Feb to April – Market Watch

Feb to April – Market Watch

Share Market  ||  Share Market Analysis  ||  शेअर बाजार आढावा  ||  Targets Achieved  ||  अनुमान  

Image result for share market

http://latenightedition.in/wp/?p=3021

वरील लिंकवर “गुंतवणुकीस योग्य संधी” या लेखामध्ये जी माहिती दिली होती ती 5 Feb ला लिहिलेली आहे. बजेट आणि इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळत होती. त्यावेळेस मला जे वाटलं होतं ते मी त्या लेखामध्ये नमूद केलं होतं. त्यावेळेस अनेकजण “आता बाजार वर्षभर नकारात्मक राहील” असा सुर लावत होते. मी काही त्यांच्यापेक्षा अधिक हुशार आहे असं नाही. किंबहुना मी Technical Analyst नाही किंवा Fundamental Analyst नाही, पण गेल्या तीन-चार वर्षात जे अनुभव आले त्यातून ते मत व्यक्त केलं होतं.

त्या लेखामध्ये आम्ही Nifty मधील काही shares suggest केले होते जे Short to Mid term गुंतवणुकीस चांगले असतील असं सांगितलं होतं. त्यातील Tata Motors आणि IOC सारखे दिग्गज वगळता इतर shares मध्ये चांगला नफा मिळवला आहे. त्यात IT सेक्टर मध्ये TCS ने तर अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. त्यात ITC, LT आणि Yes Bank यांनीही चांगली कामगिरी केली आहे. दिलेल्या 10 पैकी 7 shares नी चांगला परतावा दिला आहे. याच सर्व shares मध्ये योग्य Rate वर दीर्घकालीन गुंतवणुकीस अजूनही संधी आहे.

-*-*-*-

http://latenightedition.in/wp/?p=3034

वरील लिंकवर असलेला “Top Stocks To Buy” या लेखामध्ये 12 Feb ला गुंतवणीसाठी 18 shares सुचवले होते. यामध्ये Nifty मधील काही, Blue Chip तर काही Midcap shares सुचवले होते. यातील काही shares अजूनही स्थिर असून perform करू शकले नाहीत, तर काही shares नी अपेक्षेप्रमाणे returns दिले आहेत. यामध्ये GATI मध्ये Profit Book करून बाहेर पडता येईल आणि इतर shares मध्ये आहे ती position दीर्घकाळासाठी hold करता येईल.

-*-*-*-

http://latenightedition.in/wp/?p=3024

Midcap Money या लेखामध्ये काही shares suggest केले होते. यामध्ये थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती आहे. एकंदरीत आर्थिक विकास, राजकीय अस्थैर्य व आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळे Large Cap व Blue Chip कंपन्यात गुंतवणुकीचा कल अधिक असल्याने Midcap मध्ये अजून तितकीशी तेजी आलेली दिसत नसल्याने काही shares अपेक्षित returns देऊ शकले नाहीत. या यादीतील Ashok Leyland, NBCC, AB Capital, PVR, Apollo Hospital, Ajanta Pharma व KPIT यांनी चांगले returns दिले आहेत तर Dish TV, Idea, HUDCO, BSE, BEL, SPTL यांनी negative परतावा दिला. हे shares मध्ये Hold करता येईल.

-*-*-*-

आजचा बाजार

सध्या शेअर बाजार बर्‍यापैकी स्थिर झालेला दिसत आहे. Feb आणि March मध्ये शेअर बाजारत पडझड होत होती Volatile ही होता. कारणे कुठलेही असली तरी अनेकांना नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यावेळेस ज्यांनी चांगले shares घेतले होते ते आज चांगल्या नफ्यात आहेत. शेअर बाजारात Positional आणि Long Term गुंतवणूक ही नेहमीच चांगला परातावा देते अन नुकसानीची शक्यताही कमी असते. त्यामुळे सट्टेबाजीपेक्षा गुंतवणुकीकडे कल असावा.

सध्या बाजार चांगला असला तर थोडीशी सावधानता बाळगली पाहिजे. कारण देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यावर इतर काही राज्यांच्या निवडणुका तर आहेतच पण 2019 च्या निवडणूकाकडे अनेकांच लक्ष आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही प्रमाणात अस्थिरता आहे. हवामान विभागाने मान्सून चांगला राहिल असा अंदाज वर्तवला आहे. यामुळेही बाजारात तेजी आली आहे. पण सर्व शक्यता लक्षात घेऊ सरसकट नवीन गुंतवणूक आत्ता करू नये. मागील पडझडीत जे shares Buy केले असतील अन आत्ता चांगला परतावा देत असतील त्यात partial profit booking करायला हरकत नाही. ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे त्यांना काहीच चिंता नसावी. येणार्‍या काळात अजून पडझड अपेक्षित आहे तेथे पोर्टफोलियोत चांगले shares जोडावेत.

===End===

Abhishek Buchake  ||  @Late_Night1991

Share Market Posts (All Posts)

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!