Good Shares With Low Price

Good Shares With Low Price

Low Value Shares  ||  Shares Below 100 Rupees  ||  कमी किमतीचे चांगले शेअर  ||  Good Stocks With Low Value  ||  Stock Recommendation ||  गुंतवणूक संधी  || शेअर मार्केट मराठीत  || Share Market In Marathi  || Share Market Beginners

 

शेअर बाजारात जेंव्हा केंव्हा एखादा माणूस नव्याने येतो तेंव्हा त्याचे काही गैरसमज किंवा चुकीच्या संकल्पना असतात. त्या संकल्पनांच्या आधारावर तो व्यक्ति गुंतवणूक किंवा trading करू बघतो पण शेवटी त्याचा अपेक्षाभंग होतो. या अशा चुकीच्या संकल्पनेपैकी एक आहे “Low Value Stocks” buy करायची इच्छा होणे.

नव्याने येणार्‍या गुंतवणूकदारांना वाटत असतं की ज्या शेअर ची किम्मत कमी आहे तो आपण buy करावा. कारण त्यात आपल्याला Quantity Of Shares जास्त येतील आणि जरासा रेट वाढताच आपण तो विकून टाकू आणि नफा कमवू असा त्यांचा समज असतो. मग 100 च्या खाली असलेले shares ते शोधू लागतात. दोन आकडी किमतीत असलेले shares त्यांना गुंतवणुकीस जास्त अनुकूल वाटत असतात.

उदाहरण द्यायचं झालं तर, एक शेअर असतो ज्याची किम्मत 20 रुपये असते. त्यांना तो attractive वाटतो. आपण याचे 100 shares घेतले तरी आपली गुंतवणूक 2000 होईल. मग पाच-सहा महिन्यांत याची किम्मत 25-30 तरी होईलच; त्यानंतर आपण तो विकुया. म्हणजे 5 ते 10 रुपये नफा गुणिले माझे 100 shares असे पाचशे ते हजार रुपये माझा नफा होईल.

पण ही संकल्पना चुकीची आहे. एखादा शेअर जरी कमी किमतीला दिसत असेल तरी तो गुंतवणुकीस योग्य आहेच असं नाही म्हणता येत. कारण असे छोटे shares वर्ष-वर्ष दोन-तीन रुपये सुद्धा वाढत नाहीत. उलट एखादी नकारात्मक न्यूज येताच ते कोसळत जातात. याउलट जे दर्जेदार shares आहेत, जरी त्यांची किम्मत जास्त असली तरी ते वाढत जातात. त्यांचा वाढण्याचा वेगही लक्षणीय असतो. म्हणजे, TCS सारखा शेअर, ज्याची किम्मत 3000 च्या आसपास आहे तो दिवसाला 100-150 रुपये वाढतो किंवा पडतो. SBI सारखा शेअर, ज्याची किम्मत 300 च्या आसपास आहे तो दिवसाला फार तर 10-15-20 रुपये वाढतो किंवा पडतो; कधी-कधी 2-4 रुपये सुद्धा हलत नाही. तर हे छोटे shares दिवसाला एखाद रुपया कमी जास्त होत असतात.

तुम्ही जर 3000 रुपये गुंतवणार असाल आणि TCS चा एक share buy केला तर तो 50-100 असा वाढत जाऊन 3200 होईल. तुमचा नफा 200 रुपये. आणि जर समजा, 20 रुपयाचे 150 shares घेतले आणि तो फक्त 2 रुपये वाढला तरीही तुम्हाला 200-300 इतकाच नफा होणार आहे.

त्यामुळे शेअरची किम्मत किती आहे यापेक्षा तुम्हाला किती रुपये गुंतवायचे आहेत ते योग्य शेअर मध्ये लावणे उत्तम असतं. त्यामुळे येथे Quantity पेक्षा Quality ही महत्वाची असते. त्यामुळे महाग असले तरी योग्य shares च तुमची गुंतवणूक वाढवू शकतात.

