जाणार सून ही झी मराठीची!

जाणार सून ही झी मराठीची!

#Marathi Serial ‘Honar suun Mi Hya Ghrarachi’ going to end

#होणार सून मी ह्या घराची ही झी मराठी वरील मालिकेचा गुड बाय!!!

गेल्या वर्षात whats app प्रेमींना अनेक गंभीर प्रश्न पडले होते. कटप्पा ने बाहुबलीला का मारले? २ ऑक्टोबर ला अजय देवगण कोठे होता? अच्छे दिन येणार वगैरे वगैरे. यात अतिशय महत्वाचा प्रश्न होता जानव्हीचं बाळंतपण कधी होणार? आणि काहीही हं श्री…

झी मराठी वरील होणार सून मी ह्या घराची मालिका छप्पर  फाडके चालली. खरं तर अशा मालिका बघणे हे महिला वर्गाचं काम, पण ह्या मालिकेतील काही संवादांनी अन इवेंट नी अख्खं whats app अन इतर माध्यमे झपाटून टाकली होती. कधी असल्या मालिका न बघणार्‍या मुलांनाही ह्या गोष्टी माहीत झाल्या होत्या. त्या मालिकेत नेमकं काय आहे हे माहीत नसूनही अनेकजण त्याबद्धल चर्चा करत होते अन त्यावर केलेल्या विनोदावर मनमुराद खिदळतही होते. पण बातमी अशी आहे की ही मालिका आता बंद होणार आहे. श्री-जान्हवीच्या मुलीच्या बारशाने ‘होणार सून मी या घरची…’ या मालिकेचा समारोप 23 जानेवारीला होणार आहे. जवळपास साडे-सातशे भागांचा टप्पा पार केल्यानंतर जान्हवीच्या बाळाच्या जन्माच्या आनंदी नोटवर ही मालिका संपणार आहे.

चला ठीक आहे म्हणा. जान्हवीच्या बाळंतपणाने जान्हवीपेक्षा जास्त महाराष्ट्रच मोकळा झाला असेल. तशा कळाही सोसल्या होत्या म्हणा सर्वांनी!

यातच दुसरी महत्वाची बातमी अशी येत आहे की, मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी आगामी काळात जान्हवीच्या बाळाची वेगळी कथा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशीही चर्चा आहे. बघूया आता काय होतं ते. पण मूल जन्मले हे काही कमी नाही. सुटला बिचारा!!!!

'होणार सून..'च्या जान्हवीला बाळ, बारशाने मालिकेचा निरोप

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!