IPO म्हणजे काय ?

IPO म्हणजे काय ?

IPO – Initial Public Offering   ||  share बाजारातील नफ्याचं समीकरण  || IPO ची मराठीतून माहिती || IPO that made Investors Rich  ||  IPO History 2017  ||  IPO Information || SHARE MARKET || लखपती होण्यासाठी लॉटरी

अनेकांना लॉटरी खरेदी करण्याची सवय असते. त्यातून एकना एक दिवस आपलं भाग्य उजाळेल, लक्ष्मी दारात उभी राहील अशी त्यांची स्वप्नं असतात. आयुष्यभर ते लॉटरी घेतात पण त्यातील सर्वांना काही लॉटरी लागत नाही.

पण शेअर बाजारात अगदी अशीच लॉटरी पद्धत आहे जी तुम्हाला लखपती तरी नक्कीच बनवू शकते. शिवाय यात फार जास्त जोखीम नसते. योग्य नियोजन अन योग्य सल्ला असेल तर यात चांगले पैसे मिळतात. या लॉटरी ला म्हणतात IPO अर्थात Initial Public Offering

IPO म्हणजे काय ???

शेअर बाजारातील मूलभूत माहिती असणार्‍या लोकांना, गुंतवणूकदारांना याबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. पण नवख्यांना हे काहीतरी अवघड माध्यम अन साधन वाटू शकतं. पण ही अतिशय सोपी, सुरक्षित व legal प्रक्रिया आहे.

IPO (INITIAL PUBLIC OFFER)

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने Stock Exchange मध्ये list होत असते.

IPO मुळे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून Shares विकत घेतल्याने कंपनीला नवीन भांडवल मिळतं.

सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO – Initial Public Offering प्रक्रिया म्हणतात. किंवा यालाच Primary Market असही म्हणतात कारण सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून shares विकत घेत असतो. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते.

या प्रक्रियेत Share चा दर ठरवलेला असतो, ज्याला आपण ISSUE PRICE म्हणतो. म्हणजे ज्या दराला कंपनी आपले shares गुंतवणूकदाराला देऊ करत आहे तो दर. उदाहरणार्थ, BSE IPO मध्ये Issue Price 806 आहे म्हणजे गुंतवणूकदाराला BSE चा एक share 806 रुपयांस घ्यावा लागेल.

नंतर येतो LOT SIZE. Lot Size (अर्थात एका गुंतवणूकदाराला किमान किती shares घ्यावे लागतात – 20, 30, 50 असे lot size असतात) असते. उदाहरणार्थ, BSE चा lot size आहे 18. म्हणजे एका गुंतवणूकदाराला BSE चे किमान 18 shares घ्यावे लागतील आणि 18 च्या multiple मध्येच घ्यावे लागतील.

एका IPO ची किम्मत ही साधारणपणे 15000 च्या आसपास असते. जशी BSE ची 806*18 = 14508 आहे. सामान्य गुंतवणूकदाराला कितीही Lot साठी apply करता येतं, पण शक्यतो एकच Lot Allocate केला जातो.

IPO ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होत असते. म्हणजे IPO ला apply करण्यासाठी तीन दिवस असतात. त्या तीन दिवसांत सामान्य गुंतवणूकदार IPO साठी apply करू शकतो.

IPO तून shares घ्यायचे असतील तर ते तुम्हाला ब्रोकरच्या माध्यमातून Apply करता येतं किंवा तुमच्या Demat ला लिंक असलेल्या savings बँक खात्याच्या OnlineBanking वापरुन तुम्हाला Apply करता येतं. पण त्या खात्याला ASBA ही सुविधा उपलब्ध असायला हवी. IPO ला apply करण्यासाठी कसलेच वेगळे पैसे भरण्याची गरज नसते.

जर तुम्ही IPO मध्ये एका LOT साठी apply करत असाल तर तितके पैसे तुम्हाला तुमच्या SAVINGS ACCOUNT (जे Demat शी link आहे तेच) मध्ये ठेवावे लागतात. म्हणजे मला जर BSE च्या IPO साठी apply करायचं असेल तर मला माझ्या Savings account मध्ये 14508 रुपये ठेवावेच लागतील त्याशिवाय मी apply करू शकत नाही.

