सत्तासम्राट – देवेन्द्र फडणवीस

सत्तासम्राट – देवेन्द्र फडणवीस

राजकारण   ||   सत्ता   ||  लोकसभा   ||    सत्ताकारण  ||   अन्वयार्थ  ||  समीक्षा  ||

गेल्या पाच वर्षात देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या सर्व विरोधकांवर केवळ मातच केली असं नाही तर जनतेतील त्यांची विश्वासार्हता कशी कमी होईल याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. पहिल्या दिवसापासून टोकाचा विरोध करणार्‍या शिवसेनेशी युती केली पण मग इतक्या वर्षांचा सेनेचा विरोध फसवा होता का? असा प्रश्न जनतेला नक्की पडत असणार. पर्यायाने शिवसेनेची आणि वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरे यांचीही विश्वासार्हता कमी झाली.

Image result for devendra fadnavis
राष्ट्रवादी तर पहिल्या दिवसापासून भाजपाच्या सोबत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. आज राष्ट्रवादी भाजपला विरोध करत आहे पण गरज पडल्यावर हीच राष्ट्रवादी पुन्हा भाजपला पाठिंबा देणार नाही याची शाश्वती नाही. एकंदरीत, पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनमानसतील प्रतिमा बेभरवशाची झाली.


सरकारला विरोध करण्याचं पहिलं काम विरोधी पक्षनेत्याचं असतं. सध्या त्या पदावर राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांचं विरोधी पक्षनेते म्हणून काम काय होतं हा महाराष्ट्र, पत्रकार आणि खुद्द त्यांच्या पक्षातील नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. मध्यंतरी ते स्वतः भाजपात जाणार अशा वावड्या होत्या. आता नगर दक्षिणच्या निमित्ताने पुन्हा तशाच बातम्या येत आहेत. अशा बातम्यांतून जो धुराळा उडतो त्यातून भाजपल लाभच होत आला आहे.


फडणवीस व भाजपने सर्वात जास्त कोणाचं वाईट केलं असेल तर ते म्हणजे राणे कुटुंबियांचं. राणे यांच्यासारखा आक्रमक नेता भाजपची डोकेदुखी बनू शकला असता पण त्यांचा पद्धतशिरपणे खच्चीकरण केलं. आज राणे यांच्यासमोर कसलाही पर्याय नाही. कॉंग्रेस सोडून आल्याने तो मार्ग बंद आहे. भाजपाच्या सोबत राहावं तर मुलाला साधी लोकसभेची उमेदवारीही मिळण्याची शक्यता नाही. सत्तेच्या परिघात आणून उपाशी ठेवण्याचा प्रकार झाला आहे. 


राज ठाकरे यांच्या पक्षाची अवस्थाही फार बरी नाही. जनतेचा त्यांच्या शब्दावर कितपत विश्वास आहे हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला आशीष शेलार यांच्यासारखे भाजपचे प्रमुख नेते राज यांना भेटत असतात. दुसरीकडे मनसे महाआघाडीत जाण्याचा प्रयत्न करत असताना कॉंग्रेस त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही. 


आज महाराष्ट्रात एका अर्थाने विरोधी पक्ष उरलाच नाही. भाजपच्या विरोधात ठामपणे उभा राहील असा विश्वासू पक्ष व नेता भाजपने शिल्लक ठेवला. प्रत्येकाला सत्ता व इतर ‘गाजर’ दाखवून भुलवून ठेवलं गेलं. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे राजकारण केलं त्याच पद्धतीचं राजकारण देवेन्द्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं. 


स्वपक्षातील स्पर्धकांना वादाच्या झोतात ठेवलं. खडसे, मुंडे, तावडे वगैरेना चार वर्षात एकदाही तोंड वर काढू दिलं नाही. आता मुख्यमंत्री अर्जुन खोतकर यांना म्हणाले आहेत ‘तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवायची आहे.’ म्हणजे एकंदरीत दानवे यांचाही पत्ता कट करायचे डाव सुरू झाले आहेत.
असा हा जवळपास पाच वर्षांचा सत्ताकाळ ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सत्तासम्राट बनून राहिले आहेत.

@Late_Night1991  ||  अभिषेक बुचके

अजून राजकीय लेख… 

अन्वयार्थ – तुटलेली नाती, जमलेली युती!

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!