#उद्योजकमहाराष्ट्र – २

#उद्योजकमहाराष्ट्र – २

नमस्कार महाराष्ट्र!

 

#उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना राबवताना अनेक उपक्रम घ्यायचे असं ठरलं आहे. त्यातील एक महत्वाचा उपक्रम आज सुरू करत आहोत.  हा उपक्रम दोन्हीही बाजूने अतिशाय महत्वाचा ठरणार आहे.

 

नव्याने व्यवसाय सुरू करताना खूप अडचणी येत असतात. बर्‍याचदा कोणाचं सहकार्य मिळत नाही आणि मार्गदर्शनही मिळत नाही आणि मग नैराश्य येऊ लागतं. किंवा बर्‍याचदा कोणता व्यवसाय सुरू करावा किंवा तो सुरू करताना सुरुवात कोठून करावी किंवा नवा व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत याबाबत बर्‍याचदा संभ्रम असतो अन अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न कोणाला विचारावेत हासुद्धा महत्वाचा प्रश्न असतो. यावर एक सहकार्य आणि छोटीशी मदतव् हावी म्हणून आम्ही हा छोटासा उपक्रम हाती घेत आहोत.

 

हा उपक्रम आहे मुलाखतीचा! यामध्ये आपण विविध उद्योजकांची मुलाखत घेऊन त्यांच्या उद्योगाबाबतीत माहिती तर घेणारच आहोत शिवाय त्यांच्या मार्गाने या उद्योगक्षेत्रातील विविध बाबी उलगडून दाखवणार आहोत.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेकजण उद्योग/व्यवसाय करतात. त्या लोकांच्या मुलाखती घेऊन आपण नवख्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातून जे मुलाखत देत आहेत ते त्यांच्या व्यवसाय/उद्योगाचाही मार्केटिंग करता येईल. त्यांचा व्यवसाय/उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठीही आमचे प्रयत्न असणार आहेत. शिवाय यासाठी कसलेही मूल्य असणार नाही.

 

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी काहीतरी करता यावे यासाठी आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तर आपला मुलाखत हा उपक्रम आता कायमस्वरूपी सुरू असेल. त्यात जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल किंवा आपल्या उद्योग/व्यवसाय बद्दल माहिती द्यायची असेल तर नक्की संपर्क करावा.

 

ट्विटर हँडल – @mh_udyog  || ईमेल – mhudyojakmandal@gmail.com  ||

ब्लॉग – mhudyojakmandal.blogspot.com

 

Admin

अभिषेक बुचके  ||  ट्विटर हँडल @Late_Night1991  || latenightedition.in

#उद्योजकमहाराष्ट्र – १

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!