरदहस्त अन पाठबळ असल्याशिवाय कोणीही करणार नाही. सुरुवात जरी अराजकीय असली तरी नंतर त्याला राजकीय ‘पाठबळ’ मिळालेलं दिसत आहे. सध्याची माध्यमं ही भाजपच्या मर्जीतील आहेत असं म्हणतात. मग त्यात एखादं रेडियो चॅनेल काय चीज?

मुंबई महापालिकेत भाजप सत्ता काबिज करू शकली नाही. ती सत्ता मिळावी म्हणून वाट्टेल ते प्रकार केले होते. नुकतच खुद्द मुख्यमंत्री म्हणाले की जैन समजामुळे भाजपला मुंबईत यश मिळालं. मुंबईत पंचेवीस वर्ष मराठी पक्षाची सत्ता आहे हे अमराठी लोकांना खुपत असेलच. सतत मुंबई महापालिकेला गैरकृत्यांसाठी चर्चेत ठेवलं जातं. हा निव्वळ योगायोग असावा का?

महाराष्ट्र किंवा देशातील अशी कोणती महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिथे भ्रष्टाचार होत नाही. सगळीकडे आलबेल कारभार आहे अन फक्त मुंबईत काय तो भ्रष्ट कारभार चालू आहे असा समज पसरवला जातोय. यातील एकही ‘समाजसेवी’ पुणे-नाशिक-औरंगाबाद-ठाणे-नागपुर इथे प्रश्न विचारायला पुढे सरसावत नाही. आता विरोधी पक्षांना ती आरजे म्हणजे देवदूताप्रमाणे वाटत असणार. पण त्यांच्या कृत्यामागे राजकारण असू शकतं. दूसरा विडियो तर त्याचच द्योतक आहे.

यात विदूषकी भाग म्हणजे, नीतेश का नीलेश राणे यांनी मलिश्काची बाजू घेतली. हेच राणे झेंडा चित्रपटाच्या वेळेस ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ मानायला तयार नव्हते अन त्यांनी अवधूत गुप्ते यांना काय वागणूक दिली ती संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे.

यात मनसे सारख्या पक्षाने जी भूमिका घेतली ती अपेक्षितच होती. कारण सतत शिवसेनेला अडचणीत आणायचं राजकारण करायचा त्यांचा प्रयत्न असतो. निवडणुकीच्या वेळेस सहानुभूती मिळवायची अन इतर वेळेस टोकाचा विरोध. जिथे त्यांची एकवेळ सत्ता होती त्या नाशिकवर असं गाणं त्यांनी सहन केलं असतं का? किंवा चित्रपट वगैरे बंद पाडणारे हेच असतात. मनसे नेते मराठीसाठी बेळगावात मराठी माणसावर अत्याचार करणार्‍या कन्नड संघटनेशी हातमिळवणी करायला तयार असतात पण मुंबईतील एकाही मुद्द्यावर त्यांचं शिवसेनेशी मतैक्य का होत नसावं?

ह्या सगळ्यावरून मी शिवसैनिक किंवा सेनासमर्थक असेल अशी सर्रास टिपन्नी होऊ शकते. पण हे माझं उघड मत आहे. शिवसेना मुंबईत फक्त समाजसेवा करते, बिलकुल भ्रष्टाचारी नाही, मुंबई त्यांनी खूप सुंदर बनवली असा माझा दावा अजिबात नाही. शिवसेनाही इतर पक्षांप्रमाणेच आहे. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार ही तर सर्वांचीच लक्षणे. त्यांनी कारभार सुधारायला हवा हेही खरं. पण मुंबई अन महापालिका शिवसेनेची आहे असं गृहीत धरून सगळं राजकारण चालत असतं ते खरंतर चुकीच आहे.

धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या नावाखाली विकासाचे प्रश्न झाकले जातात हे सर्रास होतं. पण मुंबईत विकासाच्या नावाखाली अस्मितेचा मुद्दा झाकोळला गेला पाहिजे असा बर्‍याच मंडळींचा प्रयत्न असतो. लातूरसारखा जिल्हा अनेक दशके कोंग्रेसच्या ताब्यात आहे. यातून दोन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल झाले. त्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर एखादा पक्ष अनेक दशके राज्य करतो हे काही नवीन नाही. तो काही खूप विकास करतो असंही नाही. मुंबईत इतर पक्षांची सत्ता आली तर मुंबई चकाचक होईल याची ‘हमी’ कोण देऊ शकतं का? मग निदान मराठीचा मुद्दा हाताळणारी शिवसेना काय वाईट? मुंबईत एखादा मराठी अस्मिता (निदान मुखी तरी असणारा) बाळगणारा पक्ष गेली पंचेवीस वर्ष अधिराज्य कसा गाजवतो ही सल अनेक मनांमध्ये आहेच. येथे मराठी माणूस एकसंध नाही उभा राहिला याची खंत वाटते.

