मिश्किली

मिश्किली

#मराठा मोर्चाच्या निमित्ताने

सोसायटीत गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे!

पूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश
अशा तत्वावर पार्किंग व्हायचे.
पण काम्बळे सरांकडे होती  लूना! तिचा वेग कमी असल्याने ते कायम उशीरा यायचे व त्यांना पार्किंग मिळत नसे. म्हणून चेअरमन पवारांकडे त्यांनी,
“माझे पार्किंग रिज़र्व करा “असा अर्ज केला व तो मंजूरही झाला 🙏🏼

बांधकाम काम करणाऱ्या भुजबळांनाही हीच समस्या आली त्यांच्याकडे स्कूटी होती. त्यांनाही रिज़र्व पार्किंग देण्यात आले

हळू हळू इतरांनाही पार्कींग वर हक्क मागायला सुरूवात केली. अशा पद्धतीत उपलब्ध पार्किंग स्पेस पैकी सत्तर टक्के रिजर्व झाली

आता झालंय असं, की कार्यकारणी बदलून कर्मधर्मसंयोगाने, जोशी चेअरमन झालेत. त्यांना गाडी पार्किंग चा प्रश्न कधीच नव्हता. त्यांच्याकडे सायकल आहे

जोशी चेयरमन झालेले पवारांना काही आवडले नाही. जोशींना त्रास देण्याच्या उद्देशाने, पवारांनी आपल्या भाऊबंदासहित त्यांना रिजर्व पार्किंग मागितले.

चेअरमन जोशींनी आता काय बरे
करावे?
स्वतःच्या सायकल सहित सोसायटी सोडून दूर निघून जावे ?

पवारांना पार्किंग द्यावे ?

की रिजर्व पार्किंग उठवून
पूर्वीप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश ही पद्धती चालू करावी ?

कृपया तुमचे मत सांगा व जोशींना निर्णय घेण्यास मदत करा…

ता.क.
याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही.
कुणाला तसा वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Not Owned by latenightedition.in

© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!