CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 4

CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 4

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 4

= > शेअर कसे खरेदी करावे???

ज्या DP मध्ये // Brokerage कंपनीत (Angel Broking वगैरे) तुम्ही डिमॅट खातं उघडलं आहे त्या कंपनीचे विविध Application Software मोबाइलवर, कम्प्युटरवर घेऊन तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता किंवा तुम्ही जर ब्रोकरकडे जाऊन डिमेट खातं उघडलं असेल तर त्यांना फोन करून शेअर खरेदी-विक्री करायला सांगू शकता. हे दोन्ही पर्याय शेअर खरेदी-विक्री करताना उपलब्ध आहेत.

= > SHARE म्हणजे काय?

बाजारातील Share हा त्या कंपनीच्या मालकीचा हिस्सा असतो. मराठीत त्याला समभाग म्हणतात! कंपनीचे भांडवल वाढावे या हेतूने कंपनीचे shares बाजारात आणले जातात ज्यातून गुंतवणूकदार ते shares खरेदी करतील आणि तो पैसा कंपनीला वापरता येईल.

To Raise Company Capital

कोणत्याही कंपनीत share घेणे म्हणजे त्या कंपनीचा भागीदार होणे. समभाग चा अर्थच तो आहे. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी जो मार्ग आहे त्याला share खरेदी म्हणतात. एकूण shares पैकी आपण ज्या प्रमाणात त्या कंपनीचे shares/समभाग घेतो त्या प्रमाणात आपण त्या कंपनीचे भागधारक होतो. एखाद्या कंपनीचे बाजारात जर एक लाख shares असतील आणि आपण जर त्या कंपनीचे 100 shares खरेदी केले तर आपण आपल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात त्या कंपनीत भागीदार झालो…. भागधारक… अर्थात shareholder

हा share कमी किमतीत खरेदी करून वाढीव किमतीत विकून आपण नफा मिळवत असतो. यालाच शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणतात. ती कंपनी कशी आहे, त्या कंपनीचा व्यवहार कसा आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन ती कंपनी कितपत चांगला परतावा देऊ शकते हे लक्षात घेऊन आपण त्या कंपनीचा share खरेदी करत असतो.

उदाहरणार्थ, Bajaj Auto ही वाहन क्षेत्रातील कंपनी आहे. जर ती कंपनी चांगला व्यवसाय करत असेल तर त्या कंपनीचे वाढ होणार हे तर नक्की. वाढ होणार म्हणजे कंपनीकडे पैसे वाढणार. त्या वाढीत मलाही हिस्सा पाहिजे असेल, त्यात सहभागी व्हायचं असेल तर मी Bajaj Auto चे shares खरेदी करेन. समजा 3000 ही Bajaj Auto च्या एका share ची किम्मत आहे. मी 100 shares घेतले तर मला dividend (हे काय असतं पुढे बघू) मिळेल आणि share ची किम्मत वाढून मला नफा होत राहील. कारण 100*3000 = 300000 इतके पैसे मी कंपनीत लावले आहेत जे पैसे कंपनी भांडवल म्हणून वापरत आहे. जर त्या कंपनीचा share कालांतराने 3100/3200/3300 असा वाढत गेला तर तो विकून मी नफा कमावणार. पण येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 3000 रूपयांचा शेअर वाढतच जाईल असं काही नाही. तो कमीसुद्धा होऊ शकतो. किती? तर शून्य सुद्धा! त्यासाठी चांगल्या कंपनीचे shares खरेदी करणे महत्वाचे!

            समजा माझी एक कंपनी आहे आणि ती खूप उत्तमरीत्या कार्यरत आहे आणि चांगला नफा कमावत आहे. तुम्हाला जर माझ्या कंपनीच्या Growth (वाढ) मध्ये सहभागी होऊन त्यातील नफ्यात भागीदार व्हायचं आहे तर तुम्हाला माझ्या कंपनीचे shares घ्यावे लागतील. समजा माझ्या कंपनीचे दहाच shares आहेत आणि एका share ची किम्मत 100 रुपये आहेत. जर 20 लोकं ते shares माझ्याकडे मागत असतील तर मी म्हणणार की जो मला सर्वाधिक किम्मत देईल त्याला मी माझ्या कंपनीचे shares देईन. तुम्हाला माझ्यावर, माझ्या कंपनीवर आणि नफ्यावर विश्वास असेल तर तुम्ही shares BUY कराल आणि माझ्या कंपनीत भागीदार व्हाल! मग 100*20=2000 इतकं भांडवल मला भेटेल जे मी कंपनीच्या growth साठी वापरेन. जर कंपनी चांगला व्यवहार करू लागली, वाढ करू लागली तर त्या share ला डिमांड वाढेल. गुंतवणूकदार 100 चा शेअर 120 ला घ्यायलाही तयार होतील. मग ज्यांनी तो 100 ला खरेदी केला आहे ते दुसर्‍याला 120 ला विकतील आणि नफा कमवतील.

