Raincoat Movie

Raincoat Movie

चित्रपट समजून घेताना  ||  आवड चित्रपटांची  ||  चित्रमित्र

पाऊस म्हंटलं की गळ्यात DSLR अडकवून भटकंती करणे! मित्रांसोबत डोंगर दर्‍यांतून, रांनावणातून, गड्कोटांवर फिरणे. गरम भजे, वाफाळलेला चहा घेणे. अगदी स्वर्गसुख! पण हे स्वर्गसुख काही रोजच अनुभवता येत नाही. बर्‍याचदा वेळ मिळत नाही किंवा मेळ लागत नाही. त्यामुळे पावसात भिजायचं राहूनच जातं. पण भिजण्यासाठी पावसात जायलाच हवं असं थोडीच असतं. म्हणजे, शॉवरखाली उभा राहायचा वगैरे सल्ला नाही. पण काही अनुभव असे घेता येतात जे आपल्या मनाला भिजवून, थिजवून जातात. अगदी ओलेचिंब वगैरे करतात. ते कसं?

चित्रपट आणि संगीत!!!
मानवी उत्क्रांतीतील सर्वोत्तम अविष्कार, सर्वोत्तम शोध जर कुठला असेल तर तो म्हणजे संगीत! जिथे शब्द आणि स्वर मनाच्या अगदी अनवट वाटांवर जाऊन अगदी एकांतातील भावनांना हात घालतं आणि निचरा व्हावा तसं मनही हलकं होत जातं.
#पाऊसवाटा च्या या रम्य मोसमात जाणून घेऊयात अशीच काही गाणी आणि चित्रपटांबद्दल…!
अनेक चित्रपट अन गाण्यांमध्ये पाऊस हा आभाळतून कोसळणारे पाण्याचे थेंब न राहता एक स्वतंत्र पात्राची भूमिका वठवत असतो. त्याच्या असण्याला अर्थ असतात. त्याच्या बरसण्याला, त्याच्या गतीला, त्याच्या आवाजालाही एक जिवंतपणा असतो. तो जिवंतपणा काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही…!
#पाऊसवाटा बद्दल विचार करत असताना सर्वात पहिल्यांदा एक चित्रपट आठवला तो म्हणजे #Raincoat  ऋतुपर्णा घोष दिग्दर्शित, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट.
Image result for raincoat movie
खरं तर हा अतिशय वेगळ्या वाटेवरील चित्रपट म्हंटला पाहिजे. नेहमीच्या पठडीतील चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळा. इथे पात्रांची कथा आहे आणि ती कथाही एक महत्वाचं पात्र आहे. कथा तशी साधीच, नेहमीची, पहिल्या प्रेमाची किंवा हरवलेल्या प्रेमाची वगैरे! पण ही कथा ऋतुपर्ण घोष नावाचा एक संवेदनशील दिग्दर्शक अत्यंत हळवेपणाने मांडतो.
कथेची साधीसरळ वाटणारी मांडणी हळूहळू दर्शकाला एका भूलभुलययात नेते. तेथून कथेला अनेक अर्थ निघू शकतात. पण चतुर दिग्दर्शक सर्वांना गुंग करून त्याला हव्या असलेल्या मार्गानेच कथेचा शेवट करतो. चित्रपट, त्याची मांडणी, संवाद आणि महत्वाचं म्हणजे अभिनय हा अप्रतिम आहे.
संपूर्ण चित्रपटात पावसाची एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे. नायक कलकत्त्यात असतो. तेथे जोराचा पाऊस सुरू असतो. त्या पावसापासून बचाव म्हणून नायक Raincoat सोबत घेतो. त्या raincoat चंही कथेमध्ये तितकाच महत्वाचा रोल आहे. नायकाचं पावसात भिजलेलं असणं आणि नायक-नायिका बंद घरात असताना बाहेर पडणारा मुसळधार पाऊस हे चित्रपटात महत्वाची भूमिका बजावतं. पावसाच्या असण्या-नसण्यानेच कथा पुढे सरकत जाते. त्या मुसळधार पावसाचा आवाज अन ते ढगाळ वातावरण हे चित्रपटाला ऑडिओ-विडियो पातळीवर वेगळाच साज चढवतात.
चित्रपट बघत असताना सतत पावसाचा उल्लेख, ते वातावरण आपल्याला पावसाच्या मूडमध्ये घेऊन जातं. पण कथा शेवटाकडे जात असताना मनही भिजलेलं असतं. आपल्याला पात्रांची एकंदरीत परिस्थिति अन कथेचा शेवट लक्षात येऊनही एक वेगळीच हुरहूर लागते. त्या दोघांचे एकांतातील संवाद खोलवर गारठवणारे आहेत.  भजे-चहाचा आस्वाद लुटावा तसे एक-दोन क्षणही आहेतच. पण चित्रपट बघितल्यावर एकंदरीतच मन पावसात भिजून आल्यासारखं असेल यात वाद नाही.
अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991
http://latenightedition.in/wp/?p=3175

© 2018, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!