Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

Infosys दीर्घकालीन गुंतवणुक

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अन परतावा   ||  Profit Ratio In Long Term Investment In Share Market  ||  चांगल्या स्टॉक्स मधील गुंतवणूक  ||  Share Market आणि गैरसमज  ||  दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे  ||  become a millionaire by investing in stocks

Image result for LONG TERM INVESTMENT

मागील भागात आपण Maruti Suzuki या शेअर बद्दल माहिती घेतली. त्या शेअर मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत किती नफा झाला हे बघितलं. दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलत असताना IT क्षेत्रातील दिग्गज Infosys बद्दल बोलल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही.

2005 साली Maruti Suzuki ऐवेजी गुंतवणूकदाराने Infosys मध्ये जर 10000 रुपये गुंतवले असते तर काय झालं असतं ते पाहू.

जानेवारी 2005 मध्ये Infy च्या एका शेअर ची किम्मत होती 250 च्या आसपास. दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/250 = 40 shares मला मिळाले असते.

आज July 2018 मध्ये Infy च्या share ची किम्मत आहे 1300 च्या आसपास. म्हणजे, 1300 – 250 = 1050 हा एका शेअर मागे नफा आणि 40 shares म्हणजे 40*1050 = 42000 इतका नफा.

कमी वाटतोय न? म्हणजे मारुती सुजुकी ने दोन लाखांपेक्षा जास्त नफा दिला आणि Infy सारख्या share ने फक्त 42000. बात हजम नही होत ना? और होनी भी नही चाहीये…

आता दरम्यानच्या काळातील Corporate Action बद्दल बोलू.

आधी येऊ Bonus कडे.

Infosys ने (गुंतवणूक केल्यानंतर) 2006, 2014 आणि 2015 साली 1:1 ह्या प्रमाणात बोनस दिला आहे.

Bonus म्हणजे काय याची माहिती माझ्या “Share Market Beginners” या Android App मध्ये मिळेल. तूर्तास इतकंच लक्षात घेऊ की 1:1 बोनस म्हणजे एकावर एक शेअर फ्री मिळतो पण त्या शेअर ची किम्मत निम्मी होते. म्हणजे 1000 किम्मत असलेल्या शेअर ची किम्मत 500 होते आणि ज्याच्याकडे ते shares आहेत त्याच्याकडील Quantity दुप्पट होते.

एकंदरीत 2005 साली 40 shares खरेदी केले होते ते 2006 साली 80 झाले. 2014 साली 160 झाले आणि 2015 साली 320 इतके झाले. Quantity दुप्पट होत गेली आणि त्या-त्या वेळेस share चा भाव निम्म्याने कमी होत गेला.

म्हणजे 2018 साली गुंतवणूकदाराकडे Infosys चे एकूण 320 shares आहेत. आता 320 shares आणि आजचा share price 1300 यानुसार 320 * 1300 = 416000 रुपये. वजा 10000 हे मूळ भांडवल. म्हणजे 406000 हा तुमचा नफा.

Record Of Bonus

https://www.moneycontrol.com/company-facts/infosys/bonus/IT#IT

 

कहाणी यही खतम नही होती.

Corporate Action मध्ये डिविडेंड हा विषय राहिलाच…

Image result for infosys

आपल्याकडील मूळ 40 shares च्या हिशोबाने ह्या 13 वर्षांमध्ये 18260 रुपये इतका डिविडेंड आपल्याला मिळाला असता.

पण दरम्यानच्या काळात Bonus भेटला होता. त्यानुसार जर हिशोब केला तर फक्त डिविडेंड चा नफा होतो 61020 रुपये.

 

Record Of Dividend

https://in.finance.yahoo.com/quote/INFY.BO/history?period1=799353000&period2=1530556200&interval=div%7Csplit&filter=div&frequency=1mo

 

एकंदरीत, 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 13 ते 14 वर्षांत अनेक पटींनी परतावा मिळाला आहे. यात महत्वाचा विषय आहे Stock Selection चा. आज कोणत्या share मध्ये पैसे गुंतवावे जेणेकरून भविष्यात त्याचे चांगले Returns मिळतील.

ABHISHEK BUCHAKE (Share Broker & Tutor)

buchkeabhishek@gmail.com

 

All About Share Market

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!