Category: Comedy Fights

उपरती!!!

उपरती!!!

#Marathi Kavita  #मराठी कविता  #नवरा-बायको

लग्नानंतरचं प्रेम…

एकदा एक फोन आला
म्हणाली छान लिहीता,
कवी महाशय सांगा ना
तुम्ही कुठे रहाता…

मी ही थोडा बावरलो
भलतच हे अघटीत,
डायरेक पत्ता विचारते
बाई पहिल्याच भेटीत….

हळुहळु जिव गुंतला
रोज फोन यायचा,
घरात असल्यावर जीव
धाकधुक व्हायचा….

कळलं जर बायकोला तर
आपलं काही खरं नाही,
या वयात प्रेम करणं
हे काही बरं नाही…..

तासनतास चॅटींग मग
व्हाटसपवर करायचो,
मी ही मलाच विसरून
तिचा होऊन उरायचो….

बस झालं म्हटलं आता
एकदा तरी भेट दे,
मोहरलेली ,मंतरलेली
सोनेरी पहाट दे……

ठरला दिवस ठरली वेळ
ठरल्या जागी गेलो मी,
जवळ जाताच तिच्या
कावरा बावरा झालो मी….

दुसरी तिसरी कुणीच नसुन
होती माझी बायको,
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे
धंदे ते नको नको…..

कसा बसा घरी आलो
युद्ध घनघोर चाललेले,
ऐकवत होती एकेक शब्द
फोनवर बोललेले….

आपल्या ताटातलं सोडुन म्हणे
दुस-याच्या ताटावर डोळा,
वाढायला गेल बुंदी तर
आवडतो शंकरपाळा…

कधीकधी झाला प्रसंग
डोळ्यापुढे आणतो,
चुकुन कुणाचा आलाच फोन
तर ताई असंच म्हणतो…..

कवी : अनोळखी😉/कदाचित नाव जाहीर करायला घाबरणारा नवरा असेल बिचारा!!!

latenightedition.in

धायरी ची शायरी

धायरी ची शायरी

#Hindi Shayari

-यूं इंतेकाम ना लेना हमारे प्यार का सनम,

तभी तेरा ही नाम होगा जुबां पे जब पेहनेंगे कफन!!!!

 

– मर मिटेंगे तेरी हर एक अदा पर जानेजा,

बस तेरी अदा और गुस्से में जरा फर्क तो बता!!!

 

-चाहती हो तुम भी हमे मगर चुपके-चुपके,

आ जा जमाने को भूल के लेकीन मेरे घरवालो से छुपके!!!

 

-तेरे गुस्से ने तो मुझे और भी तेरा दिवाना है बनाया,

हर बार डॉक्टर पुछता है की इस बार किसने तेरा दिल चुराया!!!

 

-तेरी कमर की लचक पर कोई कैसे न ललचाये,

जो न ललचाये कंबख्त उस्से लालच क्या पता है!!!

 

-देख ना तिरछी नजर से, क्या बताए क्या हाल हमारा होता है,

बस शरीर से इंसान रहते है, बाकी तो सब लापता है!!!!
-> खायला तुपाशी, प्रेमाला उपाशी देवदास

घर पटांगण फोटोग्राफी!!!

घर पटांगण फोटोग्राफी!!!

#Child Life Photografy

योगा करायलाच पाहिजे!
योगा करायलाच पाहिजे!


तुला काय वाटलं; तू सुटशील व्हय???
तुला काय वाटलं; तू सुटशील व्हय???

धरून बस आता!
धरून बस आता!
उडान!
उडान!
कोपर्‍यात गावला!
कोपर्‍यात गावला!
दरोडेखोर!
दरोडेखोर!
ह्याचा बाप ह्याला डुकरा, माकडा, बैला, कुत्र्या म्हणतो म्हणून त्याचा फोटो!
ह्याचा बाप ह्याला डुकरा, माकडा, बैला, कुत्र्या म्हणतो म्हणून त्याचा फोटो!
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो
लाजला पण कॅमेरात बसला!
लाजला पण कॅमेरात बसला!
कितीही लपलास तरी तुझा नाद नाई सुटायचा!
कितीही लपलास तरी तुझा नाद नाई सुटायचा!
पाटील जाऊ द्या मला!
पाटील जाऊ द्या मला!
बाई वाड्यावर चला! (पाटील)
बाई वाड्यावर चला! (पाटील)
तिला सोडा, मी येते पाटील!!
तिला सोडा, मी येते पाटील!!

