Kitchen Beginners

Kitchen Beginners

                    कांदेपोहे
कांदेपोहे म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन
संस्कृतीचा भाग. लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहायचा कार्यक्रम असो की कुठला विशेष कार्यक्रम
नाश्त्यासाठी गरमागरम कांदेपोहे असलेच पाहिजेत. कार्यक्रम असो की नसो पण पोटाला भूक
लागल्यावर लगेचच करता येईल असा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे कांदेपोहे.
साहित्य –
जाड पोहे, तेल, हळद, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, मसाला, कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, खिसलेल खोबर.
कृती –
१.     
सर्वात आधी जाड
पोहे चाळणीतून चालून घ्या. त्याच्यानंतर पोहे चाळणीतच स्वच्छ धुवून घ्या आणि सर्व पाणी
निघून जाऊ द्या. पोहे तसेच मोकळे करून चाळणीतच राहू द्या ज्याच्यामुळे सर्व पाणी नुघुण
जाईल (पोहयातील पाणी निघून गेल्यावर कांदेपोहे मोकळे होतात अथवा पाणी तसेच राहील तर
कांदेपोहे चिकट होतात).
२.     
कढईत पोह्याला
लागतील ह्या प्रमाणात तेल बारीक गॅस वर गरम करायला ठेवा.
३.     
त्यात पाव चमचा
मोहरी टाका.
४.     
तोपर्यंत एक
कांदा, दोन मिरच्या बारीक चिरून घ्या. असेल तर कडीपत्ता
दोन-तीन पाने स्वच्छ धुवून घ्या.
५.     
तोपर्यंत कढईतील
मोहरी फुटली असेल तर त्यात पाव चमचा जिरे आणि चिरलेला कांदा आणि मिरची टाका आणि थोड
परतून घ्या.
६.     
कढईतील कांद्याला
पिवळसर रंग आला असेल तर त्यात अर्धा चमचा हळद टाका.
७.     
त्याच्यानंतर
कढईत आवडिनुसार शेंगदाणे आणि दाळव टाका आणि परतत रहा.
८.     
आता वाळत ठेवलेले
चाळणीतील पोहे मोकळे करून कढईत टाका. पोहे परतून घ्या.
९.     
आता १ चमचा किंवा
गरजेनुसार मीठ, तिखट आणि बिर्याणी मसाला टाका.
१०.  पोहे २ मिनिट परतून घ्या आणि कढईवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा.
११.  आता पोहे तयार झाले आहेत.
१२.  कांदेपोहे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यावर कोथिंबीर आणि
खिसलेल खोबर टाका. पोहयासोबत लोणच, दही, पापड आणि एखादा गोड पदार्थ असला तर झकासच.   
–    सौ. जोशी काकू 
  

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!