              दूसरा मुद्दा होता तो रिचा सिंग नावाच्या एका अमराठी तरुणीने पुण्यावर केलेले ट्विट. अर्थात पट्टीच्या पुणेकरांनी तिची दिवसभर हजेरी घेतलीच म्हणा. आपल्या स्वगृही परतल्यावर त्यांना दृष्टान्त झाला अन पुण्यावर ट्विटत सुटल्या बाई. एकतर हे इथे राहतात. मराठी न शिकता हिंदीतच कारभार करतात. मराठी शिकणे ह्यांना गरजेचं वाटत नाही. आणि सगळं झाल्यावर ह्यांना दृष्टान्त होतात. हे म्हणजे रक्ताचे पाणी करून पोराला शिकवणार्‍या आईबापाला पोरगं मोठं झाल्यावर ‘तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही. साधा कम्प्युटरही घेऊन दिला नाही, गाडीही घेऊन दिली नाही’ असं म्हणण्यातील प्रकार आहे. उद्या जर त्या मलीश्काला काही झालं अन मुंबई महापालिकेतील कर्मचारी किंवा तिची टीका ‘झोंबलेल्या’ व्यक्तीने मदत नाकारली तर मग काय? म्हणजे सगळ्या सोयी घेणार हे आणि मग वाट्टेल तशी टीका करणार.

त्या रिचा सिंगच्या वक्तव्यावर सगळे पुणेकर एकत्रित येऊन प्रतिक्रिया देऊ लागले. तो प्रकार मलीश्का प्रकरणात दिसला नाही. कारण मुंबईतील मराठी माणूस विभागलेला आहेच हे सत्य आहे. शहरावर, पालिकेवर होणारी टीका त्यांना सेनेवरील टीका वाटली तर दुसरीकडे पक्ष, महापालिका, विकास वगैरे सगळं विसरून #सरसकट पुणेकर #निकष न बघता #तत्वत: तिच्यावर तुटून पडले. एकंदरीत #पुणेकरांची ही नस खूपच भारी आहे. पू. लं. म्हणतात तसं, पुणेकरांना पुण्याबद्धल जाज्वल्य अभिमान आहे. पक्का पुणेकर रोज एकमेकाशी भांडेल, उरावर बसेल पण बाहेरचा कोणी आला तर मिळून त्याला उरावर घेतील. पेठेतला अन उपनगरीय अशा पुणेकरात वाद असले तरी मुंबईच्या माणसाची ते दोघे ‘पुणेकर’ म्हणूनच खेचत असतात.

मुंबई व महापालिकेवरील टीका शिवसेनेनी मनावर घेतली अन पुण्यावर झालेली टीका पुणेकरांनी मनावर घेतली हा फक्त भेद आहे. कारण पुण्यातील माणसावर पक्षीय शिक्का कधी उमटत नाही. असला तरी पुणेरी टोपीखाली तो झाकला जातो. उलट मुंबईतील माणसाच्या मनात पक्ष घर करून असतात. कोण शिवसेनेचा, कोण मनसेचा तर कोण भाजपचा. मुंबईकर यापेक्षा ती ओळख गडद वाटते. पुणेरी स्वभावात दिसणारा हा एकसंधपणा मुंबईतील मराठी माणसात दिसत नाही. अर्थात पुणेकर हा स्वयंभू असतो तो भाग वेगळा.

ह्या दोन प्रकरणात दोन शहरातील, त्यात राहणार्‍या माणसांतील, स्वभावातील, अस्मितेतील अन राजकीय समजतेतील भेद स्पष्टपणे दिसतो. समान असलेल्या घटनेवर दोन शहरं कशी भिन्न प्रतिक्रिया देतात हे विशेष!

|| कुठे चूक झाली असेल तर क्षमा!  ||

विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान

वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम

#भारतीय_मानसिकता ||  #वसुधैव_कुटुंबकम  ||  #परदेशी_नागरिकत्व  || #वंश  || #माझंमत  ||  अस्मितेचे प्रश्न

नुकतच एक बातमी आली ज्याने आपल्या भारतीयांची अन त्यातल्या त्यात महाराष्ट्राची अन त्यातल्या त्यात कोकणवासीयांची मान अभिमानाने ताठ वगैरे झाली होती. ती बातमी होती, लियो वर्‍हाडकर नावाचा मूळ भारतीय-मराठी व्यक्ति आयरलॅंड देशाचा पंतप्रधान झाला. आपल्याकडील बालिश माध्यमांनी त्यांच्या घरी जाऊन डेरा टाकला होता अन त्यातले माहीत असलेले नसलेले गुण ठासून संगितले.

