आरोग्यदायक मटकी

आरोग्यदायक मटकी

{{ COPY }}

#मटकी  ||  #आरोग्यवर्धक  ||  आरोग्याम धनसंपदा  || Health Tips

आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे हे कडधान्य आणि बऱ्याच जणांना आवडणारे देखील. मटकीची मिसळ, उसळ, दही घालून केलेली भेळ, तसेच विविध चाटचे प्रकारात मटकीचा वापर केला जातो.

मटकी ही चवीला गोड, थंड गुणाची, पचायला हल्की, रूक्ष, वात वाढविते, कफपित्त कमी करते. मल बांधून ठेवते, कृमी उत्तपन्न करते.

आता मटकीच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची शरीरावर काय परिणाम होतो ते आपण पाहूया:

१) मटकीचा कट:
गोड, थंड, पचायला हल्का, कोरडा, भुक वाढविणारा, वातकर, तापात पथ्यकर.

२) मटकीचे सुप:
अल्प बलकारक, पाचक, पचायला हल्के, डोळ्यांना हितकर, रक्तविकारात उपयुक्त, चवीला गोड, पित्तकफ कमी करणारा.

३) मटकीची उसळ:
पचायला जड, तिखट, गोड, कृमी उत्पन्न करणारी, वात वाढविणारी, कफ पित्तनाशक, धातु पोषक.

Related image

मटकी आपण सर्वच जण मोड काढुन वापरतो पण असे करत असताना एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे कोणतेही कडधान्य पाणी घालून भिजत घालून मोड आणायला ठेवले असता त्यात पाण्याचा अंश वाढतो आणि मटकी अशा प्रकारे मोड काढुन खाण्याने तिच्या कृमी उत्पन्न करायच्या गुणात अधिकच भर पडणार ह्यात शंकाच नाही. मोड काढलेली मटकी कच्ची कधी ही खाऊ नये. तसेच मटकी वारंवार नियमीत खाऊ नये.

मटकी अतिप्रमाणात खाल्ल्याने भुक मंदावणे व कृमींचा त्रास बळावण्याची शक्यता वाढते.

मटकीच्या अजीर्णावर दह्यावरचे पाणी प्यावे.

सूचना – ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे ही विनंती

POST BY = स्वाती अणवेकर.

नहाने का वैज्ञानिक तरीका

© 2016 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!