मुहूर्त ट्रेडिंग!

मुहूर्त ट्रेडिंग!

शेअर बाजार मराठीत   ||  Share Market Investment  ||  शेअर बाजारातील संधी  ||  दिवाळी आणि शेअर बाजार

शेअर बाजार म्हणजे सगळा पैशांचा खेळ. पैसे लावायचे अन त्यातून पैसे कमवायचे हा बेसिक सिद्धांत. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे पैशांची देवता असलेल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करू बघत असतात. शेअर बाजारात दोन मुहूर्त महत्वाचे मानले जातात. एक असतो तो “अक्षय तृतीया” आणि दूसरा म्हणजे “लक्ष्मी पूजन.”

अक्षय तृतीया म्हणजे चांगल्या गोष्टींचा संचय करणे, त्याचा क्षय न होऊ देणे, एखादी चांगली वस्तु आपल्याकडे अक्षयपणे राहावी अशी त्यामागची भावना. अक्षय तृतीयेच्या अशा शुभ दिनी शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारा वर्ग कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवतो. तो चांगला शेअर कायम आपल्याकडे राहावा, त्यातून संपत्ती वाढत जावी अशी त्यामागची भावना.

दूसरा महत्वाचा दिवस म्हणजे “लक्ष्मी पूजन.” ह्या दिवशी जगभरात दिवाळीचा उत्साह असतो. सर्वजण कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतात. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असते अन लक्ष्मीची पुजा केली जाते. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी हे सगळं उत्साही वातावरण असतं. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी “मुहूर्त ट्रेडिंग” नावाचा एक प्रकार असतो. थेट पैशांशी निगडीत असलेलं हे क्षेत्र असल्याने त्यादिवशी बंद ठेऊन कसं चालेल. त्यामुळे दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी शेअर बाजार, अर्थात NSE-BSE हे साधारणपणे एक तासासाठी चालू केले जातात. या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेकजण या दिवशी कुठलातरी शेअर खरेदी करून ठेवतात. यादिवशी Intraday Trade फार होत नाहीत. या मुहूर्तावर शेअरची Delivery घेण्याला महत्व असतं. कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवावा जो चांगला परतावा देईल अशी त्यामागची भावना असते. अनेक नवगुंतवणूकदार या शुभ मुहूर्तावर नव्याने गुंतवणूक सुरू करतात. जे मोठे गुंतवणूकदार असतात ते या मुहूर्तावर नव्यानं रणनीती आखतात अन त्या दृष्टीने पाऊल टाकतात.

या वर्षी “मुहूर्त ट्रेडिंग” ची वेळ लक्ष्मी पूजनाच्या (7 नोवेंबर) संध्याकाळी 5.15 ते 6.40 अशी असणार आहे. या कलावधीत शेअर बाजार सुरू असेल. Equity Shares मध्ये पैसे लावणार्‍यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. जी व्यक्ति या मुहूर्तावर ट्रेड करते ती दीर्घकाळ शेअर बाजारात राहते असंही काहीजण मानतात. शेअर्सच्या रूपाने लक्ष्मीला आपण आपल्या घरात घेत असतो.

आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की या मुहूर्तावर शेअर बाजार सकारात्मक अर्थात पॉजिटिव असतो. त्याला अपवादही आहेत. 2007 आणि 2012 च्या मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार Negative मध्ये बंद झाला होता. योगायोग म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी शेअर बाजाराने negative returns दिले होते. 2008 ला तर जागतिक मंदीमुळे बाजार रसातळाला गेला होता.

गेल्या वर्षी, म्हणजे दिवाळी 2017 च्या मुहूर्त ट्रेडिंगला भारतीय शेअर बाजाराने पडझड अनुभवली होती. विशेष म्हणजे त्या वेळेस Nifty 10150 च्या आसपास होता आणि 2018 च्या दिवाळीलाही तो 10200 च्या आसपासच दिसतो आहे. त्यावेळेस क्रूड ऑइल 58$ च्या आसपास होतं जे आज 76$ च्या आसपास आहे. सन 2017 च्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार negative मध्ये बंद झाला आणि 2018 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी वाईट ठरलं. याच वर्षात शेअर बाजाराने All Time Top बनवला आणि सध्या तो yearly Bottom बनवत आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सध्याचा बाजार हा एक अनमोल संधी आहे. एका सर्वेक्षणानुसार सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी शेअर बाजारात पैसा गुंतवला तर निवडणूक निकालानंतर सहा महीने या कालावधीत उत्तम परतावा मिळाल्याचा रेकॉर्ड सांगतो. सध्या भारतीय शेअर बाजार Yearly Low ला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स Discount Price वर मिळत आहेत. अशा वेळेस Fundamentally Strong कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर चांगल्या परताव्याची संधी जास्त आहे.

यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगवर शेअर बाजार पॉजिटिव असावा अशी अपेक्षा करुयात.OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

Links-

Year 2017 Muhurat Trading

https://www.moneycontrol.com/news/business/markets/muhurat-trading-market-live-sensex-opens-samvat-2074-lower-icici-bank-drags-2416267.html

Historical Data

https://www.moneycontrol.com/news/business/markets/last-10-years-data-suggests-that-diwali-month-belong-to-bears-will-2017-be-different-2409815.html

https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/muhurat-trading-market-opens-in-green-for-ninth-time-in-the-past-11-sessions/articleshow/49746213.cms

अभिषेक बुचके (Sub Broker)

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!