जोपर्यंत ही IPO प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हे 14508 रुपये HOLD वर असतील. म्हणजे ते पैसे तुम्ही काढू किंवा वापरू शकत नाहीत. ते freeze केले जातात. जर तुम्हाला IPO मधून shares मिळाले तर ते पैसे debit होतात (कंपनीला जातात) आणि जर तुम्हाला IPO मधून shares मिळाले नाहीत तर ते तुम्हाला लागलीच परत मिळतात.

त्यानंतर चार-पाच दिवसांनी Allotment Date असते जेंव्हा apply केलेल्यापैकी कोणत्या गुंतवणूकदाराला IPO मधून shares मिळाले आहेत ते जाहीर होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे, तुम्ही IPO ला apply केलं आहे म्हणजे तुम्हाला ते shares मिळतीलच असे नसतं. ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. LOTTERY आहे…

समजा, PQR कंपनी आहे. ती कंपनी भांडवल उभं करण्यासाठी बाजारात shares घेऊन येते. समजा कंपनी 500 कोटींचे भांडवल उभं करण्यासाठी 1 लाख shares बाजारात आणत आहे. कंपनी दर्जेदार असेल तर अनेक गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करू बघतात. समजा 2 लाख गुंतवणूकदारांनी त्या IPO प्रक्रियेत सहभाग घेतला असेल. Shares 1 लाख आणि त्यासाठी 2 लाख लोक apply करत आहेत म्हणजे सर्वांना ते shares मिळणार नाहीत. मग लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना shares allocate केले जातात. इथे मागणी जास्त आहे आणि shares कमी, म्हणजे IPO तून दिल्या जाणारे shares ची किम्मत वाढू शकते. ह्या सर्व प्रक्रियेसाठी तारखा निश्चित केलेल्या असतात.

IPO मिळवण्यासाठी कसले गैरव्यवहार होत नसतात. ही अतिशय शिस्तबद्ध अशी प्रक्रिया आहे.

त्यानंतर येते LISTING DATE. या दिवशी त्या कंपनीचा share सामान्य गुंतव्नुक्दारांसाठी बाजारात खुला होतो. म्हणजे आता कोणीही Exchange through तो share घेऊ शकतो.

Share कोणत्या price ला list होईल हे सांगता येत नाही. तो ISSUE PRICE पेक्षा जास्तच price ने list होतोच असं काही नाही. एकंदरीत खरेदी आणि विक्री करणारे यावर ते मूल्य निश्चित होतं. त्यामुळे ज्या rate ला IPO मिळाला आहे त्यापेक्षा जास्त rate लाच तो LIST होईल असं काही नसतं. जर IPO मधून आलेल्या एखाद्या कंपनीच्या share खरेदी करण्यास कोणी गुंतवणूकदार तयार नसतील तर त्याचा तो share कमीलाच list होणार.

कोणते IPO चांगले, कोणत्या IPO साठी apply करावं हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. यासंबंधित माहिती टीव्ही चॅनल वर किंवा विविध वेबसाइटवर मिळेल.  सगळेच IPO चांगले असतात असं काही नाही. योग्य सल्ला घेऊन तुम्ही IPO साठी apply करू शकतात. चांगल्या कंपनीचे IPO सुद्धा नुकसानीत जाऊ शकतात. पण असं क्वचित घडतं. कोणत्या IPO साठी apply करायचं, कधी व कसं apply करायचं हे तंत्र आहे जे अभ्यासानंतर समजतं. पण एक निश्चितपणे सांगता येईल की IPO हे कमी कालावधीत चांगला परतावा देऊन जातात. एखाद्या लॉटरी प्रमाणे!!!

Image result for ipo

सण 2017 मधील असे काही IPO ज्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले.

 1. BSE

Bambay Stock Of Exchange. देशातील मोठ्या Exchange board पैकी एक. गुंतवणूकदारांना आवडेल असाच हा share आहे.

806 रुपयांना दिलेला हा share listing ला 1085 पर्यन्त गेला आणि नंतर 1250 पर्यन्त. म्हणजे 5000 ते 7000 इतका नफा.

2. Avenue Supermart

Dmart चे मॉल चालवणारी ही कंपनी. हे shares IPO मध्ये मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांच्या अक्षरशः उड्या पडल्या होत्या. परिणामही तसाच आला. 300 रुपयांना Issue केलेला हा share listing ला 640 पर्यन्त गेला आणि आज तो 1200 रुपयांवर कार्यरत आहे. म्हणजे 15000 ते 40000 इथपर्यंतचा नफा….

