Category: PoemPigeon

मामाच्या गावाला जाऊया!!!

मामाच्या गावाला जाऊया!!!

आम्ही लहान असताना सुट्टी लागली की ओढ असायची मामाच्या गावाची!!! तिथे मिळणार्‍या स्वर्ग सुखाची सर कशालाही येत नसे… अर्थात लहानपण देगा देवा!!!! पण आजकाल मामाचा गाव हरवत चाललाय… सगळे ‘standard’ झाल्याने ह्या जुनाट कल्पना होऊ पाहत आहेत. जिथे त्या अस्तीत्वात आहेत त्याचही स्वरूप खूप बदललं आहे…. दुनिया बदलती है, जमाना भी बदलता है, आप भी बदलो, बस्स बदलता नही तो यादों का खजाना!!!

#आधुनिक मामाचा गाव

झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे रिझर्व्हेशन् करूया
मामाच्या गावाला जाऊया….

मामाचा गाव हाय मोठा
मॉल, बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया
मामाच्या गावाला जाऊया….

मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईव करुया
मामाच्या गावाला जाऊया….

मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
जोक तिला पाठवून हसवूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको चटपट
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा, बर्गर खाऊया
मामाच्या गावाला जाऊया…!!!!

आंबामय कविता

आंबामय कविता

#Mango Poem

फळात फळ आंब्याचे फळ,
पात्तळ कोय नी भरदार दळ,

आंब्याच्या फळाचा न्यारा रंग,
केशरी पिवळे तुकतुकीत अंग,

रसाळ मधुर लांबट फोडी,
अमृताची लाभे रसास गोडी,

पिकल्या आंब्याच्या दरवळे गंध,
मनास करी तो सुवास धुंद,

रसाच्या संगती तूप नी पोळी,
सेवने लागे ब्रह्मानंदी टाळी,

हापूस आंब्याला मोठाच मान,
घरोघरी त्याची भलतीच शान,

पायरी, लंगडा, रायवळ, दशेरी,
तोतापुरी संगे निलम, केशरी,

हर एक आंब्याची निराळी गोडी
चोखून खा किंवा करुन फोडी,

वैशाख मासात तापती उन्हे,
तृप्त व्हा प्राशुन कैरीचे पन्हे,

चैत्रातील आंबेडाळ लागे न्यारी,
आंबट तिखट चव मज प्यारी,

कैरीच्या साराची गोडी अफाट,
छुंदा नी टक्कुची चव बेफाट,

पानात डावीकडे किती साजे,
करकरीत, लाल ते लोणचे ताजे,

आम्रखंडाची आहे सुदूर कीर्ति,
भोजनाची होई स्वादिष्ट पूर्ति,

त्रिखंडी होई ज्याचा गाजावाजा,
असा हा महान फळांचा राजा,

🍊आंबापुराण समरुपयामी.

Source: WhatsApp

धायरी ची शायरी

धायरी ची शायरी

#Hindi Shayari

-यूं इंतेकाम ना लेना हमारे प्यार का सनम,

तभी तेरा ही नाम होगा जुबां पे जब पेहनेंगे कफन!!!!

 

– मर मिटेंगे तेरी हर एक अदा पर जानेजा,

बस तेरी अदा और गुस्से में जरा फर्क तो बता!!!

 

-चाहती हो तुम भी हमे मगर चुपके-चुपके,

आ जा जमाने को भूल के लेकीन मेरे घरवालो से छुपके!!!

 

-तेरे गुस्से ने तो मुझे और भी तेरा दिवाना है बनाया,

हर बार डॉक्टर पुछता है की इस बार किसने तेरा दिल चुराया!!!

 

-तेरी कमर की लचक पर कोई कैसे न ललचाये,

जो न ललचाये कंबख्त उस्से लालच क्या पता है!!!

 

-देख ना तिरछी नजर से, क्या बताए क्या हाल हमारा होता है,

बस शरीर से इंसान रहते है, बाकी तो सब लापता है!!!!
-> खायला तुपाशी, प्रेमाला उपाशी देवदास

पाऊस पडतो चार थेंब!