काय पाटील बाईचा नाद बरा नाय!!!
काय पाटील बाईचा नाद बरा नाय!!!

मराठी ‘ऑड’नावं

मराठी ‘ऑड’नावं

#Surname in Maharashtra

 

#Colorful Maharashtrians

काळे

गोरे

पांढरे

काळभोर

हिरवे

पिवळे

ढवळे

 

#Some Metallic Maharashtrians.

पितळे

तांबे

लोखंडे

सोनार

चांदेकर

रत्नपारखी

हिरेखण

 

#Facial Maharashtrian

टकले

दाते

कानफाडे

नकटे

बोबडे

तोतडे

डोळस

डोईफोडे

 

#Professional Maharashtrians

दिवेकर

वैद्य

वकील

भगत

चिटणीस

दिवाण

भालदार

कुलकर्णी

ऊद्धव

पारधी

शास्त्री

गोसावी

सुतार

जोशी

गुरु

पंडित

 

#Vegetable Maharashtrians

आंबेकर

काकडे

देठे

दुधे

बुधे

केळकर

भाजीखाये

नारळे

गाजरे

मुळे

पिंपळकर

वाले

भेंडे

फुलमाळी

भाजीपाले

 

#Animal Maharashtrians

मांजरेकर

कोल्हे

कावळे

तितरमारे

वाघ

घारपुरे

वाघमारे

लांडगे

गरुड़

घारे

किटकुले

उंदीरवाडे

 

#Funny Maharashtrians

भूत

लिडबीडे

वडाभात

पोटभरे

पोटदुखे

पोटपुसे

पोटे

उकिडवे

वाडीभस्मे

रागीट

 

#Very Common Maharashtrians

मेश्राम

बालपांडे

गेडाम

देशपांडे

देशमुख

सहारे

मडावी

बारापात्रे

पाटील

 

#Money Oriented Maharashtrians

लाखे

सव्वालाखे

पगारे

शंभरकर

हजारे

चिकटे

पन्नासे

फुकटे

बावनकर

तनखीवाले

परीपगार

 

#Loud Maharashtrians

आकांत

गोंधळी

केकतपुरे

बोंबले

 

#Village maharashtrian

शेगावकर

नागपुरे

पंढरपुरे

रामटेके

पिंपलगावकर

डोंगरकर

 

#Killer maharashtrian

वाघमारे

कुत्तरमारे

मानुसमारे

तितरमारे

कानकापे

डोईफोडे

हातोडे

पुरुषांनो जागे व्हा!

पुरुषांनो जागे व्हा!

#What Is Partiality? Only Women are allowed to enter into dargah!!!

http://abpmajha.abplive.in/nasik/nashik-dargah-where-only-women-are-allowed-to-enter-199186

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/women-get-access-here-dargah/305495

उपरोक्त बातमीतील मजकूर वाचून आमुच्या तळपायातील आग मस्तकात जाता-जाता राहिली. मस्तकात गेली असती तरी काय झालं असतं म्हणा! तेच झालं असतं जे तमाम पुरुष मंडळींचं स्त्री मंडळासमोर होतं ते! अर्थात, तोंड दाबून बुकक्यांचा मार!!! छे! छे! परमेश्वरा तूच एकमेव आधार… त्यात आज जागतिक महिला दिन… अशा दिवशी आमच्या मुखातील एक अपरोक्त शब्द एका-एका बंदुकीच्या मार्‍याने परत आला तरच नवल…

ऐसे न व्हावे पाप, द्यावा शाप, संपवावा ताप,

जन्म न द्यावा पुरुषाचा पुन्हा, उगा म्हणे!!!

शनि शिंगणापुर झालं, आता त्र्यंबकेश्वर झालं, हाजी अली दर्गा झालं… सगळीकडे चर्चा ती महिलांना प्रवेशाची अन पुरुषी मानसिकतेची… पण ही बातमी वाचून आमचा कंठ दाटून आला आणि अश्रुंना वाटा मोकळ्या झाल्या…

चक्क एका दर्ग्यात पुरूषांना बंदी… हे परमेश्वरा हे मी काय ऐकतो आहे?? माझ्या कानाचे पडदे बोटं घालून-घालून फाटले की काय… नसतील तर ते फाड आणि ह्या डोळेरूपी खाचकड्यांनाही खिळ्याने बुजवून टाक… तुझ्या राज्यात हे काय घडते आहे… पृथ्वीवर गाफीलपणे वावरणार्‍या परमेश्वराच्या पाठीत खंजीर खुपसणारी माणसे समोर असताना मी शांत बसू (नटसम्राट फेम) … छे! छे!!! कलियुग अजून काय?