भारतात जगाचा विश्वगुरू बनायची कुवत आहे हे आपण अनेकदा ऐकलं असेल. त्याचीच सुरुवात की काय म्हणून सध्या जगभरात भारतीय ‘वंशाचे’ असलेले लोक मोठमोठ्या पदांवर विराजमान होत आहेत. अगदी गूगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे कंपनीमध्येही भारतीय सर्वोच्च पदावर स्वतःच्या स्व-कर्तुत्वाने पोचले आहेत. खरं तर एकाच ‘वंशाचे’ म्हणून आपण त्यांचं कौतुक करणे अन अभिमानाने आपली छाती भरून येणे साहजिक आहे.

त्यानंतर आपण जरा राजकीय क्षेत्रात बघितलं तरी जगातील विविध देशात भारतीय ‘वंशाचे’ अनेक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आपल्याला मोठमोठ्या पदांवर विराजमान होताना दिसत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री निकी हॅले यासुद्धा मूळ भारतीय वंशाच्या आहेत म्हणे. त्यानंतर कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन नावाचे एक मूळ शीख (भारतीय) ‘वंशाचे’ आहेत. कॅनडाच्या कॅबिनेट मंत्र्यांत जितके शीख बांधव मंत्री म्हणून आहेत तितके आपल्या भारतातही नाहीत. त्यांच्या संसदेतही बरेच शीख बांधव आहेत. अमेरिकन संसदेतही बरेच भारतीय ‘वंशाचे’ लोक निवडून आले आहेत. बॉबी जिंदाल नावाचे मूळ भारतीय ‘वंशाचे’ नेते सध्या अमेरिकेतील Louisiana ह्या मोठ्या राज्याचे गवर्नर आहेत. भविष्यात ते त्यांच्या पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. आणि तेथील लोकांनी निवडून दिलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक भारतीय ‘वंशाची’ व्यक्ति असेल. नुकत्याच ब्रिटेनच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यातही बरीच भारतीय वंशाची मंडळी निवडून आली. ही यादी बरीच मोठी आहे. एकंदरीत काय तर भारतीय ‘वंशाची’ व्यक्ती बाहेरदेशात जाऊन तेथील राजकरणात स्वतःच्या कर्तुत्वाने जागा निर्माण करू शकते अन सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते.

              हे सगळं बघून आपल्या सर्वांना अभिमान वाटणे साहजिक आहे. पण आपल्या भारतात एकही परदेशी व्यक्ति अशा पदावर पोहोचणे शक्य आहे का हा विचार मनात आला. यात पहिलं नाव आठवलं ते अर्थातच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं. सोनिया यांचा राजीव यांच्याशी विवाह 1968 साली झाला होता. त्यानंतरच्या गोष्टी इतिहासात नमूद आहेत. त्यानंतर 1999 साली त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडून आल्या. त्यांच्या परदेशी नागरिकत्व ह्या मुद्द्यावर शरद पवार वगैरे मंडळींनी तीव्र आक्षेप घेत वेगळा पक्ष काढला अन काहीच दिवसांत त्यांच्याशी आघाडी केली, त्यांच्या नेतृत्वात मंत्रिपद उपभोगलं अन आज ते त्याच पक्षासोबत आहेत. हा इतिहास आहे.

सोनिया गांधी भारतात आल्यानंतर इंदिरा गांधी अन राजीव गांधी हे पंतप्रधान पदावर राहिले होते. सोनिया गांधी यांनी देशाचं राजकारण जवळून, म्हणजे अगदी सत्ताकेंद्रापसून पाहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना देश माहीत नाही असा भाग नव्हता. राजकारणाचा भाग काहीही असो, पण सोनिया गांधी जेंव्हा राजकरणात आल्या तेंव्हा देशाचे राजकारण ढवळून निघालं. अक्षरशः त्यांच्याच पक्षात गोंधळ माजला अन फुट पडली. एक परदेशी बाई भारतीय राजकरणात महत्वाची भूमिका बजावत आहे हे कोणालाच मान्य नव्हतं. त्यावरून अतिशय खालच्या थराची टीकाही झाली. ते चूक-बरोबर असा काही विषय नाही. पण ज्याप्रमाणे परदेशात भारतीय वंशाच्या व्यक्तिला स्वीकारले जातं त्याप्रमाणे आपण केलेलं नाही. सोनिया गांधी यांच्या हेतुवरही शंका उपस्थित केल्या जात होत्या अन त्या आजही तशाच आहेत. मग जे भारतीय परदेशात मोठ्या पदावर विराजमान होत आहेत त्यांचा इतिहास-भूगोल माहीत नसताना आपण इथे बसून टाळ्या वाजवण्यात काय अर्थ आहे. तिकडे जिंदाल, वर्‍हाडकर, हॅले, सज्जन यांच्या हेतुवर शंका उपस्थित केलेली दिसत नाही. मग आपणच इतके कद्रू कसे? हे म्हणजे. आपला तो बाब्या अन दुसर्‍याचं ते कारटं यातला प्रकार झाला. दुसर्‍या देशात भारतीय मोठा झाला की वाहवा करायची अन भारतात परदेशी व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला शिव्या द्यायच्या. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा भारत तो हाच का मग?

