ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!  || मराठी कविता  || Marathi Kavita  || Twitter माध्यमावर भाष्य!!!

 

रात सरतच नाही

अन दिस पुरतच नाही

ट्विटरच्या नादापाई

धड काम होत नाही!

 

ह्या व्यसनाचा आहे नाद मोठा वंगाळ

ह्याच्या खेळामुळे होती खाण्या-पिण्याचीबी आबाळ!

 

घडी घडीला वाजतो मोबाईल टूई टूई

कोण्या मैतराचा संदेश हे बघण्याची घाई!

 

बोटा डोळ्यालाबी झालीया याचीच सवय

जिवंत माणसाचीबी नसे याच्यापुढं गय!

 

जरी व्यसन वाईट तरी कधी होतोय उपेग

बिकाऊ माध्यमांत

खऱ्या पारदर्शकतेच हे एकमेव जग??

 

कधी समाजसेवा कधी असे मनोरंजन

जरी चेष्टामस्करी कुणी करती मंथन!!

 

याच्या फायद्याला तोटे ग्रहनाप्रमाणे झाकती

परी मिळतात इथे दूरदेशीच्या संगती!

 

जरी चुकले तरी ते सपादून जाई

निष्कर्षाची येथे करू नका घाई!

 

जरी वाटता सामान्य तरी पावरबाज असे

याच्या रेट्यापुढं भल्यांची मग्रुरीही निजे!!!

 

@Late_Night1991

©latenightedition. in

 

 

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!