इतकं सांगूनही छोट्या shares च्या बाबतीत गुंतवणूकदारांचं आकर्षण काही कमी होत नाही. असे shares दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतले जातात. त्यामुळे गुंतवणूकदार PENNY STOCKS मध्ये अडकण्याची शक्यता असते. असं असूनही असे काही shares आहेत ज्यांची किम्मत दोन आकडी अर्थात 100 पेक्षा कमी आहे आणि ते तुलनेने सुरक्षित व चांगला परतावा देऊ शकतात. आज आपण असेच कमी किमतीचे shares बघणार आहोत.

सांगायची गोष्ट म्हणजे, Ashok Leyland हा शेअर तीन वर्षांखाली 20-25 रुपयांना होता आणि आज 130 रुपयांवर कार्यरत आहे. TVS Electronics, Yes Bank, DCB Bank व असे अनेक shares कधीकाळी दोन आकडी होते आणि आज खूप वाढले आहेत. या shares ना आपण Multibagger Shares म्हणतो.  मी आज जे shares सांगतो आहे ते काही Multibagger नाहीत, कमी किमतीचे चांगले shares आहेत. त्या-त्या सेक्टर मध्ये त्यांच्यापेक्षा चांगले shares ही आहेत, पण ह्या लेखात आपण केवळ ‘कमी किम्मत’ हा निकष लावला आहे.

खाली मी काही कंपन्यांची यादी दिली आहे. त्यात A Category आणि B Category असे दोन भाग केले आहेत. यात A Category मध्ये दर्जेदार, Nifty मधील, सरकारी, अशा कंपन्यांचा समावेश आहे. यात पैसे गुंतवले तर जोखीम कमी आहे. दुसरीकडे, B Category मध्ये असलेले stocks ही चांगलेच आहेत, पण त्यात थोडी अधिक जोखीम आहे.

हे stocks कसे निवडले याचाही खुलासा करतो. दर्जेदार असलेले stocks तर सर्वश्रूत आहेत. त्यानंतर काही stocks चा मी स्वतः अभ्यास केला आहे. काही stocks हे मला Business Channel आणि पेपरमधील लेखातून मिळालेले आहेत. असे विविध पातळीवरून हे stocks शोधून एकत्रित केले आहेत.

[ खुलासा – मी काही SEBI Registered Advisor किंवा Fund Manager नाही. माझ्या क्षमतेनुसार हे stocks मी निवडले आहेत. यापैकी काही stocks मध्ये माझी गुंतवणूक आहेच. ]

 

A Grade

 1. BHEL

 2. SAIL

 3. RCF

 4. NALCO

 5. IDFC

 6. IDFC Bank

 7. HUDCO

 8. NHPC

 9. Idea

 10. Tata Power

 11. Dish TV

 12. IDBI Bank

 13. HCL Infosystem

 14. South Indian Bank

 15. Nalco [National Aluminium]

 16. SPTL

 17. Crompton Greave

 18. Shivam Auto

 19. Hindustan Copper

 20. Rico Auto

 21. Z Learn

B Category

 1. TV18

 2. Welspun India

 3. Alembic Pharma

 4. PTC India

 5. Fineotex Chemical

 6. VLS Finance

 7. Snowman Logistics

 8. Marketer Limited

 9. Patel Integrated

 10. Hindustan Tin Works

 11. Sumeet Securities

 12. Monnet Ispat

 13. A2Z Infra

 14. Vascon Engineers

 15. VIP Clothing

 16. Rolta India

 17. Nectar Life

 

लवकरच या यादीत आणखी काही stocks समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय या shares बद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

 

Documentation – Abhishek Buchake  ||  @Late_Night1991

संपर्क – latenightedition.in@gmail.com

महत्वाचं पुस्तक खालील लिंकवर… 

शेअर बाजार e-book – मराठीत

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!