3. HUDCO

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी. गृहनिर्माण क्षेत्रातील महत्वाची संस्था. कोणताही सरकार सत्तेवर आलं तरी या क्षेत्रावर लक्ष केन्द्रित करतच असतं. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम कंपनी.

58 रुपये ही Issue Price असताना listing price होती 75. नंतर share price 100 पर्यन्त आणि आत्ता 82 वर आहे. म्हणजे 3 ते 8 हजार रूपयांचा नफा.

4. Shankara Builder

दक्षिणेतील या Construction कंपनीने चांगलाच नफा मिळवून दिला. 460 ही Issue Price आणि Listing Price 600 वगैरे. आणि आजची market price ही 1500 आहे. म्हणजे minimum 5000 आणि maximum 30000 चा नफा.

5. CDSL

देशात दोनच depositories आहेत त्यातील ही एक. दर्जेदार म्हणतात तशी कंपनी. 149 रुपये अशा सुयोग्य premium price वर हा IPO दिलेला जो पहिल्याच दिवशी 250 पर्यन्त पोचला आणि काहीच काळात 350 च्याही अधिक जाऊन पोचला. म्हणजे पहिल्या दिवशीचं profit 10000 आणि नंतरच ते 20000 च्या आसपास.

6. AU Small Finance

Finance क्षेत्रातील एक कंपनी. NBFC क्षेत्राची सध्याच्या परिस्थितीनुसार ही कंपनी चांगली म्हंटली पाहिजे.

358 रुपये Issue Price असलेला IPO listing ला 540 रुपये पर्यन्त गेला. आज त्या share ची price आहे 630.

First day gain 7000 रुपये वगैरे आणि होल्ड केला असता तर more than 10000.

7. Salasar Technology

साधारणपणे 108 रुपये Issue Price असलेला हा IPO 270 रुपयांपर्यंत सेटल झाला. म्हणजे 20000 रुपये नफा!!!

9. Cochin Shipyard

नावावरून अंदाज येतो की जहाजबांधणी व बंदर क्षेत्राशी संबंधित कंपनी असावी. सध्याच्या सरकारचा transportation वर अधिक भर आहे हेही काही लपून राहिलेलं नाही.

432 च्या Issue Price ने दिलेला share listing day ला 520 पर्यन्त गेला. म्हणजे एका लॉटमागे 2000 रूपयांचा नफा.

शेअर बाजार e-book – मराठीत

10. Apex Frozen

अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित असलेली ही कंपनी. 175 च्या दराने दिलेला IPO listing च्या दिवशी 200 रुपयांवर जरी अडकला असला तरी आज त्या share ची किम्मत आहे 650 च्या अधिक. म्हणजे पहिल्या दिवशी 2000 चा नफा आणि तोच जर होल्ड केला असेल तर 30000 अधिक नफा!!! लॉटरी याहून वेगळी काय असू शकते???

10. Dixon Technology

कधी कधी अनपेक्षितरीत्या लॉटरी लागते तो किस्सा इथे आहे. कंपनी नेमकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे किंवा अजून काय याबाबत फार चर्चा नव्हती. पण listing झाल्यावर कंपनीने अनेक गुंतवणूकदारांचं वेधून घेतलं. जोरदार नफा मिळवून देणारा IPO म्हणता येईल. Electronics व तंत्रज्ञान क्षेत्रात diversified असलेली कंपनी.

1766 ची Issue Price असलेला share पहिल्याच दिवशी, listing ला थेट 2800 चा टप्पा ओलांडतो. म्हणजे जवळपास एका लॉटमागे 8000 नफा!

11. Prataap Snacks

सप्टेंबर 2017 मध्ये आलेल्या ह्या IPO ने अपेक्षा नसतानाही जोरदार नफा मिळवून दिला. त्या अर्थाने अपरिचित अन फार ऐकिवात नसलेली ही कंपनी. Packed food चा व्यवसाय असलेली ही कंपनी.

938 च्या issue price वर सामान्य गुंतवणूकदारांना shares देणारी कंपनी list झाली ते 1200 च्या आसपास. पहिल्याच दिवशी IPO ने चार ते पाच हजार रूपयांचा नफा मिळवून दिला.

12. Godrej Agrovet

Godrej सारखा दर्जेदार आणि माहितीतील उद्योग समूह. कंपनीचा उद्योग हा poultry processing, animal feed, oil palm plantations and agri inputs अशा क्षेत्राशी निगडीत. एका Diversified portfolio मध्ये रिकामी जागा भरून काढता येईल असा share. सामान्य गुंतवणूकदाराला बर्‍यापैकी आकर्षित करणारा IPO.