महिलांना एखाद्या ठिकाणी बंदी केली तर ते पुरुषप्रधान संकृतीचं लक्षण. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न, महिलांवर अत्याचार आणि पुरूषांना एखाद्या ठिकाणी बंदी केली तर ती पुरोगामी परंपरा… कसे रे कसे… तूच सोडव ह्या तुच्छ जीवनाच्या चक्रातून…

मी स्पष्ट सांगतो… महिलांना जर सन्मानाने मंदिर मसजीद किंवा कुठे हवा तिथे प्रवेश दे… पण मग आम्हालापण अशा दरग्यांत प्रवेश दे… आम्हीही शेवटी निर्मळ मनाचे भक्त आहोत… आम्हालाही सेवेची संधी हवी… सोबत वटसावित्रीच्या दिवशी कामाला सुट्टी देऊन झाडाची पूजा करायची परवानगी दे… संक्रांत, मंगळा गौर, चैत्र गौर, नागपंचमीचे झोके खेळण्यासाठी, ओटी भरण्यासाठी भरगोस सुट्ट्या दे आणि हे सगळं करायची परवानगी दे… जमलं तर आमच्या बायका गरोदर असताना त्यांच्या कळांची वेदना जाणून घेता यावी म्हणून नऊ महीने पितृरजा मिळू दे अशी तुझचरणी प्रार्थना… तसे न झाल्यास मी तमाम पुरुष मंडळींना घेऊन सगळीकडे मोर्चा काढेन आणि जोपर्यंत पुरूषांना हे हक्क सन्मानाने मिळत नाही तोवर टॉवर उभा असल्याप्रमाणे झगडत उभा राहू दे….

दुसरीकडे स्त्रियांना कर्मकांडातून, चूल-मूल-देवाचं फूल यापासून दूर करून खर्‍या जगात उतरवत असणार्‍यांना शाप दे रे… कारण त्यांना मंदिरात प्रवेश देऊन त्यांना पुन्हा कर्मकांडात अडकवण्याने पुरोगामी विचार जपले जाणार आहेत… अजून काही दशकांनी किंवा शतकांनी असे पुरोगामी नेते उभे राहतील जे म्हणतील की, स्त्रियांना शनि मंदिरातील पूजेपुरता मर्यादित ठेवणार्‍यांना शासन कर… ज्यांनी कोणी स्त्रियांना पुजा-अर्चेत सामील करून घेण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना (भविष्यात) स्त्रियांना पुजा करायच्या प्रथेत जुंपलं, नसत्या परंपरा सुरू केल्या त्यांना शाप दे रे महाराजा…

पण आमची अर्जी तेवढी मान्य कर… आम्हाला काम-धंदे सोडून सगळीकडे प्रवेश मिळावा म्हणून तेवढे प्रयत्न कर आणि घरच्या स्त्रियांसमोर घाबरत-घाबरत पुरुषार्थ जपणार्‍या माझ्या तमाम पुरुष मंडळींना स्त्रियांच्या सोसातून मुक्त करून घेण्याच्या लढ्यात बळ दे रे देवा…

टीप- माझ्या बायकोला यातलं काही कळू देऊ नकोस… पुढचा आठवडा सुट्टी घेतली आहे… फुकट जाईल!!!

लेखनशैली म्हणजे काय???

लेखनशैली म्हणजे काय???

घटना:-> दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.

-> ही बातमी विस्ताराने लिहा.

नवकथा

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला.  तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

 

नवकविता

स्टेशनसमोरची रंगहीन टपरी

पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी

अंग चोरून पडलेली

वडे तळणाऱ्या माणसाच्या

कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब

ठिबकतायत

पुढ्यातल्या कढईत

टप टप टप

येतोय आवाज

चुरर्र चुर्र

ही खरी घामाची कमाई

पुढ्यातल्या

टवका गेलेल्या बशीतला

वडा-पाव खाताना

त्याच्या मनात येउन गेलं

उगाचच

 

ललित

दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.

.

‘वडा-पाव द्या हो एक’ मी म्हटलं.

.

‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!

 

शामची आई व्हर्जन

‘शाम, बाळ खा हो तो वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!’

 

जी ए  कुलकर्णी व्हर्जन

रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या  मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.

 

गो. नि. दांडेकर व्हर्जन

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?

 

ग्रेस व्हर्जन

विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव  खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!

 

Source:- WhatsApp

error: Content is protected !!