लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणूक २०१९

#अन्वयार्थ #लोकसभानिवडणूक२०१९ #राजकारण  #निवडणूक  #सत्ताकारण  राजकीय_विश्लेषण

Image result for लोकसभा निवडणूक 2019

प्रकाश आंबेडकर अन राज ठाकरे या दोघांचीही भूमिका मोदींवरोधी आहे. म्हणजे ते तरी असं म्हणत आहेत. राज यांना आघाडीत सामील करून घेण्यासाठी मतभेद होते आणि तसं असतांनाही राज यांनी लोकसभा निवडणूक न लढवता आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला.राज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदीना पाडण्यासाठी आघाडीसाठी सभा घेत फिरतील असं दिसत आहे.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांना आघाडीकडून योग्य मतदारसंघ दिले जात असतांनाही प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांसारख्या मोठ्या नेत्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेतला. त्यांच्या या निर्णयाचा कोणाला फायदा होईल हे जगजाहीर आहे.

तिसरीकडे आहेत राजू शेट्टी जे हो नाही करत, एक अधिकची जागा मिळवत आघाडीत सामील होत आहेत. काँग्रेस त्यांच्यासाठी सांगली किंवा वर्धा यापैकी एक मतदारसंघ सोडणार आहे जो काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो.

वर नमूद तीनही नेते मोदींच्या विरोधात लढत आहेत आणि तरीही प्रत्येकाची राजकीय भूमिका वेगळी आहे. यावरून हे स्पष्ट होतं की राजकारण दिसतं तितकं सरळ नसतं.

प्रत्येकाचे स्वतःचे आडाखे अन हेतू असतात त्यानुसार पत्ते टाकले जातात. विचारधारा हवी तशी झुकवली जाते अन मतांचा जोगवा मिळावा म्हणून हवे तसे सोबती मिळवले जातात. हेसुध्दा एक प्रकारचं ‘सुख’ आहे जे नैतिक अनैतिक मार्गाने मिळवलं जातं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!