460 ची Issue Price असताना listing च्या दिवशी 600 चा आकडा या share ने ओलांडला. अजूनही हा share बर्‍यापैकी तेजीत आहे. साधारणपणे 5000 रूपयांचा नफा या IPO share ने मिळवून दिला.

13. Reliance Nippon

अनिल अंबानी ग्रुपमधील कंपनी. अनिल अंबानी यांचा उद्योगसमूहातील कंपन्या विविध अडचणीमधून जात असताना हा IPO बाजारात आला. हा IPO सामान्य गुंतवणूकदाराला फार आकर्षित करू शकला नसला तरी बर्‍यापैकी परतावा या कंपनीने दिला.

252 ची Issue price असताना listing day ला share 290 पर्यन्त झेपावला. साधारणपणे 2000 हजारांचा नफा पहिल्या दिवशी या IPO ने मिळवून दिला.

14. HDFC Life

Non-banking Finance संस्थेला बरे दिवस येत असताना ह्या कंपनीने IPO बाजारात आणायचं ठरवलं. Insurance आणि काही अंशी NBFC क्षेत्रात कार्यरत असलेली ही कंपनी. ICICI General Insurance, SBI Life, GIC इत्यादी कंपन्यांचे IPO बाजारात फार चमक दाखवू शकले नसताना हा IPO बाजारात आला. एका बाजूला Share बाजार नवनवे शिखर गाठत असल्याचा फायदा ह्या share ला तर झालाच पण योग्य Issue Price आणि Brand यामुळे IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला.

नोवेंबर 2017 मध्ये 290 च्या rate ने हा शेअर सामान्य गुंतवणूकदाराला देऊ केला होता. बाजारात याची listing 315 च्या आसपास झाली असताना अनेक गुंतवणूकदारांनी याला खुल्या बाजारातून विकत घेतल्याने पहिल्याच दिवशी या शेअर ची किम्मत 350 जवळ गेली. आज हा शेअर 400 च्या वर कार्यरत आहे.

साधारणपणे listing च्या दिवशीचा हिशोब गृहीत धरला तरी एका lot मागे सामान्य गुंतवणूकदारणे 3000 रुपये नफा मिळवला.

15. Astron Papers

2017 वर्षाच्या शेवटाला हा IPO आलेला. पेपर क्षेत्राशी संबंधित कंपनी. चीनमधील पेपर सेक्टरवर निर्बंध आल्याने भारतातील पेपर सेक्टर ला चांगले दिवस येतील अशी शक्यता निर्माण झाली होती अशा काळात हा IPO बाजारात आला. शिवाय Share बाजारही तेजीत होता.

फक्त 50 रुपयाने सामान्य गुंतवणूकदाराला हा share देऊ केला होता. सर्व सकारात्मक वातावरणात हा share बाजारात 120 रुपयाने list झाला. साधारणपणे अडीच पट!!!

या share च्या एका lot मागे जवळजवळ वीस हजार रूपयांचा नफा. तोही फक्त दहा दिवसांत!!!

16. Apollo Microsystems

Quality Electronics क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ह्या कंपनीने 2017 च्या शेवटाला IPO आणलेला. सामान्य गुंतवणूकदारांसाठी 275 रुपयांच्या rate ने दिलेला हा IPO बाजारात List झाला 478 rate ला. या IPO च्या एका Lot मागे सामान्य गुंतवणूकदाराला जवळपास 8000-10000 रूपयांचा नफा दिला.

याशिवाय अन्य काही IPO आहेत ज्यांनी छोट्या प्रमाणात नफा मिळवून दिला आहे. दुसर्‍या बाजूला असेही काही IPO आहेत जे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर खरे उतरू शकले नाहीत. SBI Life किंवा ICICI General Insurance किंवा GIC, New India Insurance अशा काही IPO नी निराशा केली. ह्या सर्व दर्जेदार कंपन्या आहेत. सुरूवातीला यांनी नुकसानीची बाजू दाखवली असली तरी नंतरच्या काळात यांनी चांगला नफा दिला. पण याव्यतिरिक्त बरेच IPO आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग केला. पण कोणत्या IPO साठी appy करायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे जाणकाराचा सल्ला घेऊन आपण IPO तून चांगला नफा कमवू शकतो.

 

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!