लघुकथा

लघुकथा

लघुकथा  ||  मानवी अस्तित्व  ||  Marathi Short Story  ||  

जनावर, प्राणी असणं बरं असतं. वाट्टेल तेंव्हा उठायचा, झोपायचं, खायचं, टाकायचं अन पुढे जायचं. मरेपर्यंत असच जगत रहायचं. पोटापूरता अन्न मिळवायचं. उद्याची किंवा पुढच्या पिढीची चिंता नको उगीच. घराची, पैशाची आकर्षणे, बंधने नकोत!

उगाच झणझणीत वगैरे खाण्याची हौस नको. मिळेल त्याने पोट भरायचं. लैंगिकताही तशीच! भलती वासना नको किंवा बलात्कारही नकोत! सगळं नैसर्गिक गरजेपुरता..! कसली संस्कृतीच नको साला. प्रकृती आहे तशीच ठेवणं बरं. उगाच प्रजातीच्या प्रगतीचे दाखले नकोत किंवा त्यांच्या अस्तित्वसाठी धडपड नको.

जनावराला माहीत असतं की कधीतरी तो मरणार आहे. असे अनेक येतील अन अनेक जातील. मग बदल हवेत कशाला.? फुकटचे कायदे हवेत कशाला.? जीवनापुरता सगळेच जगले तर काहीच अडचण नाही मग. देवाने दिलेला मेंदू-हृदय घेऊन माणूस अडकला. सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अट्टाहास त्याचा.

पण प्रकृतीवर नियंत्रण ठेवता येत नाही हे मानवाला अजून समजलेलं नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टीत माणूस गुंततो अन मोहाच्या अनादी चक्रात अडकतो. एकदिवस मानवापेक्षा कोणीतरी शक्तिशाली येईल अन तेंव्हा मानव यातून सुटेल असं वाटतं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  

 

चेहरे आणि मुखवटे

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!