दुधी भात

दुधी भात

#Recipe of Meethi Bhaat   #गोड भात किंवा दुधी भात कसा बनवावा?

आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच ‘सेट मॅक्स’ वाहिनीवर अमिताभचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट पाहिला असेलच. नसेल तर चिंता करू नका, कधीही पाहू शकता. महिन्यातून एकदा तरी तो टीव्ही वर लागतोच लागतो. असो… त्या चित्रपटातील एक महत्वाचा प्रसंग आठवतो, ज्यात मुलगी सासरी आलेल्या बापाला (acp प्रद्युमन अर्थात शिवाजी साटम) एक पदार्थ खाऊ घालते. त्याला ती मीठी भात असं नाव देते.

खरं पाहायला गेलं तर हा पदार्थ आपल्या मराठी परिवारात सामान्यपणे बनत असतोच. आज त्याच प्रकाराची ‘रेसेपी’ आपण बघणार आहोत.

तुमच्याकडे जर तीन वाट्या शिळा भात राहिला असेल तर तो घ्या.

त्यात थंडगार दूध ओता. किती? दोन वाट्या.

आता त्यात तीन-चार चमचे साखर ओता. (मधुमेह वाल्यांनो बायको कुठे आहे ते बघा आधी)

नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.

आवडत असेल तर असच हादडा; नाहीतर पुढे वाचा!!!

मग हे मिश्रण गरम करायला घ्या. मंद आचेवर ठेवा.

त्याला थोडसं हलवत रहा नाहीतर करपून जाईल. (कसंही असलं तरी शेवटी ते तुम्हालाच पचवायचं आहे म्हणा!)

नंतर घरात जर बदाम (झाडाचे नाही, सुके बदाम) हातानेच बारीक करा. शिजत असलेल्या भातात टाका. किती? पाच-सहा. किंवा पगार आठवून ठरवा.

वेलदोडे असतील तर एखाद-दुसरं टाका.

थोडसं शिजू द्या. पाच मिनिटे केवळ.

सगळं एकजीव झाल्यावर हादडा!!!!

स्वीट डिश तयार आहे.

दुधी भात
दुधी भात

सूचना – ही पाककला सौ. जोशी काकू यांनी सांगितली असली तरी अनुवाद आमचा आहे. आम्ही bachelors आहोत.

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!