 

= > खरेदी – विक्री प्रक्रिया

Share बाजारात नव्याने येणार्‍या व्यक्तिला मूलभूत प्रश्न असा असतो की मी जर कुठला share खरेदी करत असेन तर विकणारा कोण असतो अन मी विकत असेन तर खरेदी कोण करतो??

तसं पाहता ह्या तांत्रिक प्रक्रियेशी आपल्याला तसं फार देणं घेणं नसतं. आपल्याला हव्या असलेल्या rate ला तो share आल्यावर खरेदी किंवा विक्री करणे हा महत्वाचा मुद्दा.

पण उदाहरण द्यायचं झालं तर… आपण एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जातो. हवी असलेली वस्तु योग्य दरात मिळत असेल तरच आपण ती विकत घेतो. ती वस्तु मॉलमध्ये त्या कंपनीने त्यांना परवडणार्‍या किमतीत विक्रीला ठेवलेली असते.

मॉल ही जशी खरेदी विक्रीची जागा झाली, देवाणघेवाण करण्याची जागा झाली तसेच shares ची खरेदी-विक्री करण्यासाठी एक जागा असते; आपण त्याला EXCHANGE BOARD म्हणतो. उदाहरण, NSENATIONAL STOCK OF EXCHANGE किंवा BSE – BOMBAY STOCK OF EXCHANGE. यांच्यामार्फत shares ची देवाण-घेवाण होते. असे विविध exchange आहेत.

हे Exchange एक प्रकारचे Platform आहेत जेथे actually shares ची देवाणघेवाण होते. विकणारा त्याला अपेक्षित किमतीला विकतो आणि खरेदी करणारा त्याला अपेक्षित किमतीला खरेदी करतो.

            तुम्हाला PQR हा share हवा असेल तर तुम्ही ब्रोकरच्या मार्फत exchange वर तुम्हाला हव्या असलेल्या किमतीला तो demand करता. आणि पलीकडे तुमच्यासारखाच एक गुंतवणूकदार जर PQR share विकू इच्छित असेल तर तोही exchange कडे त्याला विक्रीस ठेवतो. असे अनेक खरेदी-विक्री करणारे exchange कडे आपआपल्या रेट ला तो खरेदी-विक्रीला ठेवतात. आता जर PQR चा बाजारातील रेट 250 असेल तर खरेदी-विक्री करणार्‍यांना त्याच किमतीच्या आसपासचा रेट द्यावा लागतो. कारण तुम्ही जर 200 रूपयांचा खरेदी रेट टाकला तर विक्री करणारा इतक्या कमी रेट ला तो विकणार नाही कारण त्या share ची बाजार value 250 आहे.

याहून सोप्पं उदाहरण असेल ते निलामीचं! शेतकरी जेंव्हा त्याचा माल कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणतो तेंव्हा त्या मालाची बोली लावली जाते. बोली लावणारे त्यांना परवडणारी/पटणारी किम्मत देऊन बोली लावतात. जो सर्वात जास्त किम्मत करेल अन बोली लावेल आणि जर त्या शेतकर्‍याला तो मान्य असेल तर त्या उत्पादनाची देवाण-घेवाण होते. तो माल किंवा उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी जसे दलाल आणि बाजार समिती पैसे घेते तसेच shares खरेदी-विक्री प्रक्रियेवर brokerage houses (Angel Broking, Motilal Oswal इत्यादी) आणि exchanges (NSE, BSE) त्यावर पैसे आकारतात.