2004 साली जनतेने सोनिया यांच्यावर विश्वास ठेऊन कोंग्रेसला मते दिली का भाजप नको म्हणून, हे सांगणं कठीण आहे. येथे सोनिया गांधी यांची बाजू घेण्याची काहीही हौस नाही हेही स्पष्ट करू इच्छितो नाहीतर देशभक्तांच्या गर्दीत मी देशद्रोही जाहीर व्हायचो. त्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा अनागोंदी कारभार यावर चर्चा होऊ शकते. पण एकंदरीत भारतीय मानसिकता मला खूप आश्चर्यचकित करणारी वाटली. एका बाजूला “वसुधैव कुटुंबकम” हे घोषवाक्य आमचं असं मिरवत जगाला उपदेश करायचा अन स्वतःच्या घरात बाहेरच्याला महत्वाची जागा देताना कद्रूपणा करायचा हा भाग पटत नाही.

परदेशातील भारतीय ‘वंशाच्या’ व्यक्ति स्वकर्तुत्वाने त्या पदावर पोचल्या, इथे सोनिया यांचं कर्तुत्व काय होतं? किंवा घराणेशाही वगैरे हा मुद्दा ग्राह्य धरला तरी त्यांच्या परदेशी असण्याबद्दल सतत शंका का उपस्थित केल्या जातात हा प्रश्न आहे. भारताचा संरक्षणमंत्री किंवा परराष्ट्रमंत्री हा परदेशी व्यक्ति आहे हे आपण कधी मान्य करू का? मुद्दा केवळ सोनिया गांधी यांच्या असण्या-नसण्याचा नाही, पण परदेशात भारतीयांना ज्या मोठ्या मनाने स्वीकारलं गेलं त्याप्रकारे आपण स्वीकारू का हा प्रश्न आहे. हा मुद्दा केवळ नागरिक नव्हे तर राजकरणी, माध्यमं, विचारवंत अन साहित्यिक इथपर्यंत जाऊन पोचतो. आपल्यात ती वसुधैव कुटुंबकम वाली भावना आहे का हाच प्रश्न आहे. मध्यप्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांचे आजी-माजी मुख्यमंत्री मूळ मराठी आहेत/होते असं अभिमानाने सांगताना मूळ उत्तरप्रदेश किंवा अन्य राज्यातला माणूस आपण मुख्यमंत्री म्हणून स्वीकारू का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. जर कर्तुत्व अन जाण असेल तर आपण ‘वंश’ याच्यापुढे जाणार का हाच कळीचा मुद्दा आहे.

@Late_Night1991  || अभिषेक बुचके

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

पाच राज्यांच्या निवडणूक निकलांचं विश्लेषण

पाच राज्यांच्या निवडणूक निकलांचं विश्लेषण

UP Election Results || Punjab Election Results || Goa Election Results

पाच राज्यांच्या निवडणूक निकलांचे अर्थ || मोदी || अमरिंदर सिंग || राहुल गांधी || अखिलेख यादव 

आज उत्तरप्रदेश या भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. उत्तर प्रदेश मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय हा ह्या निवडणूक निकलांचं वैशिष्ट म्हणावं लागेल. 403 पैकी जवळपास 325 जागा जिंकत भाजपने सगळ्यांना धक्का दिला. हा धक्का इतका जबरदस्त होता की केवळ विरोधकच नव्हे तर पत्रकार समीक्षक अन भाजप नेतेही ह्या यशाने अवाक झालेले बघायला मिळत आहेत. त्यात भाजप प्रवक्ते तर दिवसभर एखाद्या आभासी दुनियेत असल्यासारखे दिसत होते. असो.

