रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक

रणांगण – मराठी नाटक
#पानिपत (1760) लढाई ||   #संक्रांत  ||   The Battle Of Panipat ||  मराठेशाहीचा इतिहास
दिग्दर्शक – वामक केंद्रे
मुख्य भूमिका – अविनाश नारकर

Image result for रणांगण

पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात एक शोकांतिका म्हणून गणली जाते. मराठी माणसाच्या मनावरील एक भाळभळणारी जखम. संक्रांत जवळ आली की अनाहूतपणे ह्या जखमेवरची खपली निघते अन त्या वेदनेच्या आठवणी जाग्या होतात. इतिहासात केवळ ‘…जिंकता जिंकता हरलेली लढाई!’ इतकेच मर्यादित अर्थ त्या घटनेला नाहीत. त्या युद्धांनंतर आशियाई उपखंडाचे सर्व संदर्भ बदलणार होते. मराठ्यांच्या दारुण पराभवाने ते बदललेही. अगदी, आज बलुचिस्तानात मराठ्यांचे वंशज सापडतात हेसुद्धा त्याच पानिपत युद्धाचे परिणाम म्हणावे लागतील.
१४ जानेवारी १७६१, संक्रांतीच्या दिवशी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संक्रांत साजरा होत होती अन तिकडे पानिपत युद्धात मराठा सैन्य मृत्युला सामोरं जात होतं. मराठे पानिपतची लढाई हरले आणि एका शोकांतिक, करूणामय पानांनी इतिहास भरला गेला. आजही, अडीचशे वर्षांनंतरही, संक्रांत आली की तो इतिहास आठवतो.

DOWNLOAD FREE APP HERE

खरं तर संक्रांत जवळ आलेली असतानाच वामन केंद्रे दिग्दर्शित आणि अविनाश नारकर अभिनयसंपन्न “रणांगण” हे पानिपताचा इतिहास डोळ्यासमोर जागं करणारं नाटक बघण्यात आलं. तो इतिहासच इतका रोमांचक अन थरारक आहे की नाटक बघताना मन हेलावून जातं आणि रोमांचही उभे राहतात.

नाटकाची सुरुवात होते आजकाळात. म्हणजे खर्‍या पानिपत लढाईच्या अडीचशे वर्ष नंतर. एका संक्रांतीच्या रात्री पानिपतच्या रणांगणावर इब्राहीम गार्दी (अर्थात त्याचा आत्मा) सदाशिव भाऊंना शोधत असतो. तोच इब्राहीम गार्दी जो मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तोच गार्दी ज्याने केवळ निष्ठेसाठी जीवन नाकारून मौत पत्करली. तोच गार्दी ज्याने धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य दिलं. संक्रांतीच्या त्या रात्रीपुरता पानिपतवर मृत सैनिकांचे आत्मे जीवंत होत असतात. गार्दी लष्करातिल सैनिक आनंदाने बागडत असतात अन मराठा मावळे (आत्मे) सुस्तीने, निराशेने अन शरमेने त्याच रणांगणावर पडलेले असतात. त्यांच्या लेखी पानिपत हा मराठ्यांचा लाजिरवाणा पराभव आहे, त्यामुळे त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा नाही. आपण पराभूत आहोत अन इतिहासात आपल्याला तेच स्थान आहे अशी त्यांची धारणा असते.

