Fund Transfer In Angel Broking

Fund Transfer In Angel Broking

How To Transfer Fund In Angel Broking | Online Fund Transfer  ||  Angel Eye

Angel Broking मध्ये Fund Transfer साठी दोन मार्ग आहेत. एक आहे चेक (Offline Way) आणि दूसरा म्हणजे Internet Banking द्वारे (Online Way)

यामध्ये चेक ने जर payment करायचं असेल तर आपल्या sub-broker कडे Angel Broking Pvt Ltd नावाने चेक द्यावा लागतो. या प्रक्रियेत पैसे आपल्या Demat ला जमा होण्यासाठी साधारणपणे दोन दिवस लागतात.

Fund Transfer साठी दूसरा सोपा मार्ग आहे Online Transaction चा ज्यामध्ये काही वेळामध्ये ते आपल्या Demat ला जमा होतात. यासाठी आपल्याला Angel Broking च्या वेबसाइटवर login करावं लागतं. ती प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊयात!

 

  1. सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन login करावे लागेल किंवा Google वर Angel Eye search करून पहिल्याच लिंकवर क्लिक करावे लागेल.

https://trade.angelbroking.com/

खाली दाखवलेल्या इमेज प्रमाणे एक page open होईल.

आता ह्या page वर Trading Id / Client Id आणि password असे details द्यावे लागतील. आपला Trading Id किंवा Client Id म्हणजे आपला Client Code असतो. उदाहरणार्थ, P12037 किंवा Z72578 असा काहीतरी तो असेल.

तुम्ही जर पहिल्यांदाच login करत असाल आणि password तुम्हाला माहीत नसेल तर Forget Password पर्याय निवडून आपला नवा password मिळवावा.

  1. वर दाखवलेल्या page मध्ये login केल्यानंतर सुरूवातीला तुमचा पोर्टफोलियो दिसेल. तुमच्याकडे असलेले shares, ते कधी व किती rate ला buy केले आहेत, सध्याचा rate काय ती माहिती मिळेल.

यामध्ये वरच्या बाजूला काही options (buttons) आहेत. त्यात Report ला क्लिक करावं लागेल. त्यात Fund Details असा पर्याय असेल तो निवडावा लागेल. खालील इमेजमध्ये तपासून पहा.

  1. आता त्या page वर तुम्हाला तुमच्या demat मधील fund details दिसतील. त्यात Debit किंवा Credit ची रक्कम दिसेल. त्या Amount वर click केल्यावर जुने transactions ची माहिती मिळेल.

आता जर आपल्याला Fund Transfer करायची असेल; म्हणजे आपल्या savings account मधून आपल्या Demat वर पैसे जमा करायचे असतील तर खाली दाखवलेल्या इमेज प्रमाणे “Pay Now” या option वर क्लिक करावं लागेल.

  1. आता एक नवीन page open झालेलं असेल. त्यात “Total Payable Amount” मध्ये तुमच्या demat वर किती debit आहे हे दिसेल. म्हणजे जर तुम्ही आज 5000 रुपयांचे shares खरेदी केले असतील आणि ते जमा केलेले नसतील तर तिथे – 5000 अशी अमाऊंट दिसेल.

त्याच्या खाली Amount या फील्ड मध्ये तुम्हाला तुमच्या रकमेचा आकडा टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही Demat वर किती पैसे जमा करू इच्छिता ती रक्कम.

त्याच्या खालच्या बाजूला तुमचे Bank Details दिसतील. ते account दिसेल जे तुम्ही Demat ला लिंक केलेलं आहे. त्याच account मधून demat ला पैसे transfer होऊ शकतात.

त्याखाली जो पर्याय आहे “Product” त्यात All Segment select करावं आणि “Pay Now” वर क्लिक करताच details submit होतील.

  1. आता “Pay Now” करताच तुम्ही तुमच्या Internet Banking च्या page वर redirect व्हाल. आता तुमच्यासमोर तुमची जी कोणती बँक असेल त्या बँकेची Internet Banking details submit करावे लागतील. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला तुमच्या Internet Banking चा Username आणि Password submit करावा लागेल.

  1. Internet bank details submit करताच तुमची process पूर्ण होईल आणि पैसे transfer होतील. बर्‍याचदा, details submit केल्याच्या नंतर तुमच्या registered mobile वर एक OTP येईल जो transaction पूर्ण करताना submit करावा लागेल.

तुमची Fund Transfer ची process पूर्ण झालेली असेल. तिथे transaction Id दिसेल जो तुम्ही लिहून ठेवावा. साधारणपणे एक ते दोन तासात ते पैसे तुमच्या Demat ला जमा होतात अन तसा confirmation मेसेज ही येतो.

जर काही कारणाने ते transaction पूर्ण होऊ शकलं नाही अन पैसे debit पडले आणि  demat ला जमा झाले नाहीत तर sub-broker शी संपर्क साधता येईल किंवा support@angelbroking.com वर email करता येईल किंवा 022-33551111 या Angel Broking च्या helpline center वर संपर्क साधता येईल.

WITHDRAWAL

हे झालं Fund Transfer. म्हणजे savings account तो demat transfer. याच्या विरुद्ध, जर Demat मध्ये जमा असलेले पैसे आपल्याला savings मध्ये transfer करायचे असतील तर त्याही प्रक्रिया कशी असते ते बघूयात.

याचेही दोन पर्याय असतात. एक म्हणजे आपल्या Broker ला सांगून ते transfer करून घेऊन शकता किंवा online स्वतः करू शकता. याला Fund Payout असं म्हणतात.

  1. वर दिलेल्या क्रमांक तीन पर्यन्त सर्व steps सारख्याच असतील. जेंव्हा आपण Fund Details page वर येऊ तिथे Pay Now च्या बाजूला Withdrawal (yellow color Button) असा पर्याय आहे. त्याला क्लिक करूया. See Below Image

  1. .Fund Withdrawal ला क्लिक केल्यावर तिथे एक नवीन page open होईल. Releasable Today मध्ये ती amount दिसेल जी तुम्ही आज withdraw करू शकता. त्याखाली Total Amount To Withdrawal यामध्ये तुम्ही किती पैसे काढून घेऊ इच्छिता ती amount टाकावी लागेल. ही amount Releasable Amount पेक्षा जास्त असू शकत नाही.त्याखाली तुमचे bank details दिसतील ज्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.

  1. जेंव्हा तुम्ही “Submit” कराल तेंव्हा request send होईल. त्याचा transaction Id दिसेल जो तुम्ही लिहून ठेवावा.

ही रक्कम Banking Hours मध्ये (म्हणजे सुट्टीच्या दिवशी ही रक्कम मिळणार नाही, ज्या दिवशी banks चालू आहेत तेंव्हा) मध्ये साधारणपणे तीन तासात तुमच्या demat वरून savings ला जमा होते.

या Online Transactions ला कसलेही टॅक्स लागत नाहीत. तुम्ही स्वतः ही प्रक्रिया कधीही कोठूनही करू शकता. ही Online Process कमी वेळेत पूर्ण होते आणि secured आहे.

Angel Broking च्या वेबसाइटवरून हे transactions करता येतातच, शिवाय Angel Eye हे Angel Broking चं Mobile Application आहे ज्याद्वारे या process करता येतात. त्याची माहिती पुढील पोस्ट मध्ये घेऊयात!

ABHISHEK BUCHAKE 

Share Market Posts (All Posts)

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!