बाजारात विक्रीस आलेला उत्पादन जर दर्जेदार असेल, त्या उत्पादनाला मागणी जास्त असेल व त्याचे विक्रेते कमी असतील तर त्याची किम्मत वाढते. म्हणजे, ते उत्पादन खरेदी करण्यासाठी शंभर खरेदीकर्ते तयार असतील, विक्रेते सात-आठच असतील तर त्यांच्यात चढाओढ लागून सर्वाधिक किम्मत करणार्‍याला ते उत्पादन मिळतं. यानुसारच त्या उत्पादनाची किम्मत ठरते… हेच तंत्र share च्या बाबतीत लागू होतं.

अलीकडील उदाहरण द्यायचं म्हंटलं तर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना दोन लाख कोटींची मदत जाहिर केली. त्यामुळे त्या बँकांची पत सुधारण्यात मदत होणार होती. यामुळे त्या बँकांना नफा व परिस्थिती वाढेल आणि चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा वाढली. या कारणास्तव दुसर्‍या दिवशी अचानक त्या बँकेच्या shares मध्ये खरेदी वाढली, आणि ते त्या shares ची किम्मत वाढली.

ही झाली shares आणि त्याच्या खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया.

यासाठी अजून एक उदाहरण देता येईल. तुम्ही जर तुमची गाडी विकणार असाल तर खरेदी करणार्‍याला तुम्ही ती थेट विकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला RTO मध्ये जाऊन सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. पण RTO काही तुमच्या गाडीची किम्मत ठरवणार नाही. तुम्हाला गाडी कितीला विकायची आहे ते तुम्ही ठरवा; त्या किमतीला खरेदीकर्ता तयार असेल तर तो त्या किमतीला ती गाडी विकत घेईल. पैशांची देवाणघेवाण अन व्यवहार तुमच्या दोघांत होईल, पण तो व्यवहार योग्य मार्गाने अन कायदेशीररित्या पूर्ण होण्यासाठी RTO ही मध्यस्थ यंत्रणा आहे. NSE, BSE हीसुद्धा थोड्याफार प्रमाणात तशीच आहे. तुम्हाला shares किती किमतीला खरेदी-विक्री करायचे आहेत हे तुम्ही ठरवा. त्यात NSE, BSE हे Exchange Board एक विश्वासू मध्यस्थ म्हणून काम करतील.

या भागात आपण Depositories, Depository Participant आणि Exchange याबद्दल माहिती घेतली. या सर्व संस्था शेअर बाजारातील महत्वाच्या संस्था आहेत. यांच्याद्वारेच सर्व कारभार होतो. या सर्वांवर देखरेख ठेवणारी एक संस्था असते. SEBI.

Legal Or Illegal?

ज्याप्रकारे वर्गाला मॉनिटर असतो, महापालिकेला आयुक्त त्याप्रकारे share market अन संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. त्याचं नाव आहे SEBI (Securities & Exchange Board Of India)

SEBI “protect the interests of investors in securities and to promote the development of, and to regulate the securities market and for matters connected there with or incidental there to.”

एकंदरीत, ह्या क्षेत्रात होणार्‍या वाईट गोष्टींना प्रतिबंध लावणे, नियमन करणे, त्यावर देखरेख ठेवणे अन सामान्य गुंतवणूकदारांच्या हक्काचं संरक्षण करणे हे या संस्थेचं काम आहे.

SEBI ही संस्था share बाजारात होणार्‍या अनियमित व चुकीच्या गोष्टींवर प्रतिबंध आणतात. बर्‍याचदा बनावट कंपनी किंवा अन्य मार्गाने या प्रवृत्ती गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावर SEBI देखरेख ठेवत असते. सामान्य गुंतवणूकदारची फसवणूक होऊ नये ही जबाबदारीही SEBI ची असते.

त्यामुळे, सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवायची बाब म्हणजे, येथे आपल्या पैसे सुरक्षित असतात. Share बाजारातील गुंतवणूक ही पैसा बुडवते ही संकल्पना चुकीची आहे. जोपर्यंत गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेत नाही तोपर्यंत share बाजारातील पैसा बुडत नाही; फार तर गुंतवलेला पैसा कमी परतावा देईल, उशिरा परतावा देईल पण तो कायमचा बुडेल हे चूक आहे. योग्य गुंतवणूक करणे, दर्जेदार कंपन्यांचे shares घेणे आणि, चौकशी करून निर्णय घेणे आणि योग्य सल्लागार नेमणे हे आपलं मुख्य काम आहे.

-*-*-*-

CLICK HERE  & OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

 

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!