मग गार्दी सैनिक पुर्णपणे खचलेल्या मराठा मावळ्यांना संपूर्ण पानिपतच्या इतिहासाचा जागर करून सांगतात. पानिपतची लढाई, त्याची पार्श्वभूमी अन त्याचा शेवट सर्वकाही! त्यात मराठे अन भाऊसाहेब पेशवे ज्या बहादुरीने अन शौर्‍याने लढले-झुंजले, अफगाणी अब्दालीची कशी कोंडी झाली याची आठवण ते करून देतात. एकंदरीत पानिपतचं युद्ध हे पराभव नसून शौर्याचं प्रतीक आहे आणि मराठ्यांनी पराभूत मानसिकता झिडकारून अभिमानाने मिरवावे असे घाव आहेत. येथेच सुरू होते खर्‍या नाटकाला!
पानिपतच्या युद्धाचा आवाका इतका मोठा होता की त्यावर चित्रपट बनवायचं धाडसही कोण करू शकत नाही. पण पानिपतचा इतिहास रंगभूमीवर मांडायचा पराक्रम वामन केंद्रे, मोहन वाघ चमूने केला त्याचं कौतुक केलच पाहिजे. स्टेजवर पानिपत सारख्या भीषण महासंग्रामाचा पट मांडणे हा मूर्खपणाच आहे, असं कोणीही म्हंटलं असतं. पण ते तितक्याच सिद्धतेने तडीस नेण्याचं कार्य “रणांगण” नाटकात दिसून येतं.
नाटकात प्रत्येक घटना प्रेक्षकाला समजेल, त्या घटनेची व्याप्ती, भीषणता, भव्यता जानवावी अन प्रेक्षक रोमांचित व्हावा अशी रचना केली आहे. विशेष म्हणजे, घटना त्याचे संदर्भ अन इतिहास समजावून सांगण्यासाठी पोवाडे अन गाण्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे. नाटकाचे संवाद अन कलाकारांनी चोखपणे वठवलेल्या भूमिका हे नाटकाचा प्राण म्हणाव्या लागतील. आजूबाजूला कसलाही भव्य सेट नसतानाही प्रेक्षक त्या काल्पनिक जगात जाऊन पोचतो. काळजाला भिडणारे संवाद अन त्याची चपखलपणे केलेली मांडणी हे तीन तास खिळवून ठेवतात अन उत्कंठा वाढवत राहतात. नाटकात वेशभूषा-रंगभूषा वगैरेचा वापर वगळता कसल्याच ऐतिहासिक सामुग्रीचा वापर केला नसल्याने एक शुष्कपणा वाटतो. पण पानिपतदरम्यान घडलेल्या महत्वाच्या घटना हेरून कथानक पुढे जात राहतं. मराठे अन अब्दाली यांच्यातील डावपेचाचा पट हाच नाटकाचा मुख्य गाभा आहे…

पानिपत संबंधी पुस्तके वाचा

नाटकात भाऊसाहेब पेशवे यांचं पात्र सर्वाधिक प्रभावी असणं स्वाभाविक आहे. अविनाश नारकर यांनीही भूमिका प्राण ओतून जीवंत केली आहे. भाऊसाहेबांचा मत्सुद्दीपणा, राजकीय जाण, हतबलता, उत्साह, नैराश्य आणि करारीपणा अतिशय उठून दिसतो. त्यानंतर नजीब खान ही भूमिका खूप मस्त जमून आली आहे. नजीब खानचा बेरकीपणा, स्वार्थीपणा अन विदूषकी चाळे पानिपत युद्धाला कारणीभूत आहेत हेही स्पष्टपणे समोर येतं. ती भूमिकाही खूप मेहनतीने उभी केली असल्याचं जाणवत राहतं. इब्राहीम गार्दी अन सदाशिवभाऊ पेशवे यांच्यातील मित्रत्व, आपलेपणा अन निष्ठा ही निवडक दृश्यांतून ठामपणे मांडली आहे. पानिपत युद्धादरम्यान झालेला जातीयवाद, अविश्वास अन एकमेकांच्या बाबतीत मनात असलेली आधी हीच पानिपत पराभवाला कशी कारणीभूत आहे हा मुद्दासुद्धा जाणीवपूर्वक मांडून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
खासकरून उत्सुकता होती ती मुख्य युद्धं कशा प्रकारे मांडलं जाईल याबद्धल. कारण तो महासंग्राम, ते भव्य समर रंगभूमीवर मांडणे एक आव्हान होतं. युद्धादरम्यानची रिंगण पद्धत वगैरे! पण त्यासाठी जी युक्ती वापरली आहे ती अप्रतिम आहे. ज्यांचा आत्मा #नाटक जगतो तेच असं सादर करू शकतात. ते दृश्य बघताना खरं युद्धं कसं झालं असेल याचं चित्र उभं राहतं.
एकंदरीत एक अजरामर कलाकृती बघून आनंद झाला. पानिपतचा माहीत असलेल्या इतिहासाला एक दृश्य स्वरूप ह्या नाटकामुळेच प्राप्त झालं म्हणावं लागेल.

latenightedition.in  ||  @Late_Night1991

संबंधित पोस्ट…

Unknown History Of The Maratha

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!