क्या से क्या हो गया…

क्या से क्या हो गया…

क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में चाहा क्या, क्या मिला, बेवफा तेरे प्यार में …

शेअर बाजारातील पडझड  ||  Downfall In Indian Share Market  ||  मंदी हीच संधी  ||  गुंतवणूक  ||  शेअर बाजार मराठीत

ह्या ओळी आहेत देवानंदच्या guide या चित्रपटातील. वहीदा रेहमान आणि देवानंद यांच्या नात्यात जेंव्हा दुरावा येतो त्यावेळेस दारूचे घोट रिचवत देवानंद हे गाणं म्हणतो. देवानंद आणि वहीदा म्हणजेच guide राजू आणि नलिनी उर्फ रोसी हे एकमेकांना अपरिचित असतात तिथे ही गोष्ट सुरू होते. हळूहळू त्यांना एकमेकांबद्दल आत्मीयता वाटू लागते. त्यांच्या नात्यात विश्वास निर्माण होतो. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. सगळी बंधने झुगारून ते एकत्र नांदू लागतात. ते एकमेकांचं आयुष्य व्यापून टाकतात. असं वाटतं की सगळं जग आपलं आहे. पण नियतीला जणू हे मान्यच नसतं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली वहीदा आणि केवळ तिचा साथीदार बनून राहिलेला देव. खरं तर देवानंदच्या आधारानेच ती त्या शिखरावर पोहोचलेली असते, पण नंतर तिच्या विश्वात नवीन ग्रहांचं परिभ्रमन सुरू होतं. अचानक छोट्याशा गोष्टीवरून त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि सगळा विचका होऊन बसतो.

Guide चित्रपटातील ही पार्श्वभूमी आणि तेथेच येणारं हे गाणं अत्यंत मनभेदक आहे. सांगायचं म्हणजे सध्या भारतीय शेअर बाजाराची अवस्थाही अशीच झाली आहे. सामान्य गुंतवणूकदार म्हणत आहे, “क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में…” कारण ज्या सामान्य गुंतावणूकदाराच्या जिवावर अवघ्या महिन्यापूर्वी NIFTY ने all time high बनवला होता तो nifty त्या स्तरावरून जवळपास हजार दीडहजार पॉइंट खाली आला आहे. हा Nifty गेल्याच महिन्यात 11750 च्या आसपास होता जो केवळ पंधरा दिवसांत 10250 च्या जवळ येऊन ‘पडला’ आहे. ज्या पद्धतीने हा रक्तरंजित प्रवास झाला तो अविश्वसनीय आहे. कसलीच आणि कोणाचीच दया न दाखवता बाजाराने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. केवळ सामान्य गुंतवणूकदारच नाही तर अनेक दिग्गज गुंतवणूकदार, ज्यांच्याकडे बघून देशातील सामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात त्यांचेही Portfolio मध्ये हाच कत्ल-ए-आम पाहायला मिळत आहे. घसरण आज थांबेल, उद्या थांबेल अशी तमाम जणांच्या आशा-अपेक्षांवर बाजार रोज पाणी फिरवत आहे. Nifty मध्ये 100 अंकांची घसरण तर सामान्य बाब बनून राहिली आहे. कुठलीच सकारात्मक बातमी बाजाराला मानवत नाहीये. बाजार सगळ्यांची “केह के लुंगा” असाच वागत आहे.OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

मागे 15 Sept ला “मंदी सांगून येत नाही” असा लेख लिहिला होता. पण हीच ती मंदी का याचाही सुगावा लागू दिला नाही. सगळं अत्यंत निर्दयीपणे अन बेसावध असताना झालं. मोठ्या कष्टाने रचलेला पत्त्यांचा बंगला वार्‍याच्या एका झोताने नामशेष व्हावा तशी परिस्थिती आहे. सामान्य गुंतवणूकदार तर पोर्टफोलियोकडे बघूही शकत नाही. सगळ्यात वाईट अवस्था तर Leverage Position असणार्‍यांची आहे. तेजीत असताना एक दोन दिवसांसाठी घेतलेले shares Stoploss लावायलाही वेळ न मिळू देता कोसळले आहेत. उधारीच्या ह्या positions अजून किती काळ तारून नेता येतील हीच भीती आहे. एकतरी बाऊन्स यावा जेथून बाहेर पडायची संधि मिळावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. तोही येत नाहीये. हे सगळं का होत आहे, बाजारात एवढी कसली भीती आहे हा विश्लेषणाचा भाग आहे.

अलीकडच्या काळात जे शेअर बाजारात आले आहेत त्यांच्यासाठी ही पडझड भीतीदायक वाटणारी आहे. बर्‍याचजणांना असं वाटत आहे की बाजारातील शेअर्स शून्य होतात की काय? अर्थात दिवसाला पन्नास पन्नास टक्के तुटणारे शेअर्स बघितले की ती भीती रास्तच वाटते. पण जी लोकं बाजारात किमान वीस-पंचेवीस वर्षे झाले काम करत आहेत त्यांना हे अगदीच अनपेक्षित नाही. कारण मंदी ज्यांनी बघितली त्यांना असे अनुभव आधीच आलेले असतील.