पाऊस पडतो चार थेंब!

#Marathi Kavita    #मराठी पावसाळी कविता

पाऊस पडतो चार थेंब,

गटार तुंबू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

डासे घोंगावू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

रस्ते वाहू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

रहदारी करू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

कपडे घाण करतात,

पाऊस पडतो चार थेंब,

सगळी धांदल करून जातात,

पाऊस पडतो चार थेंब,

सारं नियोजन चुकवून जातात,

पाऊस पडतो चार थेंब,

भिंती पाजरू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

दरवाजे सुजून येतात,

पाऊस पडतो चार थेंब,

सांधे दुखू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

आजारपण घेऊन येतात,

पाऊस पडतो चार थेंब,

जमीन तृप्त करतात,

पाऊस पडतो चार थेंब,

पिके जगवून जातात,

पाऊस पडतो चार थेंब,

झाडे-फुले नाचू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

पक्षी किलबिलू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

अपेक्षा लावून जातात,

पाऊस पडतो चार थेंब,

कांदा-भजी तळू लागतात,

पाऊस पडतो चार थेंब,

आठवणी उजळून येतात,

पाऊस पडतो चार थेंब,

प्रिय लोकं आठवू लागतात,

पाऊस फक्त चारच थेंब,

दुष्काळ देऊन जातात!!!

    – जयदेव

संसार म्हणजे चालायचचं.

संसार म्हणजे चालायचचं.

#Marathi Kavita      #मराठी कविता

घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं.

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं
संसार म्हणजे चालायचचं.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

धावपळ करून का होईना
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून
आई-बाबांनाच आठवायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

छोट्या छोट्या गोष्टींवरून
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून
एकत्र होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

रचनाकर्ता – अज्ञात…. Whats App

वेगळं राहायचं भारीच सुख?

वेगळं राहायचं भारीच सुख?

#Marathi Kavita     #मराठी कविता

कवितेचा जन्म मनाच्या गाभर्‍यातून कधीही, केंव्हाही, कुठेही, कसाही, कशाही अवस्थेत आणि कोणालाही होऊ शकतो. प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदातरी कविता केलेलीच असते. त्याची संपन्नता इतरांनी ठरवू नये… आपआपल्या मनालाच त्याचं महत्व असतं आणि जाण असते… एका उमद्या अन संवेदनशील मनाने केलेली ही गोंडस रचना!!!

 

ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

 

ऊन ऊन खिचडी  साजुकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

 

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.

सासुबाई-मामंजी, नणंदा नी दीर,

जावेच्या पोराची सदा पीर पीर.

पाहुणेरावळे सण नी वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,

वेगळं राहायचं भारीच सुख…

 

सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटल तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर झिलपी.

बाबांची माया काय मामंजीना येते,

पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकुट अन् दह्याची साय ,

त्यावर लोणकढ साजुक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

रडले पडले नी अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांच काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहु नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी.

बाळ रडल तर ते खपायचं नाही,

मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.

स्वयपाक करायला मीच,

बाळ रडल तरी घ्यायच मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,

वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….

 

सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलं तुप,

अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!!!!!

 

  मो.दा.देशमुख (वरोडा)

अजून एक कप च्या!!!

अजून एक कप च्या!!!

#One More Cup Of Tea!!!

दोन-तीन दिवसांखालीच एक पोस्ट टाकली होती ज्यात चहा ह्या महान पेयाचं महात्म्य सांगितलं होतं. तसं होतं न होतं की लागलीच आज चहावर अजून एक रचना आम्हाला येऊन भेटली. चहाला मरण नाही याचेच चिन्हं आहेत हे… चहा घेत-घेत वाचा अजून ‘चाह’त वाढेल…

 

☕ चहास्तोत्र. ☕

शीणसुस्ती महानिद्रा

क्षणात पळवी चहा ,

प्रभाते तोंडधुवोनी ,

घेता वाटे प्रसन्नता !!१!!

