मंदी हीच संधी!

मंदी हीच संधी!

भारतीय शेअर बाजार  ||  जागतिक मंदी की गुंतवणूकदारांना संधी  ||  Share Market Analysis 

Image result for share market

सध्या शेअर बाजारात जो भूकंप सुरू आहे त्या भूकंपाचा केंद्रबिन्दु NBFC (Non-Banking Financial Company) येथे आहे. जे काही भीतीचं वातावरण आहे ते IL&FS च्या निमित्ताने सुरू झालेलं आहे आणि त्यामुळेच बाजारात अंनिश्चितता आहे. मंदीपेक्षा मंदीची भीती ही जास्त घातक असते. कारण नसताना गुंतवणूकदार सर्वकाही विकायला काढतो. मागच्या काही आठवड्यात मीही तसेच लेख पोस्ट केलेले होते जे मंदी येत आहे असा अंगुलीनिर्देश करत होते. त्यात तथ्यही आहे. पण सरसकट सर्वच ऐवज विकायला काढणे म्हणजे बाजारात भीती आहे असं स्पष्ट होतं. सलग सहावा दिवस बाजार मोठ्या पडझडीने बंद झाला.
.
आता काय करायला हवं?
मंदी हीच संधी!
बाजारात आधीच खूप पडझड झाली आहे ती अजून वाढूही शकते.
पण Long Term Investment करत असताना अशी मंदी किंवा पडझड ही संधी समजली पाहिजे. मंदी जरी आली तरी सर्वच्या सर्व शेअर्स खालच्या दिशेने प्रवास करतील असं काही नाही. चांगले शेअर्स हे मंदीच्या काळातही चांगला परतावा देतात. पण एखादा शेअर कुठपर्यंत खाली उतरेल हे कोणीच सांगू शकत नाही. किंवा मंदीमध्ये मार्केट कुठपर्यंत जाऊन परत फिरेल हे कोणीही सांगू शकत नाही. इथे गुंतवणुकीचा एक प्रकार आपण अवलंबू शकतो. SIP (Systematic Investment Plan)

SIP ही फक्त Mutual Funds मध्येच करतात असं काही नाही. शेअर्स मध्येही SIP करता येते. महिन्याकाठी विशिष्ट रक्कम चांगल्या शेअरमध्ये गुंतवता येऊ शकते. म्हणजे समजा बाजार आता पडणारच आहे. तुम्हाला महिन्याला जो पगार येतो त्यातील विशिष्ट रक्कम बाजारात टाकायची आहे. सगळ्यात आधी चांगले शेअर्स निवडणे. दर महिन्याला अशा शेअर्स मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहणे. या पडझाडीत Maruti Suzuki सारखा शेअरही नवे तळ गाठत आहे. तुम्हाला जर 50000 गुंतवायचे असतील तर ते एकदाच गुंतवण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम त्यात गुंतवावी जेणेकरून तो शेअर वेगवेगळ्या रेटला मिळेल आणि रिस्क कमी होईल. अशी SIP तुम्ही वेगवेगळ्या Sector मधील शेअर्स मध्ये करू शकता.
.
फायदा काय?
साधारणपणे Mutual Fund मध्ये जेंव्हा पैसे गुंतवतो तेंव्हा शेअर निवड ही आपल्या हातात नसते. जर बाजार कोसळत असेल तर MF वरील परताव्यात कमी येतेच. त्यापेक्षा स्वतः चांगले शेअर्स निवडून त्यात गुंतवणूक करणे आणि नफा मिळताच बाहेर पडणे सोयीचे असते.
.
आता गुंतवणूक सुरू करायची वेळ आलेली आहे. पण सर्वच्या सर्व पैसे आत्ता गुंतवावेत असं नाही. चांगले शेअर्स घेऊन दीर्घकाळासाठी ठेवले पाहिजेत. टप्प्याटप्प्याने शेअर बाजारात पैसे लावणे उत्तम ठरेल. भलेही मंदी आली तरी हा एकसंध फ्लो चालू ठेवावा ज्याचे उत्तम परिणाम दोन वर्षात दिसू शकतात.
.
NBFC शेअर्समध्ये MF कडून झालेली गुंतवणूक आणि NBFC मध्ये आलेल्या पडझडीनंतर त्या MF चे रेट.

https://www.moneycontrol.com/…/these-24-mf-schemes-have-hig…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991START INVESTING NOW

…ताकही फुंकून प्यावे!

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!