नदी माहेराला जाते

नदी माहेराला जाते

#मराठी कविता   #Marathi Kavita

सध्या दुष्काळ असल्याने जलसंधारणची कामे सगळीकडे चालू आहेत. लोक स्वतहून शहाणे होऊन ही कामे करू लागली आहेत. पण कुठे कुठे अवैज्ञानिक अन अशास्त्रीय कामे होत असल्याने पर्यावरण हानी होत आहे. दिसेल ती नदी अडवायची, खोली-रुंदी वाढवायची वगैरे कामे जोरात सुरू आहेत. असो. जलतज्ञ यावर मतभेदात आहेत. गदिमा यांनी एक कविता लिहिली होती… ह्या परिस्थितीवर तिची आठवण होतेच होते…

 

नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर

अशी शहाण्याची म्हण, नदीला नाही माहेर

काय सांगू रे बाप्पांनो, तुम्ही अंधाराचे चेले

नदी माहेराला जाते, म्हणून हे जग चाले

 

डोंगराच्या मायेसाठी, रूप वाफेचे घेऊन

नदी तरंगत जाते, पंख वा-याचे लावून

पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजवते वाळा

पान्हा फुटतो डोंगरा, आणि मग येतो पावसाळा

गदिमा

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!