समुद्र किनारा

समुद्र किनारा

भावविश्व  || मनातलं काही || व्यक्त

ठिकाण: पोर्ट कोची , केरल दि :६/१२/१२

आज खूप महिन्या नंतर समुद्र किनाऱ्या वर जाण्याचा योग आला,

तसे घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनाची कसरत करत जगात असताना मुंबईत समुद्रावर जायला फारसा वेळ मिळतो कुठे ?

असो पण का कोण जाने समुद्र किनारा नेहमीच आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतो ?

कादाचीत हा सगळा त्या किनाऱ्या वरील वातावरणाचा प्रभाव असावा, तुम्हाला काय वाटते? म्हणजे बघा ना सूर्यास्ताची वेळ त्यात समुद्र पक्ष्यांचे उडणारे थवे, समुद्रात कोणत्या एका कडेला स्तब्ध उभे असणारे भले मोठे जहाज त्या जहाजाच्या पुढे-पुढे घुटमळणारे छोटेसे पण तरतरीत छोटे जहाज, दूरवरून येऊन किनार्याला मिळणाऱ्या लाटा आणि आजूबाजूला वाहणारी कोरडी-खारी थंडगार हवा. अशा वातावरणात आपण जेंव्हा किनार्यावर रपेट मारतो किंवा नुसतेच वाळूत बसून आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहतो तेंव्हा नक्कीच घडाळ्याचा सेकंदाचा काटा रोजच्या पेक्ष्या थोडा हळू चालू लागतो.

आपण आजूबाजूच्या लोकांना विसरून समुद्राच्या लाटांकडे आकर्षित होतो, आपले मन लाटांच्या होणाऱ्या लयबद्ध आवाजावर केंद्रित होते, मग जसा समुद्र आपल्या लाटांबरोबर बऱ्याच गोष्ठी किनार्यावर आणून सोडतो तसेच आपले मनही खोल कुठे तरी रुतलेल्या-दबलेल्या, लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्ठी, प्रसंग, संवाद पुन्हा वर घेऊन येते आणि काही वेळा करता सुरु होतो विचारांचा कल्लोळ हो कल्लोळच .. पण हा कल्लोळ फार काळ टिकत नाही कारण जसा समुद्रकिनारा दोन लाटांच्या दरम्यान सोज्ज्वळ होऊन निघतो तसेच आपले मन हि शांत होऊन त्या गोष्टींचा विचार, मंथन करते आणि हे सर्व विचार मनात साठून ना राहता ते लाटां सारखे प्रवाही होतात आणि याचा परिणाम आपले मन पहिल्या पेक्ष्या नक्कीच हलके होते .

मी यावर म्हणेन कि समुद्र किनारा हा नक्कीच नैसर्गिक मनोचिकीस्तक तज्ञा पेक्ष्या कमी नाही त्यामुळे वेळ मिळेल तेंव्हा जरूर समुद्र किनार्यावर एकटे जात जा .

मूळ लेखक व रचनाकार – बोलघेवडा

 

© 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!