मराठी महीने

मराठी महीने

#मराठी महीने अन मराठी कविता   #Marathi Poem Marathi Months

@चैत्र नेसतो सतरा साड्या,
@वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या,
@ज्येष्ठ बसतो पेरित शेती,
@आषाढ धरतो छत्री वरती,
@श्रावण लोळे गवतावरती,
@भाद्रपद गातो गणेशमहती,
@आश्विन कापतो आडवे भात,
@कार्तिक बसतो दिवाळी खात,
@मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे,
@पौषाच्या अंगात उबदार कपडे,
@माघ करतो झाडी गोळा,
@फाल्गुन फिरतो जत्रा सोळा,
@वर्षाचे महिने असतात बारा,
प्रत्येकाची न्यारीच त-हा।।

भावी पिढीला मराठी महिने शिकवण्यासाठी एक मस्त गीत!!!

कवि – अज्ञात. Source व्हाट्सapp

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!