घाटशिळ तीर्थ….

घाटशिळ तीर्थ….

अनेकदा तुळजापूर च्या आई भवानी च दर्शन घेण्याचा योग आला, पण ह्यावेळेस तेथील मंदिराजवळील एक अनोखं ठिकाण सुद्धा पाहायला मिळालं. त्या ठिकणाला घाटशिळ तीर्थ अस म्हणतात. तुम्ही तुळजापूर ला गेलात आणि तिथे स्वतःची गाडी पार्क करण्यासाठी एक जागा आहे तेथून फक्त एखाद किमी च्या अंतरावर हे सुंदर व रम्य ठिकाण आहे. ह्या जागेला तस आध्यात्मिक-पौराणिक महत्वही आहे (जे पहिल्या image मध्ये तुम्हाला दिसेल) पण तेथे असलेली शांतता खूपच ‘बोलकी’ आहे. तस हे ठिकाण पहायला तेथे जा अस म्हणण्यासारखं मोठ नाही, पण जेंव्हा केंव्हा तुम्हाला तुळजामातेच दर्शन करण्याचा योग येईल तेंव्हा हे ठिकाण पाहायला काहीच हरकत नाही. मस्तपैकी आपले मित्र-मैत्रिणी किंवा परिवार घेऊन एक दिवस शांततेत (पिकनिक म्हणा हव तर) घालावा अस ठिकाण आहे. एका बाजूने दरी असल्याने जोरदार हवा असते, इतकी की जोराने बोलावं लागत, तेथून दिसणारा घाटही सुंदर आहे, त्या दरीतून वर येण्यासाठी खोलवर पायर्‍या सुद्धा आहेत, कदाचित उत्सवकाळी भाविक तेथून येत असावेत. पण ह्या जागेला महत्व तेंव्हा आहे जेंव्हा तेथे माणसांची जत्रा नसेल, शांतता असेल, आणि स्वच्छता असेल. आज-काल कुठेही गेलात की रित्या केलेल्या दारूच्या बाटल्या असतातच, मंदिर,गड-किल्ले आणि रम्य ठिकाणही त्यापासून वंचित नाहीत. असो, दर्शन लवकर झाल्यावर ह्या ठिकाणी जाऊन बसायला काही हरकत नाही. हे अजूनतरी पर्यटन स्थळ घोषित झालं नसल्याने आणखी सुंदर आहे.

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!