Category: Accurate Angle

पर्वती!

पर्वती!

बदल… नियतीचा सिद्धांतच आहे. तो कधी संथपणे तर कधी अपघाताने घडतो. सदासर्वकाळ स्थिर, न बदलणारं असं काहीच नसतं. रात्रीच्या काळोखालाही पहाटेच्या प्रकाशाची आस लागलेली असतेच अन दिवसाचा थकवा सोडून प्रकाश संध्याकाळी रात्रीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावतोच. प्रवास चिरंतर सुरूच असतो. तोल जाताना तोल जातोय हे कळलं तरच सावरण्याचं सामर्थ्य येतं, नाहीतर समतोल साधत फक्त निष्ठुरता अन निरसता अंगी पडते. बदल घडावा अन घडवावा… शेवट तर असाही होतोच!

Image may contain: sky, tree, outdoor and nature

पर्वतीचं सांजसमयी बदलत जाणारं रूप

Image may contain: sky, night and outdoor

अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991

पर्वतीबद्दल लेख…

पर्वती

पाऊस…

पाऊस…

पावसाचा स्वतःचा स्वभाव असावा. बरसण्यातून, गरजण्यातून तोही स्वतःला व्यक्तच करत असावा!
कधी #बेभान होऊन कोसळत असतो तर कधी #हळवा होऊन रिपरिप पडत असतो.
कधी #रोमॅंटिक होऊन अंगाशी सलगी करतो तर कधी गोंधळलेल्या अवस्थेत पडतो, थांबतो, पडतो…!
कधी #नाराज होतो, रूसतो अन दर्शनही देत नाही!
कधी #वासणंध झाल्याप्रमाणे तुटून पडतो अन सारं वाहून नेतो.
कधी बुद्धाप्रमाणे शांत, स्थिर, निश्चल विचार करायला लावणारा वाटतो…
कधी आठवणी जाग्या करून डोळ्यांतील अश्रु वाहावेत तसा बरसतो…

 

 

 

 

 

 

Nature Photography

Nature Photography

#माझाक्लिक  }{   #AccurateAngle  }{  #निसर्गचित्र  }{   चतुर  }{  हेलिकॅप्टर 

wp_20161023_10_38_10_pro

 

wp_20161023_10_38_19_pro

 

wp_20161023_10_38_25_pro

wp_20161023_10_38_28_pro

@Late_Night1991

तूफान पाऊस

तूफान पाऊस

#Marathwada Heavy Rain

#Stormy_Rain In Maharashtra. वादळी वार्‍यासह पाऊस.

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाड्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. मध्यंतरी गायब झालेला पाऊस परतीच्या मार्गावर असताना मराठवाड्याला ओलाचिंब करून गेला. यात अगदी, ‘येरे येरे पावसा…’ ह्या गाण्यावर बंदी घालावी की काय असे विनोद होत आहेत. ह्याच पावसाचे एक भयाण रूप पहा. वादळी वार्‍यासाह महाराष्ट्रातील पाऊस!!!
https://t.co/ZdBV9UFLDl

The Photography

The Photography

#फोटोग्राफी

एखाद्या विचाराने मेंदूला ग्रासावे, एखाद्या संकल्पनेने विचार झपाटून जावे, प्रियेच्या आठवणीने मन भरून जावे, नैराश्यने जीवन नकोसे व्हावे तसे… अगदी तसेच… ह्या जीवंत अळीला मुंग्यांच्या झुंडीने अक्षरशः मृत्यूची भेट घडवली. कणाकणाने मरण वेगळे ते काय असते?

एकीचे बळ म्हणतात ते हेच. अवघ्या काही तासांत ह्या इवल्या #मुंग्यांनी त्या #अळीचं नामोनिशाण मिटवून टाकले. हे बघून खरं तर मावळ्यांनी मोघलांच्या बलाढ्य-प्रचंड फौजेला नेस्तांनाबूत केले, लोळवले असाच विचार येतो.

ह्या एका प्रसंगाला किती प्रतीके असू शकतात. ज्याची मनस्थिती जशी तसा तो विचार करतो.

wp_20160903_17_08_37_pro

wp_20160903_17_09_03_pro

wp_20160903_17_09_11_pro


Nikon Coolpix


Sony Cybershot

Parvati – Pune

Parvati – Pune

पर्वती म्हणजे पुण्याच्या ऐतिहासिक ठेव्याचा मानबिंदू!!! त्याच पर्वतीवरून दिसणारं पुण्याचं मोहक रूप!!!  #पर्वतीच्या नजरेतून पुणे!!!

WP_000295WP_000292

WP_000311

WP_000322

WP_000324

WP_000329

WP_000289

WP_000285

WP_000290

error: Content is protected !!