 

अर्धांगीनीहस्ते घेता ,

निद्रा तात्काळ विरघळे,

पुन्हा स्नानांतरे घेता

अंगी चैतन्य सळसळे !!२!!

 

लिंबुयुक्ता विना दुग्धा

अरूची पित्त घालवी ,

शर्करेविना घेता ,

मधुमेह न गांजवी !!३!!

 

शितज्वर शिर:शुळा ,

खोकला नाक फुरफुरा ,

गवतीपत्र अद्रकायुक्ता , प्राशिता जाई सत्वरा !!४!!

 

भोजनपुर्व प्राशिता ,

मंदाग्नी पित्तकारका ,

घोटता घोटता वाढे ,

टँनीन जहरकारका !!५!!

 

चहाविना आप्तस्नेह्यांचे ,

स्वागतासी अपुर्णता,

यास्तव भूतलजन हे ,

म्हणती त्यासी अमृता !!६!!

 

इति विकासविरचितम् चहास्तोत्रम्

चहाबाजप्रित्यर्थम् समर्पितम् !!७!!

Source:- व्हाट्स अॅप

एक कप च्या!!!

एक कप च्या!!!

अनेकदा आपल्याकडे वाद होतात, की चहा आरोग्याला चांगला असतो की कॉफी. बर्‍याचदा तर चहा आरोग्याला वाईट असतो अशीही ‘अफवा’ कानावर पडते. मागच्याच आठवड्यातील ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या पुरवणीत श्री उत्तम कांबळे यांचा लेख वाचला होता. तो चहा या पेयाविषयीच होता. उत्तम होता तो लेख… त्यात एक शयाराना अंदाज बघायला भेटला, “बेवफा सनम से तो चाय ही अच्छी है, जो दिल जलाती तो है, मगर होठो को चुमती है!!!”

चहा हा विषय जितका संशोधनाचा आहे तितकाच तो आपल्या जिव्हाळ्याचा अन आपुलकीचा आहे. चहा शिवाय जगू न शकणारी कितीतरी लोक आहेत. एखाद दिवस एक कप चहा भेटला नाही तर अस्वस्थ होणारी लोकही आहेत अनेक… गावागावात, शहराशहरात चहाच्या टपर्‍या ह्या भारतीयांचं चहावरील अतूट प्रेमाचं द्योतक आहे. उत्तम कांबळे म्हणतात तसं, पुण्यात चहा अमृततुल्य असतो… अजून काय पाहिजे??? एक कटिंग द्या असं म्हणण्यात जी गम्मत आहे ती कुठल्याही उच्च हॉटेल/रेस्टोरंट वगैरे मध्ये जाऊन ऑर्डर देण्याइतपत नाही… चहा केवळ पेय नसून बोलताना, चर्चा करताना आपला एक सवंगडी बनून गेला आहे… जुना मित्र भेटला किंवा कोणाशी घराबाहेर भेटायचं ठरलं असेल तर सोबत एक कटिंग चहा झाला नाही तो कसला ‘चहाडया’… एखाद्या नवख्या स्वयपाक शिकणार्‍या माणसाला आधी चहा बनवायला शिकावं लागतं… नवीन नवरी ला चहाचा ट्रे घेऊन वधूपरीक्षेस सामोरं जावं लागतं… तशी चहाची महती अगाथ आहे… चहास मरण अशक्य… उलट मरणास दूर सारणार्‍या मानसिकतेला प्रबळ करण्यासाठी चहा हवाच हवा!!!

अशाच एका चहाडया व्यक्तीने चहा अन कॉफी ह्या पेयांवर एक कविता वगैरे रचली आहे… ती नजरेस पडली आणि उत्तमजी कांबळे यांच्या लेखाची आठवण झाली…

Tea OR Coffee???

चहा…! की कॉफी…!!

 

चहा म्हणजे उत्साह..

कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..

कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..

कॉफी अक्षरशः निवांत..!

चहा म्हणजे झकास..

