CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 6

CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 6

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 6

TYPES OF MARKET

= > PRIMARY MARKET 

जेंव्हा एखादी अस्तीत्वात असलेली कंपनी share बाजारात नव्याने उतरत असते, ज्या प्रक्रियेतून त्या कंपनीला भांडवल निर्मिती करता येते, तेंव्हा SEBI च्या परवानगीने ती Stock Exchange मध्ये list होत असते.

सामान्य गुंतवणूकदारांना त्यात सहभाग घेता यावा अन त्या कंपनीचे shares घेऊन कंपनीत भागधारक होता यावे यासाठी ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेला IPO – Initial Public Offer प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेतून कंपनीलाही भांडवल उभं करता येतं. यात कंपनीला स्वतःची सर्व माहिती जाहीर करावी लागते. Share चा दर ठरवलेला असतो. सामान्य गुंतवणूकदार या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

याला primary market म्हणतात. जेथे सामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडून shares खरेदी करून भागधारक होतो.

उदाहरणार्थ, Avenue Supermart कंपनीचा share हा बाजारात नव्याने आणला जात होता.

IPO मधील शेअर BUY करण्यासाठी एक प्रक्रिया असते. त्यासाठी आपल्याला त्या कंपनीकडे जाण्याची आवश्यकता नसते. आपल्या ब्रोकरच्या माध्यमातून तो share खरेदी करता यावा म्हणून IPO चा form भरून तो खरेदी करता येतो. शिवाय, Online प्रक्रियेद्वारेही त्यासाठी apply करता येतं.

खालील लिंकवर अधिक माहिती…

IPO म्हणजे काय ?

 

How to apply for IPO (Initial Public Offering) Online

= > SECONDARY MARKET

ज्या मार्केटमधून गुंतवणूकदार थेट बाजारातून shares खरेदी किंवा विक्री करतो त्याला Secondary Market म्हणतात. म्हणजे, ज्या कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे, त्याचे rates रोज कमी-जास्त होत असतात, जिथे रोज वेगवेगळे खरेदी-विक्री करणारे असतात ते मार्केट म्हणजे Secondary Market.

उदाहरणार्थ, Infosys कंपनीचा share बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. त्याची खरेदी विक्री म्हणजे secondary market.

साधारणपणे, थेट कंपनीकडून shares खरेदी केले जात असतील तर त्याला primary market आणि बाजारातून exchange मार्फत जर shares ची खरेदी-विक्री होत असेल तर त्याला secondary market trading म्हणतात. या दोनहीचे काही फायदे आणि त्रुटी आहेत.

तुलनात्मक… 

  • Primary Market मध्ये shares Buy करण्यासाठी Apply करावं लागतं. येथे Shares मिळतीलच याची खात्री नसते. याउलट, Secondary market मध्ये बाजार भावानुसार तुम्हाला share लागलीच Buy करता येतो.
  • Primary Market मध्ये share Buy केल्यावर त्याला ब्रोकरेज लागत नाही. याउलट, secondary market मध्ये shares Buy केल्यावर ब्रोकरेज लागतं.
  • Primary market मध्ये share Buy करताना त्या कंपनीचा पूर्वेतीहास फार मिळत नाही कारण ती कंपनी नव्यानेच बाजारात येत असते. याउलट, secondary market मध्ये जे shares आहेत त्यांची सर्व माहिती उपलब्ध असते आणि त्याचा आजपर्यंतचे analysis करून भविष्यात तो कसे returns देईल याचा अंदाज बांधता येतो.
  • कंपनी नव्याने बाजारात येत असल्याने Primary Market/IPO मध्ये ते discount price मध्ये मिळवता येतात. त्यामुळे चांगली कंपनी असेल तर ही एक संधी असते. दुसरीकडे, secondary market मध्ये जर share खरेदी करायचा असेल तर तो market price नेच घ्यावा लागतो.

            याशिवाय मार्केटमध्ये derivatives, currency, debentures, bonds हेसुद्धा प्रकार असतात.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!