शेअर बाजाराची कटी पतंग…

शेअर बाजाराची कटी पतंग…

शेअर बाजार मराठीत  ||  Share Market In Marathi   ||  शेअर बाजारातील गुंतवणूक  ||  Share Market Investment
 
कटी पतंग! म्हणजे जी पतंग आपल्या मूळ मांजापासून सुटलेली आहे. व्यवस्थित उडणारा पतंगाचा मांजा तुटतो अन तो पतंग वार्‍याच्या तालावर नाचू लागतो. मग गल्लीतली पोरं त्या तुटलेल्या पतंगाच्या मागावर इकडून तिकडे बोंबलत फिरतात. पण तो पतंग एखाद-दुसर्‍याच्याच हाती लागतो. बाकीचे मग नशिबाला दोष देतात, किंवा कुठे चूक झाली याचा विचार करत बसतात. पण वार्‍याची दिशा काय असेल हे कोणीच ठरवू शकत नाही…
 
सध्या शेअर बाजारातही हीच परिस्थिती आहे. काय सावळा गोंधळ चालू आहे हेच समजत नाहीये. सकाळी Positive मध्ये सुरू होणारा बाजार मग कोसळू लागतो. कोसळतो आहे असं वाटत असताना पुन्हा वाढतो. कधी Negative ने सुरू होतो अन उच्चांकी पातळीवर जाऊन स्थिरावतो. कुठलं सेक्टर कधी वाढेल कधी पडेल याचा कसलाही मागसुस येत नाही.
 
गेले काही दिवस मी जाणीवपूर्वक काही readings घेत होतो. म्हणजे Business Channel वर अनेक दिग्गज Market Analyst (Technical & Fundamental) Intraday साठी वगैरे Tips देत असतात. किंवा कुठल्यातरी Brokerage Firm कडून तसे Calls येत असतात. पण सगळं फोल ठरताना दिसत आहे. याच्यातील accuracy 40 ते 50 टक्क्यांवर आली आहे. दिग्गज analyst चुकत असतील तर इतरांची काय तर्‍हा. कारण Trend काय आहे याचाही बर्‍याचदा पत्ता लागत नाहीये. वार्‍याच्या तालावर नाचणार्‍या कटी पतंग प्रमाणे shares आणि बाजार भरकटत आहेत. अनेक shares हे Support, Resistance मोडून परत खाली-वर होत आहेत. उत्तम Results सादर करून profit booking च्या नावाखाली चांगले shares कोसळत आहेत. All Time High च्या आसपास दिसणार्‍याा बाजारात 70% shares निच्चांकी पातळीवर काम करत आहेत!!! सब मोहजाल है!
 
कटलेल्या पतंगाच्या मागे विनाकारण इकडे-तिकडे पळण्यापेक्षा थोडसं थांबावं आणि वार्‍यात स्थिरता येण्याची वाट बघावी. नाहीतर निव्वळ दमछाक होणे अटळ आहे!OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

अभिषेक बुचके
http://latenightedition.in/wp/?p=3339

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!