दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अन परतावा   ||  Profit Ratio In Long Term Investment In Share Market  ||  चांगल्या स्टॉक्स मधील गुंतवणूक  ||  Share Market आणि गैरसमज  || become a millionaire by investing in stocks

Image result for LONG TERM INVESTMENT

अनेकांना शेअर मार्केटबद्दल भीती असते की येथे गुंतवलेला पैसा बुडतो. हा निव्वळ सट्टा आहे. याच्यातील धन कधी लाभत नाही वगैरे वगैरे. पण हे सगळे गैरसमज आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक तेंव्हाच बुडते जेंव्हा गुंतवणूकदार स्वतः चुका करतो. तसं ह्या क्षेत्रात येणारे सुरूवातीला चुका करतातच अन नुकसानीतही जातात. पण जे आपल्या चुकांमधून शिकतात त्यांना शेअर मार्केट इतकं नफ्याचं क्षेत्र सापडणार नाही.

आज आपण बोलणार आहोत Long Term Investment बद्दल.

Long Term Investment म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. म्हणजे शेअर बाजारात आपण जे पैसे गुंतवणार आहोत, जे shares घेणार आहोत ते किमान पाच-दहा-पंधरा वर्षांसाठीच्या कालावधीसाठी घेणार आहोत असा त्याचा अर्थ होतो. ही गुंतवणूक खर्‍या अर्थाने पुढच्या पिढीसाठी किंवा स्वतःच्या भवितव्यासाठी केली जाते. याच्यातून सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग शोधला जातो.

बर्‍याचदा आपल्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, म्हातारपणासाठी ही गुंतवणूक केली जाते.

ही Long Term Investment किती परतावा देऊ शकते हे आज आपण बघूयात.

 

समजा, जानेवारी 2005 मध्ये एका गुंतावणूकदाराने दहा हजार रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. त्यात Diversified Portfolio हा भाग सोडून देऊ. त्या गुंतावणूकदाराणे समजा ही दहा हजार रुपयांची रक्कम Maruti Suzuki या शेअरमध्ये गुंतवली आहे. जानेवारी 2005 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 400 रुपये होती. त्या गुंतवणूकदाराने दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/400 = 25 असे 25 shares त्याला मिळाले.

आज July 2018 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 8800 च्या आसपास आहे. म्हणजे माझ्याकडे 25 shares * आजची किम्मत 8800 = 220000 रुपये ही त्याची आजची किम्मत आहे. म्हणजे माझा निव्वळ नफा 220000 – 10000 = 210000 रुपये इतका झाला. किती पट, किती टक्के परतावा मिळाला हे गणित तुम्हीच ठरवा.

बरं हे गणित इतकं सोप्पं असेल असं तुम्हाला वाटतं का? जरा धीर धरा… खरी गम्मत तर अजून बाकी आहे…

2005 ते 2018 या बारा-तेरा वर्षातील corporate action तर अजून गृहीतच धरल्या नाहीत. Corporate Action म्हणजे डिविडेंड, बोनस, स्प्लिट वगैरे वगैरे. आता त्याचाही हिशोब करुयात.

आधी डिविडेंड चा विषय घेऊ. खालील लिंकवर जाऊन तुम्हाला Maruti Suzuki या कंपनीने किती dividend दिला आहे ती माहिती मिळेल.

https://www.moneycontrol.com/company-facts/marutisuzukiindia/dividends/MS24#MS24

या माहितीच्या आधारे गणित केलं असताना 25 shares साठी गुंतवणूकदाराला गेल्या 13 वर्षांत 6300 रुपये इतका डिविडेंड फक्त डिविडेंड मिळालेला आहे.

म्हणजे त्या गुंतवणूकदाराने 2005 साली Maruti Suzuki कंपनीच्या shares मध्ये 10000 रुपये गुंतवले होते. 10000 ही मूळ गुंतवणूक. त्यापैकी 6300 रुपये तर मला फक्त डिविडेंड द्वारेच मिळाले आहेत. म्हणजे वरील नफ्यात 6300 ही रक्कम अधिक केली असता दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तेरा वर्षांत 210000 + 6300 = 216300 इतका नफा मिळाला.

कोणती बँक किंवा कोणती Scheme इतका परतावा देऊ शकते? दरम्यानच्या काळात वाढलेला महागाई दर लक्षात घेता ही रक्कम बँकेत ठेवली असती अन बँकेतील व्याज अन वाढलेली महागाई याचं गणित जुळलं असतं का हा विचारही करावा लागेल.

या सर्वात महत्वाचा भाग आहे तो Stock Selection चा. म्हणजे, 2005 साली Maruti Suzuki या कंपनीचाच शेअर का घ्यायचा हे कळायला हवं होतं. हे गणित आज बसून मांडणे सोपं आहे. पण आजच्या तारखेत असा कुठला शेअर आहे जो पुढील पाच-दहा वर्षात इतक्या चांगल्या प्रकारे परतावा देऊ शकतो? हाच भाग सर्वात महत्वाचा आहे. एखाद दूसरा अपवाद वगळता दर्जेदार shares अशा प्रकारचा परतावा देण्यासाठी सक्षम मानले जातात. साधारणपणे Nifty मधील Large Cap कंपन्या चांगल्या परताव्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. ज्या कंपन्या (Mid cap वगैरे) कमी कलावधीत इतक्या खूप मोठ्या पटीने परतावा देतात त्यांना Multibagger कंपन्या म्हणतात.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की योग्य share ची निवड आणि patience हा खूप महत्वाचा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी share market अतिशय उत्तम आणि सुरक्षित आहे. आपली गरज काय आहे हे एकदा गुंतवणूकदाराने ठरवलं पाहिजे. किती पैसा किती कालावधीसाठी गुंतवायचा आहे हे धोरण स्पष्ट असायला हवं. त्यामुळे या क्षेत्रात निव्वळ नुकसान आहे असली भीती बाळगून जर तुम्ही यापासून दूर राहत असाल तर ती तुमची आर्थिक नियोजनातील चूक ठरेल.

tbc…

Abhishek Buchake (Share Broker & Tutor)

buchkeabhishek@gmail.com

All About Share Market

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!