निवडणुका झाल्या अन निकाल आले पण भाजपने उत्तर प्रदेश मध्ये जे यश मिळवलं आहे ते इतर पक्ष अन खासकरून प्रादेशिक पक्षांसमोर एक मोठं आव्हान निर्माण केलं आहे. भाजपचा अश्वमेध रोखायचा कसा हा मोठा प्रश्न इतर पक्षांना भेडसावत आहे. नेमकं काय आहे जेणेकरून भाजपला इतकं अभूतपूर्व यश मिळत आहे? असा प्रश्न आहे. देशभर भाजपचा जे वादळ किंबहुना मोदी-शहा यांचा जो प्रभाव आहे तो कशामुळे आहे हे समजुतीच्या पुढे आहे.

भाजपच्या विजयाचं गणित

उत्तर भारत हा पहिल्यापासून भाजपचा गड राहिला आहे. त्या प्रदेशात कधीना कधी भाजप सत्तेत राहिलेला आहे. फक्त आज मोदी हा लोकांना भुरळ पडणारा चेहरा भाजपकडे आहे आणि शहा यांच्यासारखा निवडणूक तज्ञ त्यांच्याकडे आहे. पण इतकं असून चालत नाही. मग काय कारण आहे?

भाजप कुठे वाढत आहे. तर जिथे याच्या आधी इतर पक्ष सत्ता राबवत होते तिथे भाजपची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्तर प्रदेश मध्ये गेली अनेक वर्षे सपा बसपा यांचं आलटून पालटून सरकार येत राहिलं. त्यात कॉंग्रेस अन भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांना कधीच स्थान नव्हतं. इतर प्रादेशिक पक्षांनी अस्मिता व इतर नावाखाली सत्ता राबवली पण त्या राज्यांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तिथे अनेक वर्षे भाजपची सत्ता नसल्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात सपा अन बसपा ला जनतेने पूर्ण बहुमत दिलं होतं. पण मायावतींनी पैसा अन पुतळ्याचा पलीकडे काहीच केलं नाही. राज्याचा विकास झाला नाही. तेथून जत्थेच्या जत्थे परप्रांतात रोजगारासाठी भटकू लागले. सपा शासन आल्यानंतरही पुन्हा तोच प्रकार झाला. गुंडगिरी अन जातीयवाद वाढला. हे सगळं दिसत असताना जनतेला मोदींसारखा एक नेता दिसला. सपा बसपा यांच्याकडून निराशा झाल्यावर त्यांना एक नवीन पर्याय हवा होता. सगळ्यांना एक संधि दिली आता एकदा भाजपला देऊन बघूया हीच मानसिकता होती. भाजपचा प्रचंड विजय हा त्यातूनच आलेला आहे.

यादव कुटुंबातील कलह, कॉंग्रेस-सपा युती, मुस्लिम मतांचं विभाजन ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या पथ्यावर नक्कीच पडल्या. पण त्याने इतकं अभूतपूर्व यश मिळालं नसतं. जनतेने ठरवलं होतं की आता नवीन पर्याय निवडायचा. त्यांना मग नोटबंदीमुळे स्वतःला अन अर्थव्यवस्थेला बसलेला फटका असेल किंवा भाजपने अनेकांची केलेली भरती असेल याच्याशी कर्तव्य नव्हतं. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की भाजप जिंकणार. ही केवळ मोदी लाट असती तर ती पंजाब, गोवा अन मणीपुर मध्येही दिसायला हवी होती. पण तसं झालं नाही. पंजाबमध्ये गेली दहा वर्षे भाजप अकाली सोबत सत्तेत आहे. तेथे सत्ताधारी पक्षाला पराभूत करायची मानसिकता लोकांत निर्माण झाली होती. त्यांना सक्षम पर्यायाचा शोध होता. सुरूवातीला आप सारखा पक्ष त्यांना तो पर्याय वाटला असेल पण नंतर त्यांचाही फोलपणा दिसला. मग त्यांच्यासमोर त्या कॉंग्रेसचा पर्याय होता ज्यांची देशभर हारकिरी सुरू आहे. कॉंग्रेस जर इतकी वाईट असती तर पंजाब, गोवा अन मणीपुरमध्ये त्यांना विजय मिळायला नको होता. पण जनतेला सक्षम पर्याय हवा असतो. एक चेहरा हवा असतो ज्यांच्यावर विश्वास टाकता यावा. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी तो पर्याय दिला अन कॉंग्रेस विजयी झाली.

