उपरती!!!

उपरती!!!

#Marathi Kavita  #मराठी कविता  #नवरा-बायको

लग्नानंतरचं प्रेम…

एकदा एक फोन आला
म्हणाली छान लिहीता,
कवी महाशय सांगा ना
तुम्ही कुठे रहाता…

मी ही थोडा बावरलो
भलतच हे अघटीत,
डायरेक पत्ता विचारते
बाई पहिल्याच भेटीत….

हळुहळु जिव गुंतला
रोज फोन यायचा,
घरात असल्यावर जीव
धाकधुक व्हायचा….

कळलं जर बायकोला तर
आपलं काही खरं नाही,
या वयात प्रेम करणं
हे काही बरं नाही…..

तासनतास चॅटींग मग
व्हाटसपवर करायचो,
मी ही मलाच विसरून
तिचा होऊन उरायचो….

बस झालं म्हटलं आता
एकदा तरी भेट दे,
मोहरलेली ,मंतरलेली
सोनेरी पहाट दे……

ठरला दिवस ठरली वेळ
ठरल्या जागी गेलो मी,
जवळ जाताच तिच्या
कावरा बावरा झालो मी….

दुसरी तिसरी कुणीच नसुन
होती माझी बायको,
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे
धंदे ते नको नको…..

कसा बसा घरी आलो
युद्ध घनघोर चाललेले,
ऐकवत होती एकेक शब्द
फोनवर बोललेले….

आपल्या ताटातलं सोडुन म्हणे
दुस-याच्या ताटावर डोळा,
वाढायला गेल बुंदी तर
आवडतो शंकरपाळा…

कधीकधी झाला प्रसंग
डोळ्यापुढे आणतो,
चुकुन कुणाचा आलाच फोन
तर ताई असंच म्हणतो…..

कवी : अनोळखी😉/कदाचित नाव जाहीर करायला घाबरणारा नवरा असेल बिचारा!!!

latenightedition.in

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!