कॉफी म्हणजे वाह मस्त..!!

चहा म्हणजे कथा संग्रह..

कॉफी म्हणजे कादंबरी..!

चहा नेहमी मंद दुपार नंतर..

कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!

चहा चिंब भिजल्यावर..

कॉफी ढग दाटुन आल्यावर.!

चहा = discussion..

कॉफी = conversation..!!

चहा = living room..

कॉफी = waiting room..!

चहा म्हणजे उस्फूर्तता..

कॉफी म्हणजे उत्कटता..!!

चहा = धडपडीचे दिवस..

कॉफी = धडधडीचे दिवस..!

चहा वर्तमानात दमल्यावर..

कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे..

कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!

 

ह्या रचनेचा लेखक कोण आहे याचा शोध लागला नाही. पण ही संकल्पना अन रचना सुंदर आहे. whats app वर आलेली ही रचना… आपल्या वाचकांसाठी…

Writer – Unknown

Source – Whatsapp

Getting Modern?

Getting Modern?

#What About Mother Tongue?

#आधुनिक जगात वावरतांना!

भाषा ही कुठल्याही संकृतीचा आत्मा असतो. भाषा जर कणाकणाने क्षीण होत असेल तर संस्कृतीही त्याच मार्गावर आहे असं मानलं पाहिजे. कुठलीच संस्कृती अमर नसते… शेवट हा असतोच… फक्त त्याच्या शेवटाची सुरुवात आपल्यापासून होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. बदलत्या जगात, बदलत्या जीवनशैलीत आपण पुढारले असल्याचं आपणच समजतो. मराठी किंवा कुठल्याही मातृभाषेतील शब्द उच्चारताना लाज वाटते. एखाद्या शब्दाला English शब्द वापरला म्हणजे आपण sophisticated आहोत असा समज आज दृढ होतो आहे. संडास ला Toilet, ढुंगन/कुल्हा शब्द चार-चौघात वापरणारा असंस्कृत तर ‘बम’ वगैरे वापरणारा मॉडर्न आणि बोल्ड ठरतो. कुठे आणि कोणाचं चुकत आहे? काय माहीत. पण आपली माय मराठी ह्या प्रक्रियेत रोज घायाळ होत आहे.

खाली दिलेली कवितेचा संदर्भ आणि अर्थ वेगळा आहे पण त्यात भाषेचा प्रश्नही प्रभावीपणे व्यक्त केला आहे. थोडेसे जुळणारे संदर्भ बघून ही कविता वरील उतार्‍याला जोडत आहे…

बिड़ी अब CIGRATE बन गयी,
चटाई CARPET बन गयी ।
मुक्केबाजी BOXING बन गयी,
कुश्ती हमारी WRESLING बन गयी।
गिल्ली डंडा CRICKET बन गया,
हमारा भारत GREAT बन गया ।।

गाय हमारी COW बन गयी,
शर्म हया अब WOW बन गयी ।
काढ़ा हमारा CHAI बन गया,
छोरा बेचारा GUY बन गया ।
कठपुतली अब PUPPET बन गया,
हमारा भारत GREAT बन गया ।।

हल्दी अब TURMERIC बन गयी,
ग्वारपाठा ALOVIRA बन गया ।
योग हमारा YOGA बन गया,
घर का जोगी JOGA बन गया ।
भोजन 100 रु. PLATE बन गया,
हमारा भारत GREAT बन गया ।

घर की दीवारेँ WALL बन गयी,
दुकानेँ SHOPING MALL बन गयीँ ।
गली मोहल्ला WARD बन गया,
ऊपरवाला LORD बन गया ।
रक्षाकवच HELMET बन गया,
हमारा भारत GREAT बन गया ।।

माँ हमारी MOM बन गयी,
छोरियाँ ITEM BOMB बन गयीँ ।
पिताजी अब DAD बन गये,
घर के मालिक HEAD बन गये ।
INDIA UP TO DATE बन गया,
हमारा भारत GREAT बन गया ।।

Source – Whatsapp

error: Content is protected !!