कॉंग्रेसने इतकी वर्षे स्थानिक नेतृत्वाला कापण्यात, त्यांचं खच्ची करण्यात वेळ घालवला. जनाधार असलेले नेते पक्षात आव्हान निर्माण करतील ह्या भीतीने कधी चाणाक्ष नेत्यांना वाव दिलाच नाही. कायम त्यांच्या पायात पाय घालण्यात धन्यता मानली. महाराष्ट्रातही विलासराव देशमुख यांच्यासारखा जनाधार असलेला नेत्यालाही त्यांनी अनेकदा खेळवत ठेवलं. अलीकडेच आसामच्या निवडणुकीतही तेच झालं. आम्ही चालवू तसा पक्ष चालला पाहिजे अन जनतेने त्याच्यामागे फरफटत यावे अशी त्यांची मनीषा होती. जे अमरिंदार सिंग आज पंजाबमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार आहेत त्यांनाही पक्षात त्रास दिला गेला अन एक वेळ अशी येऊन ठेपली की त्यांनी दूसरा स्वतंत्र पक्ष काढायची तयारी सुरू केली होती. कॉंग्रेसची आज जी परिस्थिती आहे त्याला त्यांचं वरिष्ठ नेतृत्वच जबाबदार आहे. अजूनही कॉंग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. किंबहुना भाजपवर नाराज असलेला वर्गही मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. पण कॉंग्रेस अजूनही जुनाट राजकरणात अडकली आहे.

Image result for modi shah

गोव्यातील कॉंग्रेसला मिळालेलं यश अनपेक्षित आहे. तेथे त्यांची विरोधी पक्ष म्हणून कामगिरी फार चांगली नव्हती असं म्हणतात. पण भाजपच्या राजवटीला किंवा नोटबंदी वगैरे निर्णयाला विरोध करणार्‍या जनतेनेच कॉंग्रेसला मते देऊन विजयी केलं ज्याची त्यांना अपेक्षाही नव्हती. कॉंग्रेसने अजून जोर लावला असता, चांगले उमेदवार दिले असते तर गोवा आज एकहाती कॉंग्रेसकडे असतं. पण ते घडलं नाही. तेथे अमरिंदार यांच्यासारखा चेहरा नसल्याने त्यांचं नुकसान झालं. सर्जिकल स्ट्राइक करणारे संरक्षणमंत्री गोव्याचे असताना त्यांच्या नावावर भाजपला मते मिळाली नाहीत. त्यांचे मुख्यमंत्री अन मंत्रिमंडळ पराभूत झालं. इतकी भाजपविरोधी लाट गोव्यात होती. पण कॉंग्रेसला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता.

          आज निवडणुकीचे निकाल बाहेर आल्यावर भाजपविरोधी राजकारण करणार्‍या ओमर अब्दुल्ला यांचं ट्वीट बघून कीव आली. ते म्हणतात की 2019 च्या लोकसभा आम्ही गमवल्या आहेत आता तयारी 2024 करायची. मोदींना विरोध करू शकणारा चेहरा नाही… हे आहेत मोदींचे विरोधक. त्यांच्या मनात मोदी नावाची धडकी भरली आहे. खरं तर ही सगळी त्यांनी केलेल्या कर्माची अन न केलेल्या कामाची फळे आहेत. मोदींनी सत्तेत येऊन अशी काय भरीव कामे केलीत ती तरी आठवतात का? मोदींनी सत्तेत आल्यावर आपली 30% सुद्धा आश्वासणे पूर्ण केली नाहीत तरी विरोधक असे बोलत आहेत. आज भाजप अन मोदींना मते पडत आहेत ती तुमचे विरोधक म्हणून. पैसा सत्ता यांचा वापर तर सगळेच सत्ताधारी करतात पण मोदींनी एक नशा लावली आहे. ती उतरवणे विरोधकांचं काम असतं. मोदींना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत, नितीशकुमार यांनी बिहार, ममता दीदी यांनी बंगाल मध्ये, डाव्यांनी केरळ मध्ये रोखलंच की. मग हे सगळं सोयिस्कररित्या कसं विसरता येईल. उत्तराखंड सारख्या राज्यांत आलटून पालटून सरकार येतात असतात. यंदाही तेच झालं. भाजपने त्यासाठी एन. डी. तिवारी सारख्या नेत्यालाही पक्षात घ्यायचं सोडलेलं नाही. आणि जनतेनेही ते स्वीकारलं हे विशेष.

मोदी हे आजतरी राजकीय पटलावरील नायक ठरत आहेत. पण त्यासाठी परिस्थिती जास्त करणीभूत आहे. एकेकाळी कॉंग्रेसही असे विजय मिळवत होती. आज ती कॉंग्रेसरसातळाला गेली आहे. निवडणूक जिंकणे हे तंत्र असतं. आधी ते कॉंग्रेसला अवगत होतं आता ते भाजपला अवगत झालं आहे.

कॉंग्रेसमुक्त भारत?

