CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 3

CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 3

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 3

= > WHAT IS DEMAT ACCOUNT, DEPOSITORY AND DP

ह्या क्षेत्रात येणार्‍या प्रत्येकाला Demat Account बाबत बरेच प्रश्न असतात.

ज्या प्रकारे पैसे ठेवण्यासाठी, त्या पैशांचे सुलभरीत्या व्यवहार करता यावेत, केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवता यावी यासाठी बँक खातं असतं त्याचप्रकारे shares जमा ठेवण्यासाठी, ते खरेदी-विक्री करण्यासाठी, share trading च्या व्यवहारची नोंद ठेवण्यासाठी Demat Account ची आवश्यकता असते. एकंदरीत, shares साठीची Bank.

एक प्लॅटफॉर्म/व्यासपीठ ज्या माध्यमातून shares ची देवाण-घेवाण करता येते.

जर तुम्हाला share market मध्ये गुंतवणूक करायची असेल तर Demat Account असणे आवश्यक आहे. यात Shares ची खरेदी-विक्री आणि त्याला लागणारे पैसे याचे व्यवहार Demat Account द्वारेच होतात. जसा बँकेचा अकाऊंट नंबर असतो तसा Demat Account चाही नंबर असतो. एक असतो DP ID आणि एक असतो Trading ID. याबद्दल पुढील भागात सविस्तर माहिती घेऊ.

ज्याप्रकारे Savings Account आपण विविध बँकेत उघडू शकतो, म्हणजे SBI, Axis Bank, HDFC bank त्याचप्रमाणे Demat Account विविध कंपन्याकडे सुरू करता येतं. ते बँकेतही उघडता येतं किंवा Angel Broking, Motilal Oswal, AnandRathi, Sharekhan अशा कंपन्यात broker च्या माध्यमातून सुरू करता येतं. या कंपन्यांना आपण Broker, Brokerage Firm किंवा Depository Participant म्हणतो.

जसे विविध बँकांचे विविध नियम किंवा अटी असतात पण मूळ कार्य एकच असतं त्याप्रमाणे Demat Account कुठेही सुरू केलं आणि तिथे विविध नियम-अटी असल्या तरी त्याचा मूळ हेतु सारखाच असतो.

बँकेत savings account उघडण्याची प्रक्रिया असते जवळपास तशीच प्रक्रिया Demat Account सुरू करताना असते. यात काहीही अवघड नसतं.

काही मूलभूत गोष्टींची पूर्तता केली तर कोणीही Demat Account सुरू करून share बाजारात गुंतवणूक करू शकतं.

या Demat खात्याशी तुमच्या Mutual Fund Policies, Securities, IPO, Insurance व्यवहार संलग्न करता येतात.

ही Demat Account service विविध Depositories कडे अंगीकृत असतात. सध्या भारतात CDSL (Central Depository Service Limited), NSDL (National Securities Depository Limited) या दोन Depositories आहेत. या विविध intermediaries’ मार्फत काम करत असतात. उदाहरणार्थ Angel Broking, Motilal Oswal, Sharekhan वगैरे या Depository Participant (DP) असतात.

एकंदरीत, Depositories ह्या गुंतवणूकदारांच्या securities (shares, bonds, mutual funds) electronic स्वरुपात जपून ठेवते आणि त्यांचा रेकॉर्ड ठेवते. म्हणजे आपले shares CDSL किंवा NSDL या Depository कडे ठेवलेले असतात. बँकेच्या लॉकरप्रमाणे! जेथे प्रत्येकाचा सेपरेट लॉकर अन त्याचा सेपरेट आयडी असतो. जेथे त्याला स्वतःची वस्तु ठेवता येते अन ज्यावर वार्षिक कर आकाराला जातो.

Depository Participant हे गुंतवणूकदार आणि depository यांच्यातील दुवा असतात. आपण जे काही खरेदी व्यवहार करतो ते DP च्या माध्यमातून करतो.

आपल्याला shares खरेदी-विक्री करण्यासाठी जे Softwares किंवा App असतात ते DP देत असते. जे Broker असतात ते DP सोबत संलग्न असतात. CDSL किंवा NSDL या Depositories असोत किंवा DP हे charges घेतात जे Demat Account मधून Debit होत असतात.

सध्या भारतात NSDL आणि CDSL ह्या दोन depositories आहेत.

जर मी माझं Demat Account Angel Broking कडे सुरू केलं असेल आणि Angel Broking ने जर ते CDSL कडे maintain केलं असेल तर माझी Depository आहे CDSL आणि DP झाली Angel Broking.

आता DP ID काय असतो तर ज्याप्रमाणे एखाद्या बँकेचा IFSC Code आणि Account Number असतो त्याप्रमाणे हा प्रत्येक Demat Account चा एक ID असतो. जर तुमचं demat account CDSL अंतर्गत असेल तर 12033200 हा झाला तुमचा DP ID. ज्यांचे account CDSL कडे आहेत त्यांना हा नंबर कॉमन असतो (ज्याप्रमाणे IFSC Number असतो). त्यापुढे 12345678 असा अजून एक नंबर अॅड असतो. म्हणजे एकंदरीत 16 digit number झाला. 12033200-12345678. पुढचे जे 8 digit आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळा असतो. या DP ID वर आपले shares जमा असतात.

Client ID किंवा Trading ID हा आपल्याला Broker कडून मिळालेला असतो. म्हणजे तुमचं Demat Account जर Angel Broking कडे असेल तर त्यांनी हा नंबर दिलेला असतो. मग Angel Broking चे सर्व Apps, Software वगैरे Login करताना वापरला जातो. तुम्हाला Trade करताना हाच ID लागतो.

Demat Account काढण्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते-

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. राष्ट्रीयकृत बँकेत खातं आवश्यक
  4. बचत खात्याचं Updated पासबुक अन चेकबुक
  5. पासपोर्ट साइज फोटो

इत्यादी महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या कंपनीअनुसार त्यांची अकाऊंट ओपेनिंग फी वेगवेगळी असू शकते. सध्या Demat Account सुरू करण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे.

ही प्रक्रिया theoretically समजायला किचकट वाटत असली तरी execution अगदी सोपं आहे. तुम्हाला Demat account सुरू करायचं आहे आणि त्या App मधून shares Buy-Sell करायचे आहेत. बाकीचं DP आणि Depository वगैरे माहितीसाठी आहे. हे नाही समजलं तरी काही हरकत नाही. जसं बँकेत जाऊन तुम्ही पैसे जमा करता काढता किंवा Paytm वरून पैशांचे व्यवहार करतात तसंच आहे हेसुद्धा.

-*-*-*-

CLICK HERE TO OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!