अवघा रंग एक झाला!
अवघा रंग एक झाला! || Share Market In Marathi || शेअर बाजार मराठीत || शेअर बाजाराचा नवा उच्चांक
आज Nifty आणि Sensex ने पुन्हा सर्वोच्च उंचीवर जाण्याचा पराक्रम केला. गेले काही दिवस बाजारात तेजी आल्याचं चित्र आहे जे समाधानकारक आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी Sensex ने नवा उच्चांक गाठला होता पण त्या वेळेस गुंतवणूकदारांचा पोर्टफोलियो तितक्या उंचीवर गेलेला नव्हता. काही निवडक Stocks सोडले तर बाजारात फार उत्साह नव्हता. Midcap मरगळलेल्या अवस्थेत होता. SmallCap चेही तेच हाल. LargeCap मध्येही काही दिग्गज खालीच होते. पण Public Sector आणि क्रमाने Private Sector Banks मध्ये तेजी आली. बाजार आपल्या रेंजमधून बाहेर पडून मजबुतीच्या दिशेने जात आहे हे एव्हाना सुज्ञ गुंतवणूकदारांना समजलं होतं. Large Cap मधील बहुतांश shares मध्ये आलेली तेजीने आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू सर्वच प्रकारच्या पण चांगल्या shares मध्ये BUYING येऊ लागलं.
गेल्या आठवड्यात जी तेजी आली त्यामध्ये अनेक shares वाढले. त्यात Midcap, Smallcap index बर्यापैकी मजबूत स्थितीमध्ये येत आहेत. अनेक गुंतवणूकदारांचा पोर्टफोलियो आता हिरव्या रंगात न्हाऊन निघत आहे. सरकारने केलेला विकास सामान्य माणसापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नसतो तसं बाजारातील तेजी जर सामान्य गुंतवणूकदारच्या पोर्टफोलियो मध्ये प्रतीत होत नसेल तर त्याला तेजी म्हणता आली नसती. सर्वच सेक्टर आता तेजीच्या रंगात रंगले आहेत… गुंतवणूकदारही समाधानी आहेत… विशेष म्हणजे रोजची अनिश्चितता निघून गेली याचं जास्त समाधान आहे. कारण बाजारात सध्या काहीतरी Trend आहे. त्याचा अंदाज बांधून Traders आणि गुंतवणूकदार प्रॉफिट कमावत आहेत. सध्या Bulls चा बोलबाला आहे आणि Bears मागे पडले आहेत.
सर्वदूर पाऊस पडल्यावर जसं चैतन्याचं अन बहारदार वातावरण असतं तसं वातावरण सध्या भारतीय शेअर बाजारात बघायला मिळत आहे. तेजीचा हा अवघा रंग, एक झाला!
अभिषेक बुचके || @Late_Night1991 || @Abhireal1991
© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!