भाजप अन मोदी यांचं मुख्य स्वप्न म्हणजे कॉंग्रेसमुक्त भारत. काहीही करून कॉंग्रेसला पराभूत करायचं आणि देशातील शेवटच्या ग्रामपंचायत पर्यन्त भाजपचा विजय करायचा हा भाजपचा अजेंडा आहे. उत्तरप्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये आज भाजप भलेही पूर्ण बहुमताने निवडून आला असेल पण पंजाब, मणीपुर अन कदाचित गोव्यातही कॉंग्रेस सत्तेत बसत आहे. त्यामुळे कॉंग्रेसमुक्त भारत हे स्वप्न सत्यात उतरणे अशक्य आहे. आज महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा परिषद कॉंग्रेस-एनसीपी ने जिंकल्या आहेत. पंजाबसारखं एक महत्वाचं राज्य कॉंग्रेसने बहुमताने जिंकलं आहे. उत्तर प्रदेशात भाजपने ज्या प्रकारे स्थानिक प्रादेशिक पक्षांना पराभूत करत बहुमत मिळवलं तोच प्रकार पंजाबमध्ये झाला आहे.

Image result for congress

गोव्यात काय होणार हे खूप महत्वाचं होतं. कारण गोवा हे ख्रिश्चन बहुल प्रदेश आहे. तिथे गेल्या वेळेस भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणे ही साधारण गोष्ट नव्हती. शिवाय मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री झाले अन त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करून दाखवला याचा त्यांना फायदा होतो का हे बघणेही महत्वाचं होतं. शिवाय नोटबंदीचा तीव्र फटका त्या राज्याला बसला होता कारण ते राज्यच मुळात पर्यटनावर अवलंबून होतं. ह्या सगळ्यात भाजपने संपूर्ण शक्ति पणाला लावली होती अन कॉंग्रेस मात्र नेहमीप्रमाणे गटातटात होती अन पारंपरिक पद्धतीने लढत होती. इतकं होऊनही कॉंग्रेस तेथे सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे मुख्यमंत्री अन आठ मंत्री पराभूत झाले. हा त्यांचा दारुण पराभव म्हणावा लागेल. भाजपला ख्रिश्चन मते मिळाली, त्यांचे सात ख्रिश्चन उमेदवार निवडून आले तरीही कॉंग्रेस त्यांच्यापेक्षा मोठा पक्ष ठरला ही बाब उल्लेखनीय आहे. विस्कळीत असलेल्या कॉंग्रेसला मिळालेला विजय म्हणजे, जनतेच्या लक्षात कॉंग्रेस अजूनही आहे असा होतो. त्यामुळे कॉंग्रेसने हे राज्य मिळवलं असं म्हंटलं पाहिजे.

मणीपुर हा कॉंग्रेसचा गड राहिला आहे. इरोम शर्मिला ह्या लोकहितवादी महिला नेत्या यांचं आव्हान अन भाजपचा शिरकाव करण्याचा प्रयत्न असं दुहेरी आव्हान असतानाही कॉंग्रेसने केलेली कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल.

जनतेने कॉंग्रेसला अजून पुर्णपणे नाकारलेलं नाही. पण कॉंग्रेसलाच स्वतःबद्धल विश्वास नाही राहिला. पंजाबमध्ये एका नेत्याने जे कॅप्टन पद स्वीकारून जनतेचा विश्वास संपादन केला. राज्याराज्यांत कॉंग्रेसकडे तसे चेहरे आहेत ज्यांना समोर आणलं पाहिजे.

मोदींना विनंती

आता मोदींना आठवण करून द्यावं लागेल की ते भारत या देशाचे पंतप्रधान आहेत. परदेश दौरे झाले की प्रचारसभा एवढच त्यांचं काम नाही. आता जवळपास कुठल्या निवडणुका नाहीत. राहिलेली दोन-अडीच वर्षे तरी कारभारावर लक्ष द्यावं अन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी.

राहुल गांधी यांना सल्ला

आजकाल त्यांना कोणीही ऐरागैरा सल्ला देत असतो म्हणून मीही देतो. बालिशपणाचं राजकारण सोडून राजकारण गांभीर्याने केलं पाहिजे. पक्षात इतरांना संधी दिली पाहिजे. खासदारकी अन उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेसमोर जा… जनतेचा विश्वास संपादन केलात की जनता स्वतः तुम्हाला गादीवर बसवेल…

