CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 8

CHAPTER 3 : MARKET BASICS : Period 8

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 8

=> TRADING & SETTLEMENT // SHARE खरेदी करताना अन विक्री झाल्यावर…

Shares खरेदी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला demat खात्यात पैसे टाकावे लागतात. Demat मध्ये पैसे टाकण्याचे दोन मार्ग आहेत.

  1. एक म्हणजे Online Transfer ह्या प्रक्रियेद्वारे… Digital Way Of Payment

                  यासाठी आधी तुमचं Demat खातं तुमच्या बँकेच्या savings खात्याशी लिंक केलं पाहिजे. शिवाय तुमच्या savings account ला Internet Banking ही सुविधाही उपलब्ध पाहिजे.

  1. Demat खात्यात पैसे जमा करण्याचा दूसरा पर्याय आहे Cheque payment अर्थात Physical Way Of Payment

                  यामध्ये, तुम्हाला brokerage कंपनीच्या नावाने cheque द्यावा लागतो. अर्थात, जर तुमचे Demat Angel Broking कडे maintain असेल तर “angel broking pvt ltd” या नावाने cheque द्यावा लागतो.

 उदाहरणार्थ,

तुमच्या Demat खात्यात जर दहा हजार रुपये असतील तर तुम्ही तेवढ्या किमतीचे कोणतेही shares खरेदी करू शकतात. मागे सांगितल्याप्रमाणे त्या खरेदी किमतीवर brokerage company brokerage आणि सरकार टॅक्स आकारते. Demat खात्यावर पैसे असतील तरच तुम्ही shares खरेदी करू शकतात.

जर तुम्ही आज shares विकले तर विकलेल्या shares ची amount Demat खात्यावर संध्याकाळपर्यन्त दिसेल, पण ते पैसे तुम्हाला दोन दिवसांच्या अवधिनंतर आपल्या savings खात्यात मिळू शकतात. विकलेल्या दिवशी लागलीच पैसे मिळत नसतात. त्याला T + 2 settlement असं म्हणतात.

T + 2 म्हणजे काय ते सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊ. समजा, मी माझी गाडी तुम्हाला 50000 रुपयांना विकून टाकली. तुम्ही मला 50000 रुपये दिले आणि गाडी घेऊन घरी गेलात असं होईल का? नाही…! यासाठी तुम्हाला ती गाडी तुमच्या नावावर करून घेतली पाहिजे. इतके दिवस ती माझ्या नावावर होती ती आता तुमच्या नावावर करायची असेल तर आपल्याला RTO मध्ये जावं लागणार आहे. सगळा सोपस्कार होईपर्यंत दोन दिवस जातात अन मग ती गाडी legally तुमच्या नावावर होते. याचा अर्थ असा होत नाही की ती दरम्यानच्या दोन दिवसात तुम्ही ती वापरू शकणार नाहीत. तुम्ही जर मला माझे पैसे पूर्ण दिले तर ती तुमच्याकडेच राहील. फक्त दोन दिवसांनी तुमच्या नावावर होईल इतकच. तुम्हाला पाहिजे असल्यास दुसर्‍या दिवशी (T +1) तुम्ही ती इतराला 55000 रुपयांना विकू शकता. गाडी तुमच्या नावावर झाल्यावर परत त्या तिसर्‍या व्यक्तीच्या नावावर करू शकता.

यामध्ये लक्षात ठेवायची बाब एकच की T + 2 म्हणजे, कुठलाही share BUY केल्यावर दोन दिवसांनी तो तुमच्या Demat वर जमा होईल. पण तो तुम्ही अगदी दुसर्‍या दिवशीही विकू शकता. आणि जर तो शेअर विकला तर त्याचे पैसे T+2 म्हणजे दोन दिवसांनी saving account वर मिळतील.

त्यामुळे argent गरज असेल तर share बाजार गुंतवणुकीतील पैसे तातडीने मिळतील याची खात्री नसते. पण दोन दिवसांनी संपूर्ण रक्कम तुमच्या savings खात्यावर ट्रान्सफर करता येते.

उदाहरण,

समजा, मला एका मित्राची गाडी आवडली. सोमवारी, मी त्याला 50000 रुपये दिले आणि गाडी विकत घेतली. आता तांत्रिकदृष्ट्या ती गाडी माझी आहे, त्याने ती गाडी मला दिली पाहिजे. पण मंगळवारी RTO वगैरे कामे केल्याशिवाय ती गाडी माझ्या नावावर होणार नाही. त्यामुळे सोमवारी जरी मी ती गाडी विकत घेतली असेल तरी मंगळवारी ती माझ्या नावाने register होईल अन बुधवारी मला मिळेल.

याला T+2 days settlement म्हणतात. Today + 2 days.

यामध्ये समजा, मंगळवारी मला कोणीतरी तीच गाडी 55000 हजारांना मागितली तर ??? तरीही मी ती गाडी त्यांना विकू शकतो. ह्या केसमध्ये, मंगळवारी मी त्यांच्याकडून पैसे घेईन, बुधवारी माझ्याकडे गाडी आल्यावर ती त्याच दिवशी तिसर्‍या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर करेन आणि गुरुवारी त्या गाडीची Delivery त्यांना देईन.

आजपासून दोन दिवस (T + 2) हे येथे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं.

Margin Trading

Shares खरेदीमध्ये दूसरा भाग आहे मार्जिन ट्रेडिंगचा. समजा, तुमच्याकडे जर आधीचेच खरेदी केलेले चाळीस हजारांचे shares आहेत अन दहा हजार कॅश Demat Account ला जमा आहे. तुम्हाला आता पंधरा-वीस हजारांचे shares खरेदी करायचे आहेत. तर brokerage company तुम्हाला तुमच्या आधीच्या shares वर उधारी (margin or leverage position) देते अन तुम्ही पंधरा हजारपर्यन्त (तुमच्या खात्यावर किती किमतीचे shares आहेत यावर ही उधार अर्थात margin amount ठरत असते) खरेदी करू शकता. म्हणजे, फक्त दहा हजार असतांनाही तुम्ही पंधरा हजारांचे shares खरेदी केलेले आहेत. पण दोन दिवसांत राहिलेली रक्कम (ह्या उदाहरणात पाच हजार) तुम्हाला demat खात्यात जमा करावी लागते.

जर तुम्ही उर्वरित रक्कम Dematला जमा केली नाही तर उधार (margin) रकमेवर (म्हणजे पाच हजारची) brokerage company व्याज लावते. एका विशिष्ट कालावधीनंतरही जर तुम्ही पैसे जमा नाही केले तर तुमचे आधीचे shares (Portfolioतील Your Security Holding) परस्पर विकून आपले पैसे वसूल करते. ही सर्व प्रक्रिया आपला Demat खात्यावर होते अन आपल्याला त्या संबंधित सूचना मोबाइल अन ईमेल वर येत असतात. त्यामुळे, आपल्या holding वर जरी नवीन shares उधारीत खरेदी करण्याची सुविधा असली तरी पैसे जमा करता येणार असतील तरच Margin Trading चा लाभ घ्यावा, अन्यथा आहे ती गुंतवणूकही धोक्यात येऊ शकते.

हा सर्व प्रकार बँकेच्या Credit Card सारखा आहे जेथे आपल्या saving खात्यावरील रक्कम, व्यवहार किंवा FD वर ती बँक उधार पैसे देते अन नंतर तुम्हाला ते bill भरावं लागतं. जर तुम्ही ते बिल चुकतं नाही केलं तर बँक परस्पर तुमची FD किंवा savings मधून पैसे वळते करून घेईल.

नजीकच्या काळात जर काही सकारात्मक घटना घडणार असतील किंवा काही news असतील किंवा एखादा शेअर वाढणार आहे याची खात्री असेल तर अशा Margin Trading चा लाभ उचलता येतो. पण investment करताना असे खेळ टाळावेत.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

 अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!