Kitchen Beginners

Kitchen Beginners

तुम्हाला जर खूप भूक लागली असेल आणि काही करून खाण्याचा कंटाळा आला असेल तर काही विशेष पदार्थ असे आहेत की जे बनवण्यास फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. आज आपण असेच दोन पदार्थ शिकणार आहोत.

खूप भूक आणि खूप कंटाळा आला आणि कमी वेळ असेल तर असेल तर…

१  मेतकूट चिवडा

साहित्य – चुरमुरे, तेल, मेतकूट, मीठ, तिखट किंवा लोणच आणि कांदा

कृती –
१. सर्वात आधी चुरमुरे चालून घेऊन एका पातेल्यात घ्या. (पाव किलो)
२. त्यात आता अंदाजाप्रमाणे तेल (दोन मोठे चमचे ), मेतकूट (दीड चमचे), तिखट (अर्धा चमचा) किंवा १ चमचा लोणच आणि थोडसं मीठ टाका.
३. सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. चव घेऊन बघा. जर काही कमी पडलं अस वाटत असेल तर पुन्हा टाकू शकता.
४. कांदा आणि मेतकूट चुरमुरे असा खमंग बेत जुळून येईल.

जर खूप भूकलागली असेल आणि थोडा वेळ असेल तर…

२.सुकी भेळ 

साहित्य – चुरमुरे, तेल, तिखट मीठ, मोहरी, हळद, जिरे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर.

कृती –
१. आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात थोडीशी मोहरी टाका.
२. मोहरी फुटली की मग त्यात जिरे आणि हळद टाका.
३. त्यात थोडेसे शेंगदाने आणि दाळव टाका.
४. नंतर त्यात चुरमुरे टाका.
५. मग गरजेनुसार तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. सर्व मिश्रण नीट हलवून घ्या.
५.  मिश्रण थंड होईपर्यंत कांदा, टोमॅटो कोथिंबीर आणि उन्हाळा असेल तर कच्ची कैरी (किंवा लिंबू) स्वच्छ धुवून चिरून घ्या. आवडत असेल तर त्यात तुम्ही काकडी, पापड्या किंवा मूग दाल वगैरे टाकू शकता.
 ६. हे सर्व चिरून झाल्यावर त्या तयार केलेल्या मिश्रणात टाका.
७.  आणिही एक भेल तयार आहे.

किंवा तुम्हाला फोडणी देता येत नसेल तर अजून एक नुसखा असा आहे……

१. एका पातेल्यात चुरमुरे घ्या.
२. त्यात आता पापडी आणि गरजेप्रमाणे तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. एकदा ते हलवून घ्या.
३. त्यात नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिरून टाका. सर्व मिसळून घ्या.
४. त्यात तुम्ही वरुण लिंबू, काकडी, शेंगदाने, दाळ ,शेव किंवा फरसान टाकु शकता.
५.  आवडत असेल किंवा घरात उपलब्ध असेल तर त्यात तुम्ही चटणी सुध्दा वापरू शकता.

आणखी एक असाच नुसखा आहे. त्यात फक्त चुरमुरे नसून जाड पोहे वापरावे लागतील. तो नुसखाही बघून घेऊ….

 ३.  मेतकूट पोहे

साहित्य  – जाड पोहे, मेतकूट, तिखट-मीठ किंवा लोणच, तेल, कांदा टोमॅटो, कोथिंबीर, कैरी. 

कृती – 
१. एका पातेल्यात जाड पोहे घ्या.
२. त्यात नंतर तेल (फोडणीच असेल तर उत्तम), मेतकूट आणि मीठ टाका.
३. त्यात आता तिखट, मसाला किंवा आंब्याच लोणच टाका.
४. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
५. त्यात वरुण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी चिरून टाका.
६. मेतकूट पोहे तयार.

                                                                                                                            – सौ. जोशी काकू

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!