मंदी नेमकी कोणत्या लेवलला जाऊन थांबेल ते कोणीही सांगू शकत नाही. सध्या बहुतांश गुंतवणूकदारचे पैसे बाजारात अडकले आहेत. पण जे नव्याने पैसे लावू इच्छितात त्यांना मात्र ही संधि दवडुन चालणार नाही. जर शंभर रुपये बाजारात गुंतवायचे असतील तर त्यातील 25 रुपये गुंतवायची वेळ आलेली आहे. अनेक Fundamentally Strong Stocks ह्या पडझडीच्या कचाट्यात सापडून 52 week low ला आले आहेत. थोडसं जर Data कडे बघितलं तर लक्षात येईल की Nifty नेमका कसा behave करतो.

Oct 2016 ला Nifty 8300 च्या आसपास होता. तेथून Jan17 , Oct17 , Jan18 , April18 & July18 मध्ये या महिन्यांमध्ये सर्वाधिक returns दिले. अध्ये-मध्ये छोटे-मोठे profit-loss सुरू होते.

 

 

2008 ते 09 मधील Nifty Returns
2016 ते 2018 मधील Nifty Returns
1995 पासून Nifty चे Returns per Lack

दरम्यानच्या काळात Feb18 व March18 आणि आत्ता Sept18 मध्ये मोठी पडझड बघायला मिळाली. यात घाबरण्याची बाब अशी की सर्वाधिक पडझड ह्या महिन्यात, म्हणजे Oct मध्ये झाली आहे आणि Oct सुरू होऊन आता केवळ सहा-सात दिवस झाले आहेत. म्हणजे सहा दिवसातील पडझड ही वर्षभरातील (किंबहुना दोन वर्षातील) पडझडीसमान आहे.

पण सरासरी काढली तर Oct16 ते Oct18 यात 8300 ते 10000 असा फरक आहे जो असं दर्शवतो की बाजारात दीड-दोन हजार points ची तेजी आहे.

आता 1995 पासूनचा डाटा जर बघितला तर खूप बाबी समजू शकतील. या वीस वर्षांत 2000 आणि 2001 या सलग दोन वर्षात Nifty ने negative returns दिले. नंतर 2002 मध्ये ते सामान्यपणे राहिले आणि 2003 या वर्षात ते 73% इतके होते.

साधारणपणे 2008 लाही हीच अवस्था होती. जी काही मंदी-मंदी म्हणतात ती लेहमन ब्रदर्स नंतरची आर्थिक मंदी जी 2008 ला आलेली होती. 2008 साली Nifty ने सर्वात मोठी पडझड नोंदवली. त्याच वर्षात छोटे-मोठे बाऊन्सबॅकही येत राहिले. पण नंतर 2009 साली Nifty ने सर्वाधिक returns दिले. नंतर 2011 ला पुन्हा बाजारात निराशा होती. पण 2008 नंतर 2018 पर्यन्त Nifty ने खूप मोठा पल्ला गाठला. अडीच तीन हजारांचा Nifty 11000 पर्यन्त आला. यात काळा पैसा होता की आणखी काही हा वादाचा मुद्दा असला तरी देशात वाढणारा मध्यमवर्ग आणि जनसामान्यांत वाढती अर्थसाक्षरता ही बाजाराला फायद्याची ठरली. ती येणार्‍या काळात वाढतच राहील.

असा कल आहे की, जितकी मोठी मंदी येते नंतर तितकाच मोठ्या प्रमाणात तेजीही येते. ती ज्या वेगाने येते त्यावर अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या महत्वाची अडचण काय आहे? तर Leverage Positions आणि Positional Trades किंवा Swing Call म्हणतात ते. ज्या गुंतवणूकदारांनी उपलब्ध कॅशमध्ये गुंतवणूक केली आहे, योग्य प्रमाणात ती गुंतवणूक केली आहे त्यांना यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. पुढच्या वर्षी ह्याच दिवसात त्यांचा पोर्टफोलियो पुन्हा चमकताना दिसू शकतो. जे आधीच बाजारात होते आणि पूर्ण शक्तिनिशी Trade किंवा Invest करत होते त्यांचा शक्तिपात झाला आहे. त्यांच्यात आता नव्याने बाजारात उतरण्याची शक्ति नाही. कारण एकतर अनेकांचे Funds zero तरी झाले आहेत किंवा अडकूनतरी आहेत. आता खरी संधी आहे नवीन गुंतवणूक करू इच्छिणार्यांची. त्यांना जर दीर्घकाळासाठी पैसा लावायचा असेल तर ती सुरुवात इथेच होऊ शकते. अर्थात, ती टप्प्याटप्प्याने करावी लागेल. त्यातून जे Returns मिळतील ते दुप्पटही असू शकतात. चांगले शेअर्स निवडून त्यात SIP पद्धतीने गुंतवणूक ही येणार्‍या काळासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

-START LONG TERM INVESTMENT-

 

Go to e-book!
 

श्रद्धा और सबुरी

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!