#उद्योजकमहाराष्ट्र – १

#उद्योजकमहाराष्ट्र – १

“महाराष्ट्र उद्योजक मंडळ”

मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवसाय उभे राहुच शकले नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असे अनेक उद्योग-व्यवसाय आहेत जे केवळ मार्केटिंग च्या अभावामुळे मागे पडले असावेत. गुणवत्ता असूनही आपलं उत्पादन लोकांपर्यंत न पोहोचल्याने आपला व्यवसाय अपेक्षित प्रगती करण्यापासून वंचित राहतो.

व्यवसाय करत असताना कधीही आपल्याकडे असलेल्या सकारात्मक बाबींचं प्रदर्शन करून नवनवीन लोकांना जोडलं पाहिजे. तुमचं उत्पादन/सेवा जोपर्यंत एका मोठ्या जनसामुदायासमोर पोहोचत नाही तोपर्यंत त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिरीरीने कारभार करणार्‍या अनेक लहान-मोठ्या उद्योगसमूहाला, व्यावसायिकाला सोशल मीडिया वर हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही “महाराष्ट्र उद्योजक मंडळ” ह्या सोशल फ्रंटची उभारणी करत आहोत!

तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आपला व्यवसाय कार्यरत असेल आणि तो जास्तीत जास्त जनसामुदायापर्यन्त विनामूल्य पोहोचवायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा!!

तुमचा व्यवसाय, उद्योगसमूह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्राहकांसमोर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करत राहू.!

आजच्या डिजिटल युगात व्यवसायवृद्धीसाठी सोशल माध्यमांचा वापर करणे हे अत्यंत महत्वपूर्ण झालेलं आहे. पण बर्‍याच जणांना त्याचं ज्ञान नसतं तर बरेच उद्योजक वेळेअभावी ते करू शकत नाहीत. हीच कमी आम्ही भरून काढू इच्छितो!

यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल उचलायचं आहे! आमच्याशी संपर्क!

आमचा ईमेल – mhudyojakmandal@gmail.com

आमचा ब्लॉग – https://mhudyojakmandal.blogspot.in/

आमचं ट्वीटर हँडल – @mh_udyog

यापैकी कोठेही तुम्ही संपर्क साधू शकता. लवकरच फेसबुक व Whatsapp याबद्दलही माहिती देऊ.

करायचं एकच आहे की आपल्या उद्योगाची, उद्योगसमूहाची किंवा उत्पादनाची माहिती द्यायची आहे. आपल्याकडे जर business card असेल किंवा उद्योगाची माहिती देणारी Image असेल किंवा Video वगैरे असेल तर ते आम्हाला देऊ शकता. आम्ही आमच्या परीने आपल्याला सर्व प्रकारे सहाय्य करण्याचा प्रयत्न करू.

व्यवसाय कुठलाही असोत, तुमची आयटी कंपनी असेल, शोरूम असेल, हॉटेल असेल, सेवा केंद्र असेल, खानावळ असेल, महिलांच्या बचत गटातील उत्पादने असतील, शेतकर्‍यांचे दूध-फळे-भाज्या-धान्य असेल किंवा कोणतंही उत्पादन असेल आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने आपला फायदा होत असेल तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधा.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला कोणालाही कसलेही पैसे देण्याची गरज नाही हे ठळकपणे अधोरेखित करू इच्छितो.

मराठी उद्योजकाला पुढे नेण्यासाठी ही संकल्पना जन्मास घातली आहे हे आमच्या कायम लक्षात असेल.

या संपूर्ण उपक्रमात तुमच्या सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सूचना व संकल्पना आम्ही नक्की लक्षात घेऊ. चुकत असू तर तेही सांगा!!!

महाराष्ट्र धर्म वाढवावा…! ह्याच प्रेरणेने आम्ही कार्य करत राहू…

संकल्पना व आयोजक

अभिषेक बुचके  || Twitter  @Late_Night1991  ||  latenightedition.in

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!