CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 7

CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 7

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 7

= > TYPES OF INVESTMENT IN SHARE MARKET // Trading Types

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक investor वेगळा investor असतो. प्रत्येकाच्या गुंतवणुकीच्या गरजा, हेतु, कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकजण स्वतःच्या personality आणि rquirement नुसार invest आणि trade करत असतो. त्यात साधारणपणे Intraday, Delivery & Positional असे भाग पडतात.

= > INTRADAY TRADING

या प्रकारात तुम्ही एखाद्या कंपनीचा share आजच खरेदी करता अन आजच विकता. भारतीय Share बाजार सकाळी 9.15 ला सुरू होतो अन दुपारी 3.30 ला बंद होतो. ह्या एकदिवसीय कालावधीत जर share खरेदी केला अन विकूनही टाकला तर त्याला Intraday Trading म्हणतात.

असं करण्याचे काही फायदेही आहेत अन तोटेही. पण Intraday Trading करण्यामागे कमी कालावधीत जास्त पैसे मिळवणे हा हेतु असतो. दिवसाला विशिष्ट income/earning मिळवणे अपेक्षा असेल तर Intraday Trading केलं जातं.

उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी असेल किंवा त्या कंपनीचे आज चांगले त्रैमासिक निकाल (Quarterly Results) अपेक्षित असतील तर सकाळी तो share जास्त quantity ने खरेदी करायचा अन चांगला परतावा मिळताच त्याच दिवसात विकून टाकायचा.

Intraday Trading करताना Technical Analysis हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. साधारणपणे टीव्हीवर (business channels) वर जे Intraday Calls दिले जातात ते यानुसारच दिले जातात.

फायदे-

कमी कालावधीतं चांगल्या परतव्याची शक्यता असते.

Intraday trading करण्यासाठी ब्रोकर किंवा कंपनी तुम्हाला margin (साध्या भाषेत उधारी) देते ज्यात तुम्ही 100 रुपये असतांनाही 1000 रुपयांपर्यंत खरेदी-विक्री करू शकता. पण अट अशी असते की तो trade तुम्हाला त्याच दिवशी संपवावा लागतो.

Intraday Trading साठी brokerage कमी आकारलं जातं. साधारणपणे traded value 0.05% असतं जे खरेदी अन विक्री करताना द्यावं लागतं.

तोटे-

यामध्ये रिस्क अधिक आहे.

दिवसातला पूर्णवेळ (trade पूर्ण होईपर्यंत) तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. कारण त्या share ची किम्मत कमी-जास्त होत असते अन योग्य दर येताच तुम्हाला तो विकावा लागतो.

Intraday Trade त्याच दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. बाजार 3.30 ला बंद होतो, त्यापूर्वी 3.15 ला सर्व Intraday Trades automatically पूर्ण होतात.

Intraday Trading हा शेअर बाजारातील खूप मोठा भाग आहे आणि अभ्यासाचा विषय आहे. यावर माझं स्वतंत्र पुस्तक उपलब्ध आहे.

= > DELIVERY OR POSITIONAL INVESTMENT

सामान्यपणे, एखादा share आज खरेदी करून नंतर विकणे म्हणजे delivery or positional or carry forward or overnight or short term or long term investment. आज share खरेदी करून उद्या, परवा किंवा नंतर कधीही विकणे.

जर भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल किंवा काही कालावधीनंतर चांगला परतावा हवा असेल तर delivery investment केली जाते.

उदाहरणार्थ, नोकरी करणारी व्यक्ति रिटायरमेंट किंवा त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी दहा-बारा वर्षांकरिता गुंतवणूक करत असेल तर ती long term investment असते. आज गुंतवलेला पैसा योग्य वेळी योग्य परतावा मिळेल या अपेक्षेने दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते.

किंवा

आज एखाद्या share मध्ये गुंतवणूक केली अन दहा दिवसांत किंवा दोन महिन्यांत जर चांगला परतावा मिळणे अपेक्षित असेल तर त्याला positional investment/Short term म्हणतात.

उदाहरणार्थ, जर पुढील आठवड्यात देशाच्या economy बाबतीत काही महत्वाची घोषणा होणे अपेक्षित असेल तर आपण त्याच्याशी संबंधित shares घेऊन ठेऊ शकतो जे आपल्याला चांगला परतावा देऊ शकतात. अशा छोट्या कालावधीच्या गुंतवणुकीला Positional Investment म्हणतात. Parallel Income या दृष्टीकोणातून ही गुंतवणूक केली जाते.

फायदे –

या प्रकारच्या गुंतवणुकीत रिस्क कमी असते.

वेळेचा अपव्यय टळतो.

दरम्यानच्या काळात dividend सारखे छोटे फायदे मिळतात.

कंपनी चांगली असेल तर तो share तुम्ही hold करू शकता.

तोटे –

कालावधी जास्त असेल आणि चुकीच्या share मध्ये जर पैसा गुंतवला असेल तर चांगला परतावा मिळत नाही. शिवाय अडचणीच्या काळी जर पैसा हवा असेल आणि काही कारणास्तव त्या कंपनीचा share तोट्यात असेल तर तुमची गुंतवणूक निष्फळ ठरते.

पैसे अडकून राहण्याची शक्यता असते.

Delivery Investment मध्ये brokerage Intraday Trading पेक्षा जास्त असतं. साधारणपणे, ते total traded value च्या 0.3 तो 0.5% असतं जे खरेदी आणि विक्री करताना द्यावं लागतं.

Intraday Trading आणि Delivery Investment यावरच शेअर बाजार आधारलेला आहे. दोन्हीही स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत. याबद्दल सविस्तर माहिती नंतरच्या भागात घेऊ!

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!