इरोम शर्मिला

ह्या निवडणूक निकालात सर्वात महत्वाची अन धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती आहे इरोम शर्मिला यांना मिळालेली केवळ 90 मते. भारतीय मतदार नेमका कोणत्या मानसिकतेने मतदान करतो हे सांगणं कठीण आहे. ज्या इरोम शर्मिला यांनी आपली हयात लोकशाही हक्कासाठी त्याग केली त्यांना निवडणुकीत केवळ 90 मते मिळणं हे लाजिरवणे आहे. म्हणजे लोकांना नेमकं पाहिजे तरी काय? त्यांचा पराभव झाला असता तरी ते मान्य होतं, पण 15 वर्षे एक स्त्री न्याय-हक्कांसाठी उपोषण करते आहे तिला जनतेच्या आकांक्षा समजल्या नाहीत का जनतेला तिची भावना समजली नाही. काय बोलावं? हे सुन्न करून टाकणारं आहे. शिवाय माध्यमांनाही मोदी बहुमताने का जिंकले अन कॉंग्रेसचं पुढे काय होणार यापेक्षा वेगळे प्रश्न पडले नाहीत. इरोम शर्मिला यांना केवळ 90 मते का पडली तर लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने पॉल पडेल. पण त्यांच्या गप्पाही निरर्थक आहेत. कदाचित बौद्धिक दिवाळखोरी?

Image result for irom sharmila

एकीकडे भाजप नैतिकता खुंटीला टांगून केवळ निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते करत आहे त्यांना भरभरून मते मिळत आहेत. कॉंग्रेसला तर आता नैतिकता मिळवण्यासाठी अजून काही वर्षे झगडावे लागेल. केवळ इरोम शर्मिलाच हे उदाहरण आहेत असं नाही, तर अनेक समाजसेवक अन सुधारणावादी चेहरे अन सभ्य लोक जेंव्हा निवडणूक लढवतात तेंव्हा त्यांना अशाच लोकशाहीला सामोरं जावं लागतं. अजूनही भारतीय मन मतदान करताना जात, पैसा, पक्ष, भावना वगैरे गोष्टींच्या पुढे जाताना दिसत नाही. आपण कुठल्या लोकशाहीच्या गप्पा मारत आहोत? भारतीय जनताच मग जे मिळत आहे त्याला लायक आहे असं वाटू लागतं. याचा अर्थ पुर्वांचल राज्यात जे चालू आहे ते योग्यच आहे असा निघतो. भारतात कुटुंबवाद, घराणेशाही, एकाधिकारशाही चालते याला जनताच कारणीभूत आहे. काल परवाच राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं की ‘निवडणुका कशा लढायच्या ते शिकलो… त्यांनी जे केलं तेच मी करणार…’ वगैरे. त्यांच्या पक्षाचा जो प्रॉब्लेम असेल तो असेल. त्यांनी जनतेच्या अपेक्षापूर्ती केलेली नसणार म्हणून त्याचं त्यांना फळ मिळालं असेल. तो विषय नाही किंवा त्यांना सहानुभूती नाही. पण ते जे म्हणाले ते सत्य आहे. सामान्य माणूस काय बघून मतदान करतो? लोकांनाच असे राजकारणी पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. उद्या साक्षात महात्मा गांधीही निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांना पराभव ह्याच भारतात स्वीकारावा लागेल. कदाचित त्यांना हे सत्य माहीत असल्यानेच त्यांनी कधीही निवडणूक लढवली नसावी.

प्रत्येक ठिकाणी राजकीय गणिते वेगळी असू शकतात यात वाद नाही. पण भारत हा अजब देश आहे. इथे जे सत्ताधारी आहेत त्यांना ह्याची जाणीव आहे. सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायची हिम्मत राजकरणी मंडळींना अशाच उदाहरणतून येत असावी. गुंड, बलात्कारी, चोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, व्यभिचारी वगैरेंना भारतीय जनता सहजतेने निवडून देते. त्यामागे अनेक पदर असतात. पण ते निवडून येतात. ज्या अमेठी रायबरेली मध्ये अनेक दशके गांधी कुटुंबाचे प्रतींनिधी निवडून येतात तेथे काय विकास झाला आहे? तरीही तेच निवडून येतात. हाच प्रश्न इतरांनाही लागू होतो. नोटबंदी हा निरर्थक प्रकार केला. त्यातून अनेक लोक मेले, अर्थव्यवस्थेचे आकडे जगजाहीर झाले, लोकांना झळ पोचली तरीही आपण त्याचं समर्थक करणार का?

खरं तर ह्या सगळ्या गोष्टी वेदनादायक आहेत पण काय म्हणायचं… लोकशाही आहे… जे आहे तेच चालवून घ्यायचं… लोकशाही चिरायू होवो असं ट्वीट मोदी राहुल गांधी यांना करतात… बरं आहे…

मोदी लाट की…? भाजपच्या विजयाच विश्